महत्वाची शहरे
नेपाळ :
सात वर्षे सखोल विचारविनिमय केल्यानंतर नेपाळने पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही अशा नव्या घटनेचा स्वीकार केला.
संसदेने मंजूर केलेली आणि संसदेच्या अध्यक्षांनी अधिप्रमाणित केलेली नेपाळची घटना रविवार, 20 सप्टेंबर 2015 पासून नेपाळच्या जनतेसमोर लागू होत आहे, अशी घोषणा अध्यक्ष रामबरन यादव यांनी संसदेत या कायद्याचे अनावरण करताना केली
67 वर्षांच्या संघर्षांनंतर निर्वाचित लोकप्रतिनिधींनी तयार केलेली ही पहिलीच घटना आहे
नव्या घटनेवर संसदेच्या (काँस्टिटय़ुअन्ट असेंब्ली) 601 सदस्यांपैकी 85 टक्के सदस्यांनी शिक्कामोर्तब केले असून, तीत द्विसदनी कायदानिर्मितीची (बायकॅमेरल लेजिस्लेशन) तरतूद आहे.कनिष्ठ सभागृह किंवा लोकप्रतिनिधींच्या सभागृहात 375, तर वरिष्ठ सभागृहात 60 सदस्य असतील.
नव्या घटनेचे 37 विभाग, 304 अनुच्छेद व 7 पूरक अंश आहेत.
नव्या रचनेतील सात प्रांतांना एक उच्चस्तरीय आयोग एका वर्षांच्या आत अंतिम रूप देणार आहे.
केरळ :
महिला प्रधान चित्रपट निर्मतीसाठी देशातील महिला चळवळीस सुरुवात झाली
या राज्यात फिमेल फिल्म सोसायटी या नावाने संस्थेची स्थापना केली त्या अंतर्गत महिलाप्रधान चित्रपटाना प्रोत्साहन दिले जाणार आहे
हॅंगझू :
चीनमधील हॅंगझू या शहरात 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्याचा निर्णय आशियाई ऑलिंपिक समितीच्या सदस्यांनी घेतला.
पुढील आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये इंडोनेशिया येथे होणार आहेत.
No comments:
Post a Comment