Bookmark

Bookmark this Blog

Saturday, February 27, 2016

राष्ट्रपतिची माहिती

राष्ट्रपतीची माहिती :

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे. भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो. तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो. परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.
 भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत. देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. या राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मनवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.
 राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही. अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे. तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.
 भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते. तेराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व चौदावे राष्ट्रपती म्हणून प्रवण मुखर्जी हे कार्यरत आहेत.

पात्रता -

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसारती व्यक्ती भारताची नागरिक असावी.त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.

अपात्रता -

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसारती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.

निवडणूक -

राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.
 राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.

कार्यकाल -

भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.
 राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.
 याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.
 एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.

वेतन, भत्ते व सुविधा -

राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते.
 त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते.
 कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो.
 एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही.
 आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते.
 निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.     

राष्ट्रपतीचे कार्ये व अधिकार

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासनप्रमुख असतात. भारतीय संविधानाने राष्ट्रपतीला काही विशेष अधिकार दिलेले आहेत.
 भारतीय राज्यघटनेत कलम 47 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, मंत्रीमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्ये पार पाडतील साधारणत: राष्ट्रपतीला पुढील कार्ये पार पाडावी लागतात.

कार्यकारी अधिकार

राष्ट्रपती पंतप्रधनाची नेमणूक करतो व पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.
 संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी राष्ट्रपती करतो.
 राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांच्या नेमणुका करतो. यामध्ये प्रामुख्याने महालेखापाल, महान्यायवादी, निवडणूक आयुक्त केंद्रीय लोकसेवेचे अध्यक्ष व सभासद बँकेचे गव्हर्नर, राज्यपाल इ.
 संरक्षणाच्या तिन्ही दलांचा सरसेनापती असल्यामुळे सैन्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या नेमणुका करतो.
 देशातील सर्व प्रकराचे राजकीय व सामाजिक उत्सवांच्या प्रसंगी प्रमुख मनाचे सर्वश्रेष्ठ पद भूषवतो.

कायदेविषयक अधिकार

वर्षातून किमान 2 वेळा संसदेचे अधिवेशन बोलवतो.
 लोकसभा व राज्यसभा यांच्यात मतभेद झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवतो.
 प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला संसदेपुढे अभिभाषण करतो व शासकीय ध्येयधोरण स्पष्ट करतो.
 संसदेच्या दोन्ही सभागृहात काही सदस्यांची नेमणूक करू शकतो.
 संसदेने पास केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते.

अर्थविषयक अधिकार

राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेपुढे मांडता येत नाही.
 पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करतो.
 राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय सरकारला संसदेकडे अनुदानाची मागणी करता येत नाही.
 देशाच्या संचित निधिवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते.
 केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यातील करविषयक उत्पन्नाची वाटणी राष्ट्रपती करतो.
 देशामध्ये नवीन कर लादण्याविषयीचे किंवा कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही.

न्यायविषयक अधिकार

भारतीय घटनाकलम 124 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतो.
 न्यायालयाच्या एखाद्या व्यक्तिला शिक्षा केल्यास त्याची शिक्षा कमी करण्याचा, रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे.
 राष्ट्रपतीला विशिष्ट घटनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला विचारण्याचा अधिकार आहे.
 सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास त्याला पदच्युत करतो.

आणिबाणीविषयक अधिकार

भारतीय घटनेच्या 18 व्या भागात कलम 352-360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिल्या आहेत.
 घटना कलम 352 नुसार बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याची सुरक्षितता धोक्यात आल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो.
 घटना कलम 356 नुसार एखाद्या घटकराज्यांत राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.
 घटना कलम 360 नुसार संपूर्ण देशात किंवा विशिष्ट घटकराज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.

