Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, January 31, 2017

विक्रिकर निरीक्षक पुर्व परीक्षा पेपर-१

उत्तरे:
विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा (२९ जानेवारी) चालू घडामोडी:-
---------------------------------------------------

१) रा.चि ढेरे यांनी कोणते ग्रंध लिहिले आहेत ? :-१) चक्रपाणी २) त्रिविध ३) लज्जा गिरी

२)जम्मू आणि काश्मीर च्या पहिल्या मुख्यंमंत्री कोण?:- मेहबुबा मुफ्ती

३) हरियाणातील आंतर्राष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या --------- या नावाने ओळखला जातो:- गुरुग्राम

४)अनवस्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम(एम.टी.सी.आर) गटबाबत:-
* जून २०१६ मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला
* या गटात ३५ राष्ट्रे सभासद आहे
* प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झाला आहे
* क्षेपनाश्रे आणि वैमाणिक विरहीत विमानाच्या तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे

५)ऑल्वीन टाॅफलर यांनी कोणते ग्रंध लिहिले :- १)फ्युचर शाॅक २) पाॅवर शिफट ३) थर्ड वेव्ह

६) ८८ व्या अकादमी अवार्ड मध्ये आॅस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार :-
सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट:-सन ऑफ साॅल
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघु चित्रपट:-बेअर स्टोरी
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर :-इंनसाईड आऊट
सर्वोत्कृष्ट अनुबोध:-एमी

७)आय.एस.आर ओ म्हणजे :-इंडीयन स्पेस रिसर्च आॅरगनायझेशन

८) २०१४ ते २०१६ या कालावधीत कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते:- डॉ मंजुळा चेल्लूर

९) जुलै २०१६ मध्ये कोणी आपल्या राज्य सभा सदस्यत्वचा राजीनामा दिला :- नवज्योतसिग सिधु

१०) भारतातील कोणते राज्य सन २०१५ मध्ये सेंद्रीय राज्य म्हणून घोषित केले गेले :सिक्कीम

११) सुंदरबन :-
* ते भारत आणि बांगलादेशात पसरलेला आहे
* २४ परगणा (दक्षीन)वन विभाग  सुंदरबनचा भाग आहे

१२) दि २१.१०२०१५ रोजी झालेले २०१२-१३ ची शिवछत्रपती पारितोषिक :-
जीवनगौरव:-रमेश विपट
नेमबाजी :-राही सरनोबत
जिमनॅस्टीक:-रोमा जोगळेकर
जिजामाता:-नंदिनी बोंगाडे

१३) युरोपियन युनीयनचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे
court ऑफ जस्टीस व युरोपियन कमिशन ह्या रोपियन युनीयन च्या उपसंस्था आहेत

१४) योग्य कधने
* रीओ ओल्य्म्पिीक मध्ये सामन्यांच्या उद्घाटन सभारभात हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली
* ३१ व्या स्पर्धा ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या

१५) तेजस :-(योग्य विधाने)
* स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे
* इ.स. २००३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तेजस असे नामकरण केले
* त्याचा पल्ला ३००० की.मी आहे

१६) रामचंद्र चिंतामण ढेरे :-(योग्य विधान)
* त्यानी लोकसाहित्य ,प्राचीन ,साहित्य यांचा अभ्यास केला
* साहित्य विशारद आणी राष्ट्र भाषा प्रवीण या परीक्षा ते उतीर्ण झाले
* साहित्य अकादमी पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले
* श्री नृसिह -उदय आणि विकास या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

Friday, January 20, 2017

देशातील पहिल्या घटना

देशातील पहिल्या घटना -

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)

📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे

📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)​
〰〰〰〰〰〰〰〰〰

Saturday, May 7, 2016

English Study

������  ENGLISH ������

��Simple Sentences with ��

��A] "Be" :- am / is / are

***We use :- am / is / are
1.  "I am",
2. "We are",
3. "You are"
4. "They are",
5. "He is"
6. "She is".

��Examples : -

1. I am from Maharashtra .
I am a boy.
I am .........

2. He is a teacher.
He is my friend.
He is.........

3. She is my friend.
She is a clever girl.
She is..........

4. We are students.
We are good players.
We are.........

5. They are not players.
They are ready.
They are.........

6. You are a good student.
You are an active member.
You are........

❓❓Questions :-❓❓

1. What is your name?
(My name is ... / I am......)

2. Where are you from?
(I am from ...)

3. What is your job?
(I am a ...)

4. Are you busy ?
(Yes I am. / No I'm not.)

5. Is your friend a good student? (Yes he is. / No he isn't,
she's a ...)

6. Are your parents teachers? (Yes they are. / No, they are ...)

------------------------

��B] "Be" :- was / were

��We use "was",  "were"
1. I was...
2. You were.....
3. We were...
4. They were...
5. He was...
6. She was...

��Examples :-
1. I was tired yesterday.
I was .......

2. He was a lazy student.
He was......

3. She was my neighbor.
She was........

4. We were classmates.
We were.........

5. They were friends.
They were........

6. You were a cute child.
You were.......

❓❓Questions :-❓❓

1. Were you happy to see him?

2. Were you tired when you woke up this morning?

3. Was he your friend?

4. Were they in the same school?

5. Was he naughty as a child?

6. Was yesterday a rainy day?

��������������������

Tuesday, April 19, 2016

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण - [ संक्षिप्त रुपात - भाग I ]  
==================================================
१) स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.
.
२) संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.
.
३) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.
.
४) अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.
.
५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.
.
६) सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.
.
७) शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.
.
८) साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.
.
९) शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.
.
१०) प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.
.
११) धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
.
१२) धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.
.
१३) टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
.
१४) समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.
.
१५) शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.
.
१६) मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.
.
१७) इस. १८३६ साली मराठीतील पहिले मुद्रित व्याकरणाचे पुस्तक - "महाराष्ट्र भाषेचे व्याकरण" गंगाधरशास्त्री फडके यांनी लिहिले.
.
१८) महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.
.
१९) मुख्यार्थ्यास बाधा न येता संदर्भानुसार अनेक शब्द सूचित होतात त्यांना व्यंगार्थ असे म्हणतात.
.
२०) व्यंगार्थ निर्माण करणा-या शक्तीस व्यंजना असे म्हणतात.
.

भारतीय संसद

भारतीय संसद : सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी
● भारत की संघीय व्यवस्थापिका को किस नाम से जाना जाता है— संसद
● भारतीय संसद का निर्माण कैसे होता है— लोकसभा + राज्यसभा + राष्ट्रपति
● संसद के कितने सदन है— दो
● संसद के किस सदन को ‘प्रतिनिधि सभा’ कहा जाता है— लोकसभा
● संसद का स्थायी संदन कौन-सा है— राज्यसभा
● भारतीय संसद का तीसरा अंग कौन है— राष्ट्रपति
● संसद के दो क्रमिक अधिवेशनों के मध्य कितना समयांतराल होता है— 6 माह
● भारतीय संसद को कौन भंग कर सकता है— राष्ट्रपति
● भारतीय संसद की संप्रभुत्ता किससे प्रतिबंधित है— न्याय समीक्षा से
● भारतीय संसद की दोनों की संयुक्त बैठक किस संबंध में होती है— साधारण विधेयक
● साधारण विधेयक से संबंधित गतिरोध को दूर करने के लिए संसद के दोनों सदनों की संयुक्त बैठक कौन बुलाता है— राष्ट्रपति
● स्वतंत्र भारत में अब तक कितनी बार संयुक्त अधिवेशन हो चुके हैं— चार बार
● क्या राष्ट्रपति या उपराष्ट्रपति कभी संयुक्त अधिवेशनों की अध्यक्षता करता है— कभी नहीं
● एक वर्ष में कम से कम कितनी बार संसद की बैठक होना आवश्यक है— दो बार
● संसद के दोनों सदनों की संयुक्त अधिवेशनों की अध्यक्षता कौन करता है— लोकसभा अध्यक्ष
● संसद के दोनों सदनों का सत्रावसान कौन करता है— राष्ट्रपति
● संसदीय प्रणाली को कौन-सी प्रथा भारत की देन है— शून्य काल
● संसद की कार्यवाही में प्रथम विषय कौन-सा होता है— प्रश्न काल
● किस विधेयक को संसद में दोनों सदनों द्वारा अलग-अलग विशेष बहुमत से पारित करना आवश्यक है— संविधान संशोधन विधेयक
● सांसदों के वेतन का निर्माण कौन करता है— संसद
● संसदीय प्रणाली वाली सरकार को अन्य किस नाम से जाना जाता है— संघीय सरकार
● संविधान लागू होने के बाद सर्वप्रथम त्रिशंकु संसद का गठन कब हुआ— 1989 ई.
● अस्थायी संसद भारत में कब तक रही— 17 अप्रैल, 1952 ई.
● संसद भवन (पार्लियामेंट हाउस) का उद्घाटन कब हुआ— 1927 ई.
● संसद भवन (पार्लियामेंट हाउस) का उद्घाटन किसने किया था— लॉर्ड इरविन
● भारत की संचित निधि से धन निर्गम पर किसका नियंत्रण होता है— संसद का
● राज्यसभा और लोकसभा की संयुक्त बैठक कब होती है— लोकसभा और राज्यसभा में मतभेद होने पर
● संसद का निम्न सदन कौन-सा होता है— लोकसभा
● संसद का उच्च सदन कौन-सा होता है— राज्यसभा
● संसद के किस सदस्य को गैर सरकारी सदस्य कहा जाता है— मंत्री के अतिरिक्त अन्य सभी सदस्यों को

Tuesday, April 12, 2016

राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ पुस्तके

‎राज्यसेवा‬ मुख्य परीक्षा संदर्भ पुस्तके:-
‪#‎मराठी‬-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
‪#‎इंग्रजी‬-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
- 10000-Objective-general-English by R.S. Aggarwal & Vikas Aggarwal
‪#‎सामान्य‬ अध्ययन एक – इतिहास व भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ.अनिल कटारे
- आधुनिक भारताचा इतिहास- डॉ.श्रीनिवास सातभाई
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- प्राचार्य डॉ एस,एस.गाठाळ
- महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास- भिडे-पाटील
- गांधींनंतरचा भारत- रामचंद्र गुहा
- आधुनिक भारताचा इतिहास- वैद्य सुमन,शांता कोठेकर
- आधुनिक भारत- य ना कदम
- भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- दूरसंवेदन- प्रा. कार्लेकर
- हुसेन/खुल्लर यांची पुस्तके
- जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ
#सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
- इंडियन पॉलिटी- एम.लक्ष्मीकांत
- स्पेक्ट्रम पॉलिटी फॉर मेन्स.
- इंट्रोडक्‍शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन- डी. डी. बसू
- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- आपली संसद- सुभाष कश्यप
- भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे
- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर
- पंचायतराज- के. सागर
- पंचायती राज- किशोर लवटे
- महाराष्ट्र प्रशासन व्यवस्था -आर के बंग
- Modern Indian Political thought- B. L. Bhole
- भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण – प्रा. चिं. ग. घांगरेकर
#सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
- मानवाधिकार- NBT प्रकाश
- मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे
- मानवी हक्क- प्रशांत दीक्षित
- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन
- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा
- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे
- Wizard-Social Issue
#सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल
- भारत आर्थिक पाहणी अहवाल
- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
- विज्ञान घटक- स्पेक्ट्रम
- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
- विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन
- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन)
- प्रा. के .एम .भोसले- काटे यांची पुस्तके
- अर्थव्यवस्था विशेषांक- प्रतियोगिता दर्पण
‪#‎चालू‬ घडामोडी-
- सकाळ, मटा, लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस ही वृत्तपत्रे
- परिवर्तनाचा वाटसरू’ पाक्षिक
-लोकराज्य’, योजना-कुरुक्षेत्र मासिके,
- महाराष्ट्र वार्षिकी'- युनिक प्रकाशन
- बळीराम हावळे, दत्ता सांगोलकर,देवा जाधवर व राजेश भराटे यांची पुस्तके कमी कालावधीत रिव्हिजन करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतात.
- तसेच maharashtra.gov.in, mahanews.nic.in ,pib.nic.in या वेबसाईटही अत्यंत उपयुक्त आहेत.
- फक्त दूरदर्शन व आकाशवाणी वरील वाद संवादाचा फायदा होऊ शकतो.
टीप:- अधिकृत संदर्भ म्हणून NCERT, स्टेट बोर्ड व य.च.मु ची पुस्तके अभ्यासाने अत्यंत गरजेचे आहे.
तसेच विविध खाजगी क्लासेसचे स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील पुस्तके व प्लानर व सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरू शकतात.
( सर्व पुस्तके अभ्यासणे गरजेचे नाही विविध पर्याय म्हणून जास्त पुस्तकांची नावे दिलेली आहेत. अभ्यासण्यास सहज सोपी व अभ्यासक्रमाला धरून असलेली पुस्तके पाहूनच वाचायला घ्या)

Monday, April 4, 2016

चालु घडामोडी ८१

चालू घडामोडी (4 एप्रिल 2016)
चालू घडामोडी (4 एप्रिल 2016) :

वेस्ट इंडीज 2016 चा टी-20 वर्ल्डकप विश्वविजेता :

अखेरच्या षटकात विजेतेपद निश्चित करण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असताना स्ट्राइकवर असलेल्या अष्टपैलू क्रेग ब्रेथवेटने बेन स्टोक्सला पहिल्या चार चेंडूवर सलग चार षटकार ठोकले.
 इंग्लंडला 4 विकेटने नमवून वेस्ट इंडीजने दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
 विशेष म्हणजे, यासह दोन वेळा टी-20 विश्वविजेतेपद पटकाविणारा पहिला संघ म्हणून विंडीजने इतिहास रचला.
 विंडीज 19 वर्षांखालील मुलांच्या संघाने सुद्धा 2016 चा विश्वचषक जिंकला आहे.
 ईडन गार्डनवर झालेल्या या रोमांचक सामन्याआधी याच मैदानावर विंडीजच्या महिलांनी ऑस्ट्रेलिया पाडाव करून पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकाविले.  
 प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला 9 बाद 155 असा लक्ष विंडीज समोर ठेवला.
 तसेच वेस्ट इंडिज ने 19.4 षटकांत 6 बाद 161 धावा पूर्ण करून विश्वविजेतेपद जिंकले.  

जम्मू आणि काश्‍मीरच्या मुख्यमंत्री पदावर मेहबूबा मुफ्तीं :

जम्मू आणि काश्‍मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (दि.4) शपथ घेणार आहेत.
 भारतीय जनता पक्ष आणि 'पीडीपी'ची राज्यात युती आहे.
 जम्मू आणि काश्‍मीरच्या इतिहासात मुख्यमंत्रिपदाचा मान मिळविणाऱ्या मुफ्ती या पहिल्या महिला असतील.
 राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी त्यांना पीडीपी-भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले होते.
 मेहबूबा यांचे वडील आणि मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात राज्यपाल राजवट होती.

देहरजी मध्यम प्रकल्पासाठी वनजमीन देण्यास मान्यता :

प्रस्तावित देहरजी मध्यम प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 10 वषार्नंतर 445.29 हेक्टर (1113 एकर) वनजमीन देण्यास अखेर मान्यता दिली आहे.
 केंद्र सरकारच्या लिंक प्रोजेक्टचा एक भाग असलेल्या असलेल्या पालघर येथील या जमिनीला पर्यावरणवाद्यांसह स्थानिकांनी केलेला विरोध डावलून सरकारने ही मान्यता दिली आहे.
 देहरजी धरण बांधण्यासाठी मोठ्याप्रमाणावरील वनेतर जमीन उपलब्ध नसल्याने यासाठी 531.186 हेक्टर वनजमीन मिळावी,असा प्रस्ताव कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, रायगड यांनी महाराष्ट्र शासनास पाठवला होता.
 शासनाने तो मान्यतेसाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवला होता.
 तसेच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यांत डिजिटल शाळा :

