Bookmark

Bookmark this Blog

Tuesday, September 1, 2015

नेपाळ चालु घडामोडी

��नेपाळच्या घटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढणार

��*.नेपाळच्या नव्या घटनेतून ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द काढून टाकण्यास नेपाळच्या राजकीय पक्षांनी मान्यता दिली आहे.नेपाळमधील बहुसंख्य नागरिकांना या नव्या घटनेत सेक्युलॅरिझमऐवजी ‘हिंदू’ किंवा ‘धार्मिक स्वातंत्र्य’ असा शब्द हवा आहे.

��*.दशकभराच्या बंडखोरीनंतर मुख्य प्रवाहात सामील झालेल्या युनिफाईड कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-माओईस्ट सरकारने २००७ मध्ये नेपाळ हा धर्मनिरपेक्ष देश असल्याचे जाहीर केले होते. या निर्णयानंतर नेपाळची शेकडो वर्षांचाइतिहास असलेली जगातील एकमेव हिंदू राजवट अशी ओळख संपली होती.

��*.नव्या घटनेवर नागरिकांची मते मागविण्यात आली होती. त्यात बहुसंख्य लक्षावधी नागरिकांनी घटनेतून धर्मनिरपेक्ष (सेक्युलॅरिझम) शब्द काढून टाकण्याची सूचना केल्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या भूमिकेत बदल करावा लागला.

��*.नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकसंख्या हिंदू आहे.

No comments:

Post a Comment