राष्ट्रपतीवरील महाभियोग

राष्ट्रपतीने घटनेच भंग केला असेल किंवा घटनाविरोशी कृत्य केले असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे.
 राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया 61 व्या कलमात संगीतलेली आहे.
 संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतीने घाटना भंग केल्याचा ठराव प्रथम मांडावा लागतो.
 हा ठराव लोकस्वरुपाचा असावा लागतो व सभागृहातील किमान 1/4 (25%) सभासदांची त्याला संमती असावी लागते.
 ठराव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीला आरोपासंबंधी 14 दिवस अगोदरची सूचना राष्ट्रपतीला द्यावी लागते.
 या ठरावावर सभागृहात चर्चा होऊन सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने तो ठराव मंजूर झाला पाहिजे आरोप बहुमताने सिद्ध न झाल्यास तो ठराव तेथेच रद्द होतो.
 एक सभागृहाने आरोपपात्र ठेवल्यानंतर दुसर्‍या सभागृहात त्याची चौकशी होते. सभागृहातील चर्चेच्या वेळी स्वत: किंवा आपल्या प्रतींनिधीमार्फत आपली बाजू मांडू शकतो तसा घटनेत राष्ट्रपतीला अधिकार आहे.
 दुसर्‍या सभागृहाने एकुण सभासदाच्या 2/3 बहुमताने आरोप सिद्ध केल्यास त्या दिवसापासून राष्ट्रपती पदच्युत होतात.

राष्ट्रपतीपदाचे महत्व

भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभा, राज्यसभा, आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो. भारतीय घटना कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असा स्पष्ट उल्लेख केले आहे.
 राष्ट्रपती भारतीय संविधानामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे.
 राष्ट्रपती हे पद देशाचे सर्वात श्रेष्ठ अधिकारपद आहे. राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे. घटनेने राष्ट्रपतीला सर्वोच्च पद देऊन त्याला व्यापक प्रमाणावर अधिकार दिले आहे.
 राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असल्याने त्याला अनेक प्रकारची कार्ये पार पडावी लागतात. अनेक प्रकारचे अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त होतात.
 भारतीय शासन व्यवस्थेने दोन प्रमुख आहेत एक नामधारी प्रमुख तर एक वास्तविक प्रमुख आहे. राष्ट्रपती हा नामधारी व प्रंतप्रधान हा वास्तविक शासनप्रमुख आहे.
 राष्ट्रपती स्वेच्छेने आपल्या अधिकाराच्या जोरावर आणीबाणी जाहीर करू शकतो.
 राष्ट्रपती स्वअधिकाराच्या जोरावर गुन्हेगाराला दयरा दाखवून त्याची शिक्षा स्थगित करू शकतो किंवा कमी करू शकतो.  

Friday, February 26, 2016

रेल्वे बजट २०१६

������������������
〰〰〰〰〰〰〰〰〰
☑रेल्वे बजेट 2016,लोकप्रिय घोषणा
नाही, पायाभूत सुविधांवर भर
〰〰〰〰〰〰〰〰〰
������
मुंबईतील सर्व लहान प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार. तसंच प्रचंड गर्दीचा मार्ग असलेल्या चर्चगेट – विरार आणि सीएसटी – पनवेल मार्गावर उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
������
सुरेश प्रभू यांनी 2016-17 या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केलं. हे त्यांनी मांडलेलं सलग दुसरं बजेट होतं. यावर्षीही रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही नव्या लोकप्रिय घोषणा करण्याचं टाळलं. तसंच यंदाही पायाभूत सुविधांवरच भर दिला.
������
यावर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये 8720 करोड रुपयांची बचत झाल्याचा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला. तसंच मेक इन इंडियामार्फत रेल्वेत 40 हजार कोटींची गुंतवणूक होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
������
 
➡����यंदा नवं काय?

▪*हमसफर, तेजस, उदय आणि अंत्योदय या नव्या गाड्या

▪*हमसफर – पूर्ण एसी कोच; जेवणाची सुविधा, तेजस – वेग ताशी 130 किमी; गाडीमध्ये टीव्ही, सिनेमा, मनोरंजनाची साधणं, वायफाय , उदय – डबलडेकर कोच; गर्दीच्या मार्गावर वाहतूक, 40 टक्के जास्त प्रवाशी वाहतूक शक्य;  आणि अंत्योदय – लांब पल्ल्याची अनारक्षित सुपरफास्ट रेल्वे

▪*दीनदयालु कोच – पिण्याचं पाणी आणि मोबाईल चार्जिंग सुविधा

▪*2020 पर्यंत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट

▪* 2018 पर्यंत 400 रेल्वे स्टेशनवर वायफाय

▪*जनरल डब्ब्यातही मोबाईल चार्जिंगची सुविधा

▪*वरिष्ठा नागरिकांचा कोटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवला, महिला आणि ज्येष्ठांसाठी लोअर बर्थच्या जागांत वाढ

▪*तान्ह्या बाळांसाठी बेबी फूड, दूध आणि गरम पाणी

▪*चर्चगेट – विरार आणि सीएसटी – पनवेल मार्गावर उन्नत मार्गाची घोषणा

▪*भोपाळमधलं हबीबगंज रेल्वे स्टेशन देशातलं पहिलं मॉडेल स्टेशन बनणार. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार

▪*रेल्वेतील कुलींचं सहाय्यक असं नामकरण, ड्रेसकोडही बदलणार

▪*रेल्वे ट्रॅकवरील मलमूत्र विसर्जन थांबवणार, रेल्वे स्टेशन आणि गाड्यांमध्ये बायोटॉयलेटची संख्या वाढवणार
������
➡����रेल्वे बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे

 ▪रेल्वेच्या प्रत्येक कँटगरीच्या तिकीटात महिलांसाठी ३० टक्के आरक्षण. रेल्वेमंञ्यांची महिला वर्गाला मोठी भेट

▪दिव्यांग आणि वृद्धांना प्रवासात मदत करण्यासाठी सारथी सेवा. प्रायोगिक तत्वावर कोकण रेल्वेत सुरू करणार अंमलबजावणी

▪नांदेड,नाशिक,पाली साठी स्पेशल आस्था सर्किट ट्रेन्स चालवण्यात येतील

▪– कुलीजसाठी स्मार्ट नवीन युनिफॉर्म्स देण्यात येईल आणि त्यांना सहाय्यक म्हणण्यात येईल.

▪– एफएम रेडिओ चॅनल्स ला ऑनबोर्ड मनोरंजन सुविधा देण्यासाठी सांगण्यात आलंय,

▪– मुंबईच्या एमयूटीपी-३ च्या माध्यमातून चर्चगेट-विरार आणि सीएसटीएम-पनवेल असे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर्स.

▪– मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळदरम्यान डेजिकेटेड कॉरिडॉर.

▪रेल्वेच्या सर्व महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन्स आणि जीपीएस सिस्टीमचा वापर केला जाईल.

▪– ट्रेन कोलजन अवॉइडन्स सिस्टिम १०० पेक्षा जास्त मार्गांवर वापरात आणणार.

▪– सर्व लो प्लॅटफॉर्म्स ची उंची वाढवली जाईल.
▪– सर्व राज्यसरकानं ऑफिसटायमिंग बदलण्याची विनंती केली आहे ज्यामुळे ट्रेन्समधील गर्दी कमी होण्य़ास मदत होईल.

▪कचरा दिसल्यास तातडीने बोगीच्या स्वच्छतेची मागणी करता येणार
बाळांचे डायपर चेंज करण्यासाठी रेल्वेत टेबलची सुविधा

▪तान्ह्या बाळांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आधी बुकिंग केल्यास बेबीफूड आणि चिल्ड्रन्स मेन्यू देण्यात येईल.

▪अनरिझर्व्ह्ड पॅसेंजर्ससाठी दीनदयाल कोचेस नावानं स्पेशल कोचेस काही स्पेशल ट्रेन्समधे देण्यात येतील..यात जास्तीत जास्त मोबाईल चार्जर्स आणि पिण्याचे पाणी असेल

▪– हमसफर,तेजस आणि उदय या तीन रिझर्व कोच आणले जातील..हमसफर – फुल्ली एअरकंडशन्ड कोच..तेजस ऑनबोर्ड एंटरटेनमेंट,वायफाय कोच…उदय – डबलडेकर कोचेस.

▪– हँडहेल्ड टिकट वेंडर्स फॉर शॉर्टजर्नी

▪– जर्नलिस्टसाठी कन्सेशनल टिकिट.

▪– बारकोड तिकिटींग फॅसिलिटी.

▪– वेटलिस्टेड पॅसेजर्ससाठी विकल्प सिस्टिम इतर ट्रेन्समधेही वाढवण्यात येईल.

▪– पॅसेंजर्स एसएमसच्या माध्यमातून कोच स्वच्छतेसाठी मगणी करू शकतील

▪– 30000 बायोटॉयलेट्स ट्रेन्स आणि स्टेशन्सवर,

▪– प्रवाशांच्या जेवणासाठी आयआरसीटीसी स्वच्छ आणि वेळेत जेवळ पुरवतील..केटरिंगचा दर्जा आणि दायरा वाढवतील.

