Bookmark

Bookmark this Blog

Monday, April 20, 2015

अतिसंभाव्य ५० प्रश्नावली

अतिसंभाव्य ५० प्रश्नोत्तरे

०१) कोट्यावधींच्या सत्यम घोटाळ्याप्रकरणी कोणत्या न्यायालयाने सत्यम कॉम्पुटर्सचे संस्थापक बी.रामलिंग राजू त्यांचे बंधू बी. रामा राजू यांच्यासह १० आरोपींना दोषी ठरवले आहे?
== हैदराबादच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने
- न्यायमूर्ती बी.व्ही.एल.एन चक्रवर्ती
- यापूर्वी ११ जानेवारी राजू यांच्यासह १० जणांना आंध्रप्रदेश पोलीस गुन्हे अन्वेषष विभागाकडून अटक करण्यात आली होती.

०२) सत्यम कॉम्पुटर्सचे संस्थापक बी.रामलिंग राजू यांच्यासह कोट्यावधींच्या सत्यम घोटाळ्याप्रकरणी हैदराबादच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयातर्फे कोणास दोषी ठरवण्यात आले आहे?
== सत्यम कॉम्पुटर्सचे संस्थापक बी.रामलिंग राजू यांच्यासह या प्रकऱणी त्यांचे आणि सत्यमचे माजी संचालक बी. रामा राजू, माजी प्रमुख वित्त अधिकारी वादलामनी श्रीनिवास, माजी पीडब्लूसी ऑडिट सुब्रमणी गोपालकृष्णन आणि टी. श्रीनिवास, दुसरे बंधू बी. सुर्यनारायण राजू, माजी कर्मचारी डी. रामकृष्णा, डी. व्ही.वेंकटत्रिपाठी राजू, श्रीसैलम आणि व्ही.एस.प्रभाकर गुप्ता

०३) अमेरिकन हवाई नियामक फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटी (एफएए)ने भारतीय हवाई क्षेत्राचे मानांकन सुधारताना कोणते मानांकन बहाल केले आहे?
== श्रेणी-१
-१४ महिन्यांनंतर भारतीय हवाई क्षेत्राला सुरक्षिततेची ही श्रेणी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. याआधी भारतीय हवाई नियामक ‘डीजीसीए’ने आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांची पूर्तता न केल्याने हे मानांकन श्रेणी-२पर्यंत कमी करण्यात आले होते.
-अमेरिकेचे वाहतूकमंत्री अँथनी फॉक्स

०४) अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील शेतकर्याना यापूर्वी ५० टक्के नुकसान भरपाई दिली जात असे मात्र आता ही मर्यादा किती टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे?
== ३३ टक्के
नुकसान भरपाईच्या रक्कमेत ५० टक्के वाढही करण्यात आली आहे.

०५) चॉकलेट व बिस्किट क्षेत्रातील कॅडबरी इंडिया लिमिटेड कंपनीने कोटय़वधी रुपयांचे उत्पादन शुल्क चुकवल्याचे उघड झाले असून त्यामुळे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कंपनीला किती कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे?
== ५७० कोटी रुपये

०६) युद्धग्रस्त येमेनमधून भारताने चार हजाराहून अधिक नागरिकांची सुटका केली आहे. यासाठी कोणती मोहीम राबविण्यात आली होती?
== ऑपरेशन राहत

०७) बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी तसेच मृत गर्भाला कचरापेटीत फेकून दिल्याप्रकरणी अमेरिकन न्यायालयाने भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेला २० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे?
== पूर्वी पटेल (३३)

०८) १५ एप्रिल २०१३ रोजी बोस्टन मॅरेथॉनच्या "फिनिशिंग लाइन‘ जवळ झालेल्या दुहेरी बॉंबस्फोटांमध्ये तीन जण ठार तर १७० जण जखमी झाले होते.याप्रकरणी कोणास आरोपपत्र निश्चिफत करून दोषी ठरविण्यात आले आहे?
== झोहोखर त्सार्नेव्ह (वय २१)

०९) मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉंबस्फोट प्रकरणातील कोणत्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले?
== याकूब अब्दुल रझ्झाक मेमन

१०) चर्चित व्यक्ती:- याकूब अब्दुल रझ्झाक मेमन
- मुंबई साखळी स्फोटांचा सूत्रधार टायगर मेमन याचा याकूब हा भाऊ आहे.
-गुन्हेगारी कट आखणे आणि मुंबई स्फोटांसाठी आर्थिक मदत गोळा करून तिचे वाटप करणे, या आरोपांखाली मुंबईतील ‘टाडा‘ न्यायालयाने २००७ मध्ये मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती.
-मार्च २०१३मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानेही ‘टाडा‘ न्यायालयाचा निर्णय कायम राखला होता.
-त्यानंतर ऑक्टो१बर २०१३ मध्ये मेमनने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

११) निवडणूक आयोगाचे विद्यमान मुख्य आयुक्त एच. एस. ब्रह्मा हे १९ एप्रिलला निवृत्त होत आहेत.त्यामुळे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे.
== नसीन झैदी
१९७६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे झैदी हे अनेक वर्षे नागरी विमान उड्‌डाण मंत्रालयात कार्यरत होते.

१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी ०९ ते १६ एप्रिलपर्यंत कोणत्या तीन देशांच्या भेटीवर जात आहेत?
== फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा
- अण्विक ऊर्जा, संरक्षण, अवकाश, पायाभूत क्षेत्र, गुंतवणूक आणि उद्योग व व्यापार या विषयांवर या तीन देशांचा दौरा प्रामुख्याने केंद्रित राहणार आहे.

१३) सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसाठी योगासनांचे वर्ग सुरु करण्यात आले असून याकामी कोणत्या संस्थेची मदत घेतली जात आहे?
== बह्म कुमारी
- बीएसएफ प्रमुख डी के पाठक

१४) नेदरलँड्स येथील ‘रॉयल डच शेल‘ कंपनी लवकरच ब्रिटनच्या कोणत्या ग्रुपचे अधिग्रहण करणार आहे?
== बीजी ग्रुप
-हा व्यवहार ४७अब्ज पौंड म्हणजे सुमारे ७० अब्ज डॉलरला पार पडणार आहे.

१५) एका मिनिटात चार्ज होणार्या तसेच अत्यल्प खर्च असलेल्या ऍल्युमिनियमच्या मोबाईल बॅटरीचा शोध कोणी लावला आहे?
== स्टॅण्फोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी

१६) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या वारशाच्या संवर्धनासाठी राबवण्यात येत असलेल्या 'मेरा लखनऊ' या मोहिमेची तसेच साहसी महिलांना दिल्या जाणाऱ्या 'राणी लक्ष्मीबाई नारी सन्मान' या पुरस्काराची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
== फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१५ची सेकंड रनर अप वर्तिका सिंह

१७) नवीन रेल्वे सुविधा:-
- रेल्वेप्रवाशांना आपल्या प्रवासाच्या वेळात निश्चिंतपणे झोप घेता यावी, यादृष्टीने रेल्वेने एक अनोखी सेवा लागू केली आहे. उतरण्याचे स्टेशन येण्याच्या ३० मिनिटे आधी प्रवाशाला त्याच्या मोबाइलवर 'वेकअप कॉल' दिला जाणार आहे. १३९ या रेल्वे इन्क्वायरी नंबरवर व्हॉइस कॉलच्या स्वरुपात ती उपलब्ध असेल.

१८) आंध्र प्रदेशच्या कोणत्या जंगलात सुरू असलेल्या चंदन आणि रक्तचंदन तस्करीला रोखण्यासाठी राज्य पोलिस, वन विभाग तसेच विशेष कृती दलाच्या जवानांनी सुरू केलेल्या मोहिमेत २० जण ठार झाले असून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणी आंध्र सरकारला नोटीस बजावली आहे?
== सेशाचलम
-चित्तूर जिल्ह्यातील तिरूपतीजवळील श्रीशैलमच्या घनदाट जंगलात ही चकमक सुरू आहे.

१९) केंद्रीय दक्षता आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== वरिष्ठ आयएएस अधिकारी निलम साहनी
-आयोगाचे प्रमुख आलोककुमार यांची नीती आयोगाच्या अतिरिक्त सचिवपदी बदली केल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.
-साहनी १९८४च्या बॅचच्या आयएएस असून, सध्या आंध्र प्रदेशामध्ये कार्यरत आहेत. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असेल.

