विषय - पर्यावरण
--------------------------------------------------------
भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार
---------------------------------------------------------
१) रामसर करार - वर्ष - १९७१
* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
* अमलात येण्याचे वर्ष - १९७५
* भारताने मान्य केला - १९८२
२) CITES - वर्ष - १९७३
* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
*अमलात येण्याचे वर्ष - १९७६
* भारताने मान्य केला - १९८०
३) बोन करार - वर्ष -१९७९
* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९८३
* भारताने मान्य केला -१९८३
४) व्हिएन्ना करार - वर्ष - १९८५
* ओझोन थर संरक्षण
* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
* भारताने मान्य केला - १९९१
५) बँसेल करार - वर्ष - १९८९
* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
* अमलात येण्याचे वर्ष - १९९२
* भारताने मान्य केला - १९९२
६) UNFCCC - वर्ष - १९९२
* हवामान बदल रोखणे
* अमलात येण्याचे वर्ष - १९९४
* भारताने मान्य केला - १९९३
७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७
* हरितवायू उत्सर्जनात घट
* अमलात येण्याचे वर्ष - २००५
* भारताने मान्य केला - २००२
८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२
* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
* अमलात येण्याचे वर्ष - १९९३
* भारताने मान्य वर्ष - १९९४
९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - वर्ष - २०००
* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षा हालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
* अमलात येण्याचे वर्ष - २००३
* भारताने मान्य केला - २००३
१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचा करार -वर्ष - १९९४
* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
* अमलात येण्याचे वर्ष - १९९६
* भारताने मान्य केला - १९९६
११) रोटरडँम करार - वर्ष - १९९८
* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००५
१२) स्टॉकहोम करार - वर्ष - २००१
* अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .
ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
* अमलात येण्याचे वर्ष - २००४
* भारताने मान्य केला - २००६
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, October 31, 2015
पर्यावरण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment