Bookmark

Bookmark this Blog

Friday, October 16, 2015

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ - वैशिष्ट्ये

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश 2014

या कायद्याची वैशिष्ट्ये -

1) सावकारी व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या परवान्याकरीता अर्जदाराने सावकारांचा सहाय्यक निबंधक यांचेकडे अर्ज करावा. साव कारांचा सहाय्यक निबंधक यांनी प्राप्त अर्जाची छाननी करुन त्याचे तपासणी अहवालासह व शिफारशींसह सावकरांचा जिल्हा निबंधक यांच्याकडे दाखल करावा. सावकारी व्यवसाय करण्याकरीता सर्वसाधारण अटीनुसार परवान्यात नमूद पत्यावर व त्याच कार्यक्षेत्रात व्यवसाय करणे बंधनकारक आहे.


2) सावकारी कायद्यातील कोणत्याही तरतूदींचे उल्लंघन हेात असल्यास, भा.दं.वि. नुसार संबंधीत व्यक्ती दोषी आढळणे इ. कारणांसाठी सावकरांचा जिल्हा निबंधक परवाना नाकारू शकतो. याबाबतचे अपील सावकराचे विभागीय निबंधकाकडे असेल व त्याचा निर्णय अंतिम राहील.

3) सावकारास कर्जदाराकडून मुद्दलपेक्षा जास्त व्याज घेता येणार नाही तसेच व्याजावर व्याज लावता येणार नाही. अनावश्यक खर्च वसूल करता येणार नाही. तसेच राज्यशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या व्याजदरानुसारच तारण व विना तारण कर्जव्यवहार करणे सावकारास बंधनकारक आहे.

या कायद्याचे उल्लंघन करण्याऱ्यांविरोधात  दंड व शिक्षेची तरतूद -
सर्वात महत्वाचे म्हणजे या कायद्यामुळे शेतकऱ्यांची सावकारापासून मुक्तता झाली आहे. शेतकऱ्यांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून पुढील काळजी घ्यायला हवी.

1) शेतकऱ्यांनी शक्यतोवर सहकारी संस्था, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडूनच कर्ज घ्यावे. यासाठी शासनाच्या महत्वाकांक्षी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमुळे पीककर्ज नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी कर्जदारास रुपये 1 लाखापर्यंत शून्य टक्के व्याज व 3 लाखापर्यंत 2 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे.

2) अपरिहार्य कारणामुळे सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ आलीच तर सदर सावकार परवानाधारक आहे याची खात्री करुन घ्या.

3) सावकारांनी कर्जावर आकारावयाच्या व्याजाचे दर शासनाकडून ठरवून दिलेले आहेत. तसेच सावकारांनी सरळव्याज पध्दतीने व्याज आकारावयाचे आहे. त्याला ते चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारता येत नाही. जर आपल्याकडून जास्त व्याज वसूल केले असेल तर जवळच्या सहकारी खात्याच्या कार्यालयाकडे तक्रार करा.

4) शक्यतोवर कर्जाची परतफेड नियमितपणे करा. जर अडचणीच्या काळात कर्ज परत करण्यास वेळ लागला तर त्यावेळी मुद्दलपेक्षा व्याजाची रक्क्म जास्त देण्याची गरज नाही.

5) कोणत्याही कागदपत्रावर वाचून समजल्याशिवाय सह्या करु नका तसेच कोऱ्या कागदावर सही करु नका.

6) सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळालेल्या कर्जाची रक्कम कागदपत्रावर अक्षरी व आकडी बरोबर लिहिली आहे काय याची खात्री करा. सावकारास परत केलेल्या कर्ज रक्कमची पावती घ्या कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे जपून ठेवा. कर्जाला तारण देण्याच्या दृष्टिने स्थायी संपत्तीचे विक्रीपत्र कधीच करु देऊ नका.

7) सावकाराने हिशेबाशिवाय अन्य रक्कमेची मागणी केल्यास ती मान्य करु नका. सावकाराकडून कर्जाचे विवरणपत्र प्राप्त करा. विवरणपत्रातील मजकून व रकमा योग्य नसल्यास ती बाब सावकाराच्या निदर्शनास आणा व त्याने दखल न घेतल्यास रितसर तक्रार सहकार खात्याकडे करा.

8) सावकाराकडून उपद्रव होत असल्यास सहकार खात्याकडे व जवळच्या पोलीस स्टेशनकडे तक्रार करा.

9) शासनाची हेल्पलाईन क्रमांक 022-61316400 या नंबरवर संपर्क साधा.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सचिव दर्जाचा अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करणार आहे. त्यांच्या मदतीला 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय त्यांना आमचा विभाग देखील सहकार्य करणार आहे. महत्वाचे म्हणजे महसूल विभाग देखील मदत करणार आहे. या प्राधिकरणामुळे निवडणुका घेताना सहजता येणार आहे.
जुना सावकारी कायदा 1946 सावकारांचे नियमन करण्यास अपूरा पडतो. त्यामुळे प्रभावशाली व परिणामकारक नियमन करणारा नवा कायदा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. शासनाने चौकशी करुन नवीन कायद्याचा मसुदा तयार केला सदर मसूद्यास मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्य विधीमंडळासमोर विचार विनिमयासाठी व मंजूरीसाठी ठेवण्यात आले. सदर विधेयकाला 22 एप्रिल 2010 रोजी राज्य विधीमंडळाची मान्यता मिळाली.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रस्तावित विधेयकात काही सुधारणा केल्यामुळे त्या सुधारणांसह प्रख्यापित करावयाच्या अध्यादेशास 10 जानेवारी 2014 रोजी मा.राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली आहे.

चालु घडामोडी ४७

चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2015)
चालू घडामोडी (16 ऑक्टोबर 2015) :

आणखी सहा लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार केले परत :

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ आणखी सहा लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले आहेत.
 प्रसिद्ध इंग्रजी कवी केकी दारूवाला व राजस्थानी लेखक नंद भारद्वाज यांचा यात समावेश आहे.
 दादरी हत्याकांड तसेच गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांच्या निषेधार्थ लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्यास सुरवात केली आहे.
 त्यांची संख्या आतापावेतो 26 वर पोचली आहे.
 शशी देशपांडे व सच्चिदानंदन यांच्यासारख्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले.
 यात आज दारूवाला व भारद्वाज यांच्यासह वीरभद्रप्पा, के. नीला, आर. के. हुडूग्गी व काशिनाथ अंबालगी या कन्नड साहित्यिकांचीही भर पडली.

प्रति"कॉल ड्रॉप" एक रुपया दंड :

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) चा प्रति"कॉल ड्रॉप"पोटी एक रुपया दंड मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना द्यावा, असा एक प्रस्ताव आहे.
 तसेच हा दंड देशातील सर्व कंपन्यांना द्यावा लागू शकतो.
 या संदर्भात सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यामुळे असा दंड लावला जाऊ शकतो, असे समजते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे रामेश्‍वरममध्ये भव्य स्मारक उभारण्याची घोषणा :

देशाचे क्षेपणास्त्रपुरुष आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे रामेश्‍वरममध्ये भव्य स्मारक उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
 तसेच 'अमृत' योजनेच्या माध्यमातून रामेश्‍वरमचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
 उदयोन्मुख संशोधकांना प्रेरणा मिळावी म्हणून रामेश्‍वरममध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येईल.
 या स्मारकाच्या उभारणीसाठी सरकारने भूसंपादन केले असून, यासंबंधी नि��

चालु घडामोडी ४६

��चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2015) ��

"����नॅशनल डायलॉग क्वार्टलेट" संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर :

ट्युनिशियामध्ये 2011 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर अराजकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशात लोकशाही टिकविण्यात भरीव कामगिरी केलेल्या "नॅशनल डायलॉग क्वार्टलेट" या संस्थेला यंदाचे शांततेचे नोबेल पोरतोषिक जाहीर झाले आहे.
 ट्युनिशियामध्ये झालेल्या या सकारात्मक बदलाचा आदर्श इतर देशांनीही घ्यावा, यासाठीही हे पारितोषिक दिले असल्याचे नोबेल निवड समितीने म्हटले आहे.
 ट्युनिशियातील चार प्रमुख संस्थांची मिळून द क्वार्टलेट ही संस्था बनली आहे.
 यामध्ये द ट्युनिशियन जनरल लेबर युनियन, द ट्युनिशियन कॉन्फडरेशन ऑफ इंडस्ट्री ट्रेड अँड हॅंडिक्राफ्ट्‌स, द ट्युनिशियन ह्युमन राइट्‌स लीग आणि द ट्युनिशियन ऑर्डर ऑफ लॉयर्स यांचा समावेश आहे.
 या सर्व संस्थाद्वारे ट्युनिशियातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांमध्ये मानवाधिकार, कायद्याचे पालन, समाजकल्याण अशा मूल्यांचा प्रसार केला जातो.
 द क्वार्टलेट या संस्थेने आपल्या नैतिक सामर्थ्याच्या जोरावर ट्युनिशियामध्ये शांततापूर्ण मार्गाने लोकशाहीचा विकास होण्यासाठी प्रमुख माध्यम म्हणून काम केले असल्याचे निवड समितीने पारितोषिक जाहीर करताना म्हटले आहे.
 द क्वार्टलेटसह इतर क्षेत्रातील नोबेल मिळालेल्या सर्व विजेत्यांना 10 डिसेंबरला पारितोषिक वितरण होणार आहे.
 चार संस्थांनी मिळून बनलेल्या या संस्थेची स्थापना 2013 ला करण्यात आली.
 राजकीय हत्यासत्र आणि देशात पसरलेल्या अराजकतेमुळे लोकशाही प्रक्रिया संकटात सापडली असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही स्थापना झाली होती.

जस्मिन रिव्होलुशन

ट्युनिशियामध्ये 2010 मध्ये सरकारविरोधी वातावरण तयार होऊन ही लाट सर्व अरबजगतात पसरली.
 म्हणूनच उठावांना "अरब स्प्रिंग" म्हणूनही ओळखले जाते.
 ट्युनिशियामध्ये याला "जस्मिन रिव्होलुशन" म्हणतात.

����शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप सुविधा निर्माण करण्याचा निर्णय :

बदलते हवामान, शेतीमालांचे बाजारभाव, कृषी विद्यापीठे आणि तज्ज्ञांनी केलेले नवीन प्रयोग आणि शेतीसंदर्भातील अन्य महत्त्वाच्या घडामोडी समजण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऍप सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
 याबाबतची माहिती कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी दिली.
 सध्या हवामानात सातत्याने बदल होत असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय अनेकदा संकटात सापडत आहे.
 बदलत्या हवामानाच्या अधारे शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करणे आवश्‍यक असून, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 शेतकऱ्यांनाही घरबसल्या सर्व बदलांची माहिती मिळणे आवश्‍यक असल्याने सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
 याबाबत येत्या डिसेंबर 2015 अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना "सॉईल कार्ड" देण्यात येईल.
 या कार्डामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या परिस्थितीचा तपशील असेल.
 यावरून शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यावीत आणि त्यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा याबाबत कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.

����मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेचे "ऍप" :

मुंबईतील रेल्वे प्रवाशांना यापुढे तिकिटासाठी किंवा मासिक पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही.
 रेल्वेचे "ऍप", ज्याद्वारे मोबाईलवरच अनारक्षित प्रवास तिकीट, मासिक पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट घेता येईल.
 या "पेपरलेस" सेवेचे उद्‌घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज केले.
 तसेच विनातिकीट प्रवास करून रेल्वेचा महसूल बुडविणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी आगामी सहा महिन्यांत मोठी मोहीम राबविली जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली.
 सुरवातीच्या टप्प्यात पेपरलेस प्लॅटफॉर्म तिकिट सेवा मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर सेंट्रल, पनवेल, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, अंधेरी, मुंबई सेंट्रल, बोरिवली, दादर पश्‍चिम, वसई रोड, वांद्रे त्याचप्रमाणे नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या मध्य, पश्‍चिम आणि उत्तर रेल्वेच्या स्थानकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
 मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय स्थानकांवर (मुंबई) मोबाईल ऍपद्वारे प्रवाशांना अनारक्षित रेल्वे तिकीट आणि मासिक पास या ऍपद्वारे घेता येईल.
 दिल्लीत नवी दिल्ली ते पलवल या स्थानकांदरम्यानच्या मासिक पासधारकांना मोबाईलवर ही सेवा मिळेल.
 'गुगल प्ले स्टोअर' किंवा 'विंड स्टोअर'वरून हे ऍप डाउनलोड करता येईल.

����ज्येष्ठ संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचे निधन :

'सौदागर', "फकिरा", "गीत गाता चल", "अखियों के झरोंको से", "राम तेरी गंगा मैली", "हीना", "चितचोर", "तपस्या", "चोर मचाये शोर", "दुल्हन वही जो पिया मन भाये" अशा अनेक चित्रपटांना सुमधुर संगीताने सजवणारे ज्येष्ठ संगीतकार व गीतकार रवींद्र जैन यांचे निधन झाले.
 ते 71 वर्षांचे होते.  
 संगीत क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल याच वर्षी त्यांना "पद्मश्री"ने सन्मानित करण्यात आले.
 तसेच उत्तर प्रदेश सरकारनेही त्यांचा सत्कार केला होता.

����अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :

भारताच्या पहिल्या जल अणुभट्टीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ डॉ. शेखर बसू यांची शुक्रवारी केंद्रीय सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 त्यांना या पदावर अवघ्या 11 महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे.
 डॉ. बसू सध्या भाभा अणू संशोधन केंद्रात (बीएआरसी) संचालक असून, अणू पुनर्वापर मंडळाचे (एनआरबी) मुख्य कार्यकारी आहेत.
 सध्या अणू कार्यक्रमाचे प्रमुख असलेले डॉ. आर.के. सिन्हा 23 ऑक्टोबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्याकडून बसू सूत्रे हाती घेतील.
 कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणू संशोधन केंद्रात टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन पुन:प्रक्रिया सुविधा प्रकल्प स्थापन करण्यात डॉ. बसूंची मुख्य भूमिका आहे.

����एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर :

मुख्यमंत्र्यांच्या नावाने राज्याच्या ग्रामीण भागासाठी एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर होईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
 स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय आत्मसन्मान कार्यशाळा पुण्यात बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
 आराखडा बनवून राज्याने स्वत:ची मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना तयार केली आहे.
 त्यासाठी 1 हजार कोटी मागितले आहेत.
 त्याला तत्त्वत: मंजुरीही मिळाली आहे. पुरवणी बजेटमध्ये त्याला निधी मिळेल.
 त्यानंतर लवकरच राज्याची ही योजना कार्यान्वीत होईल.

����लेखिका शशी देशपांडे यांचा साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलचा राजीनामा :

कानडी लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत मौन पाळण्यात आल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करून साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका शशी देशपांडे यांनी शुक्रवारी साहित्य अकादमीच्या जनरल कौन्सिलचा राजीनामा दिला.
 देशपांडे ह्या अनेक कादंबऱ्या, लघुकथा आणि निबंध संग्रहाच्या लेखिका आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आहेत.
 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

����प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे :

प्लुटोच्या वातावरणाची पहिली रंगीत छायाचित्रे नासाच्या न्यू होरायझन्स यानाने पाठवली असून त्यात बर्फाळ बटू ग्रहावर निळे आकाश दिसत आहे.
 प्लुटोच्या पृष्ठभागावर बर्फ दिसत आहे.
 तेथील बर्फाळ धुक्याच्या कणांना राखाडी किंवा लाल रंग आहे, पण ज्या पद्धतीने ते निळा रंग पसरवतात त्यामुळे न्यू होरायझन्स मोहिमेचे वैज्ञानिक चकित झाले आहेत.
 एसडब्ल्यूआरआय या संस्थेचे संशोधक कार्ली हॉवेट यांच्या मते त्या निळ्या रंगातून आपल्याला धुक्याच्या सदृश कणांची व्याप्ती व संरचना कळू शकते.आकाश हे काही लहान कणांनी नेहमी सूर्यकिरण विखुरले गेल्याने निळे दिसते.
 पृथ्वीवर नायट्रोजनच्या लहान रेणूंनी सूर्यकिरण पसरले जाऊन आकाश निळे दिसते, तर प्लुटोवरही आकाश काजळीसारख्या थोलिन या कणांमुळे निळे दिसते.
 वैज्ञानिकांच्या मते प्लुटोच्या वातावरणातील अगदी वरच्या थरात थोलिनचे कण असतात तेथे अतिनील किरणांचे विघटन होते व त्यातून नायट्रोजन व मिथेनचे रेणू तयार होतात.
 ते एकमेकांशी अभिक्रिया करतात. त्यामुळे धन व ऋणभारित आयन तयार होतात.
 ते पुन्हा एकत्र आल्यानंतर स्थूलरेणू तयार होतात.
 अशी क्रिया शनीचा चंद्र असलेल्या टायटन या उपग्रहावर दिसून आली आहे.
 अधिक गुंतागुंतीचे रेणू एकत्र येऊन त्याचे छोटे कण बनतात.
 अस्थिर वायूंचे संघनन होते व ते त्या कणांच्या पृष्ठभागावर बसतात त्यामुळे बर्फाचे कण असल्यासारखे धुके दिसते, त्यामुळे प्लुटोच्या लालसर रंगातही भर पडते.
 न्यू होरायझन्स यानाने केलेल्या संशोधनानुसार प्लुटोच्या अनेक भागात बर्फ आहे.
 राल्फ स्पेक्ट्रल कंपोझिशन मॅपरने ते शोधले आहे.
 प्लुटोच्या विस्तारित भागात सरसकट बर्फ दिसत नाही, कारण तिथे अतिशय तरल अशा बर्फाचे थर आहेत.
 न्यू होरायझन्स अवकाशयान पृथ्वीपासून 5 अब्ज किलोमीटर दूर आहे, त्यातील सर्व प्रणाली व्यवस्थित काम करीत आहेत.

गणितानुसार मापन खालील प्रकारे केले जाते

                       
एकक,
दशक,
शतक,
हजार, दशहजार,
लक्ष, दशलक्ष,
कोटी, दशकोटी,
अब्ज, दशअब्ज,
खर्व, दशखर्व,
पद्म, दशपद्म,
नील, दशनील,
शंख, दशशंख,
क्षिती, दशक्षिती,
क्षोभ, दशक्षोभ, 
ऋद्धी, दशऋद्धी,
सिद्धी, दशसिद्धी,
निधी, दशनिधी,
क्षोणी, दशक्षोणी,
कल्प, दशकल्प, 
त्राही, दशत्राही,
ब्रह्मांड, दशब्रह्मांड,
रुद्र, दशरुद्र,
ताल, दशताल,
भार, दशभार,
बुरुज, दशबुरुज,
घंटा, दशघंटा,
मील, दशमील,
पचुर, दशपचुर,
लय, दशलय,
फार, दशफार,
अषार, दशअषार,
वट, दशवट,
गिरी, दशगिरी,
मन, दशमन,
बव, दशबव,
शंकू, दशशंकू,
बाप, दशबाप,
बल, दशबल,
झार, दशझार,
भिर, दशभीर,
वज्र, दशवज्र,
लोट, दशलोट,
नजे, दशनजे,
पट, दशपट,
तमे, दशतमे,
डंभ, दशडंभ,
कैक, दशकैक,
अमित, दशअमित,
गोल, दशगोल,
परिमित, दशपिरमित,
अनंत, दशअनंत.

पेरुमल मुरुगन

#पेरुमल मुरुगन

* तमिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांना पाचव्या आंतरराष्ट्रीय भारतीय भाषा महोत्सवाचा 'समन्वय भाषा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* तामिळनाडूत जात व गुलामगिरीच्या प्रवृत्तितून लोकांचा छळ केला गेला, तो त्यांनी साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला.

* त्यांना मधोरूभगान या कादंबरिसाठी पुरस्कार मिळाला.

* त्यांचा जन्म 1966 मध्ये झाला.

* ते सध्या नमक्कल येथे गव्हर्नमेंट आर्ट्स कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.

* त्यांनी एकूण 9 कादंबरया व 4 कथासंग्रह लिहिले आहेत.

* त्यांच्या सिझन्स ऑफ द पाम, करंट शो, वन पार्ट वीमेन( मधूरोभगान) या कादंबरया इंग्रजीतही आल्या आहेत.

Monday, October 12, 2015

जी - २०

#भारत २०१८ साली होणाऱ्या G-२० चा अध्यक्ष होणार आहे.

*.G-२० ची २०१५ परिषद तुर्की येथे सुरु आहे. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

*.G-२० ची २०१६ परिषद = चीन

*.G-२० ची २०१७ परिषद = जर्मनी

*.G-२० ची २०१८ परिषद = भारत

#G-२० बद्दल :--

*.१९९७ साली आशिया खंडात आर्थिक महामंदी आली होती.

*.त्या पार्श्वभूमीवर १९९९ साली जगातील प्रमुख अर्थसत्ता असलेल्या २० देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांची एक परिषद भरली. तीच ही G-२० होय!

*.हे २० देश जगातील ८५% एकूण घरगुती उत्पन्नधारक (GDP) देश आहेत.

*.ही एखादी संघटना नाहीये. केवळ एक मंच (फोरम) आहे.

*.त्यामुळे G-२० चे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नसते.

*.ज्या देशात ही सभा भरणार असते, तेथे त्या वर्षभरासाठी तिचे तात्पुरते सचिवालय स्थापन केले जाते.

#सदस्य :--

*.Brazil, China, Russia, India, South Africa, Australia, Argentina, Canada, France, Indonesia, Germany, Italy, Mexico, Japan,Saudi Arabia, Turkey, South Korea, UnitedKingdom (UK), United States (US) and European Union (EU).

Economics

Economics:

हल्लीच्या बातम्यांमधे आर्थिक घडामोडीच्या बातम्यांना प्रमुख स्थान मिळू लागले आहे. या बातम्या स्टॉक मार्केटशी संबंधीत तरी असतात किंवा रिझर्व्ह बँकेच्या संबधीत तरी असतात. रिझर्व्ह बँकेशी संबधीत असलेल्या बातम्या शक्यतो बँकेचे पत धोरण व रेपो रेट या संबधीत असतात. या बातम्या वाचताना Repo Rate, CRR, SLR, Reverse Repo Rate असे शब्द वाचण्यात येत असतात व या शब्दांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काही ना काही तरी परिणाम होत असतो एवढे आपल्याला कळते पण याचा नक्की अर्थ काय हे बरेच जणांना समजत नसते. (मी पण त्यातलाच एक आहे). नुकताच पुण्याच्या सकाळचे संपादक श्री, मुकुंद लेले यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. मला हा लेख फार आवडला. मूळ लेख इंग्रजीमधे असून तो सान्ता व बांन्ता यांच्या संवादात आहे. मी या लेखाचे स्वैर मराठी रुपांतर केले असून सान्ता बान्ताच्या जागी मराठीतील ‘काळू-बाळू’ ही लोकप्रीय जोडी घेतली आहे. श्री. लेले यांच्या लेखामुळे माझ्या बर्या च शंकांचे निरसन झाले तसेच आपल्या पण शंकांचे निरसन व्हावे हाच या लेखाचा मूळ हेतू आहे.

काळूः- 
मी ऐकले आहे कि मि. राजन यांनी रेपो रेट (Repo Rate) 50 बेसिक पॉईन्ट्सनी कमी केला आहे. सगळेजण म्हणत आहेत की मार्केटच्या दृष्टीने ही एक चांगली गोष्ट आहे. कर्जाचे हप्ते पण ( Loan EMI) कमी होतील. हा ‘रेट कट’ म्हणजे नक्की काय? मला हे जरा समजाऊन घ्यायचे आहे.
बाळूः- 
हे समजावून घेण्याआधी तुला बँका कशा काम करतात हे समजावून घेणे आवश्यक आहे.
काळूः-
का?
बाळूः- 
कारण याचा बँकांच्या कामकाजाशी फार जवळचा संबंध आहे. मला सांग बँका काय काम करत असतात?
काळूः- 
बँका डिपॉझीटर्सकडून पैसे गोळा करत असतात व तेच पैसे कर्ज रुपाने देऊन त्यावर व्याज कमवत असतात. अशा पद्धतीने ते सगळ्यांना खूष ठेवत असतात व वर प्रॉफिट पण कमवत असतात.
बाळूः- 
बरोबर! पण या ठिकाणी अजुन काही गोष्टी असतात. मी अगदी साध्या भाषेत तुला समजाऊन सांगायचा प्रयत्न करतो. बँकेला पैसा हवा असतो. बँक तुझ्या किंवा माझ्यासारख्या डिपॉझीटर्सकडून पैसे गोळा करू शकते, तसेच आर. बी. आय.( म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया) यांचेकडून पण पैसे घेऊ शकते. अर्थात यासाठी बँकेला डिपॉझिटरला तसेच आर.बी.आय. ला काही ना काहीतरी व्याज हे द्यावेच लागते. 
काळूः- 
बर मग?
बाळूः- 
यासाठी जेव्हा आपण बँकेमधे 100 रुपये डिपॉझीट म्हणून ठेवतो त्याचे पुढे काय होते हे आपण समजावून घेणे आवश्यक आहे. 
काळूः- 
मला ठाऊक आहे. बँक तेच 100 रुपये कर्जरुपाने ज्याला गरज आहे त्याला देते! 
बाळूः-
नाही! हे एवढे सोपे नसते. कारण बँक जरी कर्ज देत असली तरी त्यात मोठी जोखीम असते. कर्ज बुडू शकते. अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत. यामधे बँकेचे पैसे बुडू शकतात. त्यामूळे बँक त्यांचेकडे असलेला सगळाच पैसा अशा प्रकारच्या ‘हाय रिस्क’ क्षेत्रात वापरू शकत नाही. या पैशांना काहीतरी संरक्षण आवश्यक असते. कारण किती झाले तरी हा लोकांचा पैसा असतो. तो सुरक्षीत रहायलाच हवा नाही का?
काळूः- 
होय पण ते कसे?
बाळूः-
आर. बी. आय ने प्रत्येक बँकेसाठी एक गोष्ट अनिवार्य केली आहे. आलेल्या प्रत्येक 100 रुपये डिपॉझिटपैकी 4 रुपये रिझर्व बँकेकडे करंट अकाऊंटमधे ठेवायचे. यावर काही व्याज मिळत नाही. याला ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (CRR) म्हणतात जो सध्या 4 टक्के आहे.

काळूः-
अस? मग पुढे काय होत?
बाळूः- 
त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांसाठी अजून एक गोष्ट अनिवार्य केलेली आहे. बँककडे डिपॉझिटच्या रुपाने आलेल्या प्रत्येक 100 रुपयांमधील 21 रुपये 50 पैसे एवढी गुंतवणूक सरकारी कर्जरोख्यांमधे करणे आवश्यक आहे. अर्थातच यावर बँकेला काहीतरी व्याज मिळतच असते. याला ‘स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो’ (SLR) म्हणतात जो सध्या 21.5 टक्के आहे.
काळूः- 
याचा अर्थ बँकेकडे आलेल्या 100 रुपयांपैकी बँकेकडे खर्च करायला किंवा कर्ज देण्यासाठी फक्त 74 रुपये 50 पैसेच उरतात? 
बाळूः- 
बरोबर आहे. सिआरआर चे 4रुपये अधिक एसएलआर चे 21 रुपये 50 पैसे म्हझजे टोटल 25 रुपये 50 पैसे हे 100 रुपयांतून वजा केले तर 74 रुपये 50 पैसे उरतात. 
काळूः- 
पण तु असे म्हणालास की बँक रिझर्व्ह बँकेकडून पण कर्ज घेऊ शकते. मग यासाठी बँकेला किती व्याज द्यावे लागते?
बाळूः-
30 सप्टेंबर 2015 पर्यंत बँका रिझर्व्ह बेँकडून घेतलेल्या पैशांसाठी 8.25 टक्के दराने व्याज द्यावे लागायचे. आता हा व्याज दर 50 पॉईन्ट्स नी कमी करण्यात आला आहे. आता बँकेला 7.75 टक्के दराने रिझर्व्ह बँकेला व्याज द्यावे लागेल. यालाच ‘रेपो रेट’ (Repo Rate) असे म्हणतात.
काळूः-
रेपो रेट कमी झाल्यामूळे बँकेच्या फिक्स डिपॉझीटच्या व्याजदरावर काही परिणाम होईल का?
बाळूः-
हो अगदी बरोबर आहे. जर बँकेला पुर्वीपेक्षा कमी व्याजदराने पैसे मिळत असतील तर त्यांनी डिपॉझिटर्सना जास्त दराने व्याज का म्हणून द्यावे? पुष्कळ बँकांनी एक वर्षाच्या मुदतीच्या डिपॉझिटचा व्याजदर कमी केला असून तो 7.75 टक्के किंवा त्याच्या आसपास केला आहे. 
काळूः- 
आता जर बँकांना कमी व्याजाने पैसा मिळू लागला आहे तर त्यांनी कर्जासाठीचे व्याजदर कमी करायला हवेत व याचा फायदा लोकांना म्हणजे जनतेला मिळवून द्यायलायला हवा!
बाळूः- 
होय तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. व्याजदर कमी होतील अशी शक्यता वाटू लागल्यामूळे मार्केटमधे आनंदी वातावरण आहे. उद्योजकांना कमी व्याजाने कर्ज मिळू लागले तर त्यांना त्यांच्या उद्योग धंद्यात भरीव वाढ करणे शक्य होणार आहे. त्यामूळे नवीन नोकर्यां उपलब्ध होऊन बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, त्यांच्या फायद्यामधे वाढ होईल व त्यामूळे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी येईल!
काळूः-
पण त्यामुळे महागाई कमी होईल का?
बाळूः-
हे बघ! त्याचे असे आहे की कर्जावरचे व्याजदर कमी झाले की लोक जास्त कर्ज घ्यायला उत्सुक असतात. याचा अर्थ लोकांकडे खर्च करायला किंवा खरेदी करायला जास्त पैसा उपलब्ध होईल. त्यामूळे मार्केटमधली मागणी वाढेल. पण जर त्याप्रमाणात मालाचा पुरवठा झाला नाही तर किंमती वाढू शकतील. 
काळूः- 
याचा अर्थ यामुळे महागाई वाढू शकेल!
बाळूः-
होय वाढू शकेल! पण महागाई वाढण्याची ईतर बरीच कारणे असतात. जसे उत्पादन (औद्योगीक उत्पादन व शेतीचे उत्पादन), आयात-निर्यात, परदेशी चलनाचा पुरवठा वगैरे. त्यामूळे महागाई वाढेल किंवा वाढणार पण नाही!
काळूः- 
आता शेवटचा प्रश्न! ज्याप्रमाणे आपण आपले पैसे बँकेमधे डिपॉझिट म्हणून ठेऊ शकतो त्याप्रमाणे बँक पण त्यांचे पैसे डिपॉझीट म्हणून ठेऊ शकतात का?
बाळूः-
होय! बँका त्यांचे पैसे रिझर्व्ह बेँकडे डिपॉझीट म्हणून ठेऊन त्यावर व्याज मिळवू शकतात. हे व्याज सर्वसाधारणपणे रेपो रेट (Repo Rate) पेक्षा एक टक्याने कमी असते. याला ‘रिव्हर्स रिपो रेट’ (Reverse Repo Rate) म्हणतात. 
काळूः-
वा वा! आज मला कळले की रिपो रेट, सीअरअर, एसएलआर, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय व त्याचे काय परिणाम होत असतात. 
बाळूः-
धन्यवाद

(श्री. मुकुंद लेले, संपादक, सकाळ यांच्या सौजन्याने)

_______________________________