Bookmark

Bookmark this Blog

Sunday, November 8, 2015

लसावि आणि मसावि

 लसावी (LCM) आणि मसावी (HCF / GCD)   
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१) एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्यांनी भाग जातो, त्या सर्व संख्यांना मुळच्या संख्येच्या विभाजक संख्या किंवा दिलेल्या संख्येचे विभाजक म्हणतात 
.
२) एखाद्या संख्येने ज्या ज्या संख्यांना भाग जातो, त्या त्या सर्व संख्या दिलेल्या संख्येचे विभाज्य आहेत असे म्हणतात 
.
३) विभाज्य संख्या अनंत असतात 
.
४) दोन भिन्न सख्यांचे विभाजक लिहिल्यास कधी कधी ज्या दोन्ही संख्यामध्ये समान असणारे विभाजक आढळतात अशा विभाजकाना सामाईक विभाजक असे म्हणतात 
.
५) अपूर्णांकास संक्षिप्त रूप देण्यासाठी अंश आणि छेद या दोघानाही सामाईक विभाजकाने भागावे लागते 
.
६) अपूर्णांकाचा अंश आणि छेद यांना त्यांच्या म.सा.वी. ने भागल्यास अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप मिळते 
.
७) दिलेल्या दोन संख्यांचा मसावी हा त्यांच्या लसावी चा निश्चितपणे अवयव असतो 
.
८) दिलेल्या संख्येच्या मसावी ने त्या प्रत्येक संख्येस भाग जातो
.
९) दिलेल्या संख्यांच्या लसावी ला त्यांच्यापैकी प्रत्येक संख्येने भाग जातो 

No comments:

Post a Comment