Bookmark

Bookmark this Blog

Friday, March 13, 2015

जागतिक दिवस

जागतिक दिवस :::

जानेवारी
१ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस.
१२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन.
१५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन.
२६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस.
३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस
(महात्मा गांधी स्मृति दिन).

फेब्रुवारी
४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस.
१४ फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.
२० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिवस.
२१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
२४ फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.
२७ फेब्रुवारी : जागतिक नाट्यदिन.
२७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस.
२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस.

मार्च
७ मार्च : जागतिक गणित दिवस.
८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन(राष्ट्रसंघद
्वारा घोषित).
२० मार्च : जागतिक चिमणी दिवस.
२१ मार्च : जागतिक जंगल दिवस.
२२ मार्च : जागतिक पाणी दिवस(राष्ट्रसंघ
द्वारा घोषित).
२३ मार्च : जागतिक हवामान दिवस.
२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस.
३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस.

एप्रिल
१ एप्रिल : जागतिक मूर्खांचा दिवस.
५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन.
७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिवस.
११ एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिवस.
१७ एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस.
२२ एप्रिल : भारतीय वर्षारंभ दिवस.
२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन.
२३ एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस(राष्ट्रसंघ
द्वारा घोषित).
२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस.

मे
१ मे : महाराष्ट्र दिवस.
१ मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
१ मे जागतिक अस्थमा दिवस.
१ मे : जागतिक दमा दिवस.
३ मे : जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
(राष्ट्रसंघद्वा
रा घोषित).
४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
८ मे : जागतिक रेडक्रॉस दिवस.
९ मे : जागतिक थॅलसीमिया दिवस.
११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
१२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
१५ मे : आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
१७ मे : जागतिक दूरसंचार दिवस.
१९ मे जागतिक कावीळ दिवस.
२२ मे : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
मे महिन्यातला पहिला रविवार : जागतिक
हास्यदिन.
मे महिन्यातला दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय
मातृदिन.

जून
१ जून : आंतराराष्ट्रीय बालदिन.
५ जून : जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वा
रा घोषित).
जूनमधला तिसरा रविवार : पितृदिन (अमेरिका,
इंग्लंड, कॅनडा).
१४ जून : जागतिक रक्तदान दिवस.

जुलै
१ जुलै : भारतीय डॉक्टर दिवस.
११ जुलै : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.

ऑगस्ट
९ ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस.
९ ऑगस्ट : भारत छोडो दिवस.
१२ ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस.
१४ ऑगस्ट : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.
१५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिन.
२० ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस.
२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद
जयंती.

सप्टेंबर
५ सप्टेंबर : भारतीय शिक्षक दिवस.
५ सप्टेंबर : भारतीय संस्कृत दिन.
८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस
(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर
महिन्यातला पहिला रविवार
जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
२७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिवस.
जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
२७ सप्टेंबर : मराठीमाती संकेतस्थळ २७ सप्टेंबर
२००२
साली सुरू झाले.
आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील
कामगारदिनानंतरचा रविवार

ऑक्टोबर
२ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती.
गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे
५ ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वा
रा घोषित).
८ ऑक्टोबर : भारतीय वायु दिन.
१० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
१० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिवस.
१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन.

नोव्हेंबर
१२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस.
१४ नोव्हेंबर : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.
१६ नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस.

डिसेंबर
१ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वा
रा घोषित).
३ डिसेंबर : जागतिक अपंग दिवस.
७ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
१८ डिसेंबर : भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
२३ डिसेंबर : भारतीय किसान दिन.
२३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिवस. जागतिक दिवस :::

महत्वपुर्ण तारखा

घटना समिती निवडणुक – १९४६
घटना समितीची पहिली बैठक – ९ डिसेंबर १९४६
घटनेची स्वीकृती – २६ नोव्हेंबर १९४९
घटनेचा अंमल – २६ जानेवारी १९५०
राष्ट्रध्वजाला मान्यता – २२ जुलै १९४७
राष्ट्रगीत मान्यता – २४ जानेवारी १९५०
पहिली सार्वत्रिक निवडणूक – १९५२
पहिला वित्त आयोग – १९५१
योजना आयोगाची स्थापना – १५ मार्च १९५०
पंचायत राजला सुरुवात – २ ऑक्टोंबर १९५९
हिंदू विवाह अधिनियम – १९५५
वन्य जीव संरक्षण अधिनियम – १९७२
वन संरक्षण अधिनियम – १९८०
पर्यावरण संरक्षण अधिनियम – १९८६
जल प्रदुषण बचाव व नियंत्रण अधिनियम – १९७४
वायु प्रदुषण बचाव व नियंत्रण अधिनियम – १९८१
बालमजुरी निषेध व नियम अधिनियम – १९८६
७३ वी घटना दुरुस्ती – २४ एप्रिल १९९३
विनोद

लक्ष्यात ठेवण्याच्या काही ट्रिक्स

:-
=> G-8 देश
ACF JEJE R (ACF जेजेआर )
A-अमेरिका
C-कैनडा
F-फ्रांस
J-जर्मनी
E-ईटली
J-जपान
E-इग्लंड
R-रशिया
------------------------------------
=> G-5 देश
MBBS C
M-मेक्सिको
B-भारत
B-ब्राझील
S-सा.आफ्रिका
C-चीन
------------------------------------
=>G-20 सदस्य देश
AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीना
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E = इटली, इंडोनेशिया
A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
------------------------------------
=>सार्क सदस्य देश
MBBS PANI
M-मालदीव
B-भूटान
B-बांग्लादेश
S- श्रीलंका
P-पाकिस्थान
A-अफगानिस्थान
N-नेपाळ
I-इंडिया
------------------------------------
=>पंचायतराज स्वीकारणारे राज्य:-
RAAT KO PUMP
रात को पम्प लाना है.
R-राजस्थान
A-आंधप्रदेश
A-आसाम
T-तामीडनाडू
K-कर्नाटक
O-ओरिसा
P-पंजाब
U-उत्तर प्रदेश
M-महाराष्ट्र
P-प.बंगाल.
------------------------------------
=>विधानपरिषद असलेले सहा राज्य...
आज उमक बिहार ला गेला
आ-आंधप्रदेश
ज-जम्मू काश्मीर
उ-उत्तर प्रदेश
म-महाराष्ट
क-कर्नाटक
बी-बिहार
------------------------------------
=>भारताच्या इतर देशाच्या सीमा
बचपन MBA
ब-बांग्लादेश
च-चीन
प-पाकिस्थान
न-नेपाळ
M-म्यानमार
B-भूटान
A-अफगानिस्थान
------------------------------------
=> महाराष्ट्रातील इतर राज्याच्या सीमा
MKG G AC
मोहनदास करमचंद गांघी गुजरात मध्ये AC त बसत
होते.
M-मध्यप्रदेश
K-कर्नाटक
G-गोवा
G- गुजरात
A-आंध्रप्रदेश
C-छतीसगड
------------------------------------
=>सर्वाधिक क्ष्रेत्रफळ असलेले देश
R-रशिया
C-कँनडा
C-चीन
A-अमेरिका
B-ब्राझील
A-आस्ट्रेलिया
B-भारत
-----------------

भारतीय संविधानातील‬ महत्वाच्या घटना दुरूस्त्या


*१ली दुरुस्ती जून १८
१९५१ भूसम्पत्तिविषयक राज्य
विधानसभांच्या कायद्यास
वैधता दिली गेली.

