Bookmark

Bookmark this Blog

Thursday, September 3, 2015

General Knowledge 12

०१) नवी मुंबईत जगातील सर्वात मोठय़ा
‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ कधीपर्यंत
वाहतुकीसाठी खुले करण्यात येईल,असे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान
परिषदेत स्पष्ट केले आहे?
== सन २०१९
०२) यंदाचे विधिमंडळाचे नागपूर हिवाळी
अधिवेशन कधीपर्यंत वाढवण्यात आले आहे?
== २४ डिसेंबपर्यंत
०३) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या
२३व्या विभागीय मराठी साहित्य
संमेलनाचे(दापोली) अध्यक्षपदी कोणाची
निवड करण्यात आली आहे?
== डॉ. अरुणाताई ढेरे
०४) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या
२३व्या विभागीय मराठी साहित्य
संमेलनाचे उद्घाटन १९ डिसेंबर रोजी
कोणाच्या हस्ते होणार आहे?
== ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत
देसाई
०५) भारताने नुकतेच ’जीएसएलव्ही मार्क-३
प्रक्षेपकाचे यशस्वी प्रक्षेपण कोठून केले आहे?
== श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून
०६) ’जीएसएलव्ही मार्क-३ मोहिमेसाठी
१.५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या
प्रक्षेपकाची चार हजार किलोग्रॅम वजन
वाहून नेण्याची क्षमता आहे.तर प्रक्षेपकाचे
वजन ६३० टन असून उंची किती मीटर इतकी
आहे?
== ४२.४ मीटर
०७) केअर‘ == क्रू मोड्यूल ऍटमॉस्फेरिक री-
एन्ट्री एक्सटपिरिमेंट
०८) वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी अमेरिकेचे
सर्जन जनरल बनण्याचा मान कोणत्या
भारतीय वंशाच्या डॉक्टरांना मिळाला
आहे?
== डॉ. विवेक मूर्ती
०९) एअर एशिया कंपनीने नुकतीच कोणती
दोन उड्डाणे सुरु केली आहेत?
== पुणे-बंगळूर आणि पुणे-जयपूर
१०) पासपोर्टचे ऑनलाइन अर्ज भरण्याची
सुविधा आता कोणत्या सेवाकेंद्रावरही
उपलब्ध होणार आहे?
== महा ई सेवा केंद्र व संग्राम सेवा केंद्र
११) विमानतळावर "इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल‘
स्थापन करण्यास कस्टम विभागाने हिरवा
कंदील दाखविला आहे?
== पुणे विमानतळ
१२) केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्तू व सेवा कर
(जीएसटी) विधेयक कधी मंजूर केले?
== १८ डिसेंबर २०१४
१३) प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान
२०१४ कोणास जाहीर झाला आहे?
== विख्यात खगोलतज्ज्ञ, पद्मविभूषण डॉ.
जयंत विष्णू नारळीकर ("चार नगरातले माझे
विश्वि‘ या आत्मकथनपर ग्रंथासाठी)
१४) प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी सन्मान
२०१४ कोकणी भाषेसाठी माधवी सरदेसाय
यांच्या कोणत्या निबंध संग्रहाला
मिळाला आहे?
== मंथन
१५) यक्षाची देणगी, वामन परत न आला,
याला जीवन ऐसे नाव, टाइम मशीनची
किमया, पक्ष्याची देणगी आदी पुस्तकांनी
वेगळी ओळख निर्माण करणारे विख्यात
खगोलतज्ज्ञ कोण?
== डॉ. जयंत विष्णू नारळीकर
१६) साहित्य अकादमी इतर भाषेतील
पुरस्कार:-
*इंग्रजी-आदिल जस्सीवाला-"ट्राईंग टू से
गुडबाय‘-काव्यसंग्रह
*हिंदी-रमेशचंद्र शहा-"विनायक‘ - कादंबरी-
*कानडी-जी. एस. नाईक-उत्तरार्ध-निबंध
संग्रह
१७) १२२ वे घटना दुरुस्ती विधेयक कशासंदर्भात
आहे?
== वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी)
१८) न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये
कार्यरत असलेल्या कोणत्या वरिष्ठ
राजनैतिक अधिकारी असलेल्या व्यक्तीस
परराष्ट्र मंत्रालयाकडून सक्तीची विश्रांती
देण्यात आली आहे?
== देवयानी खोब्रागडे
१९) हॉंगकॉंग विद्यापीठातील संशोधक
सिसिलिया चेंग आणि एंजेल यी-लाम-ली
या दोन महिला संशोधकांनी इंटरनेटच्या
दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करून एक
अहवाल तयार केला असून त्यानुसार जगातील
किती टक्केय लोक हे इंटरनेटच्या पूर्णपणे
आहारी गेले असून, त्यांचे हे नेट ऍडिक्श न
जीवनशैली, आरोग्य, वैयक्तिपक संबंध यावर
विपरीत परिणाम करत आहे?
== ६ %
२०) पेशावरमधील शाळेवर तालिबानी
दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याच्या
सूत्रधाराचे नाव उघड झाले असून, त्याचे नाव
काय असल्याचे पाकिस्तानी
तालिबान्यांनी म्हटले आहे?
== उमर मन्सूर (चाइल्ड किलर)
२१) धर्मश्रद्धांमध्ये बदल न होता केवळ
लग्नाच्या उद्देशाने घडवून आणण्यात आलेले
धर्मांतर बेकायदेशीर असल्याचा सन २००० चा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा
हवाला देत कोणत्या उच्च न्यायालयाने
नुकतेच केवळ विवाहासाठीचे धर्मांतर अवैधच
ठरविले आहे?
== अलाहाबाद उच्च न्यायालय (न्यायमूर्ती
सूर्यप्रकाश केसरवाणी)
२२) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
महिलांच्या ५० मी. रायफल प्रोन प्रकारात
६२२.१ गुणांसह सुवर्णपद पटकाविणारी खेळाडू
कोण?
== तेजस्विनी सावंत
२३) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
महिलांच्या सांघिक ५० मी. रायफल
प्रोनमध्ये महाराष्ट्राने १८३७.५ गुणांसह प्रथम
क्रमांक मिळविला. या संघात समाविष्ट
असलेल्या खेळाडू कोण?
== तेजस्विनी सावंत,दीपाली देशपांडे आणि
प्रियल केनी
२४) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
पुरुषांच्या २५ मी. रॅपिड फायर पिस्तूल
प्रकारात सुवर्णपदक पटकाविणारा खेळाडू
कोण?
== हरप्रीत सिंग(हरियाणा)
२५) ऑस्ट्रेलियाच्या इयान हिलीला मागे
टाकत (एकूण ६२८ बळी) सर्वाधिक बळी
मिळवणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत
चौथे स्थान मिळविणारा खेळाडू कोण?
== महेंद्रसिंग धोनी
२६) सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या
यष्टीरक्षकांच्या यादीत पहिल्या
स्थानावर असणारा खेळाडू कोण?
== मार्क बाऊचर (९९८) दक्षिण आफ्रिका
२७) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
महिलांच्या १० मी. पिस्तूल (आयएसएसएफ)
प्रकाराच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या
कोणत्या खेळाडूने १९९.० गुणांची नोंद करत
सुवर्णपदक पटकावले?
== शीतल थोरात
२८) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत
'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'चा मानकरी
ठरलेला खेळाडू कोण?
== पी. एन. प्रकाश-कर्नाटक
२९) भारतीय अॅथलेटिक्सचा दर्जा
उंचावण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा
प्राधिकरणाने (साई) कोणत्या शहरात लांब
व मध्यम पल्ल्याच्या शर्यतींसाठी राष्ट्रीय
अॅथलेटिक्स अॅकॅडमीची स्थापना करण्याची
घोषणा केली?
=== भोपाळ
३०) कोल्हापूरमधील कागल येथील व्ही. ए.
घाटगे पाझर तलावात सलग सहा तास ३२
मिनिटे आणि दहा सेकंद पोहण्याचा
आशियाई विक्रम पुण्याच्या १२ वर्षीय खुशी
परमार हिने आपल्या नावावर केला.या
विक्रमाची नोंद सध्या विक्रमांची नोंद
ठेवणार्या कोणत्या पुस्तकात झाली आहे?
== आशिया बुक
३१) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
ऑर्गनायझेशन '(' ईपीएफओ ') ने चालू आर्थिक
वर्षात(२०१४-१५) मध्ये आपल्या ठेवीदारांना
किती टक्के व्याज देण्याची घोषणा केली
आहे?
== ८.७५%
३२) अमेरिकन 'फोर्ब्स' मासिकाने व्यवसाय
करण्यास सर्वोत्तम १४६ देशांची यादी तयार
केली आहे.या यादीत भारताचे स्थान कितवे
आहे?
== ९३वे (डेन्मार्क पहिल्या स्थानावर)
३३) आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (आयटीएफ)
वार्षिक पुरस्कार २०१४;-
*नोवान झोकोविच
*सेरेना विलियम्स
*बॉब आणि माईक ब्रायन
*सारा ईरानी आणि रोबर्टा विंसी
३४) तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाचे पहिले
अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात
आली आहे?
== घंटा चक्रपाणी
३५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना
नुकतेच कोणत्या कोर्टाने १० हजार रुपयांचा
दंड आकाराला आहे?
== दिल्ली
३६) पाकिस्तानला चाश्मा-३ आणि
चाश्मा-४ या दोन अणुभट्ट्या पुरविणारा
अणुपुरवठा गटाचा (एनएसजी) सदस्य देश
कोणता?
== चीन
३७) मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी
हल्ल्याच्या सूत्रधार आणि लष्कर-ए-
तैयबाचा कमांडर असलेल्या कोणत्या
दशहतवाद्यास पाकिस्तानी कोर्टाकडून
जामीन देण्याच्या निर्णयावर भारतासह
जगभर संतापाचे पडसाद उमटल्यानंतर पुढील
तीन महिने गजाआडच ठेवण्याचे पाकने जाहीर
केले आहे?
== झकीउर रेहमान लख्वी
३८) मिस वर्ल्ड स्पर्धेत स्वीम सूट राऊंड
यापुढील वर्षापासून बंद करण्याचा निर्णय
घेणारी संस्थेच्या अध्यक्षा कोण?
== ज्युलिया मोर्ले
३९) १९५१ मध्ये मिस वर्ल्ड संस्थेची स्थापना
कोणी केली होती?
== एरीक मोर्ले
४०) पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर
पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांना फाशी
देण्याचा निर्णय घेतल्याने, आता २३
डिसेंबरला कोणत्या दोन दहशतवाद्यांना
फाशी देण्याचे आदेश पाकिस्तानच्या
दहशतवादविरोधी न्यायालयाने दिले आहेत?
== अताउल्लाह आणि मोहम्मद आझम(लष्कर-
आय-झांगवी)
४१) केम्ब्रिजमधील हॉर्वर्ड-स्मथसोनियमन
सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्समध्ये शिकणाऱ्या
कोणत्या विद्यार्थ्याने पृथ्वीपासून १८०
प्रकाशवर्षे अंतरावर असणाऱ्या एका
'सुपरअर्थ' ग्रहाचा शोध लावला आहे?
== अँड्र्यू वँडरबर्ग
४२) ५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील
महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन
सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविणारे
महाराष्ट्राचे त्रिकुट कोणते?
== तेजस्विनी सावंत, अंजली भागवत, वेदांगी
तुळजापूरकर
४३) पहिल्यावहिल्या इंडियन सुपर लीग
फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने
पटकाविले?
== अॅटलेटिको डी कोलकाता(सौरव
गांगुलीच्या संघाने) केरळ ब्लास्टर्स उपविजेते
४४) 'जत्रेतलं जायंट व्हील' या नाटकासाठी
महाराष्ट्र फाऊंडेशनचा रा. शं. दातार
नाट्यपुरस्कार जाहीर झालेले नाटककार
कोण?
== हिमांशू स्मार्त
४५) शिक्षणहक्काच्या अंमलबजावणीबाबत
केंद्र सरकारने 'रिपोर्टकार्ड' तयार केले असून
त्यामधील आकडेवारीनुसार राज्यातील एकूण
९६ हजार १७८ शाळांपैकी केवळ किती
शाळांनाच दहा पैकी दहा ग्रेड्स मिळाल्या
आहेत?
== ३० हजार ४७१ (३१.६८ टक्के)
४६) "गुगल‘चे हे जगातील तिसरे कॅम्पस
अमेरिका आणि ब्रिटननंतर कोठे थाटले
जाणार आहे?
== हैदराबाद
४७) पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धा सलग
पाचव्यांदा जिंकण्याचा विक्रम करणारा
देश कोणता?
== भारत(उपविजेता-पाकिस्तान)
४८) महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा २०१४चे
विजेतपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
== भारत(उपविजेता-न्यूझीलंड)
४९) कोणत्या देशाने नोबेल शांती
पुरस्काराचे संयुक्त विजेते कैलास सत्यार्थी व
मलाला युसुफझाई यांना 'शांती प्रतिक'
मानावे म्हणून आपल्या सिनेटमध्ये एक प्रस्ताव
पारित केला आहे?
== अमेरिका
५०) 'नट-खट' हे आत्मचरित्र कोणत्या
कलाकाराच्या जीवनावर आधारित आहे?
== मोहन जोशी
५२) गुगलने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या
अहवालानुसार भारतात सर्वात जास्त सर्च
केली जाणारी वेबसाईट कोणती?
== IRCTC (Indian Railway Catering and
Tourism Corporation)
५३) 'बँक आपकी मुठ्ठी मे' ही योजना
कोणत्या बँकेने सुरु केली आहे?
== एचडीएफसी बँक
५४) १४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण
आहेत?
== वाय.व्ही रेड्डी
५५) ९५ वे मराठी नाट्य संमेलन कोठे आयोजित
करण्यात आलेले आहे?
== बेळगाव
५६) विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी
राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या कोणत्या
नेत्याची निवड करण्यात आलेली आहे?
== धनंजय मुंडे
५७) सलग दुस-यांदा क्रिकेट विश्वचषकाचा
ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलेला भारताचा
सुप्रसिध्द खेळाडू कोण?
== सचिन तेंडूलकर
५८) ‘मंथन’ या समीक्षात्मक लेखसंग्रहासाठी
२०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार नुकताच
जाहीर झालेल्या कोकणी भाषेतील
प्रभावशाली कवयित्री व चिंतनशील
लेखिकेचे नुकतेच निधन झाले आहे?
== डॉ. माधवी सरदेसाई
५९) ‘भास आभास’, ‘एका विचाराची
जिवीत कथा’ या प्रसिद्ध पुस्तकांचा
लेखिका कोण आहेत?
== डॉ. माधवी सरदेसाई
६०) प्राध्यापक सुमन कुंडू यांच्या
नेतृत्वाखाली दिल्ली विद्यापीठाच्या
जैवरसायन विभागाच्या शास्त्रज्ञांच्य
ा पथकाने रक्ताला पर्याय म्हणून काय
विकसित केले आहे?
== आर्टिफिशयल हिमोग्लोबिन
६१) विमानात प्रवासी बोर्डवर असताना
फिनोथ्रिन, ऑरगॅनस, फॉस्फरस,
न्युट्रोक्सिनसारखे केमिकल कीटकनाशक
म्हणून वापरणे प्रवाशांच्या आरोग्यास
धोकादायक. यामुळे, कर्करोगासह अन्य
घातक आजार होण्याची शक्यता असते,अशी
तक्रार केंद्र सरकारकडे करणारे मेंदूविकार
तज्ज्ञ आणि टेक्सास येथील बेलर रुग्णालयाचे
प्रायमरी स्ट्रोक सेंटरचे संचालक कोण?
== डॉ. जय कुमार
६२) भारताने बंगालच्या उपसागराच्या
ओदिशा किना-यावर १००० किलो
वजनाच्या ‘गायडेड ग्लाईड बॉम्ब’ची यशस्वी
चाचणी घेतली या बॉम्बची क्षमता किती
आहे?
== १०० किमी
६३) जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पाचव्या
टप्प्यानंतरच्या मतदानानंतर गेल्या २७
वर्षातील सर्वाधिक म्हणजे किती टक्के
मतदानाची नोंद झाल्याचे केंद्रीय निवडणूक
आयोगाने सांगितले आहे?
== ६६ टक्के
६४) देशातील जिल्हा व कनिष्ठ
न्यायालयाची स्थिती:-
*जिल्हा व कनिष्ठ न्यायालयांमध्ये २ कोटी
६८ लाख तर उच्च न्यायालयांमध्ये ४४ लाख ५६
हजार खटले प्रलंबित
*२०१३ अखेपर्यंत कनिष्ठ न्यायालयांमध्ये २
कोटी ६८ हजार खटले प्रलंबित आहेत.
