Bookmark

Bookmark this Blog

Saturday, September 12, 2015

चालु घडामोडी ४०

��चालू घडामोडी (9 सप्टेंबर 2015) :

��स्विस सरकारने एका नव्या भारतीय कंपनीचे नाव केले जाहीर :

परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून स्विस सरकारने मंगळवारी एका नव्या भारतीय कंपनीचे नाव जाहीर केले.

इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने केली असल्याचे स्विस अधिकाऱ्यांनी सांगितले.

निओ कॉर्प ही 1985 मध्ये छोटी कंपनी सुरू करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा दावा केला जात आहे.

कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.

भारत आणि स्वित्र्झलडमध्ये प्रशासकीय सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे.

स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने आले आहे.

��महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ यांनी केला :

अर्ध्याहून अधिक जगावर ज्या राजसत्तेचे राज्य होते आणि ज्या राजाच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नसे अशा सत्तेमध्ये 63 वर्षे महाराणी पदावर राहण्याचा विक्रम राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी केला आहे.

वयाच्या 25व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ या आता 89 वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असेही रेकॉर्ड त्यांनी बनविले आहे.

आज त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन 63 वर्षे पूर्ण होत आहेत.

या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांना लहानपणी लिलिबेट अशा नावाने हाक मारली जाई.

राणीपदावर असताना त्यांनी विविध देशांना भेटी दिल्या आहेत.

आजवर 116 देशांना 265 भेटी देण्याचा त्यांचा विक्रम आहे.

अमेरिकेच्या गेल्या 13 राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी 12 राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे.

��गगन नारंग आशियाई नेमबाजी क्रमवारीत अव्वल :

भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने 50 मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने 50 मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.

नारंगने लंडन येथे 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते.

फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने 626.3 गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत 185.8 गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.

32 वर्षीय नारंगचे आता 971 गुण झाले आहेत.

चीनच्या शेंगबो झाओने 896 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.

तरपिस्तूल विभागात जितूने 1929 गुण मिळविले आहेत.

दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे.

गुरप्रित सिंगने 25 मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.

��व्हिलर बेटाचे आता कलाम बेट म्हणून नामांतराची घोषणा :

क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले जाणारे व्हिलर बेटाचे (Wheeler Island) आता कलाम बेट (A P J Abdul Kalam Island)  म्हणून नामांतराची अधिकृत घोषणा ओडिशा सरकारने केली आहे.

देशातील तरुणाईला हे बेट आपली शक्ती विकासकामासाठी वापरण्याकरिता सतत प्रेरणा देईल.

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांच्या कार्यकाळात 1993 मध्ये सरकारने व्हिलर बेट डीआरडीओच्या ताब्यात दिले.

कलाम यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने या बेटावर देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरु केल्या.

ऑगस्ट महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मेघालय येथे निधन झाले होते.

कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण कलाम रोड असे करण्याच्या निर्णय स्थानिक पालिकेने घेतला.

या नामांतरानंतर आता व्हिलर बेटाचे कलाम बेट असे नामांतर करण्यात आले आहे.

��मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग :

प्रवासी वाहतुकीसाठी बुक केल्या जाणाऱ्या वाहनांप्रमाणेच आता मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग करता यावे यासाठी www.sastabhada.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

या संकेतस्थळावर मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूक धारकांची नोंद करण्यात येणार आहे. 

इंब्युलीयन्स इन्फोवेब कंपनीच्या मदतीने www.sastabhada.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

सस्ताभाडा या संकेतस्थळावरून ट्रक किवा टेम्पो बुक केल्यास गाडीच्या मालकासह वाहन बुक करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होणाच्या विश्वास संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी व्यक केला आहे.

इंब्युलीयन्स इन्फोवेब प्रायवेट लिमिटेडने यासाठी एक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे.

या प्रणाली मुळे कोणतीही जीपीएस प्रणालीचा वापर न करता किवा वाहकाकडे कोणतेही साधन न देताही वाहने ट्रॅक होऊ शकतात.

सध्या ही कंपनी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत आहे.

��कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची 'ट्राय'ची सूचना :

मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर 'ट्राय'ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर 28 सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला 'ट्राय' दंड आकारते.

एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे 'ट्राय'चे म्हणणे आहे.

'ट्राय'ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये.

मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.

��फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत 155 व्या स्थानावर :

फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत 155 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची 156 व्या स्थानावर घसरण झाली होती.

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे.

बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे

��दिनविशेष :

1948 : उत्तर कोरिया प्रजासत्ताक दिन

1991 : ताजिकिस्तान स्वातंत्र्य दिन

1776 : अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.

1991 : ताजिकिस्तानला सोविएत संघराज्यापासून स्वातंत्र्य मिळाले.
��������������������

भारताचा भुगोल

भारताचा भूगोल - जर आपण राज्यसेवा व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असाल तर हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. भारताचा प्राकृतिक विभाग अभ्यासताना हिमालय, हिमालयाच्या डोंगररांगा त्यांची विभागणी, हिमालय पर्वतातील महत्त्वाच्या िखडी, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, त्यावरील निरनिराळे प्रकल्प, मदानी प्रदेश, त्यांचे वितरण, भारताचा पठारी प्रदेश, पठारावरील निरनिराळ्या डोंगररांगा, पूर्वघाट, पश्चिम घाट, अंदमान, निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांचा अभ्यास करावा. भारताच्या हवामानाचा अभ्यास करताना भारतीय मान्सून, त्याचा उदय, पावसाचे वितरण, भारतीय हवामानावर एल् निनो ला-निना यांचा प्रभाव, अवर्षण पूर यांचा अभ्यास करावा.भारतीय सामाजिक व आíथक भूगोलाचा अभ्यासात २००१ व २०११ च्या जणगणनेचा तुलनात्मक अभ्यास, भारतीय लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाल मृत्युदर, माता मृत्युदर या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. त्याच प्रमाणे भारतातील नागरीकरण, नागरीकरणाच्या समस्या, झोपडपट्टींचा प्रश्न, केंद्र सरकार-राज्य सरकार यांनी या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाययोजना यांचा अभ्यास करावा. भारतात आíथक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती,उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, वाहतूकव्यवस्था यांचा अभ्यास करावा. अभ्यास करताना नकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.जगाचा भूगोल - या वर्षांपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षेत हा अभ्यासक्रम नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जगाचा भूगोल अभ्यासताना सर्वप्रथम नकाशावरील महत्त्वाचे भाग मार्क करून त्याचा अभ्यास करावा. उदा. निरनिराळ्या देशातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, महत्त्वाची सरोवरेइ. नंतर जगाचा अभ्यास. खंडाप्रमाणे केल्यास जास्त सोपा होतो. उदा. अमेरिकेचा अभ्यास करताना दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका यांतील पर्वतश्रेणी, नदीप्रणाली, विविध सरोवरे, त्यांचा दक्षिण उत्तर क्रम, खनिज संपत्ती, निरनिराळे प्रकल्प, महत्त्वाची शहरे असा अभ्यास करावा.यूपीएससीच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे याघटकावर साधारणत: प्रश्न नकाशावर विचारले जातात. म्हणून एक चांगला नकाशा घेऊन त्याचा अभ्यास केल्यास अवघड प्रश्नांची उत्तरे देणे सोपे होते. याशिवाय जगातील शेतीप्रणाली, उद्योगधंदे, जंगल, मासेमारी, खनिज संपत्ती यांचे तक्ते बनवावेत.भूगोलाचा अभ्यास करताना फक्त भूगोलाचाच अभ्यास होत नाही तर सामान्य अध्ययनातील चालू घडामोडींचाही अभ्यास होत असतो. म्हणून या घटकाचा अभ्यास करताना पुढील संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा.१) महाराष्ट्राचा भूगोल - ए.बी.सवदी२) भारताचा भूगोल - ए.बी.सवदीभारताचा भूगोल (इंग्रजीत) माजिद हुसेन३) जगाचा भूगोल - जिओग्राफी थ्रु मॅप्स् - के. सिद्धार्थ४) महाराष्ट्र बोर्डाची सहावी ते दहावीपर्यंत भूगोलाची पुस्तके५) यूपीएसीसाठी पाचवी ते दहावीपर्यंतची सी.बी.एस.सी. बोर्डाची पुस्तके तसेचइंडिया इयर बुक जे अद्याप बाजारपेठेत यायचे आहे. (भारत सरकारचे) ते मात्र यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नक्की वाचावे,त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक वाचणे आवश्यकच आहे.

®महत्त्वाचे मुद्दे -

१)    २००१च्या जनगणनेनुसार राज्यात दर हजार पुरुषांच्यामागे ९२५ स्त्रिया आहे. हे प्रमाण २००१ साली ९२२ स्त्रिया असे होते.

२)    २०११ च्या जनगणनेनुसार ५४.७७ % लोकसंख्या ग्रामीण भागात तर ४५.२३% लोकसंख्या नागरी भागात राहते.तर सन २००१च्या जणगणनेनुसार राज्यात ग्रामीण लोकसंख्या ५७.६०% तर शहरी लोकसंख्या ४२.४० % इतकी होती.

३)    भारताच्या एकूण क्षेत्रफळापकी ९.३६ % भाग म्हणजे एक दशांश हिस्सा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. महाराष्ट्राला ७२० कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. देशातील एकूण समुद्र किनाऱ्यापकी ९.५८ % एवढा हिस्सा महाराष्ट्राला आला आहे.

४)    देशातील रेगूर मृदेचा सर्वात मोठा साठा हा महाराष्ट्रात आहे.

५)    आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून सह्याद्री पर्वतात आहे. तर तोरण माळ हे नंदुरबार जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगररांगेत स्थित आहे.

६)    चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे.

७)    मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे.

८)    कृष्णेच्या खोऱ्यात बॉक्साइट हे खनिज सापडते.

९)    वर्धा व वैनगंगा यांचा संगम शिवने येथे झाला आहे.

१०)    उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे.

११) प्राकृतिक रचना ही महाराष्ट्रातील पर्जन्यावर परिणाम करणारे सर्वात मोठे घटक आहे.

१२)    महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान हे चंद्रपूर या ठिकाणी आढळून येते.

१३)    महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात जांभी मृदा आढळते.

१४)    ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळून येते

१५)    महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात.

१६)    अकोला जिल्ह्यातील महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पारस या ठिकाणी आहे.

१७)    िठबक सिंचनामुळे ३० ते ६० % पाण्याची बचत होऊन त्यामुळे २५ ते ४० % अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते.

१८)    महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विहिरी अहमदनगर व त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात आहे. मात्र घनतेचा विचार करता सांगली व सोलापूर जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.

१९)    नाशिक जिल्ह्यात ठिबक सिंचनात अधिक प्रगती झालेली आढळून येते.

२०)    कोयना प्रकल्पअंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर हे नाव देण्यात आले आहे.

२१)    मेरीनो जातीच्या मेंढय़ा या लोकरीसाठी उत्तम असतात.

२२)    सांगली जिल्ह्यातील जत हे ठिकाण खिलार बलांचे पदास केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

२३)    महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत.

२४) महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर येथे आहे.

२५)    महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी इचलकरंजी येथे आहे.

२६)    हर्णे हे बंदर रत्नागिरी जिल्ह्यात आहे.

२७) कोकण रेल्वेचा सर्वात लांब पुल शरावती नदीवर आहे.

२८)    न्हावाशेवा हे महाराष्ट्रातील संपूर्ण संगणकीकृत बंदर आहे.

२९)    महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली जिल्ह्यात आहे.

३०)    महाराष्ट्रात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुला-मुलींमधील प्रमाण हजारपुरुषांमागे ८८३ स्त्रिया असे आहेत.

३१)    पितळ खोरे लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत.

३२)    नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.

३३)    महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिक येथे आहे.

३४)    १ मे १९७८ रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली.

३५)    बाबा आमटे यांनी अपंग व कुष्ठरोगी यांच्यासाठी चालवलेले केंद्र हेमलकसा असून हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात आहे.

३६)    गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे.

३७)    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोळसाच्या खाणी व औष्णिक विद्युत केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

३८)    चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाली येथे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे.

३९)    भोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र वर्धा जिल्ह्यात आहे.

४०)    ऊनकेश्वर, यवतमाळ या जिल्ह्य़ात गरम पाण्याचे झरे आढळतात.

४१)    लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

४२)    अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन १ जुल १९९८ रोजी वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली.

४३)    संत तुकडोजी महाराजांची समाधी तसेच संत तुकडोजी महाराजांचे गुरुकुंज मोजरी अमरावती या जिल्ह्यात आहे.

४४)    अमरावती जिल्ह्यातील डोंगराळ भागात तिखाडी नावाचे गवत आढळते या गवतापासून रोसा हे तेल बनवले जाते.

४५)    औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचे मंदिर असून हे ठिकाण िहगोली जिल्ह्यात आहे.

४६)    १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन िहगोली जिल्ह्याची निर्मिती झाली.

४७)    िहगोली जिल्ह्यातील वनांमध्ये सुगंधी व औषधी तेल आढळते.

४८)    हेमांडपती शिल्पाचा नमुना असलेले तुळजाभवानीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

४९)    औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना जिल्ह्याची निर्मिती झाली.

५०)    जाम हे ठिकाण समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान आहे.

५१)    औरंगाबाद जिल्ह्यातील पठण तालुक्यात आपेगाव हे ठिकाण संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आहे.

५२)    संत एकनाथ महाराजांची समाधी पठण येथे आहे.

५३)    जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी औरंगाबाद या ठिकाणी आहे.

५४) एक जुल १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.

५५)    नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे म्हणून याला आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

५६)    नंदुरबार या ठिकाणी तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे.

५७)    फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे ठिकाण जळगाव भुसावळ जवळ आहे.

५८)    प्रवरा नदीच्या काठी दायमाबाद या ठिकाणी ताम्रपाषाण काळातील काही अवशेष सापडतात.

५९)    महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

६०)    गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा मठ असून हे कोल्हापूर येथे आहे.

मागील तलाठी परीक्षेचा पेपर

तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच (भाग - 1)

विषय : गणित (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

1. एका वर्षी जागतिक कामगार दिन बुधवारी आला तर त्यावर्षीचा नाताळ कोणत्या वारी आला असेल ?

बुधवार        गुरुवार         शुक्रवार         यापैकी नाही

उत्तर: बुधवार   
  
2. दुपारी २ वाजून ४० मिनिटे झाली असताना घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल?

170         160          150          यापैकी नाही

उत्तर: 2. 160

3. 12(390) 8;7 (134) ;11(....?....)6.

