Bookmark

Bookmark this Blog

Saturday, October 31, 2015

महत्वाच्या योजना

श्या:माप्रसाद मुखर्जी "रूर्बन" योजना(एसपीएमआरएम) :

"स्मार्ट सिटी" योजनेच्या पाठोपाठ आता स्मार्ट गावे तयार करण्यासाठी व शहरांकडील स्थलांतर थांबवण्याच्या उद्देशाने देशाच्या 300 विभागांत स्मार्ट गावे निर्माण करण्याची श्याशमाप्रसाद मुखर्जी "रूर्बन‘ योजना (एसपीएमआरएम) सरकारने घोषित केली
 स्मार्ट गाव योजनेसाठी केंद्राकडून 5142 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद
 यासाठी 300 विभाग आहे त्यातील गावांची संख्या धरली तर हजारो गावे या योजनेत समाविष्ट होतील
 पहिल्या टप्प्यात 100 विभाग केले जातील. एकेका विभागात मिळून गावांची एकूण लोकसंख्या 25 ते 50 हजार व दुर्गम तसेच वाळवंटी भागात पाच ते 15 हजार अशी अट असेल
 गावांना स्मार्ट बनविण्यासाठी 15 ठळक निकष आहे ग्रामीण भारताचा आर्थिक, सामाजिक व पायाभूत सुविधा या तिन्ही बाजूंनी सर्वंकष विकास करण्यासाठी नवी योजना सरकारने घोषित केली आहे. यात पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, इंटरनेट सुविधा, तरुणांना कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणासह त्याबाबतच्या संधी, शेतमालासाठी सुलभतेने बाजारपेठ मिळवून देणे आदींचा समावेश असेल.
 ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास करणार
 गावांचा विकास करण्यासाठी राज्यांनी केंद्राकडे प्रस्ताव व संभाव्य गावांची नावे पाठवायची आहेत

गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्प :

आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी या दोन नद्यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
 हा भारर्तातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे
 नदीजोड प्रकल्पाच्या आधारे गोदावरी नदीच्या पोलावरम कालव्याच्या माध्यमातून 80 टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्यात आले.
 भविष्यात यामुळे जवळपास 17 लाख एकर जमिनीचे सिंचन होणार आहे. तसेच कृष्णा, कुर्नुल, कडप्पा,

No comments:

Post a Comment