▪– लोकांना स्थानिक जेवणाचा ऑप्शन देण्यात येईल

▪– एकाच स्टॉलवर जेवण आणि औषधं असेही स्टॉल्स देण्यात येईल.

▪– महिलासांठी 33 टक्के बर्थ चा कोटा ठेवण्यात येईल.

▪– कोकण रेल्वेतील सारथी सेवा ज्यामुळे महिला आणि वृद्धांना सेवा देण्यात येते ती इतर स्टेशन्सवर वाढवण्यात येईल.

▪– प्रत्येक स्टेशनवर किमान एक टॉयलेट दिव्यांग प्रवाशांसाठी बनवण्यात येईल.
▪– रेल्वेप्रवाशांसाठी तिकिट काढताना इन्शुरन्सची सेवा.

��हमसफर, अंत्योदय, तेजस, उद्य या रेल्वेच्या चार नव्या सेवा

��भोपाळमधलं हबीबगंज रेल्वे स्टेशन देशातलं पहिलं मॉडेल स्टेशन बनणार. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार

��सध्या 100 रेल्वे स्टेशनवर वायफाय, येत्या 2 वर्षात 400 स्टेशनवर सुविधा सुर करणार

��कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार

��सिनिअर सिटीझन कोटा 50 टक्क्यांनी वाढवणार

��महिला आणि वृद्धांसाठी लोअर बर्थसाठी विशेष कोटा

��गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबवणार, मार्चअखेर 17 हजार बायोटॉयलेट्स स्टेशन आणि गाड्यांमध्ये बसवणार

��रेल्वे अर्थसंकल्प केवळ व्यवहाराचं गणित नव्हे, अपेक्षांचं प्रतिक

��जनरल डब्ब्यातही मोबाईल चार्जिंग पाईंटची सुविधा

��2020 पर्यंत हवं तेव्हा तिकीट रिझर्व्हेशन उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य- सुरेश प्रभू

��मेक इन इंडियामार्फत रेल्वेत 40 हजार कोटींची गुंतवणूक – सुरेश प्रभू

��2020 पर्यंत वेळेवर गाडी सोडणं, सर्वांना रिझर्व्हेशन देण्याचं लक्ष्य –

��2020 पर्यंत पहारेकरी नसलेले रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचं लक्ष्य

��जगभरात मंदी असताना, रेल्वे नफ्यात आणण्याचा प्रयत्न

��रेल्वेतील गुंतवणूक दुप्पटीने वाढेल

��रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी पारंपारिक मार्ग बंद करण्यात येतील
������
छोटी छोटी कामे सुद्धा रेल्वेसाठी महत्वाची
सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रेल्वे बजेट
यावर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये 8720 करोड रुपयांची बचत
〰〰〰〰〰〰〰〰〰
������������������

Tuesday, February 23, 2016

चालु घडामोडी ८०

चालू घडामोडी (23 फेब्रुवारी 2016)

राज्य सरकारचा कालबाह्य कायदे रद्द करण्याचा निर्णय :

स्वातंत्र्यपूर्व काळात अमलात आलेले आणि आता कालबाह्य ठरलेले कायदे रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

तसेच त्या अनुषंगाने राज्याच्या विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र कोडअंतर्गत सध्या वापरात नसलेल्या सुमारे 170 कायद्यांची यादी बनवली आहे.

याविषयी संबंधित विभागांचे अभिप्राय घेऊन हा प्रस्ताव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मांडण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राज्य विधी आयोगाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्र कोडमधील वापरात नसलेले जुने कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र कोडमधील 370 कायद्यांचा विधी व न्याय विभागातील विशेष समितीने वर्षभर अभ्यास केला.

तसेच यापूर्वी 1983 मध्ये काही निरुपयोगी कायदे रद्द करण्यात आले होते.

राज्यात 'ऍडव्होकेट ऍक्‍ट 1961' अस्तित्वात आल्यानंतर 'प्लीडर्स ऍक्‍ट' निरुपयोगी ठरला.

