Bookmark

Bookmark this Blog

Saturday, October 31, 2015

चालु घडामोडी ४८

⚪24 ऑक्टोबर् 2015⚪

हा या वर्षातील २९७ वा (लीप वर्षातील २९८ वा) दिवस आहे.

��जागतिक पोलिओ निर्मूलन
�� दिनजागतिक माहिती विकास दिन : (World Development of Information Day)

��महत्त्वाच्या घटना:

��२०००:थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. 
६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
��१९९७:सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
��१९८४:भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
��१९७२:दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
��१९६४:उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
��१९६३:देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
��१९४५:संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
��१९०९:स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
��१६०५:मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.

��जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:��

��१९२६ : केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (मृत्यू: ३ आक्टोबर २०१२) 
��१९२१ : रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण ��(२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५) 
��१९१४ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२) 
��१९१० : ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????) 
��१८६८ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
��१७७५ : बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू:७ नोव्हेंबर १८६२) 
��१६३२ : अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

��मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:��

��२०१३ : प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (जन्म: १ मे १९१९) 
��१९९५ :माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????) 
��१९९२ : अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
��१९९१ : इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (जन्म: १५ ऑगस्ट१९१५) 
��१६०१ : टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (जन्म: १४ डिसेंबर१५४६)

����������������
   ��महाराष्ट्र एडमिन पैनल��
����������������

No comments:

Post a Comment