Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 23, 2016

महत्वपूर्ण पुस्तके

��महत्वाचे पुस्तके आणि आत्मचरित्र :

पुस्तक - सुमन सुगंध (गायिका सुमन कल्याणपूर यांचे चरित्र)
लेखिका - मंगला खाडीलकर

पुस्तक - आमची माई (सिंधुताई सपकाळ यांचे चरित्र)
लेखक - डी.बी. महाजन

पुस्तक - ऑल दॅट कुड हॅव बीन  
लेखक -  महेश भट

पुस्तक - लावा (कवितासंग्रह)  
लेखक - जावेद अख्तर

पुस्तक - टू द ब्रिंक अँड बँक: इंडियाज 1991 स्टोरी  
लेखक - माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश.

पुस्तक - द इन्सायडर  
लेखक - माजी क्रिकेट खेळाडू आकाश चोप्रा

पुस्तक - लव्ह अॅट फेसबूक
लेखिका - निकीता सिंग

पुस्तक - तेजस्वी तारे, माझी जन्मठेप
लेखक - स्वा. वि.दा. सावरकर

पुस्तक - हयूब्रिस व्हाय इकॉमिस्ट फेल्ड टू प्रेडिक्ट द क्रायसीस अँड हाऊ टू अडव्हाइड द नेक्स्ट वन  
लेखक - भारतीय वंशीय अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई.

पुस्तक - बोस्टिच्या गोष्टी
लेखक - गीतकार गुलजार

पुस्तक - द फस्ट इंडियन स्टोरी ऑफ द फस्ट इंडियन सर्कमनॅव्हीगेशन अंडर सेल
लेखक - कमांडर दिलीप दोंदे.

पुस्तक - गुड मुस्लिम, बॅड मुस्लिम
लेखक - मेहमुद ममदानी

कादंबरी - दी इअर ऑफ द नरवेज
लेखक - भारतीय वंशीय ब्रिटिश संजिव साहोटा.

पुस्तक - सच ए लॉन्ग जर्नी
लेखक - रोहिग्टन मिस्त्री

पुस्तक - जिना:इंडिया, पार्टिशन, इनडिपेन्डन्स
लेखक - माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग.

पुस्तक - ग्रेट सोल - महात्मा गांधीजींच्या जीवनावर
लेखक - जोसेफ लेलीव्हेल्ड

पुस्तक - मधोरूबगन (तमिळ)
लेखक - पेरूमल मुरूगन

आत्मचरित्र - स्ट्रेट टू द हार्ट
लेखिका - टेनिस खेळाडू फ्लॅव्हिया पेनेटा.

चर्चेतील पुस्तके।१

 चर्चित पुस्तके २०१५ 
______________________________________
१) रीबुटींग इंडिया रिअलायजझिंग बिलियन अस्पायरेशन्स:-
नंदन नीलकेणी
२) ३० वुमेन इन पाॅवर -देअर व्हाॅइसेस,देअर स्टोरीज:- नैना लाल
किडवाई
३) मोदीज वल्ड एक्स्पाडींग स्फीअर ऑफ इन्फलुएन्स:- सी.
राजमोहन
४ )इंडीया सेंट्रल एशिया रिलेशन्स-द इकॉनॉमिक् डायमेन्शन्स--
अमिया चंद्रा
५) ट्रान्सेन्डन्स - माय स्पिरिच्युअल एक्सपीरियंस विथ प्रमुख
स्वामीजी:- डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम
६ घोस्टस ऑफ कलकत्ता--संबस्टीअन ओरिटझ
७ )द कॅपिटल इन ट्वेटी फस्ट सेसेच्युरी थंँमास पिकेटी
८) टेन जजमेटस दॅट चेज्ड इंडिया :-- झिया मोदी
९) काश्मीर द वाजपेयी झयर्स :-- ए एस दुलत
१०) मिशन राॅ :--आर के यादव
११) द सिल्क रोड ;अ न्यू हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड :---पीटर
फ्रॅकोपॅन
१२) ग्लोबलायझेंशन, डेमोक्रेटायझेशन अणड डिस्ट्रीब्युटीव्ह
जस्टीस :-- प्रा मूलचंद शर्मा
१३) रेड टेप टू रेड कार्पेट :--गिना रेनेहाटेॅ
१४) शेपिंग अवर फ्युचर :- अशले व्हान्स
१५) प्लेइंग इट माय वे:- सचिन तेंडुलकर
१६) नेहरू, बोस पॅरलल लाइव्हज:- रुदांश मुखर्जी
१७) मोसाद:- मायकेल बार झोहर आणी निस्सीम मिशल
१८) इलेक्शण- अॅन अनडॉक्युमेंटेड वंडर:- एस. वाय. कुरेशी
१९) फोर्च्युन स्माईल ;- अॅडम जाॅन्सन
२०) द ड्रॅमॅूटीक डिकेड इंदिरा इयर्स :- प्रणव मुखर्जी
२१) ब्लॅक टोरनॅॅडो- द थ्री सिजेस ऑफ मुंबई:- सांदेप उन्नितन
२२) इंटरलिकिंग द इंडीयन रिव्हर्स:- राधाकांत भारती
२३) ड्रीमिंग बिग- माय जर्नी टू कनेक्टइंडिया:- सॅम पित्रोदा

२४) टू द ब्रिंक अंड बँक -इंडियाज १९९१स्टोरी :- जयराम रमेश

२५) रीस्टार्ट- इंडियाज लास्ट आॅपाॅर्च्यूनिटी :- मीहीर शर्मा

चालु घडामोडी ७७

चालू घडामोडी..
नेताजी बोसांनाही होते फॅसिझमचे आकर्षण :

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीपुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्त्चाविषयी आजही भारतीय जनमानसात मोठे आकर्षण दिसून येते.
 नेताजी स्वातंत्र्य लढ्याला केवळ आक्रमक रूप देऊन थांबले नाहीत; तर स्वातंत्र्यानंतर आपला देश कसा असावा, याचा ठोस आराखडाही त्यांनी तयार केला होता, त्यांच्या मनामध्ये फॅसिस्ट विचारसरणीचेही सुप्त आकर्षण होते.
 स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील कम्युनिस्ट नेते रजनीपम दत्त यांनी 24 जानेवारी 1938 मध्ये लंडनच्या 'डेली वर्कर' या दैनिकासाठी नेताजींची मुलाखत घेतली होती.
 तसेच यामध्ये नेताजींनी समाजवाद आणि फॅसिस्ट विचारसरणीच्या आकर्षणाचा स्पष्टपणे उल्लेख केला होता, याचे नेमके प्रतिबिंब त्यांनी 1935 मध्ये लिहिलेल्या 'दि इंडियन स्ट्रगल' या आत्मचरित्रात्मक ग्रंथामध्ये उमटलेले दिसून येते.

ओडिशात डॉल्फिनची गणना :

ओडिशातील भीतरकणिका राष्ट्रीय उद्यानात डॉल्फिनची गणना येत्या 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
 सलग दुसऱ्या वर्षी ही गणना करण्यात येत आहे, असे राजनगर खारफुटी वन व वन्यजीव विभागाचे अधिकारी विमल प्रसन्न आचार्य यांनी सांगितले.
 ओडिशाच्या किनारपट्टीवरील धमरानदीपासून देवीनदीच्या मुखापर्यंतच्या भागात दिसणाऱ्या डॉल्फिनची मोजणी यात करण्यात येणार आहे.
 गेल्या वर्षी झालेल्या गणनेत या भागात इरावडी, बॉटलनोज, हम्पबॅक डॉल्फिन (सॉसा चायनिसीस), हम्पबॅक डॉल्फिन (सॉसा प्लम्बिया), पॅन ट्रॉपिकल स्पॉटेड डॉल्फिन व फिनलेस पॉर्पाइज अशा डॉल्फिनच्या सहा जाती आढळल्या होत्या.
 'फिनलेस पॉर्पाइज' जातीचा एक डॉल्फिन हुकीतोला येथे तर अन्य जातींचे डॉल्फिन गहिरमाता अभयारण्यात आढळले. 'हम्पबॅक डॉल्फिन' सर्वाधिक संख्येने येथे आहेत, ओडिशा किनारपट्टीवर डॉल्फिनच्या सुमारे 12 जाती आढळतात.

