Bookmark

Bookmark this Blog

Friday, January 15, 2016

चालु घडामोडी ७३

आजच्या‬ घडामोडी:- १४ जानेवारी २०१६
(आज दिवसभरात काय घडले त्याचा संक्षिप्त वृत्तांत)...

>>हरिद्वार: मकर संक्रांतीसह अर्ध कुंभमेळ्याला सुरुवात

>>सकाळच्या सत्रात रुपया २६ पैशांनी घसरला, १ डॉलरसाठी मोजा ६७.११ रुपये... दोन वर्षातील सर्वात मोठी घसरण.

>>भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीने आज (गुरुवार) सलग २९ वा विजय मिळवताना महिला दुहेरीचा २२ वर्षापुर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.

>>राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल पॅरिसवरून परतल्यावर होणार भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा... (टीव्ही रिपोर्ट)

>>भारत-पाकिस्तानमधील परराष्ट्र सचिवांची बैठक उद्या होणार नसल्याची सूत्रांची माहिती... (एएनआय)

>>क्रिकेट: डीआरएसचा विरोध करणारा भारत पंचांची तक्रार करू शकत नाही.... ब्रॅड हॅडिनचं वक्तव्य...

>>अफगाणिस्तान: जलालाबाद येथे पाकिस्तानच्या दूतावासाजवळ बुधवारी झालेल्या स्फोटात ७ ठार...

>>इंडोनेशिया: जकार्तामधील संयुक्त राष्ट्र कार्यालयाजवळ स्फोट...

>>जपानला भूकंपाचे धक्के... ६.७ रिक्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने उत्तर जपान हादरले...

>>दहशतवादी पाकिस्तानमधून पठाणकोटमध्ये शिरले होते... पाकिस्तानी वृत्तपत्रांची माहिती... (टीव्ही रिपोर्ट)

>>साहित्य संमेलनाच्या सजावटीसाठी थर्माकोलचा वापर करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींकडून साहित्य संमेलनाचा निषेध... स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील व संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना दिले पत्र...

नवी मुंबई: दिघा येथील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा प्रस्ताव... हायकोर्टाने सरकारला फटकारले...

>>आज पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैंद्यांना बाबा रामदेव योग शिकवणार...

>>सिक्किममध्ये भूस्खलनामध्ये एकाचा मृत्यू... राष्ट्रीय महामार्ग एनएच१० बंद... (टीव्ही रिपोर्ट)

>>अल्पबचत योजनांवरील व्याजात अर्धा टक्का कपात होणार, व्याज सरकारी रोख्यांशी निगडित ठेवणार... PPF, NSC सारख्या योजनांना फटका...

>>दिल्ली सम-विषम फॉर्म्युला विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने दिला नकार... सम-विषम फॉर्म्युला विरोधातील याचिका केवळ स्टंट असल्याचं कोर्टाचं मत...

>>पुण्यात मार्च महिन्यात होणाऱ्या १८ देशांच्या संयुक्त लष्करी सरावाच्या तयारीसाठी सर्व सहभागी देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक संपली

>>मसूद अजहरच्या अटके संदर्भात कोणतीही माहिती नाही... पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केले स्पष्ट.

>>नाशिक: वादग्रस्त घंटागाडी योजनेला स्थायी समितीकडून एक महिना मुदतवाढ... महिनाभरात प्रक्रिया राबविण्याचे आदेश..

>>मलकापूर शहरातील बसस्थानकाजवळील हॉटेल सिटी पॅलेसमध्ये बुलढाणा एसीबीची धाड... नकली नोटांप्रकरणी एकास अटक... सुमारे दोन लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त... मलकापूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल

>>सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसने गाठली सिडनी ओपनची अंतिम फेरी.

>>इंडोनेशिया: जकार्ता येथील दहशतवादी आणि पोलिसांमधील चकमक संपली... इंडोनेशियन पोलिसांची माहिती.

>>२०१६-१७ चे केंद्रीय बजेट २९ फेब्रुवारी रोजी सादर होणार...

>>वन्यजीव नियंत्रणप्रणालीचा राज्यभर विस्तार करणार: सुधीर मुनगंटीवार

>>नागपूर: बल्लारशाह वन परिक्षेत्रातील मध्यवर्ती रोपवाटीका कारवा येथे राज्यातील पहिल्या वन्यजीव नियंत्रण कक्षाचे उदघाटन

>>बांगलादेश स्वातंत्र्य युद्धातील हिरो लेफ्ट. जनरल जेएफआर जेकॉब यांना २१ तोफांची गोळी झाडून मानवंदना देण्यात आली. जेकॉब यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

>>दिघामधील अंबिका अपार्टमेंटमधील कुटुंबांना मुंबई हायकोर्टाकडून १५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा, तोपर्यंत घरे स्वत:हून खाली न केल्यास १६ फेब्रुवारीपासून पोलिस बळाचा वापर करून कारवाई करण्याचे मुंबई हायकोर्टाचे कोर्ट रिसिव्हरना निर्देश.

>>बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा ठराव साहित्य संमेलनात पारित कराः शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांची माधवी वैद्य यांना पत्र पाठवून मागणी.

>>पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने तपास समिती बनविली त्याचे स्वागत असून हल्ल्यातील दोषींना शिक्षा होईल अशी आशा आहेः विकास स्वरुप, परराष्ट्र मंत्री.

>>मुंबईः महाराष्ट्र केसरी ठरलेल्या जळगावचा विजय चौधरी यांच्या पायावर शस्त्रक्रिया. डॉ . आनंद जोशी यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया.

>>एसटीतून वाहून नेल्या जाणाऱ्या २० किलोपेक्षा जास्त वजनाच्या लगेजवर प्रती टप्पा ३० पैसे दराने भाडे आकारण्याचा महामंडळाचा निर्णय.

>>नागपूरः राज्यातील ४५ सहाय्यक निरीक्षकांच्या निरीक्षकपदी पदोन्नती देवून बदल्या.

>>पुणेः साहित्य संमेलनस्थळाला ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहेः डॉ. पी. डी. पाटील, स्वागताध्यक्ष.

>>'हॅरी पॉटर'मध्ये प्रोफेसर स्नेप साकारणारे अॅलन रिकमॅन कालवश ६९व्या वर्षी कर्करोगाने निधन.

>>आयटीएफ महिला टेनिस स्पर्धेत प्रांजला येडलापल्लीची उपांत्य फेरीत धडक तर भारताच्या अंकिता रैना, प्रेरणा भांबरी यांचे आव्हान संपुष्टात.

>>शीना बोरा हत्या प्रकरणः इंद्राणी मुखर्जीसह अन्य आरोपींची चौकशी करण्याची कोर्टाची सीबीआयला परवानगी.

>>मुंबईः के. जे. सोमय्या कॉलेजमधील इंजिनिअरच्या मुलाने तयार केलेली RIGEL फॉर्मुला स्टाईल रेस कार नोएडा बुद्ध सर्कीट आंतर्राष्ट्रीय ओरीअन रेसिंग स्पर्धेत भाग घेणार आहे. या गाडीचे इंजिन केटीएम ड्यूक ३०० अक्सलेरेशनचे आहे. ४.५ सेंकदात ही गाडी १०० KMPH च्या वेगाने धावणार आहे.

>>स्वत:च्या मृत्यूच्या अफवांना ‪#‎लोककलाकार‬ मंगला बनसोडे यांचाच पूर्णविराम. हितशत्रूंवर अफवा पसरवल्याचा आरोप, आज दिवसभर सोशल मीडियावर लोककलाकार मंगलाबनसोडे यांच्या मृत्यूच्या अफवांच्या पोस्ट फिरत होत्या.

>>केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाद्वारे देशभर एक्स्प्रेस-वे, महामार्ग व राज्य मार्गांसाठी राबविण्यात येणाऱ्या रस्ते विकासाच्या योजनांमध्ये आता राज्यांचा आर्थिक वाटा (भार) ४० टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी तो सरासरी १५ टक्क्यांपर्यंत होता.

>>काल्हेर - महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पंचवार्षिक राज्यस्तरीय १८ वे अधिवेशन १७ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११ वाजता

>>ऑस्कर नामांकन २०१६ - उत्कृष्ट अभिनेता नामांकने - १) ब्रायन क्रॅन्स्टन २) मॅट डॅमर ३) मिचेल फासबेंडर ४) एडी रेडमाइन ५) मॅट डोमॅन

>>ऑस्कर नामांकन २०१६ - उत्कृष्ट अभिनेत्री नामांकने - १) ब्रिइय लार्सन २) केट ब्लँकेट ३) साओर्स रोनम ४) जेनिफर लॉरेन्स ५) शार्लेट रॅम्पलिंग

>>सिक्कीमने जवळपास ७५ हजार हेक्टर कृषी जमिनीवर टिकावू लागवड करून भारतातील पहिले सेंद्रीय राज्य बनण्याचा मान पटकावला आहे.

>>पेट्रोलमधलं इथेनॉलचं प्रमाण पाच टक्क्यांवरून १० टक्के करण्यात येणार असल्याची घोषणा रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे.

>>मंत्र्यासाठी मंत्रालयात बायोमॅट्रिक सिस्टीम बसवा, राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिकांची मागणी, मंत्रालयात मंत्री हजर नसल्याचाही आरोप

>>टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या भावाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हसीबला उत्तर प्रदेशातील अमरोहा इथं बुधवारी रात्री अटक झाली. पोलिसांसोबत धक्काबुक्की आणि बाचाबाची केल्याप्रकरणी मोहम्मद हसीबला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Thursday, January 14, 2016

प्रियंका चोप्रा

News Updets:07:00Pm
दिनांक:-14-1-2016

��प्रियांका चोप्राला अमेरिकेचा पीपल्स चॉईस अवॉर्ड प्रदान -

*प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला अमेरिकन टिव्ही मालीकेत (क्वान्टिको मालीका) प्रशिक्षणार्थी एफबीआय एंजटची भूमीका साकारल्याबद्दल‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ देण्यात आला आहे.

* हा अवॉर्ड पटकवाणी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. 

*पिपल्स चॉईस श्रेणीत प्रियांकासमोर एम रॉबर्टस जेमी ली, लि मिशेल आणि मार्शिया गे यासारख्या हॉलीवूडच्या अभिनेत्रीचे तगडे आव्हाण असताना चाहत्यांनी मतदानाद्वारे प्रियांका चोप्राची निवड केली.

*2003 मध्ये ‘द हिरो’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदापर्ण करणाचा प्रियांका चोप्राला 2008 मध्ये ‘फॅशन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

*2000 मध्ये विश्‍व सुंंदरी (मिस वर्ल्ड) स्पर्धेत विजेतेपद पटकावून पाचवी भारतीय विजेती ठरली. प्रथम या स्पर्धेत रिता फारीया (1966) विजेती ठरली. 

इस्रो

इस्रो नव्या वर्षात सोडणार पीएसएलव्ही :

भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) गेल्या वर्षी मिळालेल्या यशानंतर इस्रो आता पुन्हा नव्याने येत्या 20 जानेवारीला इस्रो पीएसएलव्ही- सी 31 आणि दूरसंचारसाठीचा आयआरएनएसएस- 1 ई हे दोन उपग्रह आकाशात सोडणार आहे.
 
तसेच चेन्नईपासून 80 किलोमीटरवर असलेल्या श्रीहरीकोटा येथून हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत.
 
इस्रोने आतापर्यंत 32 पीएसएलव्हीचे यशस्वी उपग्रह सोडले असून, आता पीएसएलव्ही - सी 31 हा 33 वा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

Wednesday, January 13, 2016

चालु घडामोडी ७२

#चालू #घडामोडी
:------------------------------------------------------------------------------------

१) २०१५ या वर्षाची अंतिम लोक अदालत कोणत्या दिवशी पार पडली:-१२ डिसेंबर ( नवी दिल्ली येथे)

२) नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यावेतनात किती टक्के वृद्धी केली आहे:- २३.५%

३) नोव्हेंबर २०१५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची थीम ---------------ही होती:- मेक इनइंडिया

४) नोव्हेंबर २०१५ मध्ये आसीयानचे २७वे शिखर सम्मेलन कोठे पार पडले ? :- कुआलालम्पूर (मलेशिया)

५) नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टरई यांनी कोणता नवा पक्ष स्थापन केला ? :- नया शक्ती

६) जागतिक आरोग्य संघटनेने नोव्हेंबर २०१५ मध्ये कोणता देश इबोला मुक्त देश म्हणून घोषित केला :- सिएरा लियाॅन

७) जी २० देशाचे नोव्हेंबर २०१५ मध्ये -------------- येथे शिखर सम्मेलनआयोजित केले होते ? :-अंताल्या ( तुर्की)

८) चिली मध्ये संपन्न झालेल्या फिफा अंडर १७ फुटबॉल विश्व कप स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :- नायजेरिया

९) निवड
सुनील कनोरिया:- असोचैम चे नवे अध्यक्ष
हर्षवर्धन नेओतिया :- फीक्की चे नवे अध्यक्ष
विजय गोखले:- चीन मधील राजदूत
अनिल वाधवा:- इटली मधील राजदूत

१०) चर्चित पुस्तके
द स्टोरी ऑफ माय लाईफ:- हेलेन केलर
व्हाट हैपण्ड टू नेताजी :- अनुज धरद
मॉडर्ण गुरुकुल :- सोनाली बेंद्रे
हिटलर:- बायोग्राफी:- पीटर लोनग्रीच

७३ गोल्डन ग्लोब अवार्ड

* ७३ वा गोल्डन ग्लोब पुरस्कार २०१६:-
--------------------------------------------------------------------------------------------
* बेस्ट मोशन पिक्चर्स ड्रामा:-
सर्वोत्कृष्ट चित्रपट:- द रेव्हनंट
सर्वोत्कृष्ट अभिनेता:- लिओनाडरे डी कॅप्रिओ
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकल-अलेजांड्रो गोंझालेझ इनारिटू ( द रेव्हनंट )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- ब्री लार्सनला (चित्रपट:- रूम)
* म्युझिकल किंवा कॉमेडी श्रेणी:-
सर्वोत्कृष्ट चित्रपट:- द मार्शियन
सर्वोत्कृष्ट अभिनेता :-मॅट डॅमन (चित्रपट:-द मार्शियन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:-जेनिफर लॉरेन्सने (जॉय’ ) ४ दा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला
उत्कृष्ट सहायक अभिनेता:-सिल्वेस्टर स्टॅलोन
* गायीका लेडी गागा हिला पहिल्यांदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला " अमेरिकन हाॅरर स्टोरी होटल मधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा (टीव्ही) पुरस्कार मिळाला

Monday, January 11, 2016

चालु घडामोडी ७१

चालू घडामोडी (10 जानेवारी 2016)
चालू घडामोडी (10 जानेवारी 2016) :

दारूगोळ्याची संशोधकांकडून यशस्वी चाचणी :

भारताचा सर्वाधिक शक्तिशाली रणगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनसाठी तितकेच ताकदवान तोफगोळे तयार करण्यात आले असून, आज संरक्षण संशोधकांनी याची यशस्वी चाचणी घेतली. 
 ओडिशातील चांदीपूर येथे ही चाचणी घेण्यात आली असून या वेळी रणगाड्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
 पुण्यातील "डीआरडीओ"च्या लॅबोरेटरीज आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट आणि हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च या संस्थांनी हा दारूगोळा तयार केला आहे. 
 तसेच हा दारूगोळा तयार केला जात असताना प्रयोगशाळेत प्रत्येक टप्प्यावर त्याच्या तीव्रतेच्या चाचण्या घेण्यात आल्या. 
 दारूगोळ्याचे भारतातच मूल्यमापन करण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे अर्जुनचे बळ कित्येक पटीने वाढणार आहे. 

नव्या राज्यघटनेसाठी श्रीलंकेमध्ये प्रक्रिया सुरू :

देशासाठी नवी राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रियेला श्रीलंकेच्या संसदेमध्ये सुरवात झाली. 
 सर्व सदस्यांचे मिळून घटना मंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी संसदेमध्ये सादर केला.
 घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी सर्व सदस्यांचा सहभाग आवश्‍यक असून, त्यावर नियंत्रण आणि समन्वय ठेवण्यासाठी 17 सदस्यांची नियुक्ती करावी, असे विक्रमसिंघे यांनी मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. 
 अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असलेली 1978 मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेऐवजी नवी राज्यघटना अस्तित्वात आणली जाणार आहे. 