२०) ऑनलाइन शॉपिंगच्या दुनियेत अल्पावधीतच दबदबा निर्माण करणार्या कोणत्या कंपनीने ऑनलाइन किराणा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे?
== फ्लिपकार्ट
-बिगबास्केट, जॉपनाउ आणि लोकल बनियासारख्या ऑनलाइन कंपन्या आधीपासूनच किराण व्यवसायात आहेत.
-अॅमेझॉन आणि स्नॅपडील या कंपन्याही आधीपासूनच ऑनलाइन किराणाच्या क्षेत्रात आहेत. इतकेच नव्हे तर, अॅमेझॉन इंडियानं किराणा दुकानांच्या सहकार्यानं 'किराणा नाउ' नावानं एक्सप्रेस डिलिव्हरी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.

२१) राज्यातील १२ टोलनाके पूर्ण बंद करण्यात येणार असून, ५३ टोलनाक्यांवर जीप, कार तसेच एसटीला वगळण्यात येणार आहे.या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल?
== ३१ मेच्या मध्यरात्रीपासून (१ जूनपासून)
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अखत्यारीतील ३८पैकी ११ तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचा (एमएसआरडीसी) एक असे १२ टोलनाके पूर्णत: बंद
- तर पीडब्ल्यूडीच्या २७ व एमएसआरडीसीच्या २६ टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी असेल.
- मुंबईत प्रवेश करण्यासाठीचा तसेच पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावरील टोलबाबत निर्णय घेण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून, त्याबाबत जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल.
- कोल्हापूर टोलबाबतही ३१ मेपूर्वी निर्णय होईल.

२२) मॅनेजमेंट गुरू अशी ओळख असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची विश्वासार्हता लक्षात घेऊन ‘फ्लिपकार्ट’'ने डबेवाल्यांच्या कोणत्या युनियनशी करार केला आहे?
== नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट

२३) साखरेचे दर दररोज कोसळत असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य आधारभूत किंमत (एफआरपी) देता यावी, यासाठी किती रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे?
== दोन हजार कोटी

२४) विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्याच्या एसएससी बोर्डाच्या अखत्यारितील शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरात किती चाचण्या घेण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे?
== तीन चाचण्या
-पहिली पायाभूत चाचणी शाळा सुरू झाल्यानंतर घेण्यात येईल, तर अन्य दोन चाचण्या प्रत्येक सत्राअखेर घेण्यात येईल.

२५) रेशन धान्य वितरणात गैरव्यवहार करणाऱ्या वाहतूक कंत्राटदारांसह दोषी अधिकाऱ्यांवर यापुढे कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे?
== महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा' (मोक्का)

२६) राष्ट्रीय महिला आयोगाला सिव्हिल कोर्टाचे अधिकार देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील एका मंत्रिगटाने मंजुरी दिली आहे?
== केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
-राष्ट्रीय महिला आयोग कायदा(१९९०)
- कायद्यातील दुरुस्तीनुसार आयोगाला सिव्हिल कोर्टाचे अधिकार मिळाल्यास समन्स बजावण्याचे, शपथेवर दिलेली माहिती तपासण्याचे, एखादा पुरावा शोधून सादर करण्याचे, शपथपत्रावर पुरावे मागण्याचे तसेच कोर्टा वा संबंधित कार्यालयाकडून पुरावे मागण्याचे अधिकार आयोगाला मिळतील.
- तपासासाठी केंद्र किंवा राज्यातील कोणत्याही तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याची सेवा घेण्याचा अधिकारही आयोगास मिळेल.

२७) केंद्रीय व राज्य नियोजन आयोगाचे माजी सदस्य असलेल्या कोणत्या ज्येष्ठ कृषितज्ज्ञचे नुकतेच निधन झाले आहे?
== डॉ. जयंतराव शामराव पाटील
-बॅ. ए. आर. अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात डॉ. जयंतराव पाटील यांनी राज्य फलोद्यान विभागाचे अध्यक्षपद भूषवले.
-महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
-राज्य नियोजन आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. होती. व त्यानंतर पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात पाटील नियोजन आयोगाचे सदस्य होते.