*२री दुरुस्ती मे १ १९५३ संसदेत
राज्यांच्या प्रतिनिधीत्वाविषयी बदल
लागू

*३री दुरुस्ती फेब्रुवारी २२
१९५५ राज्य, केंद्र व जोडसूचीत दुरुस्ती

*४थी दुरुस्ती एप्रिल २७
१९५५ जमिन अधिग्रहणाबाबत
नुकसानभरपाई
न्यायालयांच्या परिघाबाहेर

*५वी दुरुस्ती २४ डिसेम्वर
१९५५ राज्य
पुनर्गठनाविषयी राज्यांची मतमतांतरे
जाणून
घेण्यासाठीची समयसीमा निर्धारित
केली गेली.

*६वी दुरुस्ती सप्टेंबर ११
१९५६ व्यापारी मालांवरच्या करांमध्ये
बदल घडवणारी संविधानाच्या कलम २६९

२८६ क्रं ची दुरुस्ती.

*७वी दुरुस्ती नोव्हेंबर १
१९५६ राज्य
पुनरचनेचा विषयीचा सरकारी निर्णय
लागू.

*८वी दुरुस्ती जानेवारी ५
१९६० अनुसूचित जाती व जमाती; अँग्लो-
इन्डियन समाजासाठीची आरक्षण
व्यवस्थेची मर्यादा १० वर्षांऐवजी २०
वर्षे केली.

*९वी दुरुस्ती डिसेंबर २८
१९६० शेतीघरे
हस्तान्तरांविषयीचा भारत-
पाकिस्तान करार अमलात
आणण्यासाठीची दुरुस्ती.

*१०वी दुरुस्ती ऑगस्ट ११
१९६१ पूर्वीच्या पोर्तुगिज
वसाहती असलेल्या
दादरा, नगर व हवेली यांना केंद्रशासित
प्रदेशाचा दर्जा

*११वी दुरुस्ती डिसेंबर १९
१९६१ राष्ट्रपती व
उपराष्ट्रपती यांच्या निवडणूकीतील
वैधतेसाठी निवडणूक प्रक्रिया संदेहरहित
होण्यासाठीची दुरुस्ती.

*१२वी दुरुस्ती डिसेंबर २०
१९६१ २४० क्रं कलमात व
पहिल्या परिशिष्टात दुरूस्ती करून
गोवा, दमन व दीव यांना केंद्रशासित
प्रदेशाचा दर्जा.

*१३वी दुरुस्ती डिसेंबर १
१९६३ नागालँडच्या प्रशासन व्यवस्थेत
राज्यपालांना विशेष आधिकार देण्यात
आले.

*१४वी दुरुस्ती डिसेंबर २८
१९६२ फ्रान्सच्या ताब्यातून भारतात
विलिन झालेल्या पाँडिचेरीस केंद्रशासित
प्रदेशाचा दर्जा.

*१५वी दुरुस्ती ऑक्टोबर ५
१९६३ संविधानाच्या १२४, १२८,
२१७, २२२,
२२५-क, २२६, २९७ व ३११ कलमांमध्ये
दुरुस्ती.

*१६वी दुरुस्ती ऑक्टोबर ५
१९६३ संविधानाच्या १९ नं कलमात
‘भारताचे सार्वभौमत्व व अखण्डतेसाठी’
पुरेसे
आधिकार उपलब्ध केले गेले. याशिवाय ८४ व
१७३ नं कलमात दुरुस्ती करून राज्य
विधानसभा व संसदीय उमेदवारांस
भारताचे सार्वभौमत्व व
अखण्डता रक्षणाची शपथ
सक्तीची केली गेली.

*१७वी दुरुस्ती जून २० इ.स.
१९६४ संपत्तीच्या आधिकाराविषयीच्या
दुरूस्त्या

*१८वी दुरुस्ती २७ अगस्ट
१९६६ केंद्रशासित प्रदेशांची नावे व
सीमा बदलण्याचे आधिकार संसदेस दिले गेले.

*१९वी दुरुस्ती डिसेंबर ११
१९६६ निवडणूक लवादाऐवजी उच्च
न्यायालयास संसद वा राज्य
विधानसभांविषयीच्या याचिका दाखल
करून घेण्याचे आधिकार दिले गेले.

