Bookmark

Bookmark this Blog

Friday, October 2, 2015

मुद्रा बँक लोन

देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा यासाठी ८ एप्रिल २०१५ रोजी  २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले.

या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे. तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. तसेच तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याचबरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार स्कीम बनवली जाईल. प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील.

'सिडबी'ची उप कंपनी या नात्याने मुद्रा बँक ही रिझव्‍‌र्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्तसंस्था म्हणून नोंदणीकृत होईल आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करेल.

मुद्रा योजनेची वैशिष्टय़े......

देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य
वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा
२०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ सिडबीची ही उपकंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार
सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक

        
मुद्रा लोन मध्ये खालील प्रमाणे माहिती आहे
1) कोणत्याही प्रकारचा जामीन नाही
2) कोणत्याही प्रकारचा माॅरगेज नाही
2) हि योजना फक्त सरकारी बैंक तच होते
3) वय 18 वर्षे पूर्ण असली पाहिजेत
4) या साठी ची कागदपत्रे खालील प्रमाणे
1) ओळखीचा पुरावा उदा - मतदान ओळख पत्र, आधार कार्ड
2) रहिवासी पुरावा उदा - लाईट बिल, घरफाळा पावती
3) आपण जो व्यवसाय करणार आहोत कींवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता
4) व्यवसायासाठी लागणारे माल मटेरियल किंवा यंत्रसामुग्री त्याचे कोटेशन व बिले
5) आपण ज्या व्यापार्या कडुन माल घेतला त्याचा पुर्ण नाव व पत्ता
6) अर्जदाराचे 2 फोटो
7) अर्जदार कोणत्याही बॅन्केचा थकबाकीदार नसावा इत्यादि
5) कोणतीही सरकारी बॅन्क कर्ज नाकारू शकत नाही
6) स्वतःचे 10 टक्के भागभांडवलची गरज नाही
सबका साथ सबका विकास

महाराष्ट्र व विभाग

महाराष्ट्राचे विभाग

Wednesday, September 30, 2015

इंधन दरवाढीचे गणित

इंधन दरवाढीचं गणित !

-
जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड घट झाली आहे. यामुळे ज्या राष्ट्रांची मदार तेलविक्रीवर आहे, त्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था चांगलीच संकटात आलीय. यामध्ये एक्वाडोर, सौदी अरेबिया, इराण, रशिया, व्हेनेझुएला, इराक या देशांचा समावेश आहे. आपण थोडक्यात प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून हे समजून घेऊयात. तेलाच्या किमतीत का घट झालीय, त्याच्यामागची कारणे काय आहेत आणि त्याचा फायदा-तोटा कुणाला आहे?

1) सध्या तेलाच्या किमती काय आहेत?
सध्या तेलाच्या किमती 42 डॉलर प्रति बॅरलवर आल्यात. एक वर्षापूर्वी किमती प्रति बॅरल 90 ते 100 एवढ्या होत्या.

2) जागतिक तेलाच्या किमतीमध्ये का घट झाली?
अमेरिकेनं देशांतर्गत खनिज तेलाचं उत्खनन वाढवलंय. याशिवाय गेल्या 6 वर्षांत अमेरिकेनं आपलं तेल उत्पादन दुप्पट केलंय. आजपर्यंत अमेरिका हा तेलाचा मोठा आयातदार देश होता. तेलविक्रीसाठी अमेरिकेवर अवलंबून असणारे राष्ट्र सौदी अरेबिया, नायजेरिया, अल्जेरिया यांना नवं मार्केट शोधावं लागलं. त्यामुळे स्वाभाविक त्यांना तेल किमती कमी कराव्या लागल्या. दुसरीकडे कॅनडा, इराकने तेल उत्पादन कमी करण्याऐवजी वाढवलंय, त्याशिवाय मंदी असताना रशियानं तेल उत्खनन कमी केलं नाही. त्यामुळे मागणीपेक्षा उत्पादन जास्त झालंय.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक युरोपियन युनियनमधील अनेक राष्ट्रांची अर्थव्यवस्था नाजूक झाली आहे. शिवाय या राष्ट्रांनी आता वाहनांसाठी पेट्रोल, डिझेलऐवजी अपारंपरिक ऊर्जेवर अधिक भर दिला आहे.

3) तेल किमतीत घट; फायदा कुणाला?
या सर्व घटाचा फायदा अनेकांना झालाय. इंधनासाठी आयातीवर अवलंबून राहणार्या भारतासारख्या राष्ट्रांचा फायदा झालाय. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आलीय, शिवाय सरकारी तेल कंपन्यांचा तोटा कमी झालाय. महागाई वाढीवर नियंत्रण आलंय. आयात-निर्यातमधील तुट भरुन निघाली आहे. जगभरातील वाहनांचा वापर करणार्या कुटुंबांना याचा फायदा मिळत आहे. सध्या जगभरात गॅसोलीनच्या किमती खाली आल्यात. त्याचा फायदा युरोप, अमेरिकन कुटुंबांना होत आहे. महत्त्वाचं म्हणजे अल्प उत्पादन असणार्या कुटुंबांना याचा सर्वात जास्त फायदा झालाय. एक वर्षात गॅसोलीनच्या किमती 3.45 डॉलरवरून 2.65 डॉलरवर आल्यात.

4) तोटा कुणाला?
घटत्या तेल किमतीचा फटका बसलाय तो मुख्यता व्हेनेझुएला, इराण, नायजेरिया, इक्वाडोर, ब्राझील, रशिया या पेट्रो राष्ट्रांना. आखातातील अनेक देशांना याचा फटका बसतोय.
अनेक मोठ्या तेल कंपन्या तोट्यात गेल्या आहेत. कंपनीच्या वार्षिक फायद्यात मोठी घट झालीय. चेव्रॉन, रॉयल डच शेल या कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांचे पगार, भत्ते, इतर गोष्टींना कात्री लावावी लागली आहे.
मात्र या मंदीत छोट्या तेल उत्पादक कंपन्या तग धरू शकत नाहीत. बँकांनी त्यांना कर्जपुरवठा न केल्यास या कंपन्या बंद पडण्याची भीती आहे. मंदीमुळे या क्षेत्रातील जवळपास 1 लाख लोकांच्या नोकर्या गेल्यात. अनेक कंपन्या तोट्यात गेल्यात, तेल उत्खननातील गुंतवणूक कमी झालीय.

5) ओपेकची काय भूमिका आहे?
ओपेक संघटनेच्या धोरणामुळे तेलाच्या किमती पडल्या आहेत. कारण तेलाची मागणी कमी असताना उत्पादन कमी करायला ओपेक राष्ट्र तयार नाहीत. ओपेकचा क्रूड ऑईल निर्देशांक जवळपास 50 टक्क्यांनी खाली आलाय. तरीही उत्पादन कमी करण्यास या राष्ट्रांनी नकार दिलाय.
सौदी अरेबिया ओपेक संघटनेचं नेतृत्व करते. सौदीच्या मते जर आम्ही तेल उत्पादन कमी केलं आणि भविष्यात तेलाच्या किमती वाढल्या तर त्यांचं मार्केट शेअर कमी होईल. याच भीतीमुळे सौदीनं इतर राष्ट्रांनाही तेल उत्पादन सुरूच ठेवण्यास सांगितलंय. अल्जेरिया, व्हेनेझुएला, इराण या राष्ट्रांचा याला विरोध आहे, मात्र हा विरोध संघटनेनं झुगारून लावलाय.
याचा फटकाही ओपेक राष्ट्रांना बसलाय. सोदी अरेबियासह इतर राष्ट्रांचं 300 अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. सौदी अरेबियाचं उत्पन्न घटलंय. मात्र तेलाच्या किमती वर्षभर अशाच कायम राहिल्या तर सौदी अरेबियाचे राजे सलमान हे इतर ओपेक राष्ट्रांना उत्पादन सुरूच ठेवण्याविषयी फार समजावून सांगू शकणार नाहीत.

6) तेल किमती खाली येण्यामागे काही अन्य थेअरी आहेत?
तेल किमती कमी होण्यामागे काही राष्ट्रांचा कट असल्याच्या अनेक थेअरी प्रचलित आहेत. अमेरिकेला सौदी अरेबिया, रशिया, इराणची तेल आधारित अर्थव्यवस्था कमजोर करायची आहे. युक्रेनचा वचपा काढण्यासाठी अमेरिका हे करत असल्याचंही अनेकांना वाटलंय. 1980 मध्येही सोव्हिएत युनियन फुटण्यामागे पडलेल्या तेलाच्या किमतीचा मोठा वाटा होता. मात्र या थेअरीला काही आधार नाही. एकतर अमेरिका, सौदी अरेबियामध्ये पहिल्यासारखे सलोख्याचे संबंध उरलेले नाहीत. याशिवाय बलाढ्य तेल कंपन्यांचे तेल उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याइतपत ओबामा प्रशासनाचा वचक उरलेला नाही.

7) तेल किमती केव्हा स्थिर होतील?
सध्यातरी काही काळ असं होण्याची चिन्हं नाहीत. अमेरिका आणि इतर देश तेल उत्पादन सातत्यानं वाढवत आहेत. मात्र काही महिन्यांनंतर काही देश तेल उत्पादन कमी करणार आहेत. त्यामुळे काही काळानंतर कच्च्या तेलाची मागणी येईल आणि किमती जाग्यावर येऊ शकते. जागतिक तेल बाजाराच्या इतिहासात चढ-उतार होत राहतात.

"कोर्ट"ची आॅस्कर'वारी

* मराठमोळ्या 'कोर्टा'ने चढली ऑस्करची पायरी :-
----------------------------------------------------------------------------------
* जगभरातील मनोरंजन क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांसाठी चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट‘ हा चित्रपट भारतातर्फे परदेशी भाषा विभागासाठी ‘कोर्ट’चे नामांकन पाठविण्यात येणार आहे.

* ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्या ऑस्कर ज्युरी समितीचे अध्यक्ष अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या समितीने विविध भाषांच्या ३० चित्रपटांतून कोर्ट या चित्रपटाची निवड केली

* ऑस्करला भारतातर्फे पाठविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये श्वास आणि हरीश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांनंतर ‘कोर्ट‘ हा आणखी एक मराठी चित्रपट ठरला

* कोर्टला 2015ला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी सुवर्णकमळ देऊन सन्मानित करण्यात आले होते. 'कोर्ट'ला यापूर्वी 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

* कोर्ट' हा सिनेमा भारतीय कायदेपध्दतीवर आधारित आहे. 'कोर्ट' हा सिनेमा एका लोककलाकाराच्या आयुष्यातील न्यायालयीन लढा वर्णन करणारा आहे.

चालु घडामोडि ४२

चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2015)
चालू घडामोडी (25 सप्टेंबर 2015) :

व्यवहार्यता तपासण्यासाठी चीन, फ्रान्स आणि स्पेनमधील कंपन्यांची निवड :

दिल्ली, मुंबई आणि कोलकता, त्याचप्रमाणे मुंबई आणि चेन्नई या महानगरांना जोडणाऱ्या हीरक चतुष्कोन (डायमंड क्वाड्रिलॅटरल) या महत्त्वाकांक्षी रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी रेल्वेने चीन, फ्रान्स आणि स्पेनमधील कंपन्यांची निवड केली आहे.
 चारही प्रस्तावित लोहमार्गांचे अध्ययन करून या कंपन्यांनी अहवाल देणे अपेक्षित आहे.
 तब्बल दोन लाख कोटी खर्च अपेक्षित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे चारही महानगरे वेगवान रेल्वेगाड्यांनी (हायस्पीड ट्रेन) जोडली जातील.
 300 किलोमीटर प्रतितास या वेगामुळे प्रवासाचा वेळही लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.
 याअंतर्गत "थर्ड रेल्वे सर्व्हे अँड डिझाइन इन्स्टिट्यूट" ही चिनी कंपनी दिल्ली- मुंबई मार्गाचे अध्ययन करेल, तर फ्रान्समधील "सिस्ट्रा" ही कंपनी मुंबई- चेन्नई मार्गाची पाहणी करेल.
 याखेरीज दिल्ली आणि कोलकता यांना जोडणाऱ्या मार्गाचे अध्ययन स्पेनच्या "इनेको" या कंपनीकडून केले जाईल.
 या अध्ययनासाठी तीस कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होण्याची शक्‍यता :

लातूर जिल्ह्यात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेले आहे.
 यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
 यात जिल्ह्यातील सर्वच 943 गावांत 67 पैसे पेक्षा कमी पैसेवारी आली आहे.
 त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होण्याची शक्‍यता आहे.
 जिल्ह्यात सरासरी 358 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

स्वयंचलित टेहळणी व सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी :

भारतीय हवाई

वाळु उत्खननाचे नवे धोरण

#वाळू उत्खननाचे नवे धोरण:
-------------------------------------------------------------

•देशभर फोफावलेल्या वाळू माफियांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने वाळू उत्खनन धोरणाचा नवा मसूदा तयार केला

•यापुढे सरसकट वाळू उत्खनन करता येणार नाही. रिमोट सेन्सिंगच्या साह्य़ाने नदीकिनारी असलेला वाळूचा साठा सर्वप्रथम निश्चित करण्यात येईल. केवळ त्याच भागात वाळू उत्खनन करण्यास परवानगी असेल.

