Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, January 13, 2016

चालु घडामोडी ७२

#चालू #घडामोडी
:------------------------------------------------------------------------------------

१) २०१५ या वर्षाची अंतिम लोक अदालत कोणत्या दिवशी पार पडली:-१२ डिसेंबर ( नवी दिल्ली येथे)

२) नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यावेतनात किती टक्के वृद्धी केली आहे:- २३.५%

३) नोव्हेंबर २०१५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची थीम ---------------ही होती:- मेक इनइंडिया

४) नोव्हेंबर २०१५ मध्ये आसीयानचे २७वे शिखर सम्मेलन कोठे पार पडले ? :- कुआलालम्पूर (मलेशिया)

५) नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टरई यांनी कोणता नवा पक्ष स्थापन केला ? :- नया शक्ती

६) जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर २०१५ मध्ये कोणता देश इबोला मुक्त देश म्हणून घोषित केला :- सिएरा लियाॅन

७) जी २० देशाचे नोव्हेंबर २०१५ मध्ये -------------- येथे शिखर सम्मेलनआयोजित केले होते ? :-अंताल्या ( तुर्की)

८) चिली मध्ये संपन्न झालेल्या फिफा अंडर १७ फुटबॉल विश्व कप स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :- नायजेरिया

९) निवड
सुनील कनोरिया:- असोचैम चे नवे अध्यक्ष
हर्षवर्धन नेओतिया :- फीक्की चे नवे अध्यक्ष
विजय गोखले:- चीन मधील राजदूत
अनिल वाधवा:- इटली मधील राजदूत

१०) चर्चित पुस्तके
द स्टोरी ऑफ माय लाईफ:- हेलेन केलर
व्हाट हैपण्ड टू नेताजी :- अनुज धरद
मॉडर्ण गुरुकुल :- सोनाली बेंद्रे
हिटलर:- बायोग्राफी:- पीटर लोनग्रीच

७३ गोल्डन ग्लोब अवार्ड

* ७३ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार २०१६:-
--------------------------------------------------------------------------------------------
* बेस्ट मोशन पिक्चर्स ड्रामा:-
सर्वोत्कृष्ट चित्रपट:- द रेव्हनंट
सर्वोत्कृष्ट अभिनेता:- लिओनाडरे डी कॅप्रिओ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकल-अलेजांड्रो गोंझालेझ इनारिटू ( द रेव्हनंट )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- ब्री लार्सनला (चित्रपट:- रूम)
* म्युझिकल किंवा कॉमेडी श्रेणी:-
सर्वोत्कृष्ट चित्रपट:- द मार्शियन
सर्वोत्कृष्ट अभिनेता :-मॅट डॅमन (चित्रपट:-द मार्शियन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:-जेनिफर लॉरेन्सने (जॉय’ ) ४ दा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला
उत्कृष्ट सहायक अभिनेता:-सिल्वेस्टर स्टॅलोन
* गायीका लेडी गागा हिला पहिल्यांदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला " अमेरिकन हाॅरर स्टोरी होटल मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा (टीव्ही) पुरस्कार मिळाला

Monday, January 11, 2016

चालु घडामोडी ७१

चालू घडामोडी (10 जानेवारी 2016)
चालू घडामोडी (10 जानेवारी 2016) :

दारूगोळ्याची संशोधकांकडून यशस्वी चाचणी :

भारताचा सर्वाधिक शक्तिशाली रणगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनसाठी तितकेच ताकदवान तोफगोळे तयार करण्यात आले असून, आज संरक्षण संशोधकांनी याची यशस्वी चाचणी घेतली. 
 ओडिशातील चांदीपूर येथे ही चाचणी घेण्यात आली असून या वेळी रणगाड्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
 पुण्यातील "डीआरडीओ"च्या लॅबोरेटरीज आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आणि हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च या संस्थांनी हा दारूगोळा तयार केला आहे. 
 तसेच हा दारूगोळा तयार केला जात असताना प्रयोगशाळेत प्रत्येक टप्प्यावर त्याच्या तीव्रतेच्या चाचण्या घेण्यात आल्या. 
 दारूगोळ्याचे भारतातच मूल्यमापन करण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अर्जुनचे बळ कित्येक पटीने वाढणार आहे. 

नव्या राज्यघटनेसाठी श्रीलंकेमध्ये प्रक्रिया सुरू :

देशासाठी नवी राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेला श्रीलंकेच्या संसदेमध्ये सुरवात झाली. 
 सर्व सदस्यांचे मिळून घटना मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेमध्ये सादर केला.
 घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी सर्व सदस्यांचा सहभाग आवश्‍यक असून, त्यावर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी 17 सदस्यांची नियुक्ती करावी, असे विक्रमसिंघे यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. 
 अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असलेली 1978 मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेऐवजी नवी राज्यघटना अस्तित्वात आणली जाणार आहे. 

नेताजींच्या मृत्यूबाबतच्या प्रत्यक्षदर्शींची जबानी प्रसिद्ध :

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातातच मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ प्रत्यक्षदर्शींनी दिलेली जबानी प्रसिद्ध केली आहे.
 सुभाषबाबू आणि इतर तेरा ते चौदा जणांना घेऊन जाणाऱ्या जपानच्या हवाई दलाच्या विमानाने व्हिएतनाममधील टर्बन येथून 18 ऑगस्ट 1945 ला उड्डाण केले होते. या विमानामध्ये जपानचे लष्करी अधिकारी ले.  जन. सुनामासा शिदेई हेसुद्धा होते. 
 www.bosefiles.info या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. 
 तसेच या अपघाताची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीसमोर साक्षीदारांनी दिलेली माहिती संकेतस्थळावर आहे. 

मंत्रालयात 'सिंगल विंडो सीएसआर सेल' स्थापन करा :

राज्यातील सामाजिक प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला केली. 
 उद्योगजगताला ज्या क्षेत्रात सीएसआर निधीचा वापर करण्यात स्वारस्य आहे, त्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची मुभा त्यांना मिळावी, जेणेकरून त्यांना त्या कामाची व्यवहार्यता तपासता येईल, अशी सूचना राज्यपालांनी केली.
 सीएसआर कार्यक्रमांतर्गत उद्योगजगताकडून सरकारकडे येणाऱ्या विविध प्रकल्पांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी तसेच त्यांना आवश्‍यक सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एका विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती  केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
 हा अधिकारी सरकार आणि उद्योगजगत यांच्यात समन्वय साधण्याचे काम करील.

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू :

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर नव्या सरकारच्या स्थापनेला विलंब होत असल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
 राज्याचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे, केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यात राज्यपालांची राजवट लागू करण्याची केलेली शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली.

कृष्णविवर शोधण्याची नवी पद्धती विकसित :

भारतीय वंशाच्या एका अमेरिकी प्राध्यापकाच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने कृष्णविवर शोधण्याची नवीन पद्धती विकसित केल्याचा दावा केला आहे. 
 ते छोटी आकाशगंगा शोधण्यात आणि आकाशगंगेत असलेल्या बाहेरील थरातील तरंगाचा तपशील देईल.
 रोसेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील सहायक प्राध्यापक सुकन्या चक्रवर्ती यांनी आकाशगंगेतील अंतर्गत संरचना आणि द्रव्यमान मोजण्यासाठी आकाशगंगेच्या डिस्कमधील तरंगाचा वापर केला. 
 या संशोधनाचे निष्कर्ष चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष अ‍ॅस्ट्रोफिजिकल रिसर्च लेटर्सकडे सोपविण्यात आले आहेत. 
 अदृश्य पार्टिकलला कृष्णविवर किंवा डार्क मॅटर म्हटले जाते. त्यात या ब्रह्मांडाचा 85 टक्के भाग सामावला आहे. 

सोनाली कुलकर्णी 'सखी मंच'ची 'ब्रँड अ‍ॅम्बेसिडर' :

विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने 'सखी मंच'हा उपक्रम सुरू केला.
 महिलांचे केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांना यामधून काही तरी शिकता यावे, त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. 
 यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते. यंदाच्या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लोकमत सखी मंचची 2016-17 वर्षांसाठी अ‍ॅम्बॅसिडर असणार आहेत.

ट्विटर संदेशाची अक्षर मर्यादा दहा हजार पर्यंत करणार :

ट्विटर या मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळावरून पाठवल्या जाणारया संदेशांची अक्षर मर्यादा आता 140 वरून दहा हजार करण्याची शक्यता आहे, सध्या या ब्लॉगचे असलेले 30 कोटी वापरकत्रे त्यामुळे वाढतील अशी अपेक्षा आहे. 

दिनविशेष :

मार्गारेट थॅचर दिन : फॉकलंड द्वीप
 1840 : इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
 1920 : जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.

Monday, January 4, 2016

२०१५ सर्व प्रादेशिक घडामोडी

मागोवा २०१५
प्रादेशिक घडामोडी
:-----------------------------------------------------------
------------------------
जानेवारी २०१५:-
• पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
वंसतगोवारीकर यांचे निधन
• केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
यांची महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून
नियुक्ती
• शिवसेना आमदार प्रकाश /बाळा सावंत यांचे निधन
• स्क्रीन पुरस्कार:-
सर्वोत्कृष्ट चित्रपट:- विटी दांडू
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:- लक्ष्मण उतेकर (टपाल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता :- शाहिद कपूर (हैदर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- प्रियांका चोप्रा
• राज्यात राबविण्यात येणाऱ्या ई- गव्हर्नन्स प्रकल्पामध्ये
यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर
• प्रभात फिल्म कंपनीच्या तत्कालीन
बालकलाकार व हिंदी चित्रपटात अभियनाचा टसा
उमटविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री बेबी
शंकुतला यांचे निधन
• शेतकर्याना लागू असलेला ऊस खरेदी करमाफ
• चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचा राज्य
सरकारचा निर्णय. वर्धा गडचिरोली नतर चंद्रपूरहा
महाराष्ट्रातील दारूबंदी असलेला तिसरा
जिल्हा
• इयत्ता पहिलीकरीता
प्रवेशाची वयोमर्यादा ५ वर्षाऐवजी १
वर्षानी वाढवत ती सहा वर्ष
केली
• अरबी समुदातील छत्रपती
शिवाजी महाराजाच्या स्मारका संबधी स्थापन
केलेल्या कृती समितीच्या
अध्यक्षपदीविनायक मेटे यांची निवड
• मराठी साहित्यातील सर्वोच्य
सन्मानमानला गेलेला जनस्थान पुरस्कार यंदा अरुण साधू यांना
जाहीर
• मार्मिक भाष्यकार व लेखक आर. के. लक्ष्मण यांचे निधन
• राज्य शासनाच्या वलीने दिनकर रायकर (२०१३)
जेष्ट पत्रकार विजय कुवळेकर (२०१२) आणी ल.
मा. जोशी (२०११) यांना लोकमान्य टिळक
जीवनगौरव पुरस्कार
---------------------------------
फेब्रुवारी २०१५:-
• सरक्षण मंत्री मनोहर परीकर यांच्या
हस्ते महाराष्ट्राच्यापंढरीची
वारीया चित्ररथाला (गणराज्य दिनानिमित्त)प्रथम
क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
• मराठी सहित्यातील गेली चार
दशके आपल्या लेखनशैलीचे वेगळे पीठ
निर्माण करणारे जेष्ट सहित्यक समीक्षक भालचंद्र
नेमाडे यांना २०१४ चाज्ञानपीठ सन्मान
जाहीर
• विनोदी अभिनेते म्हणून ठसा उमटवणारे जेष्ठ
रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचे निधन
• शासकीय महाविद्यालयात अध्यापकाचे
निवृतीचे वय ६३ वरून ६४ वर्ष
• कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या
वर कोल्हापुरात गोळीबार
• माजी उपमुख्यमंत्री व
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील
यांचे निधन
• द. मा ,मीरसदार यांना राज्य सरकारच्या
मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा २०१४ चा
कविवर्य विदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार
जाहीर