*२०वी दुरुस्ती डिसेंबर २२
१९६६ जिल्हा शासंकांच्या निर्णयास
वैधता दिली गेली.
‪‬
*२१वी दुरुस्ती एप्रिल १०
इ.स. १९६७ सिंधी भाषेस
सहाव्या परिशिष्टाद्वारे
आधिकृत भाषेचा दर्जा.

*२२वी दुरुस्ती सप्टेंबर २५
इ.स. १९६९ आसामची पुनररचना

*२३वी दुरुस्ती जानेवारी २३
इ.स. १९७० लोकसभा व राज्य
विधानसभेत अनुसूचित
जातीजमाती व अँग्लो-इन्डियन
समाजासाठीची आरक्षण
व्यवस्थेची मर्यादा इ.स. १९७९
सालच्या जानेवारी महिन्यापर्यंत
वाढवली.

*२७वी दुरुस्ती फेब्रुवारी १५
इ.स. १९७२

*२८वी दुरुस्ती ऑगस्ट २९
इ.स. १९७२ भारतीय सनदी सेवांतर्गत
नियुक्त
कर्मचा-यांच्या विशेष सोईसुविधा रद्द

*२९वी दुरुस्ती जून ९ इ.स.
१९७२ केरळ
राज्याच्या जमिनसुधारणा नवव्या
परिशिष्टात समाविष्ट.

*३१वी दुरुस्ती ऑक्टोबर १७
इ.स. १९७३ लोकसभा सदस्यसंख्या ५२५
पासून
वाढवून ५४५ केली गेली.

*३२वी दुरुस्ती जुलै १ इ.स.
१९७४ आंध्र प्रदेश राज्यासाठी विशेष
सांविधानिक व्यवस्था.

*३५वी दुरुस्ती मार्च १ इ.स.
१९७५ सिक्किम भारताचे सहयोगी राज्य
‪‬
*३६वी दुरुस्ती एप्रिल २६
इ.स. १९७५ सिक्किम राज्यास
पूर्णराज्याचा दर्जा

*४२वी दुरुस्ती वा छोटे
संविधान जानेवारी ३
इ.स. १९७७

चालु घडामोडी ११


चालू घडामोडी - १० मार्च २०१५
·        १० मार्च : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर पुण्यतिथी

·        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींसाठी भाग्यश्री योजनेचे उद्घाटन केले.

·        १ जानेवारी २०१४ रोजी सुरु

केलेल्या सुकन्या योजनेत बदल करून नवीन भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे.

·        सुकन्या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे एक वर्षाच्या आत २१,२०० रुपये आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत जमा केले जात होते.

·        भाग्यश्री योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर १ लाख रुपये देण्यात येणार आहे.

·        अभिनेत्री भाग्यश्रीची या योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

·        जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत तेरा शहरे भारतातील आहेत.

·        यामध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर, तर बीजिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

·        ईशान्येकडील पहिले  कॉल सेंटर (केसीसी) ९ मार्च २०१५ रोजी आगरतळा, त्रिपुरा येथे  सुरु करण्यात आले. या किसान कॉल सेंटरचे उद्घाटन त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केले.

·        याकरिता त्रिपुरा राज्यसरकार वित्तपुरवठा करणार असून यात खाजगी उद्योगातील कृषी, मत्स्यपालन  तज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.

·        साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०१४ साठीचा पुरस्कार केदारनाथसिंह व अकादमीचे अध्यक्ष विश्‍वनाथप्रसाद तिवारी यांच्या हस्ते डॉ. जयंत नारळीकर यांना मराठीसाठी, तर दिवंगत मंगला सरदेसाय यांना कोकणीसाठीचा सन्मान वितरित करण्यात आला.

