Bookmark

Bookmark this Blog

Sunday, November 8, 2015

प्लेटलेट्स म्हणजे काय?

⚡‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡

हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.

हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.
लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

⚡प्लेटलेट्सचं कार्य⚡

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते.

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

⚡प्लेटलेट्सची संख्या ⚡

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

⚡प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी

⚡संख्या कमी झाल्यास...

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

⚡प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                      
⚡नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ .

जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

⚡१.पपई -⚡

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.

⚡२.गुळवेल⚡

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

⚡३.आवळा⚡

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.

⚡४.भोपळा⚡

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

⚡५.पालक⚡

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

⚡६.नारळ पाणी⚡

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

⚡७.बीट ⚡

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

अन्न द्रव्यांचि कमतरता ओळखा

अशी ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता

1) नत्र - झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.

2) स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

3) पालाश - पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

4) जस्त - पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

5) लोह - शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.

6) तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

7) बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.

9) मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

10) गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.

स्पर्धा परीक्षा विशेष

��स्पर्धा परीक्षा विशेष ��

��७ नोव्हेंबर २०१५ ��

����15 नोव्हेंबरपासून अर्धा टक्का उपकर लागू होणार :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी आता अर्धा टक्का स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
दिवाळीनंतर 15 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
त्यामुळे विमान प्रवास, दूरध्वनीवरील संभाषण, हॉटेलांतील जेवण आणि बँकिंग सेवा आदी महाग होणार आहे.
 
या निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीत चार हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.
 
अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आवश्यकता भासल्यास सर्वच किंवा विशिष्ट सेवांवर दोन टक्के स्वच्छ भारत उपकर लागू करण्याचे संकेत दिले होते.
 
तसेच या उपकराच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्वच्छ भारत अभियानासाठीच वापरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
----------------

����ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन :

तंबाखूवर्गातील प्राचीन वनस्पतीमध्ये असलेले असे जनुक शोधले आहे की, त्याचा वापर करून मंगळासारख्या दूरच्या ग्रहावरही प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणारी पिके व इतर वनस्पती आंतरजनुकीय तंत्राने तयार करणे शक्य होणार आहे.
 
क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठातील वनस्पती जनुकशास्त्राज्ञ प्रा. पीटर वॉटरहाऊस यांनी सांगितले की, मूळ आदिवासी जमातींमध्ये प्रचलित असलेल्या तंबाखूच्या एका देशी रोपात म्हणजे निकोटियाना बेनथामियाना या पिटज्युरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीत हे जनुक सापडले आहे.
 
पिटज्युरी ही तंबाखू वनस्पती आहे, तिचा इतिहास शोधताना हे जनुक सापडले आहे.
 
या वनस्पतीचा उपयोग जनुकशास्त्रज्ञ विषाणू व लशीची चाचणी घेण्यासाठी प्रारूप म्हणून करीत असतात.
 
वनस्पतींमधील पांढरा उंदीर म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केले जातात असा जैविक घटक असे या वनस्पतीला म्हणावे लागेल.
 
या वनस्पतीत अनेक आश्चर्यकारक गुण असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतीचा जनुकीय आराखडा तयार केला आहे.
 
ही वनस्पती पश्चिम ऑस्ट्रेलिया व उत्तर सीमेकडील असल्याचे सांगण्यात येते.
 
रेणवीय घड्याळाच्या व जीवाश्म नोंदीच्या आधारे वैज्ञानिकांनी या वनस्पतीचे आताचे रूप शोधून काढले आहे.
 
साडेसात लाख वर्षांपूर्वीची ही वनस्पती असून ती जंगली स्वरूपातील होती.
 
वनस्पती जैवतंत्रज्ञानावर मोठा परिणाम करणारे हे संशोधन असल्याचे संशोधक श्रीमती ज्युलिया बॅली यांनी सांगितले.
 
या वनस्पतीने प्रतिकारशक्ती गमावली असली तरी ती पटकन वाढते, फुलोरा लगेच येतो व कमी पावसातही उगवते.
 
दुष्काळातही ही वनस्पती तग धरते, त्यामुळेच इतकी वष्रे ती टिकून राहिली आहे. अवकाशात रोगमुक्त वनस्पतींच्या निर्मितीसाठी या वनस्पतीचा अभ्यास उपयुक्त आहे.
####################

����तामिळनाडूतील संस्था नोंदणी कार्यालयाची नोंदणी रद्द केल्याचा दावा :

तामिळनाडूतील संस्था नोंदणी कार्यालयाने स्वयंसेवी संस्था म्हणून असलेली आपली नोंदणी रद्द केल्याचा दावा ग्रीनपीस इंडिया सोसायटीने केला.
--------------------------

����अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात केली सुरू 

अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात सुरू केली असून, त्यातील सर्वात चांगले मॉडेल 14 लाख रुपयांना आहे.
 
या घडय़ाळाच्या किमती 30,990 ते 14 लाख दरम्यान आहे.
 
देशातील 100 अ‍ॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत. वेगवेगळय़ा डिस्प्ले आकारात म्हणजे 38 मि.मी. व 42 मि.मी.मध्ये ती उपलब्ध आहेत.
 
अ‍ॅपल घडय़ाळे 18 कॅरट रोज गोल्ड, व्हाइट स्पोर्ट्स बँड, 42 मि.मी. डिस्प्ले या स्वरूपात उपलब्ध आहेत.
 
त्यांची किंमत 9.9 लाख रुपये आहे. 42 मि.मी. डिस्प्लेचे दोन प्रकार अ‍ॅल्युमिनियम केस व स्पोर्ट्स बँड असे असून त्यांच्या किमती 34900 रुपये आहेत.
 
अ‍ॅपल घडय़ाळाचे उपयोग : कॉल घेणे,  छायाचित्रे काढणे,  संगीत श्रवण, इन्स्टाग्राम छायाचित्रांचे व्यवस्थापन, शरीराच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणे, ईमेल वाचणे.
####################

����दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन योजना लागू होणार :

दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन अर्थात OROP योजना लागू होणार असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
 
OROP संर्दभातील सर्व मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे सरकारच्या विरोधात आज सर्व माजी सैनिकांनी मेडल वापसी करणार असल्याचे जाहीर केले होते.  
 
जर वन रँक वन पेन्शंन योजना सरकारने लागू नाही केली तर दिवाळी साजरी करणार नाही असेही माजी सैनिकांने सांगीतले होते.
 
निवृत्त सैनिकांसाठी असलेली निवृत्तीवेतन योजना (OROP)  1 जुलै 2014 पासून लागू केली होती पण सरकार आणि अंदोलनकर्ते (माजी सैनिक) यांच्यातील तिढा कायम होता.  
--------------------------

����भारताकडून अफगाणिस्तानला चार लढाऊ हेलिकॉप्टर देण्याचा करार :

भारताकडून अफगाणिस्तानला चार लढाऊ हेलिकॉप्टर देण्याचा करार लवकरच अंतिम होण्याची शक्‍यता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
 
अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हानिफ अत्मर भारत दौऱ्यावर येत असून, त्याचवेळी करारावर स्वाक्षरी होण्याची शक्‍यता आहे.
 
भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानला फक्त पायाभूत सुविधांसंदर्भात मदत करण्यापर्यंत स्वतःला मर्यादित ठेवले होते.
 
मात्र, दहशतवादाशी झुंजत असल्याने लष्करी मदतही पुरवण्याची अफगाणिस्तानकडून सातत्याने मागणी होत होती.
 
हे चार हेलिकॉप्टर पुरविण्यामुळे त्यांची ही मागणी पूर्ण होण्यास सुरवात झाली असल्याचे मानले जाते.
 
लढाऊ हेलिकॉप्टर्सबरोबरच साध्या हेलिकॉप्टर्सची मागणीही अफगाणिस्तानने केली आहे.
####################

����दिनविशेष :

रशिया क्रांती दिन  
 
1907 : डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
 
1996 : नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण
 
2000 : हिलरी क्लिंटनची अमेरिकेच्या सेनेटवर निवड
-------------------------

कुस्ती लीग

* कुस्ती लीग
--------------------------------------------------------------------------------------
* प्रो कुस्ती लीगसाठी आज पैलवानांचा लिलाव झाला. या लिलावात महिला पैलवान पुरुषांपेक्षाही सरस ठरल्या.
* या लिलावात यूक्रेनची ओकसाना हरहेल सर्वात महागडी ठरली. हरहेलला हरियाणाने 41. 30 लाख रुपये आणि वेसलिसा (बेलारूस) हिला पंजाबने 40.20 लाख रुपयांत आपल्या टीममध्ये घेतले.
* भारताचे दोन सर्वात लोकप्रिय आेलिम्पिक पदक विजेते पैलवान योगेश्वर दत्त आणि सुशील कुमार यांनाही चांगली किंमत मिळाली. योगेश्वरला 39.70 लाख रुपयांमध्ये तर सुशीलला 38.20 लाख रुपयांत हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या संघांनी विकत घेतले आहे. आयकॉन खेळाडूंमध्ये योगेश्वर आणि सुशीलची बेस प्राइज 33-33 लाख रुपये होती.
* सहा आयकॉन खेळाडूंमध्ये पैलवान नरसिंह यादव, महिला पैलवान गीता फोगाट, अमेरिकेची महिला पैलवान अॅडेलीन ग्रे आणि स्वीडनची सोफिया मॅटसन यांचा समावेश होता. अमेरिकीची पैलवान ग्रे हिला मुंबईने 37 लाख रुपयांत विकत घेतले. तर, दिल्लीने मॅटसनला तिच्या बेस प्राइसवरच खरेदी केले..
* मुंबईच्या नरसिंगला बंगळुरू संघाने ३४ लाख ५० हजार रु.मिळाले

’खेळाडूंची आखणी:-
* प्रत्येक फ्रँचाइजीकडे पाच भारतीय व चार परदेशी असे एकूण नऊ खेळाडू असतील.
* त्यामध्ये चार महिला खेळाडूंचा समावेश आहे.