279        239        229        यापैकी नाही

उत्तर: 3. 279  
 
4. Z = 52 आणि ACT = 48, तर BAT =.....?.....

42         44         46        यापैकी नाही

उत्तर: 3. 46

5. जर "BICYLE" हा शब्द "C3DZDM2 " असा लिहिला , तर "LABOUR " हा शब्द कसा लिहाल ?

MIC4VS         MBCP5S         MI3C4S         यापैकी नाही

उत्तर: 4. यापैकी नाही

6. 2,6,25,96,285,568,.......?........

782         1076         567       यापैकी नाही

उत्तर: 3. 567

7. 14,183,62,143,94,......?

123        119       132        यापैकी नाही

उत्तर: 2. 119

8. 8 EF 17 GH :: ........?  .......... : 25  MN

17 LK         17 KL         17 OP         यापैकी नाही

उत्तर: 4. यापैकी नाही

9. PAIR : 2161423 :: CAT : .......?......

8625       82725         9726            यापैकी नाही

उत्तर: 1. 8625

10. GHI, XYZ,JKL, .........? MNO,RST.

PQR         ABC         UVW        यापैकी नाही

उत्तर: 3. UVW

11. "A" आणि "B "  हे दोघे भाऊ आहेत . "C " आणि "D" बहिणी आहेत . "A" चा मुलगा "D " चा भाऊ आहे. तर 'B' चे "C "  बरोबर नाते काय ?

काका             पुतण्या         भाऊ         यापैकी नाही

उत्तर: 1. काका

12. 20: 30::.....?.....:56

36         44            42        यापैकी नाही

उत्तर: 3. 42

13. एका सांकेतिक भाषेत WATER हा शब्द DZGVI असा लिहतात , तर त्याच भाषेत PEN हा शब्द कसा  लिहाल ?

MVK         KMV         KVM       यापैकी नाही

उत्तर: 3. KVM 

14. 6(15)3;2(3)1;4(?)6
10    
11        
18         
यापैकी नाही

उत्तर: 1.10

15. 25,32,43,56,73,.......?

89    92       101        यापैकी नाही

उत्तर: 2. 92

16. 25 %-(25%25%) =
0.1875       
0.2715        
0.1525        
यापैकी नाही
उत्तर: 1. 0.1875   

विषय : मराठी (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

अमरावती  तलाठी भरती लेखी परीक्षा मराठी  प्रश्नसंच -2013
1. 'आम्हा मुलांना कोण विचारतो ? या वाक्यातील विशेषनाचा प्रकार सांगा .

दर्शक विशेषण         प्रश्नार्थक विशेषण         सर्वनामिक विशेषण     यापैकी नाही

उत्तर: 3. सर्वनामिक विशेषण 

2. 'मी नककीच क्रिकेट शिकेन.' या वाक्यातील अर्थ कोणता ?

आज्ञार्थ         विध्यर्थ         संकेतार्थ         यापैकी नाही  

उत्तर: 4. यापैकी नाही  

3. 'चूक' या शब्दाचे अनेकवचन रूप सांगा .

चूका      चुकी         चूक     यापैकी नाही  

उत्तर: 3. चूका

4. 'हरी' या नामाचा प्रकार ओळखा .

विशेषणाम         सामान्यनाम         धातुसाधित नाम         यापैकी नाही

उत्तर: 1. विशेषणाम

5. 'खोंड' या शब्दाचे  लिंग कोणते ?

नपुसकलिंग         स्त्रीलिंग         पुल्लिंग         यापैकी नाही

उत्तर: 3. पुल्लिंग 

6. 'दंगामस्ती' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?

फारशी + मराठी             मराठी + फारसी         फारसी + फारशी          यापैकी नाही

उत्तर: 2. मराठी + फारसी  

7. 'सारखा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

तुलना वाचक         योग्यतावाचक        संबंध वाचक         यापैकी नाही  

उत्तर: 2. योग्यतावाचक 

8. 'म्हणून' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?

स्वरूपबोधक           न्यूनत्वबोधक         विकल्प बोधक         यापैकी नाही

उत्तर: 1. स्वरूपबोधक 

9. 'नोकरीस' यातील विभक्तीचा प्रकार कोणता ?

तृतीया         चतुर्थी           सप्तमी         यापैकी नाही

उत्तर: 2. चतुर्थी 

10. 'तू गाणे गातोस.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

कर्तरी   कर्मणी         भावे         यापैकी नाही

उत्तर: 5. कर्तरी

11. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा .

बही : + अंग = बहिरंग             तेजस + कण  = तेज : कणसम + गती = संमती              यापैकी नाही

उत्तर: 3. सम + गती = संमती 

12. 'गरीब' या शब्दाचे सामान्यरूप कोणते ?

गरीबी         गरिबास         गरिबाने         यापैकी नाही   

उत्तर: 4. यापैकी नाही   

13. 'दलाल' हा शब्द कोणत्या भाषेतून  मराठी भाषेत आला आहे ?

कानडी         हिन्दी         फारशी      यापैकी नाही

उत्तर: 3. फारशी 

14. 'आज वेळ मिळाला तर मी गाणे शिकेन.' ह्या वाक्याचा प्रकार कोणता ?

मिश्र वाक्य  संयुक्त वाक्य   (केवल  = मिश्र ) वाक्य     यापैकी नाही

उत्तर: 1. मिश्र वाक्य 

15. 'ही मूर्ती खूप सुंदर आहे . ' या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा.

किती सुंदर मूर्ती आहे ही !             वा ! खूप सुंदर मूर्ती आहे ही !कोण सुंदर मूर्ती आहे ही !             यापैकी नाही

उत्तर: 1. किती सुंदर मूर्ती आहे ही ! 

16. 'पाच मुखी परमेश्वर' या म्हणीचा समर्पक अर्थ काय ?

कोठेही गेले तरी स्वभाव सारखाच         पंच म्हणतील तो निर्णयसर्वत्र परिस्थिति एकसारखी असते         यापैकी नाही 

उत्तर: 4. यापैकी नाही 

17. 'कृपण' या शब्दाचा  विरुद्ध अर्थी शब्द कोणता ?

कृतघ्न         उदार        अवकृपा         यापैकी नाही

उत्तर: 2. उदार  

18. 'मुलाहिजा बाळगणे'  या  वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

पर्वा  करणे         सांभाळ करणे         द्वेष असणे         यापैकी नाही

उत्तर: 1. पर्वा  करणे   

19. खालीलपैकी शुद्ध शब्द  कोणता ?

विनंती         उर्मी         ऊहापोह         यापैकी नाही

उत्तर: 1. विनंती 

20. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे .............

आगंतुक              हुरहुन्नरी     अष्टावधानी          यापैकी नाही

उत्तर: 3. अष्टावधानी   

*   विषय :  इंग्रजी (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

1. From Noun from the word "Defy "

a) Defiance        b) Definite         c) Defiable         d) None of these

Ans: 1. Defiance 

2.  The servant brought the water in a -------------

a) Pale             b) Pail        c) Peal             d) None of these

Ans: 1. Pail 

3. " He sang songs."  Change this sentence into Passive Voice.

Songs are sung by him         Songs has sung by himSongs had been sung by him             None of these

Ans: 4. None of these

4. A city that is set on ------- hill cannot be hid. use suitable artical in the blank.

the             a           an             None of these

Ans: 2. a

5. " I am right " Add a question tag.

I am right, isn't I ?           I am right, am I ?I am right, aren't I ?               None of these

Ans: 3.  I am right, aren't I ?   

6. They ----- the bridge  for several months.

have been building  buildwill build         None of these

Ans: 1. have been building  

7. He ------always grumbling.

has            had             was        None of these

Ans: 3. was

8. " I am giad that you are successful ".

Complex        Simple         Compound          None of these

Ans: 1. Complex   

11. What is the meanings of "Set Out " ?

to establish         to depart     to begin         None of these

Ans: 2. to depart     

12. What is the synonym of the word " Ingenious."?

Sincere         Generous         Inventive       None of these

Ans: 3. Inventive   

13. Neeru is at sea  in Economics.  what is the meaning of Underlined words ?

Perfect        Deficient       Clevere         None of these

Ans: 2. Deficient    

14. The house was made ------- chocolate.

of          by            with             None of these

Ans: 1. of

15. "It is a great shot." Make this sentence Exclamatory.

Oh ! a great                How great shot it is !What a shot !              None of these

Ans: 3. What a shot !

16. This is the ------ the two books on tis subject.

better of                   best of        good of                 None of these

Ans: 1. better of

17. Which of the following is correct sentence ?

sign on this paper                 Fear from GodI asked a ticket                 None of these

Ans: 4. None of these

18. Crow- " Caws " : tiger - " Roars"; Bull "------"

Bellows       Barks         Bells             None of these

Ans: 1. Bellows

19. A remedy which never fails is " --------"

Reticent          Infallible      Alimony        None of these

Ans: 2. Infallible    

20. " Get me some tea Plase ! Find  the expression from the following ?

Requaest       Order         Instruction         None of these

Ans: 1. Requaest    

#विषय : सामान्य ज्ञान (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

1.  " ......." ही वनस्पती अपुष्प वनस्पती आहे.

गुलबक्षी         धोतरा         नेचे       यापैकी नाही

उत्तर: 3. नेचे  

3. २०१३ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार ........... यांना मिळाला .

प्राण         यश चोप्रा         गुलजार        यापैकी नाही

उत्तर: 3. गुलजार 

4. "लाँग वॉक टु फ्रीडम" हे आत्मचरित्र कोणाचे ?

नेल्सन मंडेला             लॉर्ड माऊंटबॅटनबॅ. महम्मद अली जींना         यापैकी नाही

उत्तर: 1. नेल्सन मंडेला

5. "गगन नारंग" हे व्यक्तिमत्व कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

गोल्फ         टेबल टेनिस         नेमबाजी       यापैकी नाही

उत्तर: 3. नेमबाजी  

6. खालीलपैकी कोणत्या धातुला " राजधातू " म्हणतात ?