·        ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत घराघरांत शौचालय बांधकामासाठी केंद्राने एक हजार ९३५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला दिला आहे.

·        केंद्र आणि राज्य यांच्या संयुक्‍त विद्यमाने आगामी चार वर्षांत राज्यात ५६ लाख शौचालयांची बांधणी केली जाणार आहे.

·        स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक गावात ‘स्वच्छता दूत’ नेमण्यात येणार आहेत.

·        या स्वच्छता दूतांना गावातील १५० शौचालयांनंतरच्या प्रत्येक शौचालयाच्या मागे दीडशे रुपयांचे मानधन दिले जाईल.

·        यासोबतच जिल्हा परिषदांमधे स्वतंत्रपणे उपकार्यकारी अधिकारी (स्वच्छता) नेमून ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक शौचालयासाठी नऊ हजार रुपये केंद्र, तर तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे.

·        इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे जन्मठिकाण असलेल्या तिक्रित शहरावर पुन्हा नियंत्रण मिळविण्यासाठी इराकच्या सैन्याने ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेविरोधात मोठी लढाई सुरू केली आहे.

·        तिक्रितच्या बाहेर इराकी सैन्य, शिया संघटना यांनी ‘इसिस’ विरोधात जोरदार हल्ले सुरू केले आहेत.

·        जम्मू काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेता मसरत आलम याची मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी तुरुंगातून सुटका केल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

·        गेल्या दोन वर्षांत गिर अभयारण्य आणि धरी वनक्षेत्रात एकूण १२४ आशियाई सिंहांचा आणि १३५ बिबट्यांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू हे नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत.

·        दिल्लीमध्ये २०१२ मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेशसिंहची मुलाखत असलेला माहितीपट दाखविण्यास बंदी असतानाही रविवारी रात्री आग्रा जिल्ह्यातील रुपधन या गावामध्ये दाखविण्यात आला.

·        या वेळी ५० ते ६० गावांतील नागरिक जमा झाले होते. सामाजिक कार्यकर्ते केतन दीक्षित यांनी नियोजन केले होते.

·        तिरुअनंतपुरम बॅकवाटर्सच्या प्रचार प्रसाराकरिता चालविल्या जात असलेल्या केरळ पर्यटनाच्या लोकप्रिय वैश्विक मल्टीमीडिया अभियानने इंटरनेशनल टूरिजम-बोर्स बर्लिन (आईटीबी-बर्लिन) २०१५चा गोल्डन गेट रजत पुरस्कार जिंकला आहे.

·        गोल्डन गेट पुरस्कार हा पर्यटन क्षेत्रातील ऑस्कर मानला जातो.

Wednesday, March 11, 2015

चालु घडामोडी १०


‪#‎चालू‬ घडामोडी:- मार्च २०१५
०१)गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या गोवंशहत्या बंदी (महाराष्ट्र प्राणीरक्षण दुरुस्ती) विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी संमतीची मोहोर उमटवली?
== ०२ मार्च २०१५
(कलम २०१अन्वये)२६ फेब्रुवारी रोजीच या विधेयकाला संमती दिली.

०२)गोहत्या बंदी विधेयक:-
>गाय, बैल, वळू यांची हत्या करण्यावर बंदी
>गोवंशाची हत्या हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार
>गोहत्या करणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची तरतूद
>आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपींवर

०३) तक्रारीसाठी रेल्वेचे नवीन अॅप व साइट
>वेबसाइट : www.indianrailways.gov.in.
>मोबाइल अॅप www.coms.indianrailways.gov.in.या वेबपेजवरून डाऊनलोड करता येईल.
>एसएमएस क्रमांक- - ९७१७६३०९८२

०४) काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष:-
>प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
>मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम

०५) देशात १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीसंदर्भातील एका खटल्यात काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या विरोधात कोणत्या कोर्टाने अब्रूनुकसानीचा आरोप निश्चित केला असून, त्यावरील सुनावणी सुरू झाली आहे?
== दिल्ली कोर्ट )ज्येष्ठ वकील एच. एस. फूलका यांच्यावर केलेल्या कथित आरोपांमुळे)
>भारतीय दंडविधानाच्या कलम ४९९, ५००अन्वये ही बाब शिक्षेस पात्र आहे.

