〰〰〰〰〰〰〰〰〰
☑रेल्वे बजेट 2016,लोकप्रिय घोषणा
नाही, पायाभूत सुविधांवर भर
〰〰〰〰〰〰〰〰〰
मुंबईतील सर्व लहान प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार. तसंच प्रचंड गर्दीचा मार्ग असलेल्या चर्चगेट – विरार आणि सीएसटी – पनवेल मार्गावर उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
सुरेश प्रभू यांनी 2016-17 या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केलं. हे त्यांनी मांडलेलं सलग दुसरं बजेट होतं. यावर्षीही रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही नव्या लोकप्रिय घोषणा करण्याचं टाळलं. तसंच यंदाही पायाभूत सुविधांवरच भर दिला.
यावर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये 8720 करोड रुपयांची बचत झाल्याचा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला. तसंच मेक इन इंडियामार्फत रेल्वेत 40 हजार कोटींची गुंतवणूक होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
➡यंदा नवं काय?
▪*हमसफर, तेजस, उदय आणि अंत्योदय या नव्या गाड्या
▪*हमसफर – पूर्ण एसी कोच; जेवणाची सुविधा, तेजस – वेग ताशी 130 किमी; गाडीमध्ये टीव्ही, सिनेमा, मनोरंजनाची साधणं, वायफाय , उदय – डबलडेकर कोच; गर्दीच्या मार्गावर वाहतूक, 40 टक्के जास्त प्रवाशी वाहतूक शक्य; आणि अंत्योदय – लांब पल्ल्याची अनारक्षित सुपरफास्ट रेल्वे
▪*दीनदयालु कोच – पिण्याचं पाणी आणि मोबाईल चार्जिंग सुविधा
▪*2020 पर्यंत प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट
▪* 2018 पर्यंत 400 रेल्वे स्टेशनवर वायफाय
▪*जनरल डब्ब्यातही मोबाईल चार्जिंगची सुविधा
▪*वरिष्ठा नागरिकांचा कोटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवला, महिला आणि ज्येष्ठांसाठी लोअर बर्थच्या जागांत वाढ
▪*तान्ह्या बाळांसाठी बेबी फूड, दूध आणि गरम पाणी
▪*चर्चगेट – विरार आणि सीएसटी – पनवेल मार्गावर उन्नत मार्गाची घोषणा
▪*भोपाळमधलं हबीबगंज रेल्वे स्टेशन देशातलं पहिलं मॉडेल स्टेशन बनणार. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार
▪*रेल्वेतील कुलींचं सहाय्यक असं नामकरण, ड्रेसकोडही बदलणार
▪*रेल्वे ट्रॅकवरील मलमूत्र विसर्जन थांबवणार, रेल्वे स्टेशन आणि गाड्यांमध्ये बायोटॉयलेटची संख्या वाढवणार
➡रेल्वे बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे
▪रेल्वेच्या प्रत्येक कँटगरीच्या तिकीटात महिलांसाठी ३० टक्के आरक्षण. रेल्वेमंञ्यांची महिला वर्गाला मोठी भेट
▪दिव्यांग आणि वृद्धांना प्रवासात मदत करण्यासाठी सारथी सेवा. प्रायोगिक तत्वावर कोकण रेल्वेत सुरू करणार अंमलबजावणी
▪नांदेड,नाशिक,पाली साठी स्पेशल आस्था सर्किट ट्रेन्स चालवण्यात येतील
▪– कुलीजसाठी स्मार्ट नवीन युनिफॉर्म्स देण्यात येईल आणि त्यांना सहाय्यक म्हणण्यात येईल.
▪– एफएम रेडिओ चॅनल्स ला ऑनबोर्ड मनोरंजन सुविधा देण्यासाठी सांगण्यात आलंय,
▪– मुंबईच्या एमयूटीपी-३ च्या माध्यमातून चर्चगेट-विरार आणि सीएसटीएम-पनवेल असे दोन एलिव्हेटेड कॉरिडॉर्स.
▪– मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळदरम्यान डेजिकेटेड कॉरिडॉर.
▪रेल्वेच्या सर्व महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन्स आणि जीपीएस सिस्टीमचा वापर केला जाईल.
▪– ट्रेन कोलजन अवॉइडन्स सिस्टिम १०० पेक्षा जास्त मार्गांवर वापरात आणणार.
▪– सर्व लो प्लॅटफॉर्म्स ची उंची वाढवली जाईल.
▪– सर्व राज्यसरकानं ऑफिसटायमिंग बदलण्याची विनंती केली आहे ज्यामुळे ट्रेन्समधील गर्दी कमी होण्य़ास मदत होईल.
▪कचरा दिसल्यास तातडीने बोगीच्या स्वच्छतेची मागणी करता येणार
बाळांचे डायपर चेंज करण्यासाठी रेल्वेत टेबलची सुविधा
▪तान्ह्या बाळांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आधी बुकिंग केल्यास बेबीफूड आणि चिल्ड्रन्स मेन्यू देण्यात येईल.
▪अनरिझर्व्ह्ड पॅसेंजर्ससाठी दीनदयाल कोचेस नावानं स्पेशल कोचेस काही स्पेशल ट्रेन्समधे देण्यात येतील..यात जास्तीत जास्त मोबाईल चार्जर्स आणि पिण्याचे पाणी असेल
▪– हमसफर,तेजस आणि उदय या तीन रिझर्व कोच आणले जातील..हमसफर – फुल्ली एअरकंडशन्ड कोच..तेजस ऑनबोर्ड एंटरटेनमेंट,वायफाय कोच…उदय – डबलडेकर कोचेस.
▪– हँडहेल्ड टिकट वेंडर्स फॉर शॉर्टजