Bookmark

Bookmark this Blog

Saturday, October 31, 2015

चालु घडामोडी ४८

⚪24 ऑक्टोबर् 2015⚪

हा या वर्षातील २९७ वा (लीप वर्षातील २९८ वा) दिवस आहे.

��जागतिक पोलिओ निर्मूलन
�� दिनजागतिक माहिती विकास दिन : (World Development of Information Day)

��महत्त्वाच्या घटना:

��२०००:थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. 
६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
��१९९७:सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
��१९८४:भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
��१९७२:दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
��१९६४:उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
��१९६३:देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
��१९४५:संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
��१९०९:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
��१६०५:मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.

��जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:��

��१९२६ : केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (मृत्यू: ३ आक्टोबर २०१२) 
��१९२१ : रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण ��(२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५) 
��१९१४ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२) 
��१९१० : ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????) 
��१८६८ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
��१७७५ : बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू:७ नोव्हेंबर १८६२) 
��१६३२ : अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

��मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:��

��२०१३ : प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (जन्म: १ मे १९१९) 
��१९९५ :माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????) 
��१९९२ : अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
��१९९१ : इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (जन्म: १५ ऑगस्ट१९१५) 
��१६०१ : टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (जन्म: १४ डिसेंबर१५४६)

����������������
   ��महाराष्ट्र एडमिन पैनल��
����������������

जगातील महाविविधता केंद्रे

--------------------------------------------------
जगातील महाविविधता केंद्रे
---------------------------------------------------

* जगातील १९३ देशांमध्ये जैवविविधतेचे वितरण समान नाही .

* उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये वसलेल्या देशांमध्ये जगातील जैवविविधता एकवटलेली आहे .

* महाविविधता - जैवविविधता मर्यादित देशांमध्ये एकवटलेलीअसण्याला " महाविविधता " ( Megadiversity ) असे म्हणतात .

* या देशांना " महाविविधता केंद्रे " असे म्हणतात .

* हे देश राजकीय एकके ( Political units ) आहेत .

* सुरूवातीला जगात महाविविधता केंद्रे १२ होती .

* आज जगात महाविविधता केंद्रे १७ आहेत .
-----------------------------------------------------------

* महाविविधता केंद्रे दर्जा मिळवण्याचे निकष------------------------------------------------------------

१) जीवप्रजातींची संख्या / विविधता ( Species Richness )

२) स्थलविशिष्ट ( Endemic ) प्रजातींची संख्या (Degree of endemism )

* स्थलविशिष्टता - एखादी जीव प्रजाती विशिष्ट प्रदेशांपुरतीच मर्यादित असते त्यास स्थलविशिष्टता म्हणतात .उदा. थामिन हरिण - केबुल लाम्जो राष्ट्रीय उद्यान

* जगातील १७ महाविविधता केंद्रे -

१) आँस्ट्रेलिया

२) ब्राझील

३) चीन

४) कोलोंबिया

५) डेमोक्रेटीक रिपब्लिक आँफ काँगो

६) युकँडाँर

७) भारत

८) इंडोनेशिया

९) मादागास्कर

१०) मलेशिया

११) मेक्सिको

१२) पापुआ न्युगिनी

१३) पेरु

१४) फिलिपाईन्स

१५) दक्षिण आफ्रिका

१६) यु एस ए

१७) व्हेनेझ्युएला

* जगातील ६०-७०% जीवप्रजाती याच देशांमध्ये आढळतात .

* " भारत " हा देखील जगातील १७ महाविविधता केंद्रापैकी एक आहे .

देशातिल पहिली बुलेट ट्रेन

देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानला
भेट दिली, तेव्हा या प्रकल्पात साह्य करणाऱ्या
'जायका' (जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी)
कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली.
देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, ती मुंबई ते
अहमदाबाद या मार्गावर.
जपानी कंपन्यांच्या प्रकल्पांना जलदगतीने काम करता
यावे, यासाठी 'जपान डेस्क' स्थापन करण्याची
घोषणाही त्यांनी केली.
पहिली ट्रेन धावेल ती तब्बल दहा वर्षांनंतर 2024 मध्ये.
पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे आव्हान मोठे आहे.
त्यासाठी तब्बल 90 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
अंदाजानुसा, मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे तिकीट 2800
ते 3000 रुपये असेल.
हे अंतर 458 कि.मी. आहे.
'फॉर्च्युन 500' या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या जून
2015 च्या अंकातील 'अमेरिका बाईट्स बिग ऑन बुलेट
ट्रेन्स' या लेखानुसार, बुलेट ट्रेनच्या संदर्भात
(भारताप्रमाणे) 'अमेरिकाही चीन, जपान व युरोपच्या
कित्येक वर्षे मागे आहे,' असे म्हटले आहे.

महाराष्ट्र जिल्हा विशेष

महाराष्ट्रातील जिल्हा विशेष

→महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

→महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

→संत्र्याचा जिल्हा- नागपूर

→महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

→जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

→महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

→साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

→महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

→महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

→कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर

→लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

→भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

→भारताची आर्थिक राजधानी - मुंबई

→महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

→महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

→महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

→मुंबईची परसबाग - नाशिक

→महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

→मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

→द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

→आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

→अती दक्षिणेकडचा जिल्हा- सिंधुदुर्ग

→पर्यटन जिल्हा - सिंधुदुर्ग

→कलाकारांचा जिल्हा- सांगली

→दुधा तुपाचा जिल्हा- धुळे

→तलावांचा जिल्हा- गोंदिया

→विद्येचे माहेरघर- पुणे

→सैनिकांचा जिल्हा- सातारा

महिलांविषयी कायदे

महिलांविषयक कायदे :

1. सतीबंदी कायदा -1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

6. आनंदी विवाह कायदा -1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा-1986

8. विशेष विवाह -1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा -2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा-2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

18. समान वेतन कायदा -1976

19. बालकामगार कायदा -1980

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

24. माहिती अधिकार कायदा -2005

25. बालन्याय कायदा - 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

28. हिंदू विवाह कायदा -1955

29. कर्मचारी विमा योजना -1952

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

32. वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

33. हुंडा निषेध कायदा - 1986

महत्वाची शहरे

महत्वाची शहरे
नेपाळ :

सात वर्षे सखोल विचारविनिमय केल्यानंतर नेपाळने पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही अशा नव्या घटनेचा स्वीकार केला.
 संसदेने मंजूर केलेली आणि संसदेच्या अध्यक्षांनी अधिप्रमाणित केलेली नेपाळची घटना रविवार, 20 सप्टेंबर 2015 पासून नेपाळच्या जनतेसमोर लागू होत आहे, अशी घोषणा अध्यक्ष रामबरन यादव यांनी संसदेत या कायद्याचे अनावरण करताना केली
 67 वर्षांच्या संघर्षांनंतर निर्वाचित लोकप्रतिनिधींनी तयार केलेली ही पहिलीच घटना आहे
 नव्या घटनेवर संसदेच्या (काँस्टिटय़ुअन्ट असेंब्ली) 601 सदस्यांपैकी 85 टक्के सदस्यांनी शिक्कामोर्तब केले असून, तीत द्विसदनी कायदानिर्मितीची (बायकॅमेरल लेजिस्लेशन) तरतूद आहे.कनिष्ठ सभागृह किंवा लोकप्रतिनिधींच्या सभागृहात 375, तर वरिष्ठ सभागृहात 60 सदस्य असतील.
 नव्या घटनेचे 37 विभाग, 304 अनुच्छेद व 7 पूरक अंश आहेत.
 नव्या रचनेतील सात प्रांतांना एक उच्चस्तरीय आयोग एका वर्षांच्या आत अंतिम रूप देणार आहे.

केरळ :

महिला प्रधान चित्रपट निर्मतीसाठी देशातील महिला चळवळीस सुरुवात झाली
 या राज्यात फिमेल फिल्म सोसायटी या नावाने संस्थेची स्थापना केली त्या अंतर्गत महिलाप्रधान चित्रपटाना प्रोत्साहन दिले जाणार आहे

हॅंगझू :

चीनमधील हॅंगझू या शहरात 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्याचा निर्णय आशियाई ऑलिंपिक समितीच्या सदस्यांनी घेतला.
 पुढील आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये इंडोनेशिया येथे होणार आहेत.