प्लॅटिनम      पारा         टंगस्टन             यापैकी नाही

उत्तर: 1. प्लॅटिनम    

7. भारतात एकूण  ........... उच्च न्यायालये आहेत.

१८    १९    २१       यापैकी नाही

उत्तर: 3. २१  

8. महाराष्ट्र विधानपरिषदेत .......... सदस्य राज्यपालांकडून नियुक्त केले जातात .

एक तृतीयांश         एक षष्ठाश       एक बारांश          यापैकी नाही

उत्तर: 2. एक षष्ठाश  

9. "अॅडम स्मिथ" हे व्यक्तिमत्व  कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे ?

अर्थशास्त्र        राज्यशास्त्र         तत्वज्ञान             यापैकी नाही

उत्तर: 1. अर्थशास्त्र 

10. "RBI" ची स्थापना  कधी करण्यात आली ?

१९३५      १९४९         १९२१     यापैकी नाही

उत्तर: 1. १९३५ 

11. "काकोरी" कटाशी  संबधित क्रांतिकारक कोण ?

सूर्यसेन         लाला हरदयाळ          रामप्रसाद बिस्मिल     यापैकी नाही

उत्तर: 3. रामप्रसाद बिस्मिल

12. "प्रार्थना समाजाची" स्थापना कोणी केली ?

जगन्नाथ शंकरशेठ         भाऊ दाजी लाड         आत्माराम पांडुरंग         यापैकी नाही

उत्तर: 3. आत्माराम पांडुरंग   

13. " .........." राज्यातील फैजपूर येथे १९३६ साली राष्ट्रीय ' सभेचे पहिले ग्रामीण अधिवेशन 'भरले होते .

उत्तर प्रदेश         महाराष्ट्र         बिहार         यापैकी नाही

उत्तर: 2. महाराष्ट्र    

14. "DYNE"  हे  कशाचे एकक आहे ?

कार्य         बल        दाब         यापैकी नाही

उत्तर: 2.  बल   

15. " .............." हा उपयोग कार्बनडाय ओक्साइड या वायुचा  नाही .

शितपेये निर्मिती         शुष्क बर्फ बनवणे             खाण्याच्या सोडयात वापर     यापैकी नाही

उत्तर: 4. यापैकी नाही

18. "कान्हा राष्ट्रीय उद्यान" कोणत्या राज्यात आहे ?

राजस्थान         आसाम         मध्यप्रदेश      यापैकी नाही

उत्तर: 3. मध्यप्रदेश   

19. खालीलपैकी कोणते सरोवर गोडया पाण्याचे आहे ?

पुलिकत     चिल्का         कोलेरू         यापैकी नाही

उत्तर: 4. यापैकी नाही

20. "कोरबा" औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

मध्यप्रदेश         ओरिसा         छत्तीसगड       यापैकी नाही

उत्तर: 3.  छत्तीसगड    
_____________________________________

तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच (भाग - 2)

विषय : सामान्य ज्ञान (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

1. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता ?

पं.  जवाहरलाल नेहरू     बे . महमद आली जींना       वल्लभ भाई पटेल         आचार्य कृपालांनी

उत्तर : 2. बे . महमद आली जींना   

2. "घटनेतील 'कलम 51 अ'  अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे  हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य  ठरते "

संपूर्णत : चुकीचे आहे       पूर्णत : बरोबर आहेवस्तुस्थितीशी सुसंगत नाही         अंशाट : बरोबर आहे

उत्तर : 1.संपूर्णत : चुकीचे आहे

3. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?

लोकसभा सदस्य         राज्यसभा सदस्य         विधानसभा सदस्यविधानपरिषद सदस्य

उत्तर : 3.विधानपरिषद सदस्य

4. ............ घटनादुरुस्तिनुसार  भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

सव्विसाव्या     बेचाळीसाव्या       चव्वेचाळीसाव्या     शहात्त्राव्या

उत्तर : 2.बेचाळीसाव्या        

5. खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार 'भारतरत्न' व 'पद्म' सन्मान प्रदान केले जातात ?

कलम 18  कलम 11         कलम 32         कलम 13

उत्तर : 1.कलम 18

6. खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ?

नगरपालिका         महानगरपालिकाकटक मंडळ         राज्य परिवहन महामंडळ

उत्तर :4.राज्य परिवहन महामंडळ

7. 'जिल्हाधिकारी' हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ............ समितीने केली होती .

बळवंतराय मेहता        अशोक मेहता         ल.ना. बोंगीरवार     वसंतराव नाईक

उत्तर : 1.बळवंतराय मेहता

8. ग्राम पंचायतीना आपल्या आपल्या मालकीची संपती भाडे (लीज) तत्वावर द्यावयाची झाल्यास त्याकरिता त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते ?

जिल्हाधिकारी         मुख्य कार्यकारी अधिकारीविभागीय आयुक्त         ग्रामविकास मंत्री

उत्तर : 2.मुख्य कार्यकारी अधिकारी

9.'महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961' अन्वये सामन्यत:  .......... खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे .

25         50        75        100

उत्तर : 4. 100

10.'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो ?