२८) सुप्रसिद्ध विचारवंत, राजकीय विश्लेषक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== प्रा. डॉ. यशवंत सुमंत

२९) हवाई दलाचे माजी प्रमुख असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== एअर चीफ मार्शल हृषीकेश मूळगावकर (९५)
-मूळगावकरांचा जन्म मुंबईमध्ये १४ ऑगस्ट १९२० रोजी झाला.
-वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी रॉयल इंडियन एअर फोर्ससाठी अर्ज केला आणि त्यांची निवड होऊन ३० नोव्हेंबर १९४० रोजी ते पायलट ऑफिसर म्हणून रूजू झाले.
- १ फेब्रुवारी १९७६ रोजी हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. ३१ ऑगस्ट १९७८ रोजी ३८ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले.

आयपीएस अधिकारी यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील 37 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी सध्या आता निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत, त्यांना निवडणुकीनंतर नव्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. मात्र राज्यातील कोणत्याही निवडणुकीच्या कामात व्यस्त नसलेल्यांना तातडीने नव्या पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
आयपीएस अधिकारी (सध्याचं पोस्टिंग)                   नवी नियुक्ती

1. सतीश चंद्र माथूर (पोलिस आयुक्त पुणे) - महासंचालक, कायदे आणि तंत्रज्ञान, मुंबई (पदोन्नती)

2. एस. पी. यादव (अति. महासंचालक, CID) - पोलिस आयुक्त, नागपूर

3. के. के. पाठक (पोलिस आयुक्त, नागपूर) - पोलिस आयुक्त, पुणे

4. व्ही. डी.  मिश्रा (अति. महासंचालक, PCR) - अति. महासंचालक (आस्थापना)

5. डी. कणकरत्नम (अति. महासंचालक, आस्थापना) - अति. महासंचालक (रेल्वे)

6. संजय बर्वे (अति. महासंचालक (रेल्वे) - अति. महासंचालक (ACB विभाग)

7. संदीप बिश्नोई (मुख्य दक्षता अधिकारी, एसटी) - अति. महासंचालक, SRPF (पदोन्नती)

8. विनित अग्रवाल (विशेष गृहसचिव) - मुख्य दक्षता अधिकारी, एसटी

9. विवेक फणसळकर (सहआयुक्त, प्रशासन) - एटीएस प्रमुख

10. हिमांशू रॉय (एटीएस प्रमुख) - अति. महासंचालक, पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण

11. बी. के. उपाध्याय (सहआयुक्त, वाहतूक) - विशेष प्रधान गृहसचिव (पदोन्नती)

12. संजय कुमार (सहआयुक्त, पुणे) - अति. महासंचालक, CID (पदोन्नती)

13. राजेंद्र सिंह (पोलिस आयुक्त, औरंगाबाद) - अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय (पदोन्नती)

14. हेमंत नागराळे (अति. महासंचालक, नियोजन आणि समन्वय) - अति. महासंचालक, म्हाडा

15. प्रज्ञा सरवदे (विशेष पो. महानिरीक्षक, दक्षता अधिकारी, सिडको)- अति.महासंचालक, सिडको (पदोन्नती)

16. विठ्ठल जाधव (प्रशासकीय संचालक) - तुरुंग महानिरीक्षक, नागपूर

17. शशिकांत शिंदे (तुरुंग महानिरीक्षक, नागपूर) - संचालक, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ

18. मधूकर पांडे (विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण) - पोलिस आयुक्त, रेल्वे

19. रविंद्र सिंघल (पोलिस आयुक्त, रेल्वे) - विशेष महानिरीक्षक, प्रशिक्षण

20. कुलवंतकुमार सरंगल (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) - विशेष महानिरीक्षक

21. प्रभातकुमार (विशेष महानिरीक्षक) - विशेष महानिरीक्षक, कायदा-व्यवस्था

22. देवेन भारती (विशेष महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था) - सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई

23. धनंजय कमलाकर (सहआयुक्त, कायदा-सुव्यवस्था, मुंबई) - सहआयुक्त, आर्थिक गुन्हे

24. राजवर्धन (अति. पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे) - सहआयुक्त, नागपूर (पदोन्नती)

