Bookmark

Bookmark this Blog

Thursday, June 18, 2015

IIFA Award 2015

'आयफा ' पुरस्कारात 'क्वीन ', 'हैदर 'ची बाजी
8 जून 2015 - 10 : 24 AM IST
क्लालालंपूर - विकास बहल दिग्दर्शित ' क्वीन' आणि विशाल भारद्वाज यांच्या ' हैदर' या चित्रटांनी 16 व्या आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली . या पुरस्कार सोहळ्यात ' क्वीन' आणि ' हैदर ' या चित्रपटांना प्रत्येकी तीन पुरस्कार मिळाले .
मलोशियातील क्लालालंपूर येथे रविवारी रात्री आयफा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला . शाहिद कपूरला ' हैदर' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर कंगना राणावतला ' क्वीन' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला . ' हैदर' मध्ये शाहिदच्या आईची भूमिका करणाऱ्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आणि ' एक विलन ' मधील भूमिकेसाठी रितेश देशमुखला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला . ' क्वीन' हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला .
' पीके ' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला . याबरोबरच दीपिका पदुकोण हिला ' वुमन ऑफ द इयर ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

MPSC साठि उपयुक्त पुस्तके

MPSC # परिक्षेसाठी अत्यंत महत्वाची
# पुस्तके.
1. ११ वी १२ वी (सर्व
विषय)
विज्ञान साठी ७ वी ते
१0 वी
2. आधुनिक भारताचा
इतिहास - जयसिंगराव
पवार
3. समाजसुधारक- भिडे
पाटील के. सागर
4. महाराष्ट्राचा
भूगोल-
ए. बी. सवदी
5. पंचायतराज-व्ही . बि.
पाटील के सागर
6. भारतीय
अर्थव्यवस्था-
रंजन कोळंबे
7. भारतीय
अर्थव्यवस्था-
ज्ञानेश्वर मगर रत्नाई
प्रकाशन
8. विज्ञान आणि
तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
9. सामान्य विज्ञान-
चंद्रकांत गोरे
10. गणित क्लुप्त्या आणि
उत्तरे- पंढरीनाथ राणे
11. बुद्धिमत्ता चाचणी-
अनिल अंकलगी
12. चालू घडामोडी-
लोकसत्ता, महाराष्ट्र
टाइम्स, चाणक्य मंडल
मासिक, योजना,
लोकराज्य,इंटरनेट
13. गाईड- एकनाथ
पाटील /
के. सागर
पेपर- 1
मराठी-
1. मराठी व्याकरण- मो.
रा. वाळिंबे
2. मराठी व्याकरण -
बाळासाहेब शिंदे
3. अनिवार्य मराठी – के
सागर प्रकाशन
4. य.च.मु. विद्यापीठाची
भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
1. इंग्रजी व्याकरण : पाल
आणि सुरी
2. Wren and Martin
English
Grammar
3. अनिवार्य इंग्रजी- के.
सागर प्रकाशन
पेपर -2
1. आधुनिक भारताचा
इतिहास- ग्रोवर आणि
बेल्हेकर
2. आधुनिक भारताचा
इतिहास- जयसिंगराव
पवार
3. मेगा स्टेट महाराष्ट्र-
ए.
बी. सवदी
4. भारताचा भूगोल-
विठ्ठल घारापुरे
5. आपली संसद - सुभाष
कश्यप
6. आपले संविधान - शुभाश
कश्यप
7. महाराष्ट्र शासन
आणि
राजकारण- बी. बी.
पाटील
8. पंचायतराज- के सागर
9. मावाधिकार- NBT
प्रकाश
10. मानवाधिकार आणि
मनुष्यबळ- रंजन कोळंबे
11. विविध कायदे _
जळगाव
लॉ प्रकाशन
12. गणित क्लुप्त्या आणि
उत्तरे- पंढरीनाथ राणे
13. बुद्धिमत्ता चाचणी-
अनिल अंकलगी
14. माहितीचा
अधिकार-
यशदा पुस्तिका
15. मुंबई पोलिस
अधिनियम-
प. रा. चांदे
16. मुंबई पोलिस- एस.
व्ही.
कुलकर्णी
17. मानवी हक्क व
जबाबदाऱ्या- चंद्रकांत
मिसळ.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात ?


हवामनाचा अभ्यास------------------------------- मीटिअरॉलॉजी

रोग व आजार यांचा अभ्यास--------------------- पॅथॉलॉजी

ध्वनींचा अभ्यास---------------------------------- अॅकॉस्टिक्स

ग्रह-तार्यांचा अभ्यास----------------------------- अॅस्ट्रॉनॉमी

वनस्पती जीवनांचा अभ्यास---------------------- बॉटनी

मानवी वर्तनाचा अभ्यास-------------------------- सायकॉलॉजी

प्राणी जीवांचा अभ्यास--------------------------- झूलॉजी

पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास----- जिऑलॉजी

कीटकजीवनाचा अभ्यास------------------------ एन्टॉमॉलॉजी

धातूंचा अभ्यास----------------------------------- मेटलर्जी

भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास---- मिनरॉलॉजी

जिवाणूंचा अभ्यास------------------------------- बॅकेटेरिओलॉजी

विषाणूंचा अभ्यास-------------------------------  व्हायरॉलॉजी

हवाई उड्डाणाचे शास्त्र--------------------------- एअरॉनाटिक्स

पक्षी जीवनाचा अभ्यास---------------------------ऑर्निथॉलॉजी

सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र---------------------- हर्पेटलॉलॉजी

आनुवांशिकतेचा अभ्यास----------------------- जेनेटिक्स

मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास--------------------- न्यूरॉलॉजी

विषासंबंधीचा
अभ्यास--------------------------- टॉक्सिकॉलॉजी

ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र--- कार्डिऑलॉजी

अवकाश प्रवासशास्त्र-------------------------- अॅस्ट्रॉनॉटिक्स

प्राणी शरीर शास्त्र ----------------------------- अॅनाटॉमी

मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)----- अँथ्रापॉलॉजी

जीव-रसायनशास्त्र------------------------------ बायोकेमिस्ट्री

सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)-------- बायोलॉजी

रंगविज्ञानाचे शास्त्र----------------------------- क्रोमॅटिक्स

विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास------------ एथ्नॉलॉजी

उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र- हॉर्टिकल्चर
शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र---------------------- फिजिअॉलॉजी

फलोत्पादनशास्त्र------------------------------ पॉमॉलॉजी

मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र------ - टॅक्सीडर्मी

भूपृष्ठांचा अभ्यास------------------------------- टॉपोग्राफी

नरेन्द्र मोदि सरकार आणि योजना


* जन-धन योजना:-
देशातील प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडून
देण्यासाठी जन-धन ही महत्वकांक्षी योजना
सुरू करण्याचा निर्णय मोदी ने १५ आँगस्ट २०१४
रोजी आपल्या भाषणात या योजनेची
घोषणा केले . ही योजना सुरू झाल्यानंतर
पहिल्याच दिवशी १.५ कोटी लोकांनी बँक
खाते उघडून सरकारच्या निर्णयाला अभुतपूर्व
प्रतिसाद दिला. या योजनेतंर्गत आतापर्यंत
देशभरात १४ कोटी बँक खाती उघडण्यात आली
आहेत.

* स्वच्छ भारत अभियान:-
नरेद्र मोदिनी २ आक्टो २०१४ रोजी( गांधी
जयंती) ही योजना नवी दिल्ली येथील
राजघाट येथून सुरु केली स्वच्छ भारत अभियान
स्वच्छ भारत अभियानातंर्गत आगामी पाच
वर्षात भारतातील प्रत्येक परिसर स्वच्छ
बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
याशिवाय, शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये
लोकसंख्येनुसार पुरेशा शौचालयांची
निर्मिती करून स्वच्छतेच्या माध्यमातून जीवन
स्तर उंचाविण्याचा प्रयत्न या
अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.

* मेक इन इंडिया:-
देशांतर्गत गुंतवणूक, संशोधन, उत्पादनाला
चालना देण्यासाठी आणि उद्योगांच्या
विकासासाठी ‘मेक इन इंडिया’ योजनेची
घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २५ सप्टे २०१४
रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे
करण्यात आली. या योजनेतंर्गत देशामध्ये
आंतरराष्ट्रीय दर्जांच्या पायाभूत
सुविधांच्या निर्मितीसाठी पोषक
वातावरण निर्माण करणे आणि भारताला
जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्याचे
उद्दिष्ट.

* डिजिटल इंडिया:-
सरकारी कार्यालयांमधील कामकाज
गतिमान करण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’
योजनेची घोषणा. या योजनेतंर्गत सरकारी
कामकाजांसाठी लागणारा कालावधी कमी
करण्याचा आणि ई-गव्हर्नन्सची संकल्पना
प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न. या उपक्रमामुळे
सरकारी कामकाजांसाठी लागणाऱ्या
कागदपत्रांची प्रत डिजिटल लॉकरमध्ये ठेवता
येणे शक्य झाले. त्यामुळे सामान्य जनतेचा
सरकारी कामासाठी जाताना प्रत्येकवेळी
कागदपत्रे नेण्याचा त्रास वाचला.

* बेटी बचाओ बेटी पढाओ:-
देशातील महिला आणि बालिकांना प्रत्येक
क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाओ
बेटी पढाओ योजनेची सुरूवात. देशातील स्त्री-
भ्रृण हत्या आणि लिंगभेद थांबविण्याचे
उद्दिष्ट. याशिवाय, मुलींना शिक्षण आणि
रोजगार क्षेत्रात येणाऱ्या दूर करण्यासाठी
या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात
येणार आहेत.

* मुद्रा बँक :-
देशातील लघुद्योगांच्या विकासासाठी
मुद्रा बँकेची सुरू करण्याचा निर्णय. या
योजनेतंर्गत वार्षिक ७ टक्के दराने ही
वित्तसंस्था देशातील छोटय़ा उद्योजकांना
१० लाख रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करेल. २० हजार
कोटी रुपयांची ही योजना देशातील ५.७७
कोटी उद्योजकांना वित्तीय सहकार्य करेल.

* पहल योजना:-
सिलिंडरच्या सरकारी अनुदानवाटपातील
भ्रष्टाचार टाळण्यासाठी पहल योजनेची
रक्कम थेटपणे ग्राहकांच्या बँक खात्यात जमा
करण्याचा निर्णय. या योजनेतंर्गत एलपीजी
गॅसधारकांच्या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या
बँक खात्यात जमा करण्यात येते.

* खासदार आदर्श ग्राम योजना:-
देशातील गाव, खेडी विकसित करण्यासाठी
खासदार आदर्श ग्राम योजनेची सुरूवात. या
योजनेतंर्गत प्रत्येक खासदाराला आपल्या
लोकसभा मतदारसंघातील तीन गावे दत्तक घेऊन
त्यांचा विकास करावा लागणार आहे.
गावामध्ये पायाभूत सुविधांची उभारणी
करावी लागणार आहे. २०१९ पर्यंत प्रत्येक
खासदारासमोर तीन गावे विकसित करण्याचे
लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २०१९ पर्यंत प्रत्येक
खासदाराने तीन गावे विकसित केली तर,
देशातील २५०० गावे विकसित होऊ शकतात.

* सुकन्या समृद्धी योजना:-
केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ'
मोहिमेतंर्गत देशातील १० वर्षांखालील
मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची तरतूद
करणारी सुकन्या समृद्धी योजना सुरू
करण्याचा निर्णय. मुलीच्या भविष्यासाठी
पालकांकडून गुंतविण्यात आलेल्या या रक्कमेवर
९.१० टक्के दराने व्याज देण्यात येणार असून,
मुदतीनंतर व्याजासहित मिळणारी रक्कम
करमुक्त करण्यात आलेली आहे. याअंतर्गत
मुलीच्या अठराव्या वर्षी ५०% रक्कम तिच्या
शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम २१
वर्षांनंतर किंवा लग्नाच्या वेळेस (१८ ते २१
वर्षांदरम्यान) काढता येते.

* अटल पेन्शन योजना:-
देशभरातील १८ ते ४० वर्षे वयोगटातील बचत बँक
खातेधारकांसाठी ही योजना सुरू करण्यात
आली असून योजनेचा मासिक हप्ता दरमहा ४२
रुपये ते २१० रुपये इतका आहे. त्यानंतर वयाच्या ६०
व्या वर्षांपासून हप्त्याच्या रक्कमेप्रमाणे १,०००
ते ५,००० रुपयांच्या पेन्शनचे वितरण करण्यात येईल.

* प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना:-
प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि प्रधानमंत्री
जीवन ज्योती विमा योजना या देशातील
सर्वात मोठ्या विमा योजनांची घोषणा.
केवळ बँक खातेदारांसाठी उपलब्ध असलेल्या या
योजना आहेत. यापैकी एक अपघाती तर एक
जीवन विमा योजना आहे. दोन्ही योजनांमध्ये
पॉलिसीधारकाला 2 लाख रूपयांचा

वाचावीत अशी १०० पुस्तके

वाचावीत अशी १०० पुस्तके

०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युनजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे.

Wednesday, June 17, 2015

राष्ट्रगीताबद्दल माहिती


१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.