रातांधळेपणाबेरीबेरीस्कर्वीमुडदुस

उत्तर : 1.रातांधळेपणा

विषय : गणित (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

1. एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण दहा खेळाडूंनी भाग घेतला होता, प्रतेकशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले ?

36    45       20        100

उत्तर : 1. 45  

2. 21 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संकयांच्या बेरजेतील फरक किती ?

130         125         55         5 *

उत्तर :4. 5

3. पाच अंकी मोठ्यात मोती सम व चार अंकी लहनात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकाची बेरीज पुढीलपैकी कोणती  ?

44        43    42  41

उत्तर :3. 42  

4. 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात. तर एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करील ?

19    38        289        361

उत्तर : 4. 361

5. प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 या प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते, तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती ?

50       56        52        54    

उत्तर : 1. 50  

6. 548*2 या संख्येला 12 ने नि : शेष भाग जातो , तर * च्या जागी

1        3        5      7

उत्तर :3. 5 

7. पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 36 आहे. तर त्यापैकि  सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे ?

5/4        3/4        4/5       4/3

उत्तर : 3. 4/5

8. सचिनच्या सलग पाच डावातील धावा अनुक्रमे 80,90,100व m आहेत. जर त्या पाच डावाची त्याची सरासरी धावसंख्या 100 असेल , तर त्याने पहिल्या डावपेक्षा शेवटच्या डावात किती अधिक धावा काढल्या ?

50       20        130        10

उत्तर : 1. 50

9. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा . की जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 18 ने भागल्यास बाकी 11 उरते व 24 ने भागल्यास बाकी 17 उरते ?

137    65   203        10

उत्तर : 2. 65

10.ताशी 60 किमी वेगाने जाणार्या 480 मीटर लांबीच्या  मालगाडीस 420 मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ?

1 मी.4 से.         54 से.        1 मी. 12 से.         45 से.

उत्तर : 2.54 से.

11. मुंबई ते अमरावती हे 750 किमी अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वा. परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किमी व ताशी 70 किमी असल्यास , दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?

स. 11 वा.         स.11.30     दू. 12.30 वा.         दू. 12 वा.

उत्तर : 4. दू. 12 वा.

12. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास, रोज किती तास काम करावे लागेल ?

5    6        7      8      

उत्तर : 3. 7

13 'अ','ब','क' हे तिचे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर 'क' ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. तर 'अ' तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल ?

30    20    25    24

उत्तर : 4. 24

14. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या 2/3 केली, तर आणखी लोतो माणसे कामावर घ्यावी लागतील ?

42         7        14       28

उत्तर : 3. 14

15. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते . तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

4    8  6    5

उत्तर :2. 8

16. 12 % अल्कोहोल असलेल्या 40 लीटर द्रावणात किती लीटर पाणी ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 8 % होईल ?

60 ली.         30ली.         20 ली.        40 ली.

उत्तर : 3. 20 ली.

17. 12:X : 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर X = किती ?

24        21        18       14

उत्तर : 3. 18   

18. 10 वर्षांपूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 7 होते , परंतु 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 2 होईल , तर वडिलांचे आजचे वय किती ?

24 वर्षे         38 वर्षे           36 वर्षे             28 वर्षे

उत्तर : 2. 38 वर्षे

19. एका गावात मराठी जाणणारे 82 % हिंदी  जाणणारे 76 % लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2,244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8 % लोक असल्यास  त्या गावाची लोकसंख्या किती ?

6,800         5,100         3,400 *         यापैकी नाही 

उत्तर : 3. 3,400 

20. चहा पावडरचा भाव 25 % ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?

25 %         20 %       30 %         2.15%

उत्तर : 2. 20 %

21. वसंतने एक घड्याळ 15 % नफ्याने विकले. जर त्याने ते घड्याळ 8 % नफ्याने विकले असते तर त्याला 42 रुपये कमी मिळाले असते, तर त्या घड्याळाची खरेदीची  किंमत किती ?

700 रु.         800 रु.         500 रु.         600 रु.

उत्तर :4. 600 रु.

 22. एका दोन अंकी संखेतील अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान आहे,  तर मूळ संख्या कोणती ?

74         29         83         92

उत्तर :4. 92

23. दोन संख्यांचा गुणाकार 384 असून त्यांचा भागाकर 6 आहे. तर त्यापैकि लहान संख्या कोणती ?

48         8        24         12

उत्तर : 2.8

24. एक समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 चौ.कि.मी.  आहे, तर त्यांच्या कर्णाची लांबी किती ?

6 >2        6        12       6>3

उत्तर : 3.12

25. एका माकड 15 मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मी. चढते व दुसर्या मिनिटाला 3 मी. खाली घसरते , असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल ?

6         10     15     11

उत्तर : 4.11

विषय : मराठी (तलाठी परीक्षेतील प्रश्नसंच)

1. खालीलपैकी कोणती स्वरसंधी नाही ? कशाप्रकारे होईल ?

मन्वंतर         सूर्यास्त          उमेश             मतैक्य

उत्तर : 2.सूर्यास्त

2.  'शब्दच्छल' या संधीची फोड कशाप्रकारे होईल ?

शब्द + छल       शब्द + चल             शब्द + सल         शब्द + च्छल

उत्तर : 1.शब्द + छल    

3. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची  जात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत.

भाववाचक नाम         सामान्य नाम           विशेषण         विशेषनाम

उत्तर :2. सामान्य नाम            

4. भाववाचक नाम ओळखा .

फुशारकी       शहराणी  मुले             थोडी फळे         बोलका पत्थर

उत्तर : 1.फुशारकी     

5. 'प्रामाणिकपणा' हे ...........आहे.

विशेषनाम         सामान्यनाम             क्रियापद         भाववाचक नाम*

उत्तर : 4.भाववाचक नाम

6. 'बेडूक' या शब्दाचे स्त्रीलिंग रूप -

बेडूक             बेडकी             बेडकीन         बेडके

उत्तर :2.बेडकी  

7. पुढीलपैकी कोणता शब्द नपूसंकलिंग नाही ?

पुस्तक         चित्र                 मंगळसूत्र         शाळा

उत्तर :4. शाळा

8. मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा ?

चतुर्थी             पंचमी                 षष्ठी           सप्तमी

उत्तर : 3.षष्ठी

9. खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांची विभक्तीचा प्रकार शोधा.  मुलांनो, ही वाक्य दहा मिनिटात लिहा.

द्वितीय         सप्तमी          पंचमी             संबोधन

उत्तर :2. सप्तमी

10. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
'जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल'

दर्शक सर्वनाम         संबंची सर्वनाम        अनिश्चित सर्वनाम         प्रश्नार्थक सर्वनाम

उत्तर :2.संबंची सर्वनाम      

11. सर्वनाम हे ........

पदार्थाचे नाव सांगते                 नामाबद्दल विशेष माहिती सांगतोक्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते         नामाच्या ऐवजी येते

उत्तर : 4.नामाच्या ऐवजी येते

12. मराठीत  लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?

तीन             चार                 तीन       पाच

उत्तर :3.तीन     

13. 'आजची पुजा चांगली झाली' या वाक्यात झालेल्या विशेषणाचे प्रकार ओळखा .

अव्ययसाधित विशेषण       विधिविशेषण            उत्तर विशेषण      नामसाधित विशेषण

उत्तर :2.विधिविशेषण            

14. खालील कोणता शब्द विशेषण नाही ?

निस्तेज         निर्धास्त         निरोप            निराश

उत्तर :3.निरोप

15. 'त्या राजाला शोभले' या वाक्यातील कर्म ओळखा.

राजाला         मुकुट            शोभतो                 त्या

उत्तर : 2.मुकुट

16. माला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

शक्य क्रियापद     प्रयोजक क्रियापद             संयुक्त क्रियापद         साधित क्रियापद

उत्तर : 1.शक्य क्रियापद

17. वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा- 'सदा सर्वदा योग तुझा घडावा'

योग         तुझा             सदासर्वदा           घडावा

उत्तर : 3.सदासर्वदा 

18. 'चमचम' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?

गतिदर्शक         स्थितिदर्शक         अनुकरणदर्शक *        प्रकारदर्शक

उत्तर : 3.अनुकरणदर्शक

19. हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना .......... असे म्हणतात .

उभयान्वयी         केवलप्रयोगी         शब्दयोगी        क्रियाविशेषण

उत्तर : 3. शब्दयोगी     

20. 'चाकूमुळे' यातील मुळे हे कोणते अव्यय आहे ?

 उभयान्वयी         केवलप्रयोगी             क्रियाविशेषण         शब्दयोगी

उत्तर : 4.शब्दयोगी

21. माझ्याकडून कॉफी घेतली गेली. या वाक्यातील प्रयोग ओळखा ?

कर्मणी प्रयोग  भावे प्रयोग         कर्तरी प्रयोग         संकीर्ण प्रयोग         

उत्तर : 1.कर्मणी प्रयोग    

22. ' भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला ' या वाक्यातील विधे कोणते ?

विश्वचषक जिंकला            भारतीय क्रिकेट संघानेक्रिकेट संघाने                 क्रिकेट संघाने विश्वचषक

उत्तर :1. विश्वचषक जिंकला      

23.खालीलपैकी  कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्वं  समासाचे  नव्हे.

खरे खोटे             चारपाच         भलेबुरे         चहापाणी

उत्तर : 4.चहापाणी

24. वेसण घालणे याचा  अर्थ ..............

वारंवार बजावून  सांगणे                 खूप दु:ख  देणेमर्यादा घालणे                    हौस पुरवणे

उत्तर : 3.मर्यादा घालणे           

25. "चोराच्या मनात चांदणे" या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा .

मन चिंति ते वैरी न चिंती             ओळखीचा चोर  जीवे न सोडीखाई त्याला खवखवे           असंगाशी संग अन प्राणाशी गाठ

उत्तर : 3.खाई त्याला खवखवे
___________________________________