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात 13 जिल्ह्यांत ज्ञानरचनावादी शाळा आणि तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये संपूर्णत: डिजिटल शाळा झालेल्या आहेत.
 राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जोमाने राबविण्यात येत आहेत.
 ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती म्हणजे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देणे होय.
 तसेच या पद्धतीत मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यात शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकांची राहणार आहे.
 परिसर स्वच्छ, शाळा व वर्गाची रंगरंगोटी, वर्ग सजावट आणि सर्वात म्हणजे प्रात्यक्षिकांतून शिक्षण देणे हेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धती आहे.
 शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 2 वर्षात देशातील शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये येण्याचा संकल्प केला आहे.
 मात्र त्यापूर्वीच राज्यातील प्राथमिक शाळा आता डिजिटल शाळा व ज्ञानरचनावादी शाळा होणार आहेत.  
 अहमदनगर, सोलापूर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, नांदेड, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली हे 14 जिल्हे 100 टक्के ज्ञानरचनावादी शाळांचे झाले आहेत.
 तसेच नगर, नंदूरबार, पालघर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, परभणी या जिल्ह्यांमधील शाळा डिजिटल झाल्या आहेत.

इस्रोचा चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी करण्याचा निर्णय :

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान 2 मोहीम स्वदेशी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात रशियाची मदत घेतली जाणार नाही, अमेरिकेची किरकोळ मदत घेतली जाणार आहे.
 इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी सांगितले की, चांद्रयान 2 मोहीम पूर्णपणे स्वदेशी राहील.
 तसेच त्यातील लँडर व रोव्हर भारतातच तयार केले जातील.
 डिसेंबर 2017 मध्ये किंवा 2018 च्या पूर्वार्धात भारताचे चांद्रयान 2 झेपावेल, त्यात चंद्रावरील खडक व माती गोळा करून त्यांची माहिती पृथ्थकरणानंतर पृथ्वीकडे पाठवणारी उपकरणे असतील.
 चांद्रयान 2 च्या आधी भारताने चांद्रयान 1 मोहीम यशस्वी केली आहे.
 तसेच त्यात चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.
 2010 मध्ये रशियाच्या ग्लावकॉसमॉस संस्थेला लँडर तयार करण्यात सहभागी करण्याचे ठरवले होते व इस्रो ऑर्बिटर तसेच रोव्हर तयार करणार होती.
 पण आता सगळे भारतच तयार करणार आहे, इस्रोने आता लँडर व रोव्हर, ऑर्बिटर सगळे स्वत:च तयार करण्याचे ठरवले आहे.
 तसेच कुठलेही यानाचे निरीक्षण एका ठिकाणाहून करून चालत नाही त्यामुळे नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेतली जाणार आहे.

गुरू ग्रहा सारखा नवीन ग्रहाचा शोध :

वैज्ञानिकांनी तीन तारे व त्याभोवती फिरणारा गुरूसारखा वायू असलेला ग्रह शोधून काढला आहे.
 हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या अमेरिकेतील संस्थेच्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे.
 तसेच द्वैती ताऱ्यांचा एक संच यात आढळला असून आधी तो एकच तारा वाटत होता. 
   द्वैती हे तारे तिसऱ्या एका ताऱ्याभोवती फिरत आहेत, या सर्व तारका प्रणालीत एक ग्रह तीन ताऱ्यांभोवती फिरत आहे.
 तीन ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह दुर्मीळ असतात. तीन ताऱ्यांभोवती फिरणारा ग्रह सापडण्याची ही चौथी वेळ आहे.
 विशेष म्हणजे हा ग्रह असलेली तारका प्रणाली पृथ्वीपासून तुलनेने जवळ आहे.  
 नवीन ग्रहाचे नाव केइएलटी 4 एबी असे असून तो वायू असलेला ग्रह आहे.
 गुरूइतक्या आकाराच्या असलेल्या या ग्रहाला परिवलनास तीन दिवस लागतात, तो केइएलटी-ए ताऱ्याभोवती फिरत आहे.  
 तीस वर्षांत ते एकमेकांभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात पण केइएलटी ए ताऱ्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास द्वैती ताऱ्यांना चार हजार वर्षे लागतात.
 केइएलटी 4 एबी हा ग्रह आपल्या सूर्याच्या चाळीस पट मोठय़ा असलेल्या केइएलटी ए ताऱ्याभोवती फिरत आहे.
 तसेच हे संशोधन द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

दिनविशेष :

1949 : पश्चिम युरोपातील राष्ट्रे व अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक उत्तर अटलांटिक करार म्हणजे ‘नाटो करार’ करण्यात आला.

��������