त्यातील ५९ लाख ८० हजार खटले पाच
वर्षापासून प्रलंबित आहेत
*उच्च न्यायालयांमध्ये ३१ डिसेंबर २०१३पर्यंत
४४ लाख ५६ हजार खटले प्रलंबित आहेत.
त्यापैकी १६ लाख ८३ हजार खटले पाच
वर्षापासून प्रलंबित आहेत.
*आतापर्यंत जिल्हा न्यायालयांत १९५१८ तर
कनिष्ठ न्यायालयांत १५,११५ पदे भरण्यात
आली आहेत. देशातील उच्च न्यायालयांत ९८४
पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील ३५३ पदे रिक्त
आहेत,
६५) नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या
(एनसीआरबी) अहवाल:-
*यावर्षी देशात ८००हून अधिक(एकूण ८३६)
शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून त्यात
दुर्दैवाने महाराष्ट्रातील ७२४ शेतक-यांचा
समावेश.
*राज्यात ऑक्टोबर २०१४पर्यंत तब्बल ७२४
शेतक-यांनी आत्महत्या केल्या.
*देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात
(७२४) झाल्या असून त्या खालोखाल तेलंगणा
(८४), कर्नाटक (१९), गुजरात (३), केरळ (३)
आणि आंध्र प्रदेश (३) या राज्यातील शेतक-
यांनी आत्महत्या केल्या
*गेल्या वर्षभरात देशात तब्बल ११ हजार ७७२
शेतीशी निगडीत स्वयंरोजगार करणा-या
व्यक्तींनी आत्महत्या केल्या.
६६) राष्ट्रीय संरक्षण कायदा २०१५ नुसार
अमेरिकेच्या ५७८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण
खर्चाला मंजुरी दिली असून त्यातून एक अब्ज
डॉलर्सची मदत कोणत्या देशाला दिली
जाणार आहे?
== पाकिस्तान
६७) जीईएमएस फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणा-
या प्रतिष्ठेच्या जागतिक शिक्षक
पुरस्कारासाठी भारतातून कोणत्या तीन
शिक्षकांची निवड झाली आहे?
== किरण सेठी-अहमदाबाद- रीव्हरसाईड
शाळा,
हिरा प्रसाद-कोलकाता- बिरला हायस्कूल
बिजल दमानी- राजकोट- एस.एन.
कानसागरा शाळा
(पुरस्कार १६ मार्च २०१५ ला दुबईमध्ये जाहीर
होणार आहे)
६८) जीईएमएस फाऊंडेशनची स्थापना कोणी
केली आहे?
== भारतीय वंशाचे सनी वारकी
६९) डीआरएस पद्धत(क्रिकेट):- डिसिजन
रिव्हय़ू सिस्टिम
७०) भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुस-या
कसोटी सामन्यात आयसीसीच्या
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकऱणी
भारताचा कोणत्या जलदगती गोलंदाज
असलेल्या खेळाडूच्या मानधनातून १५ टक्के
रक्कम कापून घेण्यात आली आहे?
== इशांत शर्मा(कलम २.१.४ लेव्हल १ चा भंग)
७१) भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुस-या
कसोटी सामन्यात षटकांची गती न
राखल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
असलेल्या कोणत्या खेळाडूला मानधनाच्या
६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे?
== स्टीव्हन स्मिथ (सहका-यांना तीस टक्के
दंड)
७२) पाकिस्तानचा हरहुन्नरी अष्टपैलू खेळाडू
असलेल्या कोणत्या खेळाडूने पुढील वर्षी
होणाऱ्या विश्वेकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर
निवृत्त होणार असल्याची घोषणा केली
आहे?
