Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, September 9, 2015

१८५७ चा उठाव व महाराष्ट्र

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1. रंगो बापुजी गुप्ते

सातार्‍याचा राजा प्रतापसिंह याचा वकील.
प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला.
यासाठी सतत इंग्लंड मध्ये 12 वर्ष वास्तव्य
इंग्रजांनी मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर इंग्रजांविरुद्ध सशस्त्रं उठावाची योजना रंगो बापूजीने बनवली.
मांग, रामोशी, कोळी, यांना भरती करून छुपे सैन्य उभारले.
सातारा व महाबळेश्वर येथे उठावाची योजना होती.
परंतु उठाव फसला, योजना यशस्वी झाली नाही.
रंगो बापुजी गुप्ते पळून जाण्यास यसस्वी.
2. नानासाहेब व तात्या टोपे :

इंग्रजांविरुद्ध 1857 च्या उठावात भाग
18 एप्रिल 1859 - तात्या टोपेला फाशी
उत्तरेकडील 1857 च्या उठावाला मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.
कोल्हापुरातील उठाव: :

1. जुलै 1857 - 21 व्या आणि 28 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांचा उठाव.
2. डिसेंबर 1857 - कोल्हापूर छत्रपतीला लहान भाऊ चिमा साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव, बेळगाव, धारवाडा, कोन्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना आखली
पण हा उठाव फसला.
वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने सहाय्य केले.
जमाखिंडी संस्थानातील उठाव :

आप्पासाहेब पटवर्धन यांचा सहभाग
बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले.
1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.
मुधोळमधील बेरडांचा उठाव :

1857 ल लागू केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.
या शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.
बेरडांना सार्वजनिक ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.
सुरगाणा संस्थान मधील उठाव :

सुरगाणा संस्थानचा राजा नीळकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून आणला.
इंग्रजांनी उठाव मोडून काढला.
पेठच्या राजाला फाशी दिली.
खानदेशातील भिल्लाचा उठाव: :

सातपुडा भागात
नेतृत्व - काजीसिंग, भागोजी नाईक, शंकरसिंह
1500 पेक्षा अधिक भिल्ल सहभागी
सरकारी खजिना लुटला
इंग्रजांनी उठाव मोडून काढला
औरंगाबादेतील उठाव :

औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम बहसंख्य
मुघल बादशाहाविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुन होते.त्यामुळे उठाव केला.
नेतृत्व - फिदाअली
नागपूरमधील उठाव :

नागपूरमधील मराठे मंडळींची उठावाला फूस
युरोपीयन अधिकार्‍यांची दारूगोळा, तोफा हस्तगत करणे, सीताबर्डीचा किल्ला हस्तगत करणे असे उठावाचे पूर्वनियोजित स्वरूप होते.
या उठावाला भोसले कुळातील बाकाबाई हिचा विरोध
बाकाबाई सारखी माणसे देशद्रोहि राहिल्यामुळे उठाव फसला.

निकष :
- 1857 च्या उठावात मराठी जनतेने भाग घेतला असला तरी त्याचे सहभागीत्व अत्यंत मर्यादित होते. ते महाराष्ट्राच्या विशिष्ट भागापुरते मर्यादीत होते. या भागात राष्ट्रीयत्वाच्या - - भावना तेवड्या प्रखरतेने उदयास आल्या नव्हत्या.

- परकीय राजवटीविरुद्ध चीड, संताप, हा प्रामुख्याने संस्थानिकांत राज्य गमावलेल्या वर्गात होता.आदिवासी जमातीत होता.

- 1857 च्या उठावात मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.
नारायण मल्हार जोशी :

कामगार नेते
All India trade union congress च्या स्थापनेत पुढाकार - 1920
AITUC चे 1925 ते 1929 या काळात general secretary होते.

1931 मध्ये जोशींनी AITUC सोडली & All India Trade union Federation ची स्थापना केली.
AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी ALTUC सोडली.
भारतातील कामगार चळवळ :

1850 ते 1900 भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड. या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.

1900 ते 05 नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.

1920-All India trade union congress ची स्थापना
नारायण मेघाजी लोखंडे

जन्म - 1848 ठाणे
भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते.
महात्मा फुलेचे अनुयायी होते.
Bombay mill hands Association ची स्थापना - 1881 ला.
महाराष्ट्रातील शेतकरी उठाव :

1857 - पुणे व अहमदनगर, सातारा जिल्ह्यात या प्रदेशात अस्तित्वात असलेली महसुलाची पद्धती-रयतवारी
रयतवारी पद्धतीचा दोषाप्रमाणे या भागातील शेतकरी सावकारांच्या तावडीत सापड्लेले
या भागातील सावकार बाहेरून आलेले मारवाडी, गुजराती होते.
1860 च्या दशकात पूर्वार्धात अमेरिकेतील यादवी युद्धमुळे कापसाची निर्यात वाढल्याने कापसाचे भाव वाढत गेले.
1964 मध्ये यादवी युद्ध संपल्यावर कापसाची निर्यात कमी होवून कापसाच

सार्जत योजना १९४४

सार्जत योजना 1944 :

होमरूल लीग आणि महाराष्ट्र :

नेतृत्व - टिळक
1916 च्या बेळगाव बैठकीत होमरूल लीगच्या स्थापनेची घोषणा.
टिळकांच्या होमरूल लीगचे प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि.ल.करंदीकर
टिळकांनी 'केसरी' व 'मराठा' या वृत्तपत्रांतून होमरूल चळवळीचा प्रसार केला.
1917 चे होमरूल लीग अधिवेशन - नाशिक
1917 पर्यंत टिळकांच्या होमरूल लीगचे 33,000 सदस्य होते.
मद्रासचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुब्रंहयणमन अय्यर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना 1917 मध्ये पत्र पाठवून भारताच्या होमरूल चळवळीस सहाय्य करण्याची विनंती केली होती.
टिळकांनी होमरूलच्या प्रचारासाठी 1917 मध्ये जोसेफ बॅप्टिस्ता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इंग्लंडला पाठविले.
फ्रान्सचे पंतप्रधान कलेमेन्शो यांनाही टिळकांनी पत्र पाठवून हिंदुस्थानला स्वराज्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.
टिळकांच्या होमरूल चळवळीत 44% ब्राह्मण तर 55% ब्राम्ह्णेतर होते.
असहकार आणि महाराष्ट्र :

1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकारच्या कार्यक्रमाला मान्यता दिली.
या अधिवेशनात कॉँग्रेस संघटनेच्या विस्ताराला बाल देण्यात आले.
यावर्षी तत्वावर आधारित या प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आल्या.
असहकार चळवळ
महाराष्ट्रात मद्यपनविरोधी चळवळ
Ex - बॅरिस्टर जयकर - 1 वर्ष बहिष्कार घातला न्यायालयांवर.
1920 - लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय - पुणे स्थापना.
साधकाश्रम कडून केशवराव देशपांडे अंधेरी, मुंबई
'मी सहकारी नोकरी करणार नाही' ही शपथ साधकाश्रमात प्रवेश करणार्‍यास घ्यावी लागे.
शेती करण्याचे, सुतकताईचे, दुग्धशाळा चालवण्याचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण.
मुळशी सत्याग्रह - 1921
टाटा कंपनी विरुद्ध
नेतृत्व - बापट, पहिले सत्याग्रही - शंकरराव देव
सुरवातीला अहिंसक नंतर हिंसक वळण
कालावधी 1921-24
1923 - बापटांना 7 वर्ष शिक्षा - ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्याबद्दल.
टिळक स्वराज्य फंड - 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रूपयांचा स्वराज्य फंड गोळा करावा व 1 कोटी लोकांना कॉँग्रेसचे सभासद करून घ्यावे असा संकल्प.
याच चळवळीच्या काळात गांधींनी अर्ध कपड्यांचा त्याग केला.
सविनय कायदेभंग आणि महाराष्ट्र :

दांडी यात्रेत 13 महाराष्ट्र / 79 पैकी
पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकारे, अवंतीकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना.बांदेकर, स.का.पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणे
7 एप्रिल 1930 - सोलापूर सत्याग्रह
12 जानेवारी 1931 - जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, जयकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांना फाशी - येरवडा कारागृहात, पुणे.
शिरोडा सत्याग्रह - 12 मे 1930 - मीठ
वडाळा सत्याग्रह - 17 मे 1930 - मीठ
बिळाशी सत्याग्रह - 5 सप्टेंबर 1930 - जंगल- सत्याग्रह
उंबरगाव - 5 मे 1930 - मीठ - नानासाहेब देवधर, कमलादेवी चट्टोपाध्याय
चिरणेर सत्याग्रह - पनवेल - ठाणे - मीठ
बाबू गेनू - 12 दि. 1930 - मुंबई - वळवादेवी नवीन हनुमान रस्ता येथे बलिदान दिले.
दहीहंडी सत्याग्रह - अकोला - खार्‍या पाण्याच्या विहिरीतून मीठ तयार करून सत्याग्रह केला. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे.
यवतमाळ - बापुजी अणे
नागपुर - नरकेसरी अभ्यंकर
पुसद - 10 जुलै 1930 - जंगल - सत्याग्रह - बापुजी अणे - 6 महीने शिक्षा
शिरोडा सत्याग्रह - आठल्ये, श.द.जावडेकर, विनायकराव मुस्कूटे
याच काळात मुंबईचे हंगामी गव्हर्नर हॉटसन यांच्यावर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील वासुदेव बळवंत गोगटे या तरुणाने गोळ्या झाडल्या. गोगटेला 8 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
1942 - भारत छोडो