•जिल्हास्तरावर पर्यावरण प्रभाव पाहणी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल. वाळू उत्खनन करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्यासाह्य़ाने त्याची नोंद करण्यात येईल. यासाठी बार कोड असलेली एमआयसीआर पावती व्यावसायिकांना देण्यात येईल

•यासंबंधीचा मसूदा संकेतस्थळावर उपलब्ध असून येत्या १ जानेवारीपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

•जिल्हास्तरीय प्रभाव पाहणी प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतील. त्यांना सहकार्य करण्यासाठी जलसंपदाविभागातील कार्यकारी अभियंता प्रमुख असलेली जिल्हास्तरीय तज्ज्ञ मूल्यमापन समिती नेमण्यात येईल. हीच समिती पाच हेक्टपर्यंत वाळू उपशास परवानगी देईल.

#नव्या वाळू धोरणाची वैशिष्ट्ये :--

वाळू उपसा करतेवेळीच ठेकेदारांना दिल्या जाणाऱ्या पावत्यांना विशिष्ट "बारकोड‘- उपग्रहाच्या साहाय्याने नद्यांची "क्षेत्रे‘ ठरविणे- वाळू उपशाबाबत संबंधित राज्यांनाच अधिकार देणे- वाळूचोरांवर कारवाईचे अधिकार मुख्यत्वे राज्यांना देण

लक्षात ठेवण्याच्या सोप्या पद्धति

मजेशीर क्लूप्त्या भाग 11 :

1. जीवाणूंमुळे होणारे रोग कसे लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : धनुला क्षयरोग ओ कुष्ठरोग झाला म्हणून त्याने न्युमोनिया विषाचा घोट पटकन घेतला.

धनुर्वात
क्षयरोग
कुष्ठरोग
न्युमोनिया
विषाचा - विषमज्वर
घोट - घटसर्प
पटकन - पटकी
2. गांधीजींच्या सक्रीय चळवळी क्रमाने कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : चंपाच्या खेड्यातील गिरण्यांनी संप केला म्हणून गांधीजींनी रोलेट act नुसार असहकार चळवळीच्या माध्यमातून सविनय वैयक्तिक भारत सोडण्याचा निर्णय घेतला.

1917 - चंपारण्य सत्याग्रह
1918 - खेडा सत्याग्रह
1918 - अहमदाबाद गिरणी संप
1919 - रोलेट act विरोधात सत्याग्रह
1920 - असहकार चळवळ
1930 - सविनय कायदेभंग चळवळ
1940 - वैयक्तिक सत्याग्रह
1942 - भारत छोडो आंदोलन
3. केंद्र सरकार चे अप्रत्यक्ष कर कसे लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : SS CBI EX

S - Service (सेवा कर )
S - Sales ( विक्रीकर )
C - Custom ( सीमा शुल्क कर )
B - Banking Cash (बँक रोखे व्यवहार कर )
I  - Indirect (अप्रत्यक्ष कर )
EX - Excise (अबकारी कर)
4. केंद्र सरकार चे प्रत्यक्ष कर कसे लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : WE I GIFT

W - Wealth (संपत्ती कर)
E - Estate (मालमत्ता कर)
I - Interest (व्याज कर)
GIFT - देणगी कर
   
5. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या

क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:

वि- विध्य पर्वत
न – नर्मदा
सा- सातपुडा
ता- तापी
सा – सातमाळ
गो- गोदावरी
ह –हरिचंद्र बालघाट
भी –भीमा
म- महादेव डो
कृ- कृष्णा

फोर्ब्ज १००

#फोर्बस्-१००

-----------------------------------------------------------------------------------------

·रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचामान मिळविला. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 18.9 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे.मानाच्या मानल्या जाणाऱ्या फोर्बस्च्या आघाडीच्या श्रीमंतांमध्ये केवळ चार महिला उद्योगिनींना स्थान मिळाले आहे.·फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर सन फार्माचे संस्थापकदिलीप संघवी आहेत. त्यांच्याकडे 18 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.· यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्लिपकार्टचे संस्थापकसचिन व बिन्नी बन्सल यांना प्रथमच भारतातील आघाडीच्या 100 श्रीमंत उद्योजकांच्या यादीत सामील होण्याचा मान मिळाला आहे. या दोघांकडे प्रत्येकी 1.3 अब्ज डॉलर संपत्तीअसून त्यांना या यादीत 86 व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे

#फोर्ब्जच्या यादीतील पहिले पाच अब्जाधीश -·

१) मुकेश अंबानी - ( 18.9 अब्ज डॉलर)·

२) दिलीप संघवी - (18 अब्ज डॉलर)·

३) अझीम प्रेमजी - (15.9 अब्ज डॉलर)·

४) हिंदुजा ब्रदर्स - (15.9 अब्ज डॉलर)·

५) पालोनजी मिस्त्री - (14.7 अब्ज डॉलर)

* भारतातून निवडल्या गेलेल्या पहिल्या १०० श्रीमंतांमध्ये असलेल्या चार महिलांची एकूण संपत्ती ९.२ अब्ज डॉलर (एकूण तुलनेत ३ टक्के) गणली गेली आहे.

१) सावित्री जिंदाल, (ओ. पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा)

२) लीना तिवारी, (यूएसव्ही फार्माच्या अध्यक्षा)

३) हेवल्सचे संस्थापक किंमत राय गुप्ता यांच्या पत्नी विनोद गुप्ता

४) इंदू जैन (बेनेट, कॉलमन अॅण्ड कंपनी)

* तरुण उद्योजकांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या फॉच्र्युनच्या नामावलीत पाच भारतीयांचा समावेश झाला आहे. फॉच्र्युनने जाहीर केलेल्या जगभरातील ४० वर्षांतील उद्योजकांमध्ये

1) दिव्या सुर्यदेवडा (जीएम असेट मॅनेजमेन्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी; स्थान चौथे),

2) व्ही. नरसिंहन (नोवार्टिस; स्थान सातवे),

3) आनंद स्वामीनाथन (अॅक्सेंच्युअर्स; स्थान १८वे),

4) अपूर्वा मेहता (इन्स्टाकार्टच्या संस्थापिका; स्थान २३ वे) व

5) रेश्मा सौजानी (गर्ल्स व्हू कोड; स्थान ३९वे) यांची नावे आहेत.

Monday, September 28, 2015

चालु घडामोडी ४१

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2015) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माहिती-तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीला भेट देत आयटी दिग्गजांशी (टेक टायटनशी) संवाद साधल्याची पाच फलश्रुती पाच महत्त्वपूर्ण घोषणांमध्ये झाली आहे.

 मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्य नडेला यांनी भारतातील पाच लाख गावांना ब्रॉडबॅन्ड कनेक्टिव्हिटी तर गुगलने 500 रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यासाठी केंद्र स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
 कमी खर्चाचा ब्रॉडबॅन्ड संपर्क आणि क्लाऊड कम्प्युटिंगच्या साह्याने कामकाजात सृजनात्मकता, दक्षता आणि उत्पादकता वाढविण्यात मोलाचे योगदान देता येईल.त्यामुळे संपूर्ण भारतात योग्य दरात उत्पादन आणि सेवा सुनिश्चित करता येतील.
 आमची कंपनी भारतातील डाटा सेंटरच्या माध्यमातून क्लाऊड सेवा उपलब्ध करण्याची घोषणा करणार असून ती मोठी उपलब्धी ठरेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

 गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी डिजिटल साक्षरतेला गती देताना पुढील महिन्यापासून भारतात गुजरातीसह 10 वेगवेगळ्या भाषांमधून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध करवून देणार असल्याचे स्पष्ट केले.

अभिनव बिंद्राला आशियाई एअरगन स्पर्धेत सुवर्ण पदक :

ऑलिम्पिक सुवर्ण विजेता 'गोल्डन बॉय' अभिनव बिंद्रा याने आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत रविवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
 डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये बिंद्राने 208.8 गुणांसह सुवर्णांवर नेम साधला.
 लंडन ऑलिम्पिकचा कांस्य विजेता गगन नारंग हा चौथ्या आणि चैनसिंग सहाव्या स्थानावर राहिले.
 बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग हे 2016 च्या रियो ऑलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरले आहेत.