०६) देशातील १०१ जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्गांचा (नॅशनल वॉटरवेज) दर्जा देण्याचा विचार केंद्र सरकार करीत असून यासाठी या नव्या जलमार्गांचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी कशाची नेमणूक करण्यात आली आहे?
== इनलँड वॉटरवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया

०७) जम्मू-काश्मीरमध्ये ४९ दिवसांची राज्यपालांची राजवट अखेर संपुष्टात येऊन पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) नेते असलेल्या कोणत्या नेत्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली?
== मुफ्ती महंमद सईद
>१९८९ - १९९० या काळात व्ही.पी. सिंग केंद्रीय सरकारमध्ये भारताचे गृहमंत्री
>जम्मू-काश्मीरचे बारावे मुख्यमंत्री
>जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा
>शपथविधी:- झोरावार स्टेडियममध्ये

०८) १९९९ मध्ये स्थापन झालेल्या 'जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी'चे संस्थापक कोण आहेत?
== मुफ्ती महंमद सईद

०९) सुप्रीम कोर्टाचा निर्णय:-
>काही विशेष आणि समर्थनीय कारणे असली, तर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या गुन्हेगाराची शिक्षा कमी केली जाऊ शकते.
>भारतीय दंडविधान कलम ३७६ (२) (जी) नुसार

१०) 'पीएमओ'चे मोबाइल अॅप विकसित करण्यासाठी कोणत्या वेबसाइटवर नागरिकांकडून कल्पना मागवण्यात येणार असून, त्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे?
== mygov.in

११) कोणत्या पाकिस्तानी गायक याने भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा एकदा अर्ज सादर केला आहे.त्याने या आधी दोन वर्षांपूर्वी केलेला अर्ज केंद्र सरकारने फेटाळला होता?
== अदनान सामी

१२) तैवानच्या कोणत्या नेत्याच्या पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली आहे?
== चांग कै शेक
>गोला दहशतवाद-१९४७(चीनच्या नॅशनॅलिस्ट पार्टीच्या संतापाचे कारण)

१३) जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष:-
>स्मार्ट फोन किंवा अन्य उपकरणांचा वापर करून संगीत ऐकणाऱ्या साठ टक्के लोकांना बहिरेपणाचा सामना करावा लागतो;
>तर सुमारे ४० टक्के लोकांना नाइट क्लब आणि संगीताचे कार्यक्रम ऐकल्याने बहिरेपण येते.
>श्रीमंत देशांमधील सर्वसाधारण १२ ते ३५ या वयोगटातील तरुणांच्या श्रवणशक्तीवर परिणाम

१४) भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?
== जगमोहन दालमिया
अध्यक्ष - जगमोहन दालमिया
उपाध्यक्षपद (प्रत्येक विभागास एक) - टीसी मॅथ्यू (पश्चिआम विभाग), जी. गंगाराजू (दक्षिण), सी. के. खन्ना (मध्य), गौतम रॉय (पूर्व), एम. एल. नेहरू (उत्तर)
सचिव - अनुराग ठाकूर
संयुक्त सचिव - अमिताभ चौधरी
खजिनदार - अनिरुद्ध चौधरी.