मुंबई - सेंट्रल डायरेक्टरेट - भूमिगतांची मध्यवर्ती संस्था - क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा.
भूमिगत चळवळ - अरुण असफअली, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, सानेगुरूजी, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे
मुंबई रेडिओ स्टेशन - उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी
भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील - रायगड परिसरात - सशक्त क्रांतिकारकांची सेना - टाटा पावर केंद्रातून मुंबईला होणारा वीजपुरवठा खंडीत केला.
आझाद दल - नागनाथअण्णा नायकवडी
प्रतिसरकार - क्रांतिसिंह नाना पाटील

सत्यशोधक चळवळीचा नानांवर प्रभाव होता.
वाय.बी. चव्हाण, जी.डी.देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर
1943-46 पर्यंत कार्यरत
प्रभात फेर्‍या, मोर्चे, टेलिफोनच्या तारा तोडणे,रेल्वे रूळ उखडणे, सधन लोकांच्या घरावर दरोडा टाकून पैसा उभारणे.
पुणे - वेस्टएंड आणि कॅपिटल थिएटरला स्फोट बॉम्ब
खानदेश :

साने गुरुजी आणि मधु लिमये मार्गदर्शक
नेतृत्व - उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील
चिमठाने खनिजा लुटला - लीलाताई आणि जी.डी.लाड आणि नायकवडी नागनाथ अण्णा
शिरिषकुमार मेहता - बलिदान - नंदुरबार
अब्दुल रंजवा - भुसावळ - रेल्वे उलथवल्या
विदर्भ :

हिंदुस्थान लाल सेना - मदनल

चालु घडामोडि ३९

चालू घडामोडी - २७ ऑगस्ट २०१५
जीसॅट-६ चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) संवाद उपग्रह ‘जीसॅट-६’चे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक जीएसएलव्ही डी-६ च्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५२ मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रावरून (श्रीहरीकोटा) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
इस्रोने तयार केलेला जीसॅट-६ हा २५ वा भूस्थिर उपग्रह आहे तर जीसॅट मालिकेतील हा १२ वा उपग्रह आहे. हा उपग्रह ९ वर्षे कार्यरत राहणार आहे.
नियोजित मार्गावरून अचूक मार्गक्रमण करत 'जीएसएलव्ही'ने उपग्रहाला १७ मिनिटांत १६८ किलोमीटर बाय ३५९३९ किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित केले.
त्यानंतर तात्काळ उपग्रहावरील सौरपंखे उघडले जाऊन त्याच्याशी संपर्क प्रस्थापित झाला. यानंतर उपग्रहावर बसवण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या साह्याने 'जीसॅट ६'ला ३६ हजार किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पाठवण्यात येईल.
इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरणकुमार
प्रकल्पाचे संचालक : आर. उमामहेश्वरन
 ‘जीसॅट-६’ ची वैशिष्ट्ये
उपग्रहाचे वजन : २११७ किलो (११३२ किलो इंधनाचे वजन + ९८५ किलो मूळ उपग्रहाचे वजन)
वैशिष्ट्य : या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास ६ मीटर आहे.
कार्य : जीसॅट-६ हा उपग्रह एस बँड व सी बँडच्या दूरसंचार यंत्रणेसाठी वापरला जाणार आहे.
वापर : या उपग्रहाचा वापर प्रामुख्याने लष्करासाठी केला जाणार आहे.

 जीएसएलव्ही
हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्त्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. जीएसएलव्ही (जिओस्टेशनरी सॅटेलाइट लाँच व्हेईकल) प्रक्षेपकाचे हे एकूण नववे उड्डाण आहे.
स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने जीएसएलव्हीने केलेले हे दुसरे यशस्वी उड्डाण आहे. १५ एप्रिल २०१० रोजी एका अयशस्वी उड्डाणानंतर ५ जानेवारी २०१४ ला क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने केलेले उड्डाण यशस्वी झाले होते.
त्यानंतर २७ ऑगस्ट २०१५ रोजी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनासह इस्रोच्या जीएसएलव्ही डी-६ प्रक्षेपकाने जीसॅट-६ उपग्रह यशस्वीपणे कक्षेमध्ये सोडला. इस्रोच्या वतीने प्रक्षेपित करण्यात आलेला हा पंचविसावा संवाद उपग्रह आहे.
स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि फ्रान्सनंतर फक्त सहावा देश आहे.
‘जीएसएलव्ही डी-६’ची वैशिष्ट्ये
व्यास : ३.४ मीटर लांबी : ४९.१ मीटर वजन : ४१६ टन

नवी संघटना womens -20 (W-20)

नवी संघटना:-
वूमन्स-२० (W20)
---------------------------------------------------------------------------------------
• आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी २० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली
• जी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते
• गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
• वूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे
* वूमन्स-२० चे स्वरूप
• जी २० समुहात असणार्या २० देशातील महिला वूमन्स २०मधील प्रतिनिधी राहतील
• त्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला
• सामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला
• राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील
* सदस्य देश
अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राज़ील, कॅनाडा, चीन, फ़्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान मेक्सिको, रशिया , दक्षिण अफ़्रीका, सौदी अरेबिया दक्षिण कोरिया, तुर्कस्थान ,इंग्लंड ,अमेरिका आणी यूरोपीयन युनियन

English उच्चार साधर्म्य शब्द

1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे

2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त

3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे

4) celler - तळघर
seller -विक्रेता

5) once - एकदा
one's - एखाद्याचा

6) sit - बसणे
seat - आसन

7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे

8) test - चाचणी
taste - चव

9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा

10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता

11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन

12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला

13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे

14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास

15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे

16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)

17)meat - मटण
meet - भेटणे

18)leave - सोडणे
live - राहणे

19)piece - तुकडा
peace - शांतता

20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक

21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य

22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा

23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर

24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल

25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी

26) deed - कृत्य
did - केले

27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप

28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे

29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल

30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन

31) fell - पडणे
fail - नापास

32) story - गोष्ट
storey- मजला

33) slip - घसरणे
sleep - झोपणे

34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे

35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी

36)hit - टोला मारणे
heat - उष्णता

37) of - चा, ची चे
off - बंद करणे

38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ

39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी

40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे

41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य

42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे

43) deed - कृत्य
did - केले

44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत

45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)

46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो

47) liver - यकृत
lever - तरफ

48) tent - तंबू
taint - कलंक , दोष

49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड

50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे

51) list - यादी
least - कमीत कमी, किमान

52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,

53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही

54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती

55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन

56) lip - ओठ
leap - उडी मारणे

57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा

58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य

59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण

60) root - मूळ
route - मार्ग

61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख

62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे

63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे

64) night - रात्र
knight - सरदार

65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा

66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)

67) male - पुरूष
mail - टपाल, कवच

68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे

69) let - परवानगी देणे
late - उशीर

70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट

71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)

72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर

73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग

74) thirst - तहान
thrust - खुपसणे

75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध

76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप

77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल

78) it - तो, ती ते
eat - खाणे

79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा

80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा

82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष

83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी

84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात

85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला

86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे

87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे

88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे

89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक

90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान

91) not - नाही
knot - गाठ

92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन

93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा

94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय

95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग

96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण

97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल

98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी

99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण

100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ
=======================

Monday, September 7, 2015

चालु घडामोडी ३८

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2015)
चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2015) :

नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर वर्षभरात 37 कोटी रुपये खर्च :

पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून परदेश दौऱ्यांसाठी चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर वर्षभरात 37 कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.
 या दौऱ्यांत ऑस्ट्रेलिया दौरा सर्वांत महागडा होता.
 माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मोदींच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती मागविण्यात आली होती.
 भारतीय दूतावासांनी या अर्जावर दिलेल्या माहितीनुसार मोदींनी जून 2014 ते जून 2015 या वर्षभरात केलेल्या दौऱ्यांवर 37.22 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
 तसेच या वर्षभरात मोदींनी 20 देशांचा दौरा केला आहे.
 मात्र, जपान, श्रीलंका, फ्रान्स आणि दक्षिण कोरिया देशांच्या दौऱ्याची माहिती देण्यात आलेली नाही.
 या दूतावासांतून मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी आणि चीन या देशांच्या दौऱ्यादरम्यान सर्वाधिक खर्च झाला आहे.
 तर, भूतान दौऱ्यावर सर्वांत कमी म्हणजेच 41.33 लाख रुपये खर्च झाला. मोदींनी 365 दिवसांपैकी 53 दिवस परदेशात घालविले आहेत.

मेनसाला बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण :

बारा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीने इंग्लंडमध्ये मेनसा बुद्धिमापन कौशल्य चाचणीत सर्वाधिक 162 गुण मिळवून थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे टाकले.
 दीडशे मिनिटांत तिने 162 गुण मिळवले.
 तिला गणित, भौतिक विज्ञान आणि रसायनशास्त्रात रस होता. मेनसा (एमइएनएसए)ने आयोजित कॅटेल थ्री बी पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळाले.
 तसेच या परीक्षेतील प्रश्‍न तिने काही मिनिटांतच सोडविले.
 हॉकिंग आणि आइन्स्टाइन यांचा बुध्यांक 160 इतका आहे, तर लॅडियाचा 162 आहे.

वन रँक, वन पेंशन

वन रॅंक, वन पेन्शन योजना
वन रॅंक, वन पेन्शन योजना :

'समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन' (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) या मागणीसाठी माजी सैनिकांच्या गेली 40 वर्षे सुरू असलेल्या लढ्याला आज अखेर यश आले.  
 ‘वन रॅंक, वन पेन्शन’ संकल्पना म्हणजे, सैन्य दलात समानकाळ सारख्याच पदावर सेवा केलेले दोन माजी सैनिक जरी वेगवेगळ्या वेळी निवृत्त झाले, तरी त्या दोघांना सारखीच पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळणे होय.
 ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
 चार दशकांपासून 'ओआरओपी'ची मागणी प्रलंबित होती. हा संतापाचा मुद्दा होता.
 'यूपीए' सरकारने फेब्रुवारी 2014 मध्ये 'ओआरओपी'ची अंमलबजावणी 2014-15मध्ये होईल, असे म्हटले होते; पण अंमलबजावणी कशा प्रकारे होईल, त्यासाठी आर्थिक तरतूद किती असेल, याचा स्पष्ट खुलासा केला नव्हता.

निवृत्ती वेतनासाठीचे नियम :

सेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या पन्नास टक्के. यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची 20 वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची 15 वर्षे सेवा आवश्‍यक
 सामान्य कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या तीस टक्के. कमीत कमी 3,500 रुपये (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास)
 विशेष कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या साठ टक्के. कमीत कमी 7 हजार रुपये.(कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास)
 उदार कुटुंब निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराइतके. अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास.
 अपंग निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या तीस टक्के. शंभर टक्के अपंग असल्यास कमीत कमी 3100 रुपये
 युद्धजखमी निवृत्तिवेतन : युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास शेवटच्या पगाराइतके. तसेच, अपंग होण्याच्या प्रमाणानुसार निवृत्तिवेतन कमी.

तरतुदी :

1 जुलै 2014 पासून होणार अंमलबजावणी
 थकीत रक्कम सहा महिन्यांच्��

प्रंतप्रधानांनी चालु केलेल्या योजना

*****************************

1~प्रधानमंत्री जन~धन योजना~28 अगस्त 2014

2~डिजिटल इंडिया~21 अगस्त 2014

3~मेक इन इण्डिया~25 सितम्बर 2014

4~स्वच्छ भारत मिसन~2 अक्टूबर 2014

5~ सांसद आदर्श ग्राम योजना~11 अक्टूबर 2014

6~श्रमेव जयते~ 16 अक्टूबर 2014

7~जीवन प्रमाण(पेंसन भोगियों के लिए)~ 10नवम्बर 2014

8~मिसन इंद्र धनुष(टीकाकरण)~ 25दिसम्बर 2014

9~निति(niti) आयोग~1 जनवरी 2015

10~पहल(प्रत्यक्ष हस्तांतरण)~ 1 जनवरी 2015

11~ह्रदय(समृध्दसांस्कृतिक विरासत संरक्षण वकायाकल्प)~21जनवरी 2015

12~बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ~22 जनवरी 2015

13~सुकन्या समृध्धि योजना~22 जनवरी 2015

14~मृदा स्वास्थ कार्ड~19 फरवरी 2015

15~प्रधानमंत्रीकौशल विकाश~20 फरवरी 2015

16~प्रधानमंत्रीजीवन ज्योति~9 मई 2015

17~प्रधानमंत्रीसुरक्षा बीमा ~9 मई 2015

18~अटल पेंसन योजना~9 मई 2015

19~उस्ताद(usttad)(अल्पसंख्यक कारीगर)~ 14 मई2015

20~कायाकल्प(जन स्वास्थ)~15 मई 2015

21~डीडी किसान चैनल~26मई 2015