== शाहिद आफ्रिदी
७३) नॅशनल सॅंपल सर्व्हे ऑर्गनायझेशन ची
आकडेवारी:-
सर्व्हेतील एकूण कुटुंबे : २ लाख २२ हजार २२१
कर्ज:-२००२-२०१२
शहरी (आकडे टक्यां त) १८%(२००२) २२%(२०१२)
सरासरी कर्ज (आकडे रुपयांत) ११७७१(२००२)
८४६२५(२०१२)
ग्रामीण (आकडे टक्यांप त) २७%(२००२)
३१(२०१२)
सरासरी कर्ज (आकडे रुपयांत) ७५३९(२००२)
३२५२२(२०१२)
कर्जाची कारणे :
शहरीभाग : - घरबांधणी, - शैक्षणिक, - लग्न,
- व्यवसाय
ग्रामीण भाग : व्यवसाय
७४) भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल
असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या
(सीआरपीएफ) प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस
अधिकारी असलेल्या कोणत्या
अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली
आहे?
== प्रकाश मिश्रा
७५) विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव
देशमुख यांनी विधानपरिषदेतील सर्वात तरूण
विरोधी पक्षनेते म्हणून कोणाच्या नावाची
घोषणा केला आहे?
== धनंजय मुंढे
७६) बीसीसीआयचे २०१४-१५ सालातील
करारबद्ध खेळाडू:-
ग्रेड ए – महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली,
सुरेश रैना, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार
ग्रेड बी - प्रज्ञान ओझा, मुरली विजय,
चेतेश्वर पुजारा, रविंद्र जाडेजा, शिखर धवन,
उमेश यादव, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे,
अंबती रायुडू आणि मोहम्मद शमी
ग्रेड सी – अमित मिश्रा, वरूण अॅरोन, वृद्धिमन
साहा, स्टुअर्ट बिनी, पंकज सिंह, विनय
कुमार, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी, परवेझ
रसूल, अक्षर पटेल, मनोज तिवारी, रॉबिन
उथप्पा, कर्ण शर्मा, संजू सॅमसन, कुलदीप यादव
आणि के. एल. राहुल
७७)२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याची
अखेरची मुदत काय आहे?
== ३१ डिसेंबर २०१४
७८) रिझर्व्ह बँकेनं ५ लाख २ हजार ८५५ कोटी
किमतीच्या किती नोटा चलनातून वगळल्या
आहेत?
== १४४ कोटी ६६ लाख
७९) भासाभास, माणकुलो राजकुमार’ या
गाजलेल्या पुस्तकांची लेखिका कोण आहेत?
== ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि
भाषाशास्त्रज्ञ माधवी सरदेसाई
८०) ‘एका विचाराची जीवंत कथा’ या
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील
भाषांतर केलेल्या पुस्तकाला साहित्य
अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होते
या पुस्तकाच्या लेखिका कोण होत्या?
== माधवी सरदेसाई
८१) ‘जाग’ या कोकणी मासिकाचं
संपादकपद भूषविणार्या लेखिका कोण?
== माधवी सरदेसाई
८२) राज्य सरकारने आडत बंद करण्याचा
महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.ही घोषणा
करणारे पणन संचालक कोण?
== डॉ. सुभाष माने
८३) आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य
सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याची
घोषणा राज्याचे सहकार आणि पणन मंत्री
असलेल्या कोणत्या नेत्याने
विधीमंडळात केली आहे?
== चंद्रकांत पाटील
८४) राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर असून
१९ हजार गावांव्यतिरिक्त आणखी किती
गावं दुष्काळसदृश्य जाहीर करण्याची विनंती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय
पाहणी पथकाकडे केली आहे?
== ५ हजार ७०० गावं
८५) चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या
सेमिफायनल सामन्यात भारताविरुद्ध
असंस्कृत शेरेबाजी आणि हावभाव करणार्यार
पाकिस्तानच्या खेळाडूंपैकी दोघांना
निलंबित करण्यात आले आहे या खेळाडूंची
नावे काय आहेत?
== मोहम्मद तौसिक आणि अली अमजद
८६) बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट
अर्थात आमिर खानचा बहुचर्चित सिनेमा PK
वादाच्या भोवर्याणत सापडला आहे. Pk
च्या विरोधात लखनौ खंडपीठात याचिका
दाखल करणारी एनजीओ कोणती?
== हिंदू फ्रंट फॉर जस्टिस
८७) २६-११च्या हल्ल्यासंदर्भात न्यूयॉर्क
टाइम्सने अहवाल प्रसिद्ध केला आहे. न्यूयॉर्क
टाइम्स, प्रो पब्लिका, पीबीएस सिरीज या
तीन संस्थांनी हा अहवाल तयार केला असून,
त्याचे नाव काय आहे?