'बॉम्बे रिफ्युजी ऍक्‍ट 1947', 'बॉम्बे स्मोक न्यूसन्स ऍक्‍ट 1912', ब्रिटिशकालीन 'फोरफिटेड लॅंड ऍक्‍ट' अशी कालबाह्य ठरलेल्या सुमारे 170 कायद्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

तसेच हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास 'महाराष्ट्र कोड' मधील निम्मे कायदे रद्द होतील.
भारतीय महिला विजयी :

अनुजा पाटील (14 धावांत 3 बळी) आणि दीप्ती शर्मा (23 धावांत 2 बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने (दि.22) खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 लढतीत श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 130 धावांची मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्याचा संघाचा डाव 7 बाद 96 धावांत रोखल्या गेला.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदक :

राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 87 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना (दि.22) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदके, तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा सोहळा पार पडला.

सहा पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर 74 पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक देण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्पात कार्ड व्यवहारांसाठी करात विशेष सूट :

प्रत्यक्ष रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण कमी करतानाच वित्तीय व्यवहार डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पात कार्ड व्यवहारांसाठी करात विशेष सूट देण्यात येणार आहे. 

कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या देशातील व्यापाऱ्यांच्या अग्रगण्य संस्थेने या संदर्भात सरकारला आपला अहवाल सादर केला असून करात सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सध्या कोणत्याही दुकानात जिथे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते अशा ठिकाणी संबंधित दुकानदारास डेबिट कार्डावरून व्यवहार झाल्यास 0.75 टक्के ते एक टक्का तर क्रेडिट कार्डावरून व्यवहारा झाल्यास दोन टक्के कर आकारणी केली जाते.

बहुतांशवेळा हा संबंधित दुकानदार हा कर ग्राहकाच्याच खिशातून वसूल करतो, परिणामी, अनेक लोकांचा कल हा रोखीने व्यवहार करण्याकडे असतो.

परंतु, रोखीने होणाऱ्या व्यवहारांचा खर्चही जास्त आहे आणि रोखीने होणाऱ्या व्यवहारामुळे काळ्या पैशाचा प्रसार होण्याची भीती असते.

इलेक्ट्रॉनिक अथवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डाद्वारे व्यवहार वाढावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
पोलीस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ :

राज्यातील आगामी पोलीस भरतीसाठी वयाची मर्यादा वाढविण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाने संबंधित आदेश जारी केले असून ते पोलीस मुख्यालयाला प्राप्त झाले आहेत,
त्यांच्याकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयाची मर्यादा आता 25 वरून 28 वर्षे करण्यात आली आहे तर मागासवर्ग प्रवर्गासाठीची वयोमर्यादा 30 वरून 33 वर्षे करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

तसेच त्यासाठी पुरूष उमेदवारांची पाच किलोमीटरऐवजी 1,600 मीटर अंतर धावण्याची स्पर्धा होईल, तर महिलांना तीन किलोमीटरऐवजी 800 मीटर अंतर धावावे लागेल, दहा दिवस ही भरती प्रक्रिया चालेल.
‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार :

राज्य शासनातर्फे देण्यात येणारा 2015 वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली आहे.

पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली आहे.

मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या 27 फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येण्याची शक्यता आहे. 

साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास 2010 या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असून, 2015 या वर्षासाठी ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रा. ग. जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष, श्री. के. ज. पुरोहित, प्रा. द. मा. मिरासदार, श्री. ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके यांना गौरविण्यात आले आहे.
चीनच्या शस्त्र निर्यातीत वाढ :

चीनने मागील पाच वर्षांमध्ये आपल्या शस्त्रनिर्यातीत दुपटीने वाढ केल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

अत्याधुनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी चीनने प्रचंड पैसा गुंतविला असल्याचेही दिसून आले आहे.

चीनची शस्त्र आयात 2011 ते 2015 या काळात 25 टक्‍क्‍यांनी कमी झाली, यामुळे स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांवरील चीनचा विश्‍वास वाढल्याचेही दिसून येत आहे.

तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये चीनची मोठ्या शस्त्रांची निर्यात तब्बल 88 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

जगातील एकूण शस्त्रनिर्यातीत चीनचा वाटा 5.9 टक्के इतका आहे, हा वाटा रशिया आणि अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी असला तरी, त्यात आता वाढ होत आहे.

दक्षिण चीन समुद्रातील वादामुळे आणि हिंदी महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमुळे चीनने ही गुंतवणूक केली आहे.

अमेरिका आणि रशिया यांची शस्त्रनिर्यात अनुक्रमे 27 आणि 28 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.