नेताजींच्या मृत्यूबाबतच्या प्रत्यक्षदर्शींची जबानी प्रसिद्ध :

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातातच मृत्यू झाल्याचा दावा करणाऱ्या ब्रिटनमधील एका संकेतस्थळाने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ प्रत्यक्षदर्शींनी दिलेली जबानी प्रसिद्ध केली आहे.
 सुभाषबाबू आणि इतर तेरा ते चौदा जणांना घेऊन जाणाऱ्या जपानच्या हवाई दलाच्या विमानाने व्हिएतनाममधील टर्बन येथून 18 ऑगस्ट 1945 ला उड्डाण केले होते. या विमानामध्ये जपानचे लष्करी अधिकारी ले.  जन. सुनामासा शिदेई हेसुद्धा होते. 
 www.bosefiles.info या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. 
 तसेच या अपघाताची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीसमोर साक्षीदारांनी दिलेली माहिती संकेतस्थळावर आहे. 

मंत्रालयात 'सिंगल विंडो सीएसआर सेल' स्थापन करा :

राज्यातील सामाजिक प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंगल विंडो सीएसआर सेल स्थापन करावा, अशी सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्य सरकारला केली. 
 उद्योगजगताला ज्या क्षेत्रात सीएसआर निधीचा वापर करण्यात स्वारस्य आहे, त्या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची मुभा त्यांना मिळावी, जेणेकरून त्यांना त्या कामाची व्यवहार्यता तपासता येईल, अशी सूचना राज्यपालांनी केली.
 सीएसआर कार्यक्रमांतर्गत उद्योगजगताकडून सरकारकडे येणाऱ्या विविध प्रकल्पांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी तसेच त्यांना आवश्‍यक सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात एका विशेष कार्य अधिकाऱ्याची नियुक्ती  केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 
 हा अधिकारी सरकार आणि उद्योगजगत यांच्यात समन्वय साधण्याचे काम करील.

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू :

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर नव्या सरकारच्या स्थापनेला विलंब होत असल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.
 राज्याचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारे, केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यात राज्यपालांची राजवट लागू करण्याची केलेली शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली.

कृष्णविवर शोधण्याची नवी पद्धती विकसित :

भारतीय वंशाच्या एका अमेरिकी प्राध्यापकाच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिकांच्या पथकाने कृष्णविवर शोधण्याची नवीन पद्धती विकसित केल्याचा दावा केला आहे. 
 ते छोटी आकाशगंगा शोधण्यात आणि आकाशगंगेत असलेल्या बाहेरील थरातील तरंगाचा तपशील देईल.
 रोसेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील सहायक प्राध्यापक सुकन्या चक्रवर्ती यांनी आकाशगंगेतील अंतर्गत संरचना आणि द्रव्यमान मोजण्यासाठी आकाशगंगेच्या डिस्कमधील तरंगाचा वापर केला. 
 या संशोधनाचे निष्कर्ष चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष अ‍ॅस्ट्रोफिजिकल रिसर्च लेटर्सकडे सोपविण्यात आले आहेत. 
 अदृश्य पार्टिकलला कृष्णविवर किंवा डार्क मॅटर म्हटले जाते. त्यात या ब्रह्मांडाचा 85 टक्के भाग सामावला आहे. 

सोनाली कुलकर्णी 'सखी मंच'ची 'ब्रँड अ‍ॅम्बेसिडर' :

विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी लोकमतने 'सखी मंच'हा उपक्रम सुरू केला.
 महिलांचे केवळ मनोरंजनच नाही, तर त्यांना यामधून काही तरी शिकता यावे, त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचावे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. 
 यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन यामध्ये केले जाते. यंदाच्या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या लोकमत सखी मंचची 2016-17 वर्षांसाठी अ‍ॅम्बॅसिडर असणार आहेत.

ट्विटर संदेशाची अक्षर मर्यादा दहा हजार पर्यंत करणार :

ट्विटर या मायक्रोब्लॉिगग संकेतस्थळावरून पाठवल्या जाणारया संदेशांची अक्षर मर्यादा आता 140 वरून दहा हजार करण्याची शक्यता आहे, सध्या या ब्लॉगचे असलेले 30 कोटी वापरकत्रे त्यामुळे वाढतील अशी अपेक्षा आहे. 

दिनविशेष :

मार्गारेट थॅचर दिन : फॉकलंड द्वीप
 1840 : इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
 1920 : जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.