== २००८ मुंबई किलिंग्ज, पाईल्स आॅफ स्पाय
डाटा, बट अनकम्प्लिटेड पझल
८८) अमेरिकेच्या सेकंड सर्किट कोर्ट आॅफ
अपीलच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या
हत्येनंतर उसळलेली दंगल व हत्याकांडासाठी
काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा दावा
करणारी कोणत्या संघटनेची याचिका
फेटाळून लावली आहे?
== शीख फॉर जस्टिस
८९) ऑलिम्पिक विजेत्या अभिनव बिंद्राने
५८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोणत्या
प्रकारात सुवर्णपदक पटकावले?
== दहा मीटर एअर रायफल
९०) मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी
हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या कोणत्या
दशहतवादीचा ‘साहेब’ असा उल्लेख करून
भारताच्या भावना दुखावणाऱ्या संयुक्त
राष्ट्रांनी (यूएन) आपल्या या चुकीबद्दल
दिलगिरी व्यक्त केली आहे. असून नावापुढचा
‘साहेब’ हा आक्षेपार्ह शब्द हटवून आपली चूक
सुधारलीही आहे?
== हाफिज सईद
९१) माहिती अधिकारासाठी आवश्यक
असलेला फॉर्म कधीपासून ऑनलाइन उपलब्ध
होणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले
आहे?
== ०१ जानेवारी २०१५
९२) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात
लोकसभेत विक्रमी १८ विधेयके मंजूर झाली,
तर राज्यसभेची मोहोर किती विधेयकांवर
उमटली?
== १२ विधेयके
९३) नॅशनल डेमोक्रटिक फ्रंट ऑफ बेडोलँडच्या
दहशतवाद्यांनी आसाममधील कोणत्या दोन
ठिकाणी नुकतेच हल्ले केले आहेत?
== कोक्राझार आणि सोनितपूर
९४) मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम
समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या
पूर्वीच्या आघाडी सरकारच्या निर्णयात
महत्त्वपूर्ण बदल करत राज्य सरकारने
मुस्लिमांचे आरक्षण रद्द ठरवत केवळ मराठा
समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १६ टक्के
आरक्षण ठेवण्याची तरतूद असलेले विधेयक कधी
विधानसभेत मंजूर करण्यात आले?
== २३ डिसेंबर २०१४
९५) २०१४ हे वर्ष पत्रकारांसाठी घातक ठरले
असून, वार्ताकन करत असताना किमान ६०
पत्रकार ठार झाले. त्यातील एकूण ४४ टक्के
पत्रकारांचा खून करण्यात आला, असे
आपल्या अहवालात कोणत्या संस्थेने म्हटले
आहे?
== कमिटी टू प्रोटेक्ट
जर्नालिस्ट्स' (सीपीजे)
९६) पाकिस्तान व रशिया यांच्यात नुकताच
किती डॉलर्सचा ऊर्जा करार झाला आहे व
त्यात कराची ते लाहोर दरम्यान गॅस
पाइपलाइन टाकण्यात येणार आहे?
== १.७ अब्ज डॉलर्सचा
९७) पुण्यातील हिंदुस्तान अॅयण्टीबॉयोटिक
या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी किती
कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली
असल्याची माहिती केंद्रीय रसायन, खते व
औषध राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली
आहे?
== ५३० कोटी
९८) १९८५ मध्ये 'लव्ह इज नेव्हर सायलेंट', १९९०
मध्ये 'कॅरोलिन' व १९९२ मध्ये 'मिस रोज
व्हाइट' चित्रपटांसाठी 'एम्मी' पुरस्कार
विजेते ठरलेले कोणत्या दिग्दर्शकाचे नुकतेच
निधन झाले आहे?
== जोसेफ सरजट
९९) देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट
घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स'प्
रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालय
कधी निकाल देणार आहे?
== ०९ मार्च २०१५
१००) यंदाच्या (२०१५) 'प्रवासी भारतीय
दिवस' कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण
येणार आहेत?
== गयाना प्रजासत्ताकाचे अध्यक्ष डोनाल्ड
रॅमोतर