 32 वर्षांच्या बिंद्रापाठोपाठ कझाखस्तानचा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावरील युरकोव्ह युकिरी याने 206.6 गुणांसह दुसरे आणि कोरियाचा यू जीचूल 185.3 याने तिसरे स्थान मिळविले.
 लंडन ऑलिम्पिकमध्ये याच प्रकारात कांस्य जिंकणाऱ्या नारंगला 164.5 गुण मिळाल्याने तो चौथ्या स्थानावर घसरला.
 चैनसिंग हा 122.7 गुणांसह सहाव्या स्थानावर आला.

 नारंगने 10.6 गुणांचे दोन शॉट मारून चांगली सुरुवात केली खरी पण पुढच्या प्रयत्नांत तो माघारला.
 भारताने 10 मीटर एअर रायफलचे सांघिक सुवर्णदेखील जिंकले. बिंद्रा, नारंग आणि चैनसिंग यांच्या जोडीने 1868.6 गुणांसह अव्वल स्थान घेतले.
 तर कोरिया संघ दुसऱ्या आणि सौदी अरब संघ तिसऱ्या स्थानावर आला.
 भारताने युवा गटात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.

गुगलचा 17 वा वाढदिवस :

वर्षभर जगभरातील कोटय़वधी लोकांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या गुगलचा 17 वा वाढदिवस असून जगभरातून लाखो गुगलप्रेमींचा शुभेच्छांचा वर्षांव गुगलवर होतो आहे.
 तारुण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गुगलने बघताबघता मोठा पल्ला गाठत संगणकप्रेमी आणि मोबाईलधारकांमध्ये महत्त्वाची जागा निर्माण केली.
 अशी कोणतीही माहिती असू शकत नाही की जी गुगल या सर्च इंजिनवर नाही.
 गुगलच्या 17 व्या वाढदिवशी स्वत:चे डुडलही बदलवले आहे.
 त्यात किबोर्डसह प्लास्टिकचा पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे 'जी', दोन फुगे म्हणजे 'दोनदा ओ', सीपीयूचा आकार परत 'जी'सारखा, त्याच्यापुढे 'एल'च्या आकाराचा लावा लॅम्प आणि मेजलाच 'ई' सारखा आकार देण्यात आला आहे.

लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूशी संबंधित दस्ताऐवज सार्वजनिक करण्याची मागणी :

पश्चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित काही फायली खुल्या केल्यानंतर आता माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूशी संबंधित दस्ताऐवज सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 शास्त्रीजींच्या मृत्यूसंदर्भात संशयाचे माहोल असून, सत्य बाहेर यायला हवे, अशी मागणी त्यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल शास्त्री यांनी केली.
 शास्त्रीजींच्या मृत्यूबाबत कागदपत्रे खुले करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते परदेश दौऱ्याहून परत आल्यानंतर पुढील आठवडय़ात पत्र लिहिणार असल्याचे ते म्हणाले.
 दिल्लीत पालम विमानतळावर मी वडिलांचे पार्थिव पाहिले तेव्हा ते निळे पडलेले होते. चेहऱ्यावर पांढरे व्रण होते, असेही ते म्हणाले.
 शास्त्रीजींचा मृत्यू 1966 मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत संघातील ताश्कंदमध्ये झाला.
 1965 भारत-पाक युद्धानंतर पाकच्या नेत्यांशी समझोता करण्यासाठी ते तेथे गेले होते.

फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने स्वत:चा 'प्रोफाईल फोटो' बदलला :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक मुख्यालयातील भेटीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी स्वत:चा 'प्रोफाईल फोटो' बदलला.
 झकरबर्गचा हा तिरंगी रंगातील प्रोफाईल फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
 भारतीय सरकार देशातील ग्रामीण समाजाला इंटरनेटशी आणि जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन माध्यमावर आणण्याचे प्रयत्न करत आहे.
 त्यांचा या प्रयत्नांना माझा पाठिंबा असल्याचे झकरबर्गने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
 झकरबर्गच्या या पाठिंब्याबद्दल आभार जाहीर करताना नरेंद्र मोदी यांनीदेखील फेसबुकवरील स्वत:चा 'प्रोफाईल फोटो' बदलला आहे.

दिनविशेष-

चेक प्रजासत्ताक : चेक राष्ट्र दिन  
 तैवान शिक्षक दिन

 1939 : दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर जर्मनी व सोवियेत संघाने पोलंडचा आपसांत वाटणी करून घेतली.

 1939 : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सॉ काबीज केली.

 1944 : दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने एस्टोनियातील क्लूगा कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका केली.

 1958 : फ्रांसने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताकअस्तित्त्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.