25. मिलिंद भारंबे (अति. पोलिस आयुक्त) - वाहतूक सहआयुक्त, मुंबई

26. विश्वास नांगरे-पाटील (उपमहानिरीक्षक, ACB) - विशेष महानिरीक्षक (पदोन्नती)

27. सुरेश मेखला (पोलिस आयुक्त, अमरावती) - विशेष महानिरीक्षक, SRPF (पदोन्नती)

28. अनुपकुमार सिंह (सहआयुक्त, नागपूर) - सहआयुक्त, प्रशासन, मुंबई

29. सुनील रामानंद (विशेष महानिरीक्षक, SRPF) - सहआयुक्त, पुणे

30. रितेश कुमार (विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर) - विशेष महानिरीक्षक, सीआयडी, पुणे

31. संजय वर्मा (नियुक्तीच्या प्रतिक्षेत) - विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर

32. जयजित सिंह (विशेष महानिरीक्षक, VIP सुरक्षा) - विशेष महानिरीक्षक, नाशिक

33. प्रवीण साळुंखे (विशेष महानिरीक्षक, नाशिक) - विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा

34. प्रशांत बुरुडे (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा) - विशेष महानिरीक्षक, कोकण

35. अमिताभ गुप्ता (विशेष महानिरीक्षक, कोकण) - विशेष महानिरीक्षक, VIP सुरक्षा

36. बिपीनकुमार सिंह (विशेष महानिरीक्षक, तुरुंग) - विशेष महानिरीक्षक, नांदेड

37. दीपक पांडे (अति. आयुक्त नागपूर, गुन्हे) - विशेष महानिरीक्षक, मानवाधिकार आयोग

वित्त आयोग

जानिए क्या है वित्त आयोग
===================
भारतीय वित्त आयोग 1951 को अस्तित्‍व में आया. इसका गठन राष्‍ट्रपति द्वारा भारतीय संविधान की धारा 280 के तहत किया गया है. इस आयोग को केंद्र और राज्‍य के बीच वित्तीय संबंधों को परिभाषित करने के लिए किया गया था:
- संविधान के अनुच्छेद 280 में वित्त आयोग के गठन का प्रावधान किया गया है

- वित्त आयोग के गठन का अधिकार राष्ट्रपति को दिया गया है

- वित्त आयोग में राष्ट्रपति द्वारा एक अध्यक्ष और चार अन्य सदस्य नियुक्त किये जाते हैं

- राज्य वित्त आयोग का गठन भारतीय संविधान के अनुच्छेद 243 (1 ) की द्वारा किया जाता है
वित्त आयोग = नियुक्ति वर्ष = अध्यक्ष = अवधि
=================================================