400 रेल्वे स्थानके वाय-फाय :

जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे मुंबई सेंट्रल स्थानकातील पहिल्या वाय-फाय सेवेचा शुभारंभ (दि.22 रोजी) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
 या वेळी रेल्वेमंत्री आणि गुगलतर्फे 2018 पर्यंत 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.
 भारतातील व्यस्त रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा गुगलमार्फत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
 त्यानुसार मुंबई सेंट्रल स्थानकात ही सुविधा सुरू करण्यात आली, ही वाय-फाय सेवा मोफत आहे.

रॉजर फेडररचे ‘ग्रँड’ त्रिशतक :

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला धूळ चारून आपला 300 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकला.
 महिला गटात अव्वल टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स, रशियाच्या मारिया शारापोव्हा यांनी विजयी धडाका कायम राखताना चौथी फेरी गाठली.

'महामना एक्‍स्प्रेस'ला हिरवा झेंडा :

वाराणसी-नवी दिल्लीदरम्यान धावणाऱ्या 'महामना एक्‍स्प्रेस' या नव्या अतिजलद गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.
 बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय यांच्या स्मरणार्थ ही गाडी सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारच्या अत्याधुनिक गाड्या देशभरात लवकरच सुरू करण्याचे मोदींनी जाहीर केले.
 वाराणसीतील 'डीएलडब्ल्यू' मैदानावरून मोदींनी दूरनियंत्रकाद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखविला, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, तसेच केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा या वेळी उपस्थित होते.
 'महामना एक्‍स्प्रेस' ही गाडी म्हणजे पं. मालवीय यांच्या कर्तृत्वाला वंदन असल्याचे मोदींनी नमूद केले.
 मुरादाबाद-नवी दिल्लीदरम्यान विद्युत इंजिनाच्या साह्याने धावणारी ही पहिलीच गाडी आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावरून 27 विमानांची मानवंदना :

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये यंदा भारतीय हवाई दलाची 27 विमाने सहभागी होणार आहेत.
 या विमानांकडून होणाऱ्या प्रात्यक्षिकांची सुरुवात चार एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सने होणार आहे, हे हेलिकॉप्टर्स इंग्रजीतील ‘वाय’ अक्षराच्या आकाराने संचलन मार्गावरून जातील.
 दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन एमआय 35 हेलिकॉप्टर्स संचलनामध्ये सहभागी होतील. ही हेलिकॉप्टर्स ‘Vic’ आकाराने राजपथावरून जाणार आहेत. त्यानंतर तीन सी-130 जे सुपर हर्क्युलस विमाने राजपथावरून जातील.
 लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकामध्ये पाच जॅग्वार, पाच मिग-29 आणि तीन सुखोई 30 एमकेआय यांचा समावेश असेल.
 विमानांच्या साह्याने दिल्या जाणाऱ्या मानवंदनेचा शेवट हे नेहमीप्रमाणे सुखोई 30 एमकेआय जातीच्या लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकांनी होणार आहे.

भारताचा विकास दर 7.3 टक्के :

भारत यावर्षी 7.3 टक्के विकास दर राखून जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सगळ्यात वेगाने विकास दर प्राप्त करणारी अर्थव्यवस्था असेल.
 संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या अहवालात 2016 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.3 टक्के असेल.
 दक्षिण आशियाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2017 मध्ये 7.5 टक्के असेल.
 संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्धीस दिलेल्या ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि शक्यता 2016 या अहवालात भारताची अर्थव्यवस्था जगात सगळ्यात वेगाने वाढणारी असल्याचे म्हटले आहे.

राहुल ठक्कर यांना ऑस्कर पुरस्कार :

सुरुवातीला कोर्ट तर त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचून ऑस्करच्या स्पर्धेतून हेमलकसा बाहेर पडल्याने चित्रपटसृष्टीत कलाकार आणि सर्वच प्रेक्षकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
 मूळचे भारतीय वंशाचे असलेले आणि हॉलिवूडमध्ये काम करणारे राहुल ठक्कर यांना या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे.
 भारतीय कुटुंबावरील शॉर्टफिल्म ऑस्करसाठी नॉमिनेटेड राहुल आणि त्यांचा सहकारी रिचर्स चॅग यांनी ‘अ‍ॅडव्हान्स प्लेबॅक फीचर्स’ या प्रकारात गेल्या दशकभरात भरीव कार्य केले आहे.

दिनविशेष :

1556 : जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला.
 1897 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा कटक येथे जन्म.
 1926 : बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक यांचा जन्म.
 1950 : रसायनशास्त्राती
ल नोबेल पारितोषिक विजेते ऑटो डायलय यांचा जन्म.
 1996 : संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.

Thursday, January 21, 2016

महत्त्वपूर्ण सम्मेलन व परिषद

महत्वाच्या परिषदा-संमेलने
------------------------------------

1.चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन -

पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार बेटावर 5 व 6 सप्टें. 2015 रोजी संपन्न झाले.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष - खा. राहूल शेवाळे
संमेलनाचे उद्घाटक - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे.
संमेलन अध्यक्ष - प्रा. शेषराव मोरे.
------------------------------------
2. 5 वे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व साहित्य संमेलन -

5 सप्टें. 2015 रोजी मॉरिशस देशात संपन्न झाले.
या संमेलनाचे अध्यक्ष - श्याम जाजू
------------------------------------

3. 10 ते 13 सप्टें. 2015 दरम्यान आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद -

मध्यप्रदेशात भोपाळ येथे आयोजित केली होती.
या परिषदेची संकल्पना होती - हिंदी जगत : विस्तार एवम संभवनाई
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर समारोप अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केला.
पहिले विश्व हिंदी संमेलन 1975 साली नागपूर येथे भरले होते. तर 2007 चे 8 वे न्यूयॉर्क (अमेरिका), 2012 चे 9 वे जोहान्सबर्ग येथे आयोजीत केले होते.
भोपाळ येथे आयोजीत केलेले नागपूर, दिल्ली यानंतर हे तिसरे भारतात आयोजीत केलेले विश्व हिंदी संमेलन होते.
सन 2018 चे विश्व हिंदी संमेलन मॉरिशस देशात आयोजीत केले जाईल.
------------------------------------

4. संयुक्त राष्ट्र संघाची चौथी जागतिक संसद अध्यक्षांची परिषद -

न्यूयॉर्क येथे सप्टेंबर 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन व राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे.कुरियन हजर होते.
------------------------------------

5. फोरम फॉर इंडिया -

पॅसिफीक आयर्लंड को-ऑपरेशन/भारत - प्रशांत सागरीय व्दिप देश सहकार्य मंच - ची दुसरी शिखर परिषद 21 व 22 ऑगस्ट 2015 मध्ये नवी दिल्ली व जयपूर येथे संपन्न झाली.
या संघटनेची संकल्पना नोव्हें. 2014 मध्ये मोदी यांनी भांडली होती.
या संघटनेची पहिली परिषद नोव्हेंबर 2014 मध्ये फिजी या देशात संपन्न झाली होती.
या संघटनेतील 14 सदस्य देश - भारत, फिजी, किरीबाती, कुक्स बेटे, मार्शल बेटे, टोंगा, तुआलू, वॅनवाटू
या संघटनेतील फिजी देशात सुमारे 38 टक्के लोकसंख्या भारतीय वंशीय आहे.
ही सर्व बेटे दक्षिण पॅसिफीक/प्रशांत महासागरात आग्नेय आशिया व ऑस्ट्रेलिया खंडादरम्यान आहेत.
------------------------------------

6. जी-20 देशांच्या अर्थमंत्र्यांची व बँक गव्हर्नरांची परिषद -

4 व 5 सप्टें. 2015 रोजी तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे संपन्न झाली.
या परिषदेला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली व आरबीआय चे गव्हर्नर रघुराम राजन हजर हीओपी/कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ची 21वी परिषद -

डिसेंबर 2015 मध्ये फ्रांस देशात पॅरीस येथे भरणार आहे.
---------------------------------

7. सीओपी/कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ची 21वी परिषद -

डिसेंबर 2015 मध्ये फ्रांस देशात पॅरीस येथे भरणार आहे.
---------------------------------

8. जी-4 गटांची शिखर परिषद -

26 सप्टेंबर 2015 रोजी न्यूयॉर्क येथे संपन्न झाली.
या संघटनेचे/गटाचे चार सदस्य देश-भारत, जर्मनी, जपान, ब्राझील.
या शिखर परिषदेला जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष डिलीमा रौसेफ, जपानचे पंतप्रधान शिझो अॅबे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कायम सुरक्षा परिषदेचा विस्तार करून जी-4 गटातील चारही देशांना कायमसुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळावे अशी मागणी आहे.
------------------------------------

9. पहिली भगवद्गीता जागतिक परिषद इंग्लंड देशात सप्टेंबर 2015 मध्ये संपन्न झाली.
------------------------------------

10. संयुक्त राष्ट्र संघाचे 30 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2015 दरम्यान 21 वे जागतिक हवामानबदल विषयक परिषद/संमेलन - पॅरिस (फ्रान्स)
------------------------------------

11. सन 2016 चे प्रवासी भारतीय संमेलन - नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहे.
------------------------------------

12. सार्क संघटनेची दुसरी आंतरराष्ट्रीय युवा परिषद 30 सप्टेंबर 2015 रोजी चंदीगड येथे संपन्न झाली.
------------------------------------

13. पिपरी चिंचवड येथे सन 2016 मध्ये आयोजित केल्या जाणार्‍या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणार्‍या कलावंत - पद्मा इराणी व इरावती मालेगावकर.

------------------------------------

14. 2016 च्या 96 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन-

अध्यक्षपदी जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांची निवड करण्यात आली.
व्हाया वस्त्रहरण हे त्यांचे आत्मकथन, व ऐसपैस हे पुस्तक आहे.
त्यांनी मालवणी भाषेत लिहिलेली प्रसिद्ध नाटके - वेडी माणसे, दोघी, वर भेटू नका, वर परीक्षा, वस्त्रहरण, वात्रमेले, वन रूम किचन इ.
------------------------------------

15. तिसरी भारत-आफ्रिका शिखर परिषद/भारत-आफ्रिका फोरम समिट-

2015-26 ते 30 ऑक्टोबर 2015 - नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये संपन्न झाली.
पहिली भारत - आफ्रिका शिखर परिषद 2008 साली संपन्न झाली. या परिषदेला 14 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
दुसरी शिखर परिषद 2011 साली इथिओपियाची राजधानी आदिसआबाबा येथे झाली होती. या परिषदेला 15 देशांचे प्रतिनिधी हजर होते.
तिसरी भारत-आफ्रिका शिखर परिषद ही 2014 साली भरणार होती परंतु गेल्या वर्षी आफ्रिका खंडात इबोला रोगाच्या प्रसारामुळे ती रद्द करून यावर्षी घेण्यात आली.
तिसर्‍या परिषदेला भारत सरकारने प्रथमच आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांना निमंत्रण दिले होते.
या परिषदेला आफ्रिका खंडातील सर्व 54 देशांचे प्रतिनिधी हजर होते यापैकी 25 राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान हजर होते. तसेच उर्वरित देशांचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री हजर होते.
या परिषदेचे सह अध्यक्ष होते- झिबॉम्बेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाम्बे तर अध्यक्ष होते पंतप्रधान नरेंद्र मोदी.
या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले तर समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
ही परिषद यापूर्वी तीन वर्षाला आयोजित केली जात होती परंतु यापुढे ती प्रती पाच वर्षाला आयोजित करण्यास या तिसर्‍या परिषदेत मंजूरी देण्यात आली.
भारतात आयोजित केलेली ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय महापरिषद होती.
------------------------------------

16. सन 2015 चे अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलन सोलापूर येथे आयोजीत केले जाणार आहे.