• ज्येष्ठ अभिनेते अजय वढावकर यांचे वयाच्या ५५ व्या
वर्षी निधन
• ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांचे
निधन
---------------------------------
मार्च २०१५:-
• गेल्या १८ वर्षापासून रेगाळलेल्या गोहत्या बंदी
विधेयेकावर राष्ट्रपतीप्रणव मुखर्जी
यांची स्वाक्षरी
• माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक
चव्हाण यांची प्रदेश कॉंग्रेसच्या
अध्यक्षपदी नियुक्ती
• मुस्लीम समाजाला सरकारी
नोकरी व शैक्षणिक संस्थामधील
प्रवेशासाठी ५% आरक्षणाचा निर्णय सरकारने रद्द
केला
• जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याच्या महिला
आणी बालविकास खात्याने बेटी बचाओ,
बेटी पढाओ अंतर्गत भागश्री सुकन्या
योजना जाहीर
• महाराष्ट्र टाईम्सचा यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ना. धो.
महानोर यांना जाहीर
• विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख
यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर
• विधान परिषदेचे सभापतीपदी
राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांची बिनविरोध
निवड
• गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा हे
गीत महाराष्ट्राच्याकानाकोपर्यात पोहचवीणारे
आद्य प्रवर्तक लोकशाहीर कृष्णराव साबळे यांचे
निधन
• पुण्यभुषण फौंडेशनचा २०१५ चा पुण्यभूषन पुरस्कार सकाळचे
अध्यक्ष प्रतापराव पवार यांना जाहीर
• चैतन्य ताम्हाने दिग्दर्शित कोर्ट हा चित्रपट २०१४ चा
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट
ठरला.परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ
एकादशी या चित्रपटास सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचे
सुवर्णकमळ
---------------------------------
एप्रिल २०१५:-
• सरक्षण साहीत्य निर्मितीमध्ये
स्वत:चे सरक्षण उत्पादन धोरण तयार करण्यात पुढाकार घेणारे
महाराष्ट्र पहिले राज्य ठरले
• ज्येष्ठ तबलावादक व तालयोगी प . सुरेश
तळवळकर. दिलीप प्रभावळकर. डॉ भालचंद्र नेमाडे,
अनिलकपूर, कुमार केतकर यांना मास्टर दीनानाथ
मंगेशकर पुरस्कार जाहीर
• राज्यशासनाच्या वतीने देण्यात येणारा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यंदा
जेष्ठ सिने छायाचीत्रकार सूर्यकांत लवटे यांना तर
राजकपूर जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ
अभिनेत्री शशिकला यांना जाहीर
---------------------------------
मे २०१५:-
• राज्य सरकारचा सर्वोच्य महाराष्ट्रभूषण पुरस्कार बाबासाहेब
पुरंदरे यांना जाहीर
• १००% आदिवासी लोकसंख्या असलेल्या
ग्रामपंचायतीना आर्थिक स्वायत्ता देण्याचा
आदिवासी विभागाचा निर्णय
• जेष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे व्याखाते आणी
मराटीशाहीचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचे
निधन
• आई रिटायर होते, सातव्या मुलीची
सातवी गोष्ट, शामची मम्मी
अशा नाटकापासून अंधातर श्रीमान
श्रीमती अशा
सीरीयल्स्ने दूरदर्शनचा काळ गाजणारे
लेखक अशोक पाटोळे यांचे निधन
• गेल्या १० वर्ष ठप्प असलेल्या भूविकास बँकाच्या कारभार
गुडांळण्याचा निर्णय
• औरंगाबाद आणी डून होंग या शहरादरम्यान सिस्टर
सिटीचा करार
• केंद्राच्या नीती आयोगाच्या
शिफारशीनुसार राज्यात विशेष कृती
दलाची स्थापना
• वार्डबाॅय कडून झालेली अमानुष मारहाण व
बलात्कारामुळे ४२ वर्ष कोमात गेलेल्या व केईएम रुग्णालयाच्या
वार्डक्रमांक ४ मध्येकायमचे वास्तव असलेल्या अरुणा शानबाग यांचे
निधन
• पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांचे निधन
---------------------------------
जून :-२०१५
• राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेतेगोविंदराव आदिक यांचे
निधन
• पुण्यातील फिल्म व
टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट
सोसायटी ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी
गंजेन्द्र चौहान यांचे निधन
• शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरूपदी डॉदेवानंद शिंदे यांची निवड
• कोल्हापूरच्या राजर्षी शाहु मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला
जाणारा शाहु पुरस्कार यंदा जेष्ठ समाजवादी नेते भाई
वैद्य यांना जाहीर
• जेष्ठ पत्रकार . लेखक प्रफुल बिदवाई यांचे निधन
• साने गुरुजींच्या धडपडनाऱ्या मुलांपैकी एक
असलेले व उन्तुंग आमुचीउत्तर सीमा,
माझे राष्ट्र महान यासारख्या देशभक्तीपर
गीतांनी राष्ट्रप्रेम जागवणारे
शाहीर लीलाधरहेगडे यांना सहित्य
अकादमीचा २०१५ चाराष्ट्रीय बालसहित्य
सन्मान जाहीर
---------------------------------
जूलै २०१५:-
• मायर्क्रोसोफ्टने राज्यात स्मार्टवसाहत, व पुण्यात सुरक्षा केंद्र
उभारण्याचे जाहिर केले
• शंभर वर्षाहून अधिक जुने असलेल्या महाविद्यालयाचा वारसा
जपण्यासाठी आणी
संवर्धण्यासाठी देशातील १९ शैक्षणिक
संस्थाना वारसा महाविद्यालय म्हणून मंजुरी
• राज्यातील सर्व पोलीस ठाणी
ऑनलाईन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले
• राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने प्रसिद्ध केलेल्या
अहवालानुसार गेल्या वर्षात भारतात सरासरी प्रत्येक
तासाला १५ जणांची आत्महत्या झाल्या असून यामध्ये
महाराष्ट्र आगाडीवर. चेन्नईमध्ये सर्वाधिक
आत्महत्या
• टचाईमुक्त महाराष्ट्रासाठीराज्य सरकारने
हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानच्या कामात
सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर
• सर्वाधिक विदेशी गुंतवणूक खेचनाऱ्या
देशातील पाच राज्यात महाराष्ट्र क्रमांकावर,
देशातील थेट परकीय
गुंतवणुकीच्या प्रमाणात मागच्या वर्षीच्या
तुलनेत (२०१४- १५ ) २७ टक्क्यांनी वाढ
---------------------------------
ऑगस्ट;-२०१५
• केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी
अभियनकरीता मुंबई,नवी मुंबई, पुणे
पिपरी चिंचवड, नाशिक ठाणे अमरावती
सोलापूर नागपूर कल्याण डोंबवली व औरंगाबाद या ११
शहरांची निवड
• कर्करोगावरील उपचारासाठीची
१०६ औषधे करमुक्त
• साहीत्य व संस्कृती मंडळाच्या
अध्यक्षपदी जेष्ठ प्रकाशक बाबा भांड तर भाषा
सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी डॉ
सदानंद मोरे यांची निवड
• स्वच्छ भारतअभियानात पहिल्या पहिल्या दहा शहरामध्ये
कर्नाटकमधील तीन शहरानी
स्थान मिळवले म्हैसूरन नेपहिला क्रमांक पटकावला तर
नवी मुबई तिसरा क्रमांक पटकावला
• वाघाच्या संवर्धनासाठी अभीनेते अमिताभ
बच्चनयांची व्याघ्रदूत म्हणून निवड
• ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक भानुदास महाराज
देगलूरकर यांचे निधन
• टंचाईग्रस्त शहरासाठी पाणीपुरवठा
करण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजना राबविण्याचा
निर्णय घेतला राज्यातील ४३ शहरांचा समावेश
• कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी
कुप्पाळी वेंकटप्पा पुटूप्पा यांच्या
स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा या
वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ
कांदबरीकार श्याम मनोहर यांना जाहीर
• महाराष्ट्रातील नागपूर, कल्याण,-
डोबिंवली, ठाणे, औरंगाबाद, नादेंड
आणीशिर्डी तसेच गोव्यातील
पणजीसह ६० शहरे अपरपरिक व
नवीकरणीय उर्जा मंत्रालयच्या सौर शहर
योजनेअंतर्गत विकसीत केले जाणार
---------------------------------