महत्वाच्या योजना

श्या:माप्रसाद मुखर्जी "रूर्बन" योजना(एसपीएमआरएम) :

"स्मार्ट सिटी" योजनेच्या पाठोपाठ आता स्मार्ट गावे तयार करण्यासाठी व शहरांकडील स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशाने देशाच्या 300 विभागांत स्मार्ट गावे निर्माण करण्याची श्याशमाप्रसाद मुखर्जी "रूर्बन‘ योजना (एसपीएमआरएम) सरकारने घोषित केली
 स्मार्ट गाव योजनेसाठी केंद्राकडून 5142 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद
 यासाठी 300 विभाग आहे त्यातील गावांची संख्या धरली तर हजारो गावे या योजनेत समाविष्ट होतील
 पहिल्या टप्प्यात 100 विभाग केले जातील. एकेका विभागात मिळून गावांची एकूण लोकसंख्या 25 ते 50 हजार व दुर्गम तसेच वाळवंटी भागात पाच ते 15 हजार अशी अट असेल
 गावांना स्मार्ट बनविण्यासाठी 15 ठळक निकष आहे ग्रामीण भारताचा आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधा या तिन्ही बाजूंनी सर्वंकष विकास करण्यासाठी नवी योजना सरकारने घोषित केली आहे. यात पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, इंटरनेट सुविधा, तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणासह त्याबाबतच्या संधी, शेतमालासाठी सुलभतेने बाजारपेठ मिळवून देणे आदींचा समावेश असेल.
 ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास करणार
 गावांचा विकास करण्यासाठी राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव व संभाव्य गावांची नावे पाठवायची आहेत

गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प :

आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
 हा भारर्तातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे
 नदीजोड प्रकल्पाच्या आधारे गोदावरी नदीच्या पोलावरम कालव्याच्या माध्यमातून 80 टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले.
 भविष्यात यामुळे जवळपास 17 लाख एकर जमिनीचे सिंचन होणार आहे. तसेच कृष्णा, कुर्नुल, कडप्पा,

जाहिरनामा

* जाहीरनामा:-
-----------------------------------------------------------------------------

•तिमोर लेस्टेची राजधानी डिली येथे आग्नेय आशियातील तंबाखूविरोधी समितीची ६८वी बठक भरली होती यात तंबाखू प्रतिबंधक जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

•तंबाखूमुळे आग्नेय आशियात दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. तंबाखूच्या अतिवापरामुळे हे प्रमाण वाढत चालले असून, अकरा देशांनी नुकत्याच तंबाखूच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या

•आग्नेय आशियात २५ कोटी लोक धूम्रपान करतात आणि तेवढेच लोक विविध कारणांसाठी तंबाखू वापरतात. बहुदा ती चघळण्यासाठी वापरली जाते.

सर्व सरकारांनी, संयुक्त राष्ट्रांनी आणि सदस्य देशांनी तंबाखू नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

•जगातील तंबाखूचा एकतृतीयांश वापर हा आग्नेय आशियात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

•जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार तंबाखू नियंत्रणासाठी सिगरेट व तंबाखूच्या पाकिटांवर मोठय़ा चित्राच्या स्वरूपात तंबाखूबाबत धोक्याचा इशारा देणे बंधनकारक आहे.

•नेपाळमध्ये वेष्टनाच्या ९० टक्के आणि थायलंडमध्ये ८५ टक्के भागात तंबाखूच्या धोक्याबाबत इशारा दिलेला असतो.

•जाहीरनाम्यात काय?

* ’तंबाखूमुळे जगात दरवर्षी ६० लाख लोक मरतात, त्यातील ६० लाख मृत्यू हे तंबाखूच्या थेट वापराने होतात,

•तर ६० हजार मृत्यू दुय्यम धूम्रपानामुळे होतात म्हणजे धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात आल्याने होतात.

* ’धूम्रपान न करताही केवळ धूर शरीरात गेल्याने हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग होतो. गर्भवती महिला कमी वजनाच्या बाळांना जन्म देतात.

* ’तंबाखूच्या धुरात चार हजार रसायने असतात, त्यातील अडीचशे हानिकारक असल्याचे सिद्ध झाले असून ५० रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो.

* ’तंबाखू व सिगरेटच्या पाकिटांवर धोक्याची सूचना मोठय़ा चित्रात्मक स्वरूपात देणे आवश्यक आहे.

विविध अहवाल

* विविध अहवाल:-
-----------------------------------------------------------------------------------
#संयुक्त राष्ट्रांचा अहवाल बाल मृत्युदर:-
---------------------------------------

•संयुक्त राष्ट्रांच्या बालक कल्याण कार्यक्रमाअंतर्गत बालमृत्यूबाबत एक अहवाल तयार करण्यात आला त्यानुसार

•पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अत्यांतिक गरिबी, सकस आहार न मिळणे आदी कारणांमुळे अनेक देशांत ०-५ वयोगटातील बालकांचा मृत्यू होतो. नव्वदच्या दशकात आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बालमृत्यू होण्याची संख्या अधिक होती. मात्र २५ वर्षांनंतर ही परिस्थिती बदलली आहे. आता जगभरातील बालमृत्यूची संख्या निम्म्याने कमी झाली आहे., असे या अहवालात म्हटले आहे

•१९९०मध्ये ०-५ वयोगटातील एक कोटी २७ लाख मुलांचा मृत्यू झाला होता मात्र २०१५ म्हणजेच यावर्षी हा आकडा ६० लाखांच्या खाली आहे. म्हणजेच बाल मृत्युदरात ५३ टक्क्यांची घट झाली आहे.

