Bookmark

Bookmark this Blog

Sunday, November 1, 2015

प्राण्यांचे वर्गीकरण

सृष्टी -प्राणी उपसृष्टी - मेटाझुआ

विभाग -1 :

असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ

प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमासिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोनप्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्मनेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्मअॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीसआथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळीमोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगायइकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबरहेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

विभाग - 2 :

समपृष्ठरज्जू प्राणी
संघ : कॉर्डाटा
उपसंघ

युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरासेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्ससव्हर्टीब्रेटा -

वर्ग - a. सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन
        b.पायसेस - डॉगफिश. रोहू
        c.अम्फिबिया - बेडूक , टोड
        d. रेप्टीलीया - कासव , पाल
        e.एवज - पोपट , बदक
        f. मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव

सृष्टी -प्राणीउपसृष्टी - मेटाझुआ

विभाग - 1 : 

असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ
1. प्रोटोझुआ-

हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजनउदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम

a.अमिबा :-

गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात. आकार अनियमित असतो.

b. प्लाझमोडीयम :-

अंत:पेशीय रक्तशोषी परजीवमानवाच्या पांढऱ्या पेशीतमालेरीयास कारणीभूत असतो.अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.

2. पोरीफेरा -

शरीरावर असंख्य छिद्रे असतात.त्यांना ऑस्टिया म्हणतात.सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणीउदा. सायकॅन , युस्पॉजिया

3. सिलेंटराटा -

समुद्रात आढळतात.अरिय सममित व व्दिस्तरियदेह गुहा अ�

मराठी व्याकरण

आपण बोलताना एका पाठोपाठ येणाऱ्या काही शब्दांमधील अक्षरे एकामागोमाग उच्चारताना, एकमेकांत मिसळली जातात.
उदाहरणार्थ - या वर्गात विद्यार्थी किती?
या वाक्यात वर्ग + आत तसेच विद्या + अर्थी असे शब्द एकत्र येऊन वर्गात, विद्यार्थी हे शब्द उच्चारले जातात. वर्ग मधल्या अंत्य 'अ' मध्ये 'आत' मधल्या आद्य (पहिला वर्ण) 'आ' मिसळून एकत्रित वर्णोच्चार होतो.
एका पुढे एक येणारे जवळजवळचे वर्ण एकमेकात मिसळून जाण्याच्या या प्रक्रियेला संधी म्हणतात.  एकापाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात.
संधीचे तीन प्रकार
१) स्वरसंधी : जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात; तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात. (स्वर + वर) उदा. सुर + ईश = सुरेश.
२) व्यंजनसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. (व्यंजन + स्वर किंवा व्यंजन). उदा. सत् + आचार = सदाचार; उत् + लंघन = उल्लंघन.
३) विसर्गसंधी : एकापाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा विसर्ग असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो, तेव्हा त्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात. (विसर्ग + स्वर किंवा व्यंजन) उदा. नि: + आधार = निराधार; दु: + काळ = दुष्काळ.






काही उदाहरणे :

जगन्नाथ : जगत +नाथ .गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .सुर्याद्य : सूर्य + उदय .लंकेश्वर : लंका + ईश्वर .जलौघ : जल + ओघ .यशोधन : यश + धन .महर्षी : महा +ऋषी .विद्यार्थी : विद्या +अर्थी .सिंहासन : सिंह + आसन ..श्रेयश : श्रेय + यश .

*सराव टेस्ट -१(Practice Test)

1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. "
विधानार्थीप्रश्नार्थीनकारार्थीउद्गारार्थी1. विधानार्थी


2) वाक्यातील कर्ता ओळखा. "त्याला जरा गंमत वाटली. "
त्यालाजरागंमतवाटली4. वाटली

3) वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. "
बादशहाखाननावहे नावअसेल4. असेल

4) वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. "
उत्तरमीत्याचेमी त्याचे3. त्याचे

5) वाक्यातील कर्ता ओळखा. " गावात लोक त्याची चर्चा करीत "
लोकगावातचर्चात्याची2. गावात

6) 'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' - वाक्यप्रकार ओळ्ख.
संयुक्तकेवलमिश्रगौण1. संयुक्त

7) 'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा.
केवलमिश्रसंयुक्तगौण1. केवल

8) खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळखा.
भवितव्यआडनावविज्ञानप्रगती1. भवितव्य

9) खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख.
आजन्मलेखकदाताखोदाई1. आजन्म

10) 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो?
प्रयोजक क्रियापदसाधित क्रियापदसिद्ध क्रियापदशक्य क्रियापद

*सराव टेस्ट - 2(Practice Test)

1) 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
बरे वाटणेस्वच्छ दिसणेसमाधान होणेइच्छा पूर्ण करणे3. समाधान होणे


2) व्यंजन कशाला म्हणतात ? खालीलपैकी अचूक पर्याय लिहा.
स्वर नाहीत ते.ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही.जे संकप असतातज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .4. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो .

3) मराठी मुळाक्षरात _______ हे व्यंजन स्वतंत्र आहे.
यरलळ4. ळ

4) 'राजवाडा' हा कोणता समास आहे?
द्वंद्व समासअव्ययीभाव समासबहुव्रीही समासतत्पुरुष समास4. तत्पुरुष समास

5) 'धर्मीवाचक ' नामे कशास म्हणतात?
सामान्यनामे व विशेषनामेसर्वनामे व विशेषणेसामान्यनामे व सर्वनामेविशेषनामे व सर्वनामे1. सामान्यनामे व विशेषनामे

6) 'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात.

स्वरव्यंजनस्वरादीअर्धस्वर3. स्वरादी

7) योग्य शब्दसमूह निवडा.
फुलांचा घडखेळाडूंचा काफिलानोटांचे बंडलगुरांचा थवा3. नोटांचे बंडल

8) शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला________म्हणतात.
शब्दरचनाधातूशब्दसिद्धीशब्दशक्ती3. शब्दसिद्धी

9) 'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा.
अपूर्ण भविष्यकाळपूर्ण भविष्यकाळसाधा भविष्यकाळयापैकी नाही1. अपूर्ण भविष्यकाळ

10) 'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा.
श्रावणपौषवैशाखफाल्गुन4. फाल्गुन

चालु घडामोडी ४९

चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2015) :

रशिया भारताला आणखी पाणबुडी देण्यास तयार :

दोन देशांमधील संबंध वाढविण्याच्या दृष्टीने रशिया भारताला आणखी एक पाणबुडी भाडेतत्त्वावर देण्यास तयार असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
 संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे आजपासून रशियाच्या दौऱ्यावर असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डिसेंबर महिन्यात रशिया दौऱ्यावर जात असून, त्यादरम्यान पाणबुडीबाबतचा करार पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.
 तसेच, कामोव्ह का-226 हेलिकॉप्टरची संयुक्तपणे निर्मिती करणे आणि एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणे या करारांवरही अंतिम चर्चा होऊन मोदींच्या दौऱ्यावेळी हे करार होणार असल्याचे पर्रीकर यांनी सूचित केले.
 डिसेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीसाठी मोदी रशियाला जाणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतील.

सरदार विनोदांवर बंदी आणण्याबाबत निर्णय :

विनोदांमध्ये "सरदार" हे नेहमीच करमणुकीचे साधन ठरत असून त्यांच्यावरील विनोद हे खरोखरच मानहानीकारक आणि वांशिक आहेत का याचा सर्वोच्च न्यायालय अभ्यास करणार असून त्यानंतर अशा विनोदांवर बंदी आणण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
 एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरदारांवरील विनोदाबाबत याचिका दाखल केली आहे.
 याचिकेमध्ये 5 हजार पेक्षा अधिक संकेतस्थळांवर सरदारांबाबत विनोद असल्याचे म्हटले आहे.
 तसेच त्यामुळे या समाजातील सदस्यांचा अवमान होत असल्याचेही म्हटले आहे.
 तसेच सरदारांना मूर्ख आणि कमी बुद्धीचे का समजण्यात येते, याबाबत जाणून घेण्यास याचिकाकर्ता इच्छुक असल्याचे याचिकेवरून आढळून येत आहे.
 सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करून सरदारांवरील विनोदांवर बंदी आणण्याची मागणी याचिकेत केली आहे.
 दरम्यान न्यायालयाने असे विनोद खरोखरच मानहानीकारक आणि वांशिक आहेत का याचा अभ्यास करणार असल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ अनिवासी भारतीयांना देण्याचा निर्णय :

केंद्र सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ अनिवासी भारतीयांना देण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एका सूचनेद्वारे माहिती दिली आहे.
 गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून अनिवासी भारतीयांना यापुढे परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 अंतर्गत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
 विशेष म्हणजे या गुंतवणूकीतून मिळालेले उत्पन्न केवळ भारतातच खर्च करण्याचे बंधन लादण्यात आलेले नाही.
 या योजनेचे नियमन राष्ट्रीय निवृत्तीवेतन यंत्रणेसह निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे करण्यात येणार आहे.
 देशवासीयांना निवृत्तीनंतर उत्पन्न सुरु रहावे या हेतूने 1 जानेवारी 2004 पासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे.
 तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही ही योजना खुली आहे.

सुधींद्र कुलकर्णी हे खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पाकिस्तान दौऱयावर :

'ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन'चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी पुढील आठवड्यात पाकिस्तान दौऱयावर जाणार आहेत.
 पाकिस्तानमध्येही या पुस्तकाचे पुन्हा प्रकाशन होणार आहे.
 कसुरी यांच्या 'नीदर अ हॉक, नॉर अ डव्ह - ऍन इनसाइडर्स अकाउंट ऑफ पाकिस्तान फॉरिन पॉलिसी' या पुस्तकाचे मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये प्रकाशन झाले आहे.
 यापुस्तक प्रकाशनाला शिवसेनेने विरोध केला होता.

येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण शुल्क नियमन कायद्याची कठोर अंमलबजावणी :

येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण शुल्क नियमन कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
 या कायद्यानुसार शुल्क न आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरुद्ध सक्त कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

श्री हंसरत्न विजयजी महाराज तप पूर्ण करणार :

गेल्या अडीच हजार वर्षांत कोणत्याही साधू किंवा साध्वीजींना न जमलेले 'गुणरत्न संवत्सर तप' रविवारी पूर्णत्वाला पोहोचणार आहे.
 श्री हंसरत्न विजयजी महाराज हे तप पूर्ण करणार असून हा 'पारणा' महोत्सव 1 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात पार पडणार आहे.
 या जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
 भगवान महावीर यांच्या काळात पाच जैन साधू महाराजांनी हा उपवास यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.
 त्यानंतर अडीच हजार वर्षांनंतर ही कठीण तपस्या पूर्णत्वास येत असल्याचा दावा गुणरत्न संवत्सर तप पारणा महोत्सव कमिटीने केला आहे.
 या तपात तपस्या करणाऱ्या व्यक्तीला उपवासाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान केवळ गरम पाणी पिण्याची मुभा असते.
 तर सायंकाळी सहा ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीही पिता येत नाही.
 कोणताही प्रवास अनवाणीच करावा लागतो. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीसह शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर नियंत्रण लागते.

ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'दी सायलेन्स'ची भरारी :

ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गजेंद्र अहिरेंच्या 'दी सायलेन्स'ने भरारी घेतली आहे.
 मेक्सिको, बेल्जियम, पॅराग्वे, जर्मनी, बल्गेरिया, क्यूबा, अर्जेंटिना या देशातल्या चित्रपटांबरोबर यंदा पहिल्यांदा भारत स्पर्धा करणार आहे.
 एकंदर आठ चित्रपटांची स्पर्धा या ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे.
 6 ते 15 नोव्हेंबरदरम्यान ब्राझीलमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना 'दी सायलेन्स'चा आनंद घेता येणार आहे.
 या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार ऑफ इंडिया 2015 च्या 'डायरेक्टर्स व्हिजन' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सानिया, मार्टिना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत :

जागतिक टेनिसमधील अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
 विशेष म्हणजे सानिया - हिंगीस जोडीने सलग 20 सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
 उपांत्य सामन्यातही सानिया - हिंगीस जोडीने आपला धडाका कायम राखताना हंगेरीच्या टिमीया बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टीना मालडेनोविच यांचा सरळ दोन सेटमध्ये 6-4, 7-5 असा पराभव केला.
 गतवर्षी झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना सानियाने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.

 

Saturday, October 31, 2015

चालु घडामोडी ४८

⚪24 ऑक्टोबर् 2015⚪

हा या वर्षातील २९७ वा (लीप वर्षातील २९८ वा) दिवस आहे.

��जागतिक पोलिओ निर्मूलन
�� दिनजागतिक माहिती विकास दिन : (World Development of Information Day)

��महत्त्वाच्या घटना:

��२०००:थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. 
६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
��१९९७:सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
��१९८४:भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
��१९७२:दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
��१९६४:उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
��१९६३:देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
��१९४५:संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
��१९०९:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
��१६०५:मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.

��जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:��

��१९२६ : केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (मृत्यू: ३ आक्टोबर २०१२) 
��१९२१ : रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण ��(२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५) 
��१९१४ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२) 
��१९१० : ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????) 
��१८६८ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
��१७७५ : बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू:७ नोव्हेंबर १८६२) 
��१६३२ : अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

��मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:��

��२०१३ : प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (जन्म: १ मे १९१९) 
��१९९५ :माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????) 
��१९९२ : अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
��१९९१ : इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (जन्म: १५ ऑगस्ट१९१५) 
��१६०१ : टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (जन्म: १४ डिसेंबर१५४६)

����������������
   ��महाराष्ट्र एडमिन पैनल��
����������������

जगातील महाविविधता केंद्रे

--------------------------------------------------
जगातील महाविविधता केंद्रे
---------------------------------------------------

* जगातील १९३ देशांमध्ये जैवविविधतेचे वितरण समान नाही .

* उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये वसलेल्या देशांमध्ये जगातील जैवविविधता एकवटलेली आहे .

* महाविविधता - जैवविविधता मर्यादित देशांमध्ये एकवटलेलीअसण्याला " महाविविधता " ( Megadiversity ) असे म्हणतात .

* या देशांना " महाविविधता केंद्रे " असे म्हणतात .

* हे देश राजकीय एकके ( Political units ) आहेत .

* सुरूवातीला जगात महाविविधता केंद्रे १२ होती .

* आज जगात महाविविधता केंद्रे १७ आहेत .
-----------------------------------------------------------

* महाविविधता केंद्रे दर्जा मिळवण्याचे निकष------------------------------------------------------------

१) जीवप्रजातींची संख्या / विविधता ( Species Richness )

२) स्थलविशिष्ट ( Endemic ) प्रजातींची संख्या (Degree of endemism )

* स्थलविशिष्टता - एखादी जीव प्रजाती विशिष्ट प्रदेशांपुरतीच मर्यादित असते त्यास स्थलविशिष्टता म्हणतात .उदा. थामिन हरिण - केबुल लाम्जो राष्ट्रीय उद्यान

* जगातील १७ महाविविधता केंद्रे -

१) आँस्ट्रेलिया

२) ब्राझील

३) चीन

४) कोलोंबिया

५) डेमोक्रेटीक रिपब्लिक आँफ काँगो

६) युकँडाँर

७) भारत

८) इंडोनेशिया

९) मादागास्कर

१०) मलेशिया

११) मेक्सिको

१२) पापुआ न्युगिनी

१३) पेरु

१४) फिलिपाईन्स

१५) दक्षिण आफ्रिका

१६) यु एस ए

१७) व्हेनेझ्युएला

* जगातील ६०-७०% जीवप्रजाती याच देशांमध्ये आढळतात .

* " भारत " हा देखील जगातील १७ महाविविधता केंद्रापैकी एक आहे .

देशातिल पहिली बुलेट ट्रेन

देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानला
भेट दिली, तेव्हा या प्रकल्पात साह्य करणाऱ्या
'जायका' (जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी)
कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली.
देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, ती मुंबई ते
अहमदाबाद या मार्गावर.
जपानी कंपन्यांच्या प्रकल्पांना जलदगतीने काम करता
यावे, यासाठी 'जपान डेस्क' स्थापन करण्याची
घोषणाही त्यांनी केली.
पहिली ट्रेन धावेल ती तब्बल दहा वर्षांनंतर 2024 मध्ये.
पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे आव्हान मोठे आहे.
त्यासाठी तब्बल 90 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
अंदाजानुसा, मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे तिकीट 2800
ते 3000 रुपये असेल.
हे अंतर 458 कि.मी. आहे.
'फॉर्च्युन 500' या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या जून
2015 च्या अंकातील 'अमेरिका बाईट्स बिग ऑन बुलेट
ट्रेन्स' या लेखानुसार, बुलेट ट्रेनच्या संदर्भात
(भारताप्रमाणे) 'अमेरिकाही चीन, जपान व युरोपच्या
कित्येक वर्षे मागे आहे,' असे म्हटले आहे.

महाराष्ट्र जिल्हा विशेष

महाराष्ट्रातील जिल्हा विशेष

→महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

→महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

→संत्र्याचा जिल्हा- नागपूर

→महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

→जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

→महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

→साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

→महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

→महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

→कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर

→लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

→भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

→भारताची आर्थिक राजधानी - मुंबई

→महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

→महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

→महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

→मुंबईची परसबाग - नाशिक

→महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

→मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

→द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

→आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

→अती दक्षिणेकडचा जिल्हा- सिंधुदुर्ग

→पर्यटन जिल्हा - सिंधुदुर्ग

→कलाकारांचा जिल्हा- सांगली

→दुधा तुपाचा जिल्हा- धुळे

→तलावांचा जिल्हा- गोंदिया

→विद्येचे माहेरघर- पुणे

→सैनिकांचा जिल्हा- सातारा

महिलांविषयी कायदे

महिलांविषयक कायदे :

1. सतीबंदी कायदा -1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

6. आनंदी विवाह कायदा -1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा-1986

8. विशेष विवाह -1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा -2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा-2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

18. समान वेतन कायदा -1976

19. बालकामगार कायदा -1980

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

24. माहिती अधिकार कायदा -2005

25. बालन्याय कायदा - 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

28. हिंदू विवाह कायदा -1955

29. कर्मचारी विमा योजना -1952

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

33. हुंडा निषेध कायदा - 1986