17. सन 2016 चे 11 वे युरोपीय मराठी संमेलन - हॉलंड/नेदरलँड या देशात आयोजित केले जाणार आहे.
------------------------------------

18. श्री संत नामदेव साहित्य संमेलन 2015-

हे पंढरपूर जि.सोलापूर येथे ऑक्टोबर 2015 मध्ये संपन्न झाले.
संमेलनाध्यक्ष - प्रा. डॉ. अशोक कामत.

19. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केले जाणारे पहिले सन 2016 चे युवा साहित्य संमेलन - औरंगाबाद येथे आयोजीत केले जाईल.
------------------------------------

महत्वाचे साहित्य संमेलने :

राज्यस्तरीय व्यसमुक्ती साहित्य संमेलन:

1) वर्ष : 2012 (1 ले)
शहर : पुणे
संमेलनाध्यक्ष : अनिल अवचट

2) वर्ष:2013 (2 रे)
शहर : नागपुर
संमेलनाध्यक्ष : डॉ. राणी बंग

3) वर्ष : 2014 (3 रे)
शहर : मुंबई
संमेलनाध्यक्ष : फ्रांसिस दिब्रीटो

अ.भा. मराठी साहित्य संमेलन :

1) वर्ष : 2013 (86वे)
शहर : चिपळूण
संमेलनाध्यक्ष : नागनाथ कोत्तापल्ले

2)वर्ष : 2014 (87वे)
शहर : सासवड
संमेलनाध्यक्ष : फ.मुं. शिंदे

3) वर्ष : 2015 (88वे)
शहर : घुमान (पंजाब)
संमेलनाध्यक्ष : सदानंद मोरे

4) वर्ष : 2016 (89वे)
शहर : पिंपरी चिंचवड

विश्व मराठी साहित्य संमेलन:

1) वर्ष : 2009 (1ले)
ठिकाण : सॅन होजे (अमेरिका)
संमेलनाध्यक्ष : गंगाधर पानतावणे

2) वर्ष : 2010 (2रे)
ठिकाण : दुबई (अरबअमिराती)
संमेलनाध्यक्ष : मंगेश पाडगांवकर

3) वर्ष : 2011 (3रे)
ठिकाण : सिंगापूर
संमेलनाध्यक्ष : महेशएलकुंचवार

4) वर्ष : 2015 (4थे)
ठिकाण : पोर्ट ब्लेअर (भारत)
संमेलनाध्यक्ष : शेषराव मोरे

भारतीय सायन्स काँग्रेसची अधिवेशने :

1) वर्ष 2013 (100वे)
शहर : कोलकाता (प.बंगाल)
संमेलनाध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग (मा. पंतप्रधान)

2) वर्ष 2014 (101वे)
शहर : जम्मू (जम्मू काश्मिर)

3) वर्ष : 2015 (102वे)
शहर : मुंबई (महाराष्ट्र)
संमेलनाध्यक्ष : डॉ. एस.बी. निमसे (महाराष्ट्र)

4) वर्ष : 2016 (103वे)
शहर : म्हैसूर (कर्नाटक)
संमेलनाध्यक्ष : डॉ. ए.के. सक्सेना (नियोजीत)

सार्क शिखर परिषदा :

1) वर्ष : 2010(16वी)
यजमान शहर : थिंपू
देश : भूतान

2) वर्ष : 2011 (17वी)
यजमान शहर : अड्डेबेट, माले
देश : मालदिव

3) वर्ष : 2014 (18वी)
यजमान शहर : काठमांडू
देश : नेपाळ

4) वर्ष 2016 (19वी)
यजमान शहर : इस्लामाबाद
देश : पाकिस्तान

प्रवासी भारतीय संमेलन :

1) वर्ष : 2013 (11वे)
यजमान शहर : कोची

2) वर्ष : 2014(12वे)
यजमान शहर : नवी दिल्ली

3) वर्ष : 2015(13वे)
यजमान शहर : अहमदाबाद (गांधीनगर)

4) वर्ष : 2016 (14वे)
यजमान शहर : नवी दिल्ली

संरक्षण २०१५

#संरक्षण २०१५:-
-----------------------------------------------------------------
* इंद्र २०१५:-
स्थळ :- बिकानेर (राजस्थान)
भारत आणी रशिया यांच्यातील इंद्र या सामरिक कसरतीची सातवी आवृती. या कसरती ऐकून १४ दिवस सुरु होत्या

* मलबार :- २०१५
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अमेरिका, जपान आणी भारत यांच्या नौदलामध्ये या सयुक्त कसरतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येयुद्धनौका, विनाशिका आणी विमानवाहू नौंकाचा सहभाग होता

* मित्र शक्ती:-
स्थळ :- पुणे
भारत आणी श्रीलंका यांच्या लष्करामध्ये २९ सप्टेंबर ते ११ आक्टोंबर या कालावधीत सयुक्त कसरत पार पडली

* सिम्बेकस :- २०१५:-
सिंगापुर आणी भारत यांच्या नौदलातील चारदिवशीय कसरती. हिंदी महासागर आणी दक्षिण चीनी समुद्र या दरम्यान २३ ते २६ मे दरम्यान पार पडल्या

* इंद्रधनुष्य;-
स्थळ:- हनींगटन
भारत आणी युनायटेड किंग्डम यांच्यातील हवाई कसरती ३० जुलै रोजी पार पडल्या
* गरुडशक्ती :-
११ ते २१ फेब्रुवारी दरम्यान भारत आणी इंडोनेशिया यांच्यातील लष्करी कवायती मिझोराम येथे पार पडल्या

* स्लीनेक्स २०१५;-
स्लीनेक्स म्हणजे श्रीलंका इंडिया नेव्हल एक्सरसाईज. १ नोव्हे रोजी भारत आणी श्रीलंका यांच्या नौदलातर्फे सयुक्तिकरीत्या या कवायतीचे आयोजन करण्यात आले होते. सागरी आणी किनारी सुरक्षेच्या क्षेत्रात या दोन्ही देशांनी केलेल्या प्रगतीची चाचनी यामध्ये करण्यात आली

* सूर्यकिरण ८:-
भारत आणी नेपाळ यांच्या सरक्षण दलामधील संरक्षण सिध्तेची चाचणी करण्यासाठी २३फेब्रवारी ते३मार्च २०१५या दरम्यान सलिजहंडी येथे या युद्धसरवाचे आयोजन करण्यातआले होते
* वरूण १४ :-
गोव्यात २ मे रोजी भारत आणी फ्रांस यांच्या नौदलातील वरूण या कसरतीची १४ वी आवृत्तीपार पडली.

* आॅसिन्डेक्स:-
भारत आणी ऑस्ट्रेलिया यांच्यानौदलातील पहिल्या साप्ताहिक कसरती भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पार पडल्या . भारतातर्फे आयएनएस शिवालीक तर ऑस्ट्रेलियातर्फे नौदलाच्या पी ३सी ओरायन सव्हलंस या हवाई तुकडीने सहभाग घेतला

* एकुवेरीन २०१५:-
मालदीव आणी भारत या दोन देशाच्या सैन्यदलामध्ये १५ दिवसांच्या एकुवेरीन कसरती थिरुवनंतपुरम येथे पार पडल्या मालदीवचे ४५ मरीन कमांडो आणी भारतीय सैन्यदलाचे ४५ कमांडो यात सहभागी झाले होते

* आक्रमण २:-
भारताच्या चेतक या हेलिकॉप्टरची पंजाब मधील भटींडा येथे तैनात करण्यात आलेली तुकडी आणी ऐकून ३००अन्य लष्करी वाहनाचा व सुमारे १०००० जवानांचा युद्ध सराव

* साडमेक्स २०१५:-
द साऊथ एशियन अॅन्युक्ल डीझास्टर मॅनेजमेंट एक्सरसाइज २०१५या कसरती दिल्ली येथे पार पडल्या.भारतातील राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलातर्फे अशाप्रकारच्या कसरतीचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते सार्क देशातील आपत्कालीन प्रतिसाद दलांचे प्रतिनिधीही यामध्ये सहभागी झाले होते

* Hand in Hand 2015:-
भारत आणी चीन या दोहोच्या लष्करातर्फे या कसरतीचे आयोजन करण्यात आले होतेया कसरतिची ही पाचवी आवृती चीनच्या युनान प्रातातील कनमिग मिलीटरी अकादमी येथे त्या पार पडल्या