Bookmark

Bookmark this Blog

Saturday, October 31, 2015

देशातिल पहिली बुलेट ट्रेन

देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानला
भेट दिली, तेव्हा या प्रकल्पात साह्य करणाऱ्या
'जायका' (जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी)
कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली.
देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, ती मुंबई ते
अहमदाबाद या मार्गावर.
जपानी कंपन्यांच्या प्रकल्पांना जलदगतीने काम करता
यावे, यासाठी 'जपान डेस्क' स्थापन करण्याची
घोषणाही त्यांनी केली.
पहिली ट्रेन धावेल ती तब्बल दहा वर्षांनंतर 2024 मध्ये.
पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे आव्हान मोठे आहे.
त्यासाठी तब्बल 90 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
अंदाजानुसा, मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे तिकीट 2800
ते 3000 रुपये असेल.
हे अंतर 458 कि.मी. आहे.
'फॉर्च्युन 500' या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या जून
2015 च्या अंकातील 'अमेरिका बाईट्स बिग ऑन बुलेट
ट्रेन्स' या लेखानुसार, बुलेट ट्रेनच्या संदर्भात
(भारताप्रमाणे) 'अमेरिकाही चीन, जपान व युरोपच्या
कित्येक वर्षे मागे आहे,' असे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment