गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प:-
---------------------------------------------------------------------------
--------
•आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांचे आंध्र
प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते प्रकल्पाचे
लोकार्पण करण्यात आले.
•हा भारर्तातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे
•नदीजोड प्रकल्पाच्या आधारे गोदावरी नदीच्या पोलावरम
कालव्याच्या माध्यमातून ८० टीएमसी पाणी कृष्णा नदीत
सोडण्यात आले.
•भविष्यात यामुळे जवळपास १७ लाख एकर जमिनीचे सिंचन
होणार आहे. तसेच कृष्णा, कुर्नुल, कडप्पा, गुंटूर, अनंतपूर, चित्तूर
आणि प्रकाशम या जिल्ह्यातील शेतकऱयांनाही याचा
फायदा होणार आहे.
•आगामी काळात आंध्र प्रदेशातून वाहणाऱया कृष्णा-पेन्नार,
पेन्नार-तुंगभद्रा या मोठ्या नद्यांसोबत देशभरातील एकूण ३०
नद्यांना एकमेकांसोबत जोडण्याचा सरकारचा मानस आहे.
•प्ररकल्पाची वैशिष्ट्ये :-
- 174 किमी : अंतर कापून गोदावरीचे पाणी कृष्णेला
मिळणार
- 1,427 कोटी : पट्टीसीमा प्रकल्पाचा खर्च
- पुढील वर्षापर्यंत 24 जनित्रे बसवून गोदावरीचे पाणी
पोलावरमच्या उजव्या कालव्यात सोडणार
#फायदा :-
- कृष्णेच्या त्रिभूज प्रदेशाला सिंचन करण्याचा श्रीशैलम
धरणावरील भार कमी होणार
- श्रीशैलमचे पाणी रायलसीमा भागाकडे वळवता येणार
- वळविण्यात येणाऱ्या 80 टीएमसीपैकी 10 टीएमसी पाणी
घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी
- 70 टीएमसी कृष्णा आणि गोदावरी जिल्ह्यातील
सिंचनासाठी
- याद्वारे सात लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार
___________________________________
No comments:
Post a Comment