पहला = 1951 = केसी नियोगी = 1952-1957

दूसरा = 1956 = के संथानाम = 1957-1962

तीसरा = 1960 = एके चंद्रा = 1962-1966

चौथा = 1964 = डॉ पीवी राजमन्नार = 1966-1969

पांचवां = 1968 = महावीर त्याागी = 1969-1974

छठा = 1972 = पी ब्रह्मानंद रेड्डी = 1974-1979

सातवां = 1977 = जेपी सेलट = 1979-1984

आठवां = 1982 = वाई पी चौहान = 1984-1989

नौवां = 1987 = एन केपी साल्वेे = 1989-1995

10वां = 1992 = के सी पंत = 1995-2000

11वां = 1998 = प्रो एएम खुसरो = 2000-2005

12वां = 2003 = डॉ सी रंगराजन = 2005-2010

13वां = 2007 = डॉ विजय एल केलकर = 2010-2015

14वां = 2012 = डॉ वाई वी रेड्डी = 2015-2020

विज्ञान

============
● विज्ञान : पेशी जीवशास्त्र
१) पेशीचा शोध सर्वप्रथम रॉबर्ट हुक यांनी लावला .
२) बक्टेरीयाच्या स्वरुपात मुक्त पेशी सर्वप्रथम लीवेनहॉक ने १६८३ मध्ये पहिली.
३) सर्व वनस्पती व प्राणी पेशींनी बनलेली आहे असे प्रतिपादन जर्मन शास्त्रज्ञ मोथिअस श्लायडेन (१८३८ वनस्पती पेशी) व थिओडर श्वान (१८३९ प्राणी पेशी) केले.
४) पेशीतील केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन या शास्त्रज्ञाने १८३१ साली लावला.
५) पेशी द्रव्याला नाव देणारा शास्त्रज्ञ जे. के. पुरकिंजे याने १८३९ साली लावला.
६) सर्व पेशींची उत्पती पूर्वीच्या अस्तित्वातील पेशीपासून होते हा सिध्दांत मांडणारा शास्त्रज्ञ विर्कोव (१८५५) हा होय.
७) जीवद्रव्य (पेशीद्रव्य) जीवनाचा भौतिक आधार असतो असे सांगणारा शास्त्रज्ञ हॉक्सले हा होय.
८) तारका केंद्राचा शोध लावणारा शास्त्रज्ञ टी बोव्हेरी हा होय.
९) केंद्र्काचा शोध लावणारा शास्त्रज्ञ फोल्टेना (१७८१) हा होय.
१०) रायबोसोम्सचा शोध लावणारा शास्त्रज्ञ - Geoege Pulade हा आहे.

चालु घडामोडी २४

‪#‎चालू‬ घडामोडी:-एप्रिल २०१५

०१)आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत ११६ गुणांसह दुस-या स्थानी असणारा संघ कोणता?
== भारत
-१२२ गुणांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे.
-भारतानंतर तिस-या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका(११२) त्यापाठोपाठ श्रीलंका(१०८), न्यूझीलंड(१०७), इंग्लड(१०१), पाकिस्तान(९५) आहेत.

०२) जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार:-
-२०११ ते २०१४ या कालावधीत देशामध्ये बँक खात्यांची वाढ ३५ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर झेपावली.
-देशातील व्यवहारशून्य खात्यांच्या संख्येत होणा-या वाढीचा वेगही प्रचंड असून हा दर ४३ टक्के एवढा आहे.
-२०११ ते २०१४ या कालावधीत १७.५ कोटी नवी खाती सुरू झाली.
-जनधन योजनेंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ९७ टक्क्यांपेक्षा जास्त खाती सुरू करण्यात आली. यातील ७२ टक्के खाती ही ‘झीरो बॅलन्स’ दाखवत आहेत.

०३) सेबीची आकडेवारी:-
-देशातील ४४ फंड हाऊसेसमधील गुंतवणूकदारांच्या खात्यांची आकडेवारी -सेबीने जाहीर केली आहे.
-यात गेल्या आर्थिक वर्षामध्ये इक्विटी खात्यांची ३.१७ कोटींवर गेली आहे. -आधीच्या वर्षाअखेरीस ही संख्या २.९२ कोटी एवढी होती.
-२०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणूकदारांच्या २५ लाख खात्यांची भर पडली.

०४) केपीएमजी या संस्थेने जागतिक बांधकाम अहवाल नुकताच जाहीर केला आहे.त्यानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये देशभरातील जवळपास किती टक्के बांधकाम कंपन्यांवर एका किंवा त्यापेक्षा जास्त सुमार प्रकल्पांचा भार असल्याचे केपीएमजीने आपल्या अहवालात म्हटले आहे?
== ८०%

०५) एअरटेलने नुकताच कोणता मोफत इंटरनेट प्लॅन लॉन्च केला आहे. जावरुनच वाद निर्माण झाला आहे?
== एअरटेल झीरो

०६) नेट न्यूट्रलिटीवरुन वाद सुरु असतानाच कोणत्या ऑनलाईन रिटेल वेबसाईट आणि एअरटेलमधील करार अखेर रद्द करण्यात आला आहे?
== फ्लिपकार्ट

०७) ‘द टिन ड्रम’, ‘कॅट अ‍ॅँड माऊस’, ‘डॉग इयर्स’ इत्यादी कादंबर्यांचे लेखक कोण होते?
== नोबेल पारितोषिक विजेते व विख्यात जर्मन लेखक गुंथर ग्रास

०८) राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर गीता राणी 'ब' चाचणीतही दोषी आढळली आहे. त्यामुळे तिच्यावर कमीत कमी किती वर्षांची बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे?
== आठ वर्षे
-गीता राणीने २००६च्या राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक आणि २००४च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीन रौप्यपदकांची कमाई केली होती.
-यावर्षी केरळ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान डोपिंगची तपासणी करण्यासाठी तिची 'अ' चाचणी घेण्यात आली. यात तिने बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
- 'नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी'च्या (नाडा)च्या नवीन नियमानुसार डोपिंगमध्ये ती पहिल्यांदाच दोषी आढळली असेल, तर तिच्यावर जास्तीत जास्त चार वर्षांची बंदी घालण्यात येईल. पण, 'ऑल इंडिया पोलिस मीट' स्पर्धेदरम्यानही ३३ वर्षीय गीताचे सॅम्पल घेण्यात आले होते. त्यातही ती दोषी आढळली होती.