’लीगमधील फ्रँचाइजी:-
दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, मुंबई व बंगळुरू.

’स्पर्धेची ठिकाणे:-
दिल्ली, मुंबई, बंगळुरू, लुधियाना, नोएडा व गुरगाव.

6 टीम, 18 सामने, 21 दिवस
- 21 दिवस चालणार टूर्नामेंट 10 ते 27 डिसेंबर पर्यंत.
- संघ हरियाणा, पंजाब, मुंबई, उत्तर प्रदेश, बेंगलुरु आणि दिल्ली
- प्रत्येक संघात असतील पांच पुरुष व चार महिला.
- 54 खेळाडू विकले गेले, 2 कोटीत .
- 18 सामने होणार एकूण बक्षिसे तीन कोटींची.

आणीबाणी

आणीबाणी:काही विशिष्ट परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतीला काही विशेष स्वरूपाचे अधिकार देण्यात आले आहेत. संविधानाने खालील तीन प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख केला आहे.
अ – राष्ट्रीय आणीबाणी (३५२)
ब – घटकराज्यातील आणीबाणी (३५६)

क – आर्थिक आणीबाणी (३६०)स्पष्टीकरण :

अ) राष्ट्रीय आणीबाणी (३५२) :-युद्ध किंवा बाह्य आक्रमण यामुळे भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे किंवा अंतर्गत सशस्त्र उठावामुळे भारताच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे असे राष्ट्रपतीला वाटल्यास तो सर्व भारतासाठी किंवा भारतातील एखाद्या भागासाठी आणीबाणीची घोषणा करू शकतो.अशा त-हेच्या घोषणेला संसदेची एका महिन्याच्या आत मान्यता घ्यावी लागते.

ब) घटकराज्यातील आणीबाणी (३५६) :-एखाद्या घटकराज्याचे शासन संविधानानुसार चालत नसल्याबाबत राष्ट्रपतीची खात्री पटल्यास तो त्या राज्यात आणीबाणी घोषित करू शकतो. राष्ट्रपती त्या राज्याचे सर्व प्रशासन आपल्या हाती घेऊ शकतात. अशा परिस्थितीमध्येसंसद घटकराज्यासाठी कायदा करते. राष्ट्रपतीच्या नावाने राज्यपाल राज्याचे प्रशासन चालवितो. अशा प्रकारच्या आणीबाणीच्या घोषणेत दोन महिन्याच्या आत संसदेकडून मान्यता घ्यावी लागते. आणीबाणीचा काळ एका वेळी आणखी सहा महिन्यांनी वाढविता येतो. परंतु या पद्धतीने तो तीन वर्षांपेक्षा अधिक वाढविता येत नाही.

क) आर्थिक आणीबाणी (३६०) :-देशाच्या आर्थिक स्थैर्यास धोका निर्माण झाला आहे असे राष्ट्रपतीचे मत झाल्यास तो आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतो. आर्थिक आणीबाणी घोषित झाल्यास राष्ट्रपती सर्व शासकीय कर्मचारी तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या वेतनांमध्ये कपात करण्याचे आदेश देऊ शकतो. आर्थिक बाबतीत काही निश्चित तत्त्वांचे पालन करण्यासंबंधी तो घटकराज्यांना सूचना देऊ शकतो. अशा त-हेच्या आणीबाणीच्या घोषणेला दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवावी लागते.__________________

लसावि आणि मसावि

 लसावी (LCM) आणि मसावी (HCF / GCD)   
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१) एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो, त्या सर्व संख्यांना मुळच्या संख्येच्या विभाजक संख्या किंवा दिलेल्या संख्येचे विभाजक म्हणतात 
.
२) एखाद्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो, त्या त्या सर्व संख्या दिलेल्या संख्येचे विभाज्य आहेत असे म्हणतात 
.
३) विभाज्य संख्या अनंत असतात 
.
४) दोन भिन्न सख्यांचे विभाजक लिहिल्यास कधी कधी ज्या दोन्ही संख्यामध्ये समान असणारे विभाजक आढळतात अशा विभाजकाना सामाईक विभाजक असे म्हणतात 
.
५) अपूर्णांकास संक्षिप्त रूप देण्यासाठी अंश आणि छेद या दोघानाही सामाईक विभाजकाने भागावे लागते 
.
६) अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांना त्यांच्या म.सा.वी. ने भागल्यास अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप मिळते 
.
७) दिलेल्या दोन संख्यांचा मसावी हा त्यांच्या लसावी चा निश्चितपणे अवयव असतो 
.
८) दिलेल्या संख्येच्या मसावी ने त्या प्रत्येक संख्येस भाग जातो
.
९) दिलेल्या संख्यांच्या लसावी ला त्यांच्यापैकी प्रत्येक संख्येने भाग जातो