१५) रेल्वे प्रवासासाठी "गो इंडीया‘ स्मार्ट कार्ड योजना रेल्वेतर्फे लागू करण्यात आली असून कोणत्या दोन मार्गांवर पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत ही योजना तूर्तास चालू करण्यात आली आहे?
== दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता (हावडा)

१६) आयआरएनएसएस १-डी उपग्रह:-दिशादर्शक भूस्थिर उपग्रह
इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीममधील चौथा उपग्रह
वजन:-१ हजार ४२५ किलो
उपग्रहाचे आयुर्मान:- दहा वर्ष

१७) कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने कंपनीसह कंपनीच्या तीन उच्च अधिकाऱ्यांना संशयित म्हणून समन्स बजावले?
== राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड

१८) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परकी चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी कोणत्या दोन नेत्यांना दंड ठोठावला आहे?
== संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार आणि बिहार विधान परिषदेचे उपसभापती सलीम परवेझ-१३.६२ लाख रुपयांचा दंड
>राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीन- १३.६२ लाख रुपयांचा दंड व तुरुंगवास

१९) काळा पैसा लपविल्याप्रकरणी (२० कोटी रुपयांचा काळा पैसा) प्राप्तीकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला कोणत्या मांस निर्यातदारला दिल्लीतील न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे?
== मोईन अहमद कुरेशी

२०) गुजरातच्या गीर अभयारण्यातील आशियाई सिंहांच्या बचावासाठी इंग्लंडमधील कोणत्या संस्थेने पुढाकार घेतला आहे?
== झूलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन
>"वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया‘ नॉलेज पार्टनर

२१) "मॅंडेट : विल ऑफ दि पीपल‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी

२२) जगातील सर्वांत मोठा ध्वजस्तंभ कोठे उभारला जाणार असून, त्याची उंची तब्बल २४० फूट एवढी असेल?
== फरिदाबाद-हरियाना

२३) जम्मू-काश्मीारचे शेवटचे राजे हरिसिंह यांचे अत्यंत निकटच्या सुरक्षा रक्षकाचा मुलगा असलेले कोणत्या भाजप नेत्याने राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे?
== निर्मलसिंह

२४) अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याजागी आता कोणाची निवड करण्यात आली आहे?
== अरुण सिंह

२५) सार्क यात्रेवर गेलेले परराष्ट्र सचिव कोण?
== एस. जयशंकर

२६) दिल्ली सरकारच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती केली जाणार आहे?
== के के शर्मा
(हंगामी मुख्य सचिवपदी एस. एन. सहाय यांची नियुक्ती करण्यात आली होती)

२७) गुजरात कॉंग्रेस अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोळंकी

२८) स्वाइन फ्लू रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने चर्चेत आलेली बॉलिवूड अभिनेत्री कोण?
== सोनम कपूर

२९) केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६ तरतूद आकडे (कोटीमध्ये)
>२,४६,७२७ सरंक्षण
>७९,५२६ ग्रामविकास
>६८,९६८ शिक्षण
>३३,१५२ आरोग्य
>२२,४०७ गृहबांधणी-नागरी विकास
>१०,३५१ महिला-बाल विकास
>४,१७३ जलस्त्रोत-नममि गंगे
>१००० निर्भया निधी

३०) केंद्रीय अर्थसंकल्प २०१५-१६ महाराष्ट्रासाठी तरतूद :-
>औषध प्रशिक्षण व संशोधन संस्था
>घारापुरी लेणी व बेटाचा होणार कायापालट
>औरंगाबाद शेंद्रे-बिटकिनच्या विकासासाठी १२०० कोटी
>पुणे मेट्रोसाठी १२६ कोटी रुपयांची तरतूद
>दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी १२०० कोटी
>आगामी पाच वर्षांत २ लाख ९५ हजार कोटींचे अनुदान
>विविध योजनांतर्गत २ लाख ६० हजार कोटींचा मिळणार वाटा
>पंचायतराज बळकटीकरण योजनेंतर्गत १५ हजार कोटी
>पालिकांना मिळणाऱ्या अनुदानात १२ हजार कोटींपर्यंत वाढ
>आपत्ती व्यवस्थापनासाठी ७ हजार ३०० कोटी मिळणार