०९) दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू प्रतिस्पर्ध्याच्या चाली स्मार्टफोनवर पाहात असताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे?
== जॉर्जियाचा ग्रँडमास्टर गायोझ निगालिड्झ
-दुबई ओपनच्या सहाव्या फेरीमध्ये गायोझची लढत अर्मेनियाच्या पेट्रोसियानशी होती.
-त्याच्यावर १५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

१०) फुटबॉल जागतिक क्रमवारीत भारताने नुकतेच कितवे स्थान मिळविले आहे?
== १४७वे

११) आशिया क्रिकेट चषक स्पर्धा:-
== २०१६ मध्ये ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होईल तर २०१८ मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल.

१२) 'गांधी मला भेटला होता' या वादग्रस्त कवितेचे लेखक कोण आहेत?
== वसंत गुर्जर

१३) 'अग्नी-३' क्षेपणास्त्र
-१७ मीटर लांबी, दोन मीटर व्यास आणि ५० टनांचा प्रक्षेपण भार असलेले हे क्षेपणास्त्र दीड टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
-लष्करात याआधीच समाविष्ट करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र हायब्रीड नॅव्हिगेशन, गायडन्स व कंट्रोल सिस्टिम्सने सज्ज आहे.
-तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर मारा करू शकणाऱ्या आणि अण्वस्त्रसक्षम अशा 'अग्नी-३' या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने ओडिसा किनाऱ्यानजीकच्या व्हीलर बेटांवरून प्रक्षेपक चाचणी केली.

१४) भारताला युरेनियम पुरवठा करणारा तिसरा देश कोणता ठरला आहे?
== कॅनडा (रशिया व कझाकस्ताननंतर)
-कॅनडाची कॅमेको कॉर्पोरेशन ही कंपनी ३ हजार मेट्रिक टन युरेनियन पुरवणार आहे.
-पाच वर्षांत हा पुरवठा केला जाणार असून युरेनियमची किंमत २५४ दशलक्ष डॉलर आहे.

१५) 'स्किनिंग द ओनियन' हे आत्मचरित्र कोणत्या लेखकाचे आहे?
== गुंटर ग्रास

१६) ‘इस्लामिक स्टेट पाकिस्तान‘ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या असलेला कोणता दशहतवाद्याचा बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे?
== हाफिज मुहाम्मद सईद

१७) कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांना खजुराहो मंदिरातील किती वर्षे पुरातन शिल्प भेट दिले. "पॅरट लेडी‘ म्हणून हे शिल्प ओळखले जाते?
== ९०० वर्षे जुने

१८) हरियानातील कोणत्या खेड्यामध्ये उत्खनन करताना पुरातत्त्व शास्त्रज्ञांना पाच हजार वर्षांपूर्वीचे चार मानवी सांगाडे सापडले आहेत?
== राखी गडी

१९) संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी रशिया प्रथमच कोणत्या देशासोबत युद्धसराव करणार आहे?
==पाकिस्तान
-पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांची आणि रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोईगू

२०) भारताच्या कोणत्या विनाशिकेचे जलावतरण २० एप्रिलला मुंबई येथील माझगाव डॉकला होणार असून नौदलाच्या १५-बी या प्रकल्पाअंतर्गत तयार होणारी ही पहिलीच रडारवर दिसू न शकणारी विनाशिका आहे?
== आयएनएस विशाखापट्टणम
*आयएनएस विशाखापट्टणम‘ची वैशिष्ट्ये
१६३ मीटर : लांबी
१७.४ मीटर : उंची
४ : गॅस टर्बाईन्स
३० नॉट्‌स : वेग