•‘‘१९९० ते २०१५ या कालावधीत जगभरातील बाल मृत्युदराची संख्या ६६ टक्क्यांनी कमी करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष्य होते. परंतु हे लक्ष्य साध्य झाले नाही ते प्रमाण ५३ टक्के वर स्थिर

.* दररोज जगभरात ०-५ वयोगटातील १६००० मुलांचा मृत्यू होतो.

* न्यूमोनिया, अतिसार, मलेरिया आदी विकारांमुळे बालमृत्यू होत असल्याचे चित्र आहे.

* जगभरातील ५० टक्के बालमृत्यू कुपोषणामुळे होत आहेत.

* जन्मत:च काही दिवसांत मृत्यू येणे हीही मोठी समस्या आहे.

* आफ्रिका खंडात दर १२ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. विकसित व विकसनशील देशांमध्ये दर १४७ मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो.

* सर्वाधिक बालमृत्यू असणारे देश : अंगोला, सोमालिया, चाड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक.

* कमी बालमृत्यू असणारा देश : लक्समबर्ग, आइसलँड, फिनलँड, नॉर्वे.

#वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-२०१५’
---------------------------

•कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-२०१५’ या अहवालात जगभरातील गर्भश्रीमंताची यादी जाहीर करण्यात आली

•या अहवालानुसार २०१४ मध्ये करण्यात आलेल्या मोजणीनुसार भारतात १,९८,००० लक्षाधीश होते.

•जगामध्ये सर्वाधिक लक्षाधीश असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा ११ वा क्रमांक लागतो.

•यापूर्वी २०१३ मध्ये ही संख्या १,५६,००० इतकी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या घसरलेल्या किंमती आणि देशात झालेल्या ऐतिहासक सत्तापालटामुळे भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आले

#जागतिक बँके अहवाल:-
---------------------------

•जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्राचा आठवा क्रमांक लागला

•बँकेने दिलेल्या मानांकनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केलेला गुजरात पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर गेला असून अरुणाचल प्रदेश यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.

* या राज्यांना लालफीतशाहीचा अडथळा दूर करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवली जाते.

•मे २०१४ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी १८९ देशांमध्ये पाकिस्तान व इराणनंतर भारताचा असलेला १४२ वा क्रमांक २०१७ पर्यंत ‘टॉप ५०’पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महत्वाचे अहवाल
महत्वाचे अहवाल :

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल बाल मृत्युदर : :

संयुक्त राष्ट्रांच्या बालक कल्याण कार्यक्रमाअंतर्गत बालमृत्यूबाबत एक अहवाल तयार करण्यात आला त्यानुसार
 पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अत्यांतिक गरिबी, सकस आहार न मिळणे आदी कारणांमुळे अनेक देशांत 0-5 वयोगटातील बालकांचा मृत्यू होतो. नव्वदच्या दशकात आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बालमृत्यू होण्याची संख्या अधिक होती. मात्र 25 वर्षांनंतर ही परिस्थिती बदलली आहे. आता जगभरातील बालमृत्यूची संख्या निम्म्याने कमी झाली आहे., असे या अहवालात म्हटले आहे
 1990 मध्ये 0-5 वयोगटातील एक कोटी 27 लाख मुलांचा मृत्यू झाला होता मात्र 2015 म्हणजेच यावर्षी हा आकडा 60 लाखांच्या खाली आहे. म्हणजेच बाल मृत्युदरात 53 टक्क्यांची घट झाली आहे.
 1990 ते 2015 या कालावधीत जगभरातील बाल मृत्युदराची संख्या ६६ टक्क्यांनी कमी करण्याचे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष्य होते. परंतु हे लक्ष्य साध्य झाले नाही ते प्रमाण 53 टक्के वर स्थिर
 दररोज जगभरात 0-5 वयोगटातील 16000 मुलांचा मृत्यू होतो.
 न्यूमोनिया, अतिसार, मलेरिया आदी विकारांमुळे बालमृत्यू होत असल्याचे चित्र आहे.
 जगभरातील 50 टक्के बालमृत्यू कुपोषणामुळे होत आहेत.
 जन्मत:च काही दिवसांत मृत्यू येणे हीही मोठी समस्या आहे.
 आफ्रिका खंडात दर 12 मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. विकसित व विकसनशील देशांमध्ये दर 147 मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो.
 सर्वाधिक बालमृत्यू असणारे देश : अंगोला, सोमालिया, चाड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक.
 कमी बालमृत्यू असणारा देश : लक्समबर्ग, आइसलँड, फिनलँड, नॉर्वे.

वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-2015 :

कॅपजेमिनी आणि आरबीसी वेल्थ यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट-2015’ या अहवालात जगभरातील गर्भश्रीमंताची यादी जाहीर करण्यात आल�

गोदावरी - कृष्णा नदिजोड प्रकल्प

गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प:-
---------------------------------------------------------------------------
--------
•आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांचे आंध्र
प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते प्रकल्पाचे
लोकार्पण करण्यात आले.

•हा भारर्तातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे

•नदीजोड प्रकल्पाच्या आधारे गोदावरी नदीच्या पोलावरम
कालव्याच्या माध्यमातून ८० टीएमसी पाणी कृष्णा नदीत
सोडण्यात आले.

•भविष्यात यामुळे जवळपास १७ लाख एकर जमिनीचे सिंचन
होणार आहे. तसेच कृष्णा, कुर्नुल, कडप्पा, गुंटूर, अनंतपूर, चित्तूर
आणि प्रकाशम या जिल्ह्यातील शेतकऱयांनाही याचा
फायदा होणार आहे.

•आगामी काळात आंध्र प्रदेशातून वाहणाऱया कृष्णा-पेन्नार,
पेन्नार-तुंगभद्रा या मोठ्या नद्यांसोबत देशभरातील एकूण ३०
नद्यांना एकमेकांसोबत जोडण्याचा सरकारचा मानस आहे.

•प्ररकल्पाची वैशिष्ट्ये :-

- 174 किमी : अंतर कापून गोदावरीचे पाणी कृष्णेला
मिळणार

- 1,427 कोटी : पट्टीसीमा प्रकल्पाचा खर्च

- पुढील वर्षापर्यंत 24 जनित्रे बसवून गोदावरीचे पाणी
पोलावरमच्या उजव्या कालव्यात सोडणार

#फायदा :-

- कृष्णेच्या त्रिभूज प्रदेशाला सिंचन करण्याचा श्रीशैलम
धरणावरील भार कमी होणार

- श्रीशैलमचे पाणी रायलसीमा भागाकडे वळवता येणार

- वळविण्यात येणाऱ्या 80 टीएमसीपैकी 10 टीएमसी पाणी
घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी

- 70 टीएमसी कृष्णा आणि गोदावरी जिल्ह्यातील
सिंचनासाठी

- याद्वारे सात लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार
___________________________________

इन्फ्लेशन आणि बँकांचे व्याजदर

��इन्फ्लेशन आणि बँकाचे व्याजदर यांच्यातील परस्पर संबंध काय ? =>

सध्या बँक दर आणि महागाई, चलनवाढ किंवा इन्फ्लेशन हे शब्द सगळीकडेच ऐकायला येतात. बँक दर हा अनेक वेगवेगळ्या कारणांनी निश्चित होतो. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण असतं इन्फ्लेशन दर. जेव्हा जेव्हा महागाई निर्देशांक वाढतो तेव्हा तेव्हा बँकांची कर्जे तसंच ठेवीवरील व्याजाचे दरही वाढतात. महागाई वाढते कारण उत्पादन कमी झालेल्या वस्तूंना जेव्हा जास्त मागणीमुळे भाववाढ होते, तेव्हा संबंधित वस्तूच्या उत्पादन मूल्यापेक्षा जास्त मूल्य संबंधित वस्तूला मिळतं. म्हणजेच सिस्टीममध्ये पैश्यांचं प्रमाण वाढतं. त्यावेळी सिस्टीममध्ये जास्त झालेला पैसा पुन्हा बँका आपल्याकडे ओढून घेतात, म्हणजेच ठेवींवरील व्याजदर वाढवतात, किंवा ग्राहकांना कर्जे देणं महाग करतात, त्यामुळे बँकांकडील पैसा पुन्हा सिस्टीममध्ये जाण्यापासून वाचतो. म्हणून जेव्हा जेव्हा महागाई वाढते, तेव्हा बँकांचे व्याजदरही वाढतात.