सप्टेंबर:-
• गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ
.नामदेव कल्याणकर यांची निवड
• जपानच्या कोयासन विद्यापीठात डॉ बाबासाहेब
आबेडकर यांच्या पूर्णकृतीपुताळयाचे अनावरण
• पुण्यातील उद्योगजग सायरस पूनावालायांनी
मुंबईतील प्रसिद्ध लिंकन हाऊस ही
आलिशान वास्तू ७५० कोटी रुपयांना विकत
घेतली
• कलर्स मराठी मीक्ता २०१६ चा
पुरस्कार सोहळा यावर्षी ऑस्ट्रोलीयात.
यंदाचा गर्व महाराष्ट्र पुरस्कार डॉ. डी वाय.
पाटील यांना जाहीर
• ऑस्कर पुरस्काराच्या परदेशी भाषा
विभागासाठी भारतातर्फे कोर्ट या मराठी
चित्रपटाची निवड
---------------------------------
आक्टों २०१५:-
• अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल राम कापसे
यांचे निधन
• लाचलुचपतविरोधी पथकाचे महासंचालक
प्रवीण दीक्षित यांची
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी
नियुक्ती
• जेष्ठ संगीतकार व गीतकार
रवींद्र जैन यांचे निधन
• मराठी रंगभूमीवरील
नाटयकर्मीना देण्यात येणारे मानाचे विष्णुदास भावे गौरव
पदक यंदा अभिनेते विक्रमगोखले यांना जाहीर. १९५९
पासूनसुरु झालेल्या या पुर्स्क्राचे यंदाचे हे ५० वर्ष आहे
• सांगली जिल्हातील नेते मदन
पाटील यांचे निधन
• मराठी रंगभूमीवरील इतिहास
घडवणाऱ्या व मालवणी बोली सातासमुदापार
नेणाऱ्या वस्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर
यांची ९६ व्या अखिल मराठी नाट्यसमेलन
अध्यक्षपदी निवड
• ऊसतोड मजुरांच्या मजूरीत २०टक्के वाढ करण्याचा
निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत
पाटील व महिला बालविकास मंत्री पंकज
मुंडे यांच्या लवादाने घेतलानोव्हे २०१५
• पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या आगामी
अखिल भारतीय मराठी सहित्य समेलनाच्या
अध्यक्षपदी डॉ श्रीपाल
सबनीस विजयी. कवी विट्ठल
वाघ यांचा त्यानी ११२ मतांनी पराभव केला
• स्वच्छ भारत योजनेसाठी सेवावर अर्धा टक्का
अतिरिक्त अधिभार लावण्याचा निर्णय
• माहिती व जनसंपर्क महासंचालनाल्या मार्फत देण्यात
येणारा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार
जेष्ठ पत्रकार डॉ मुजप्पर हुसेन यांना जाहीर
• राज्यातील१६ आदिवासी जिल्ह्यात
अनुसचीत क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाणकमी
करण्यासाठी गरोदर स्रिया व स्तनदा मातांना एकवेळ
चौरस आहार देणारी डॉ ए पी जे अब्दुल
कलाम अमृत आहार योजना १ डिसेंबर पासून सुरु
• यंदाच्या वर्षापासून शेतकर्यांना मदतीसाठी
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा
योजना राबविण्याचा निर्णय. या योजनेनुसार विमा कंपन्यांना
हपत्याची रक्कम दिल्यापासून १२ महिने
कालावधीसाठी शेतकर्यांना २ लाख रुपयाचे
विमा सरक्षन
• अॅसोचम संघटनेच्याकेलेल्यापाहणीतूनरियलइस्टेट
क्षेत्रातील गुंतवणूकित महाराष्ट्र
आघाडीवर. उत्तर प्रदेश दुसर्या स्थानावर तर गुजराथ
तिसर्या स्थानावर
• नागपूरमहापालिकेने दिल्लीत अर्बन
मोबीलीटी प्रदर्शनात सादर
केलेल्या वाहतूक धोरणाला पहिला क्रमांक
---------------------------------
डिसेंबर २०१५:-
• कोकण रेल्वे ट्रकवर डबलडेकर एक्स्प्रेस सुरु
• जगातील २०० सर्वोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये
भारतातील १६ विद्यापीठेयांचा समावेश/
पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ १२९
व्या क्रमांकावर.तर मुबई विद्यापीठचा या
यादीत समावेशनाही
• महाराष्ट्र विधिमंडळाचे सर्व कामकाज ऑनलाईन, अशाप्रकारचा हा
देशातील पहिलाच प्रयोग आहे
• हिट अंड रन प्रकरणी सलमान विरोधात
कोणताही पुरावा नसल्याने त्याला निर्दोष सोडण्यात आल
-------------------------------------