#मॅन बुकर इंटरनॅशनल:-
'मॅन बुकर इंटरनॅशनल' पारितोषिक दर दोन वर्षांनी दिले जाते. हयात असलेल्या कोणत्याही देशातील लेखकाच्या इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या अथवा भाषांतरित झालेल्या साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. मॅन बुकर पुरस्कार ६० हजार पौंडाचा असून, इंग्रजी किंवा इंग्रजीत अनुवादित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. कुठल्याही लेखकाला हा पुरस्कार आयुष्यात एकदाच दिला जातो.हा पुरस्कार २००५ पासून सुरू झाला असून, त्यात लेखकाच्या एकाच कलाकृतीऐवजी सर्वागीण साहित्याचा विचार केला जातो.
#मॅन बुकर पुरस्कार:-
मॅन बुकर पुरस्कार प्रथम १९६९ मध्ये देण्यात आला. गेल्या वर्षीपासून तो कुठल्याही देशाच्या इंग्रजीतून लेखन करणाऱ्या साहित्यिकांसाठी खुला आहे, पण त्यासाठी ते पुस्तक ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेले असणे आवश्यक असते. पूर्वी या पुरस्कारात ब्रिटन व राष्ट्रकुल देश, आर्यलड व झिम्बाब्वे यांनाच सहभागी होता येत असे.
#सध्याचे विजेते:-
• मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार:- हंगेरीचे लेखक लास्लो क्रस्नाहोर्काइ
• मॅन बुकर पुरस्कार:- जमैकामधील लेखक मार्लन जेम्स (ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ सेवन किलिंग्स)
No comments:
Post a Comment