Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, September 9, 2015

चालु घडामोडि ३९

चालू घडामोडी - २७ ऑगस्ट २०१५
जीसॅट-६ चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) संवाद उपग्रह ‘जीसॅट-६’चे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक जीएसएलव्ही डी-६ च्या माध्यमातून २७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.५२ मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रावरून (श्रीहरीकोटा) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
इस्रोने तयार केलेला जीसॅट-६ हा २५ वा भूस्थिर उपग्रह आहे तर जीसॅट मालिकेतील हा १२ वा उपग्रह आहे. हा उपग्रह ९ वर्षे कार्यरत राहणार आहे.
नियोजित मार्गावरून अचूक मार्गक्रमण करत 'जीएसएलव्ही'ने उपग्रहाला १७ मिनिटांत १६८ किलोमीटर बाय ३५९३९ किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित केले.
त्यानंतर तात्काळ उपग्रहावरील सौरपंखे उघडले जाऊन त्याच्याशी संपर्क प्रस्थापित झाला. यानंतर उपग्रहावर बसवण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या साह्याने 'जीसॅट ६'ला ३६ हजार किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत पाठवण्यात येईल.
इस्रोचे अध्यक्ष : ए. एस. किरणकुमार
प्रकल्पाचे संचालक : आर. उमामहेश्वरन
 ‘जीसॅट-६’ ची वैशिष्ट्ये
उपग्रहाचे वजन : २११७ किलो (११३२ किलो इंधनाचे वजन + ९८५ किलो मूळ उपग्रहाचे वजन)
वैशिष्ट्य : या उपग्रहावर सर्वात मोठा एस बँड अँटेना असून त्याचा व्यास ६ मीटर आहे.
कार्य : जीसॅट-६ हा उपग्रह एस बँड व सी बँडच्या दूरसंचार यंत्रणेसाठी वापरला जाणार आहे.
वापर : या उपग्रहाचा वापर प्रामुख्याने लष्करासाठी केला जाणार आहे.

 जीएसएलव्ही
हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे (इस्त्रो) भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. जीएसएलव्ही (जिओस्टेशनरी सॅटेलाइट लाँच व्हेईकल) प्रक्षेपकाचे हे एकूण नववे उड्डाण आहे.
स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने जीएसएलव्हीने केलेले हे दुसरे यशस्वी उड्डाण आहे. १५ एप्रिल २०१० रोजी एका अयशस्वी उड्डाणानंतर ५ जानेवारी २०१४ ला क्रायोजेनिक इंजिनच्या साह्याने केलेले उड्डाण यशस्वी झाले होते.
त्यानंतर २७ ऑगस्ट २०१५ रोजी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनासह इस्रोच्या जीएसएलव्ही डी-६ प्रक्षेपकाने जीसॅट-६ उपग्रह यशस्वीपणे कक्षेमध्ये सोडला. इस्रोच्या वतीने प्रक्षेपित करण्यात आलेला हा पंचविसावा संवाद उपग्रह आहे.
स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेला भारत हा अमेरिका, रशिया, जपान, चीन आणि फ्रान्सनंतर फक्त सहावा देश आहे.
‘जीएसएलव्ही डी-६’ची वैशिष्ट्ये
व्यास : ३.४ मीटर लांबी : ४९.१ मीटर वजन : ४१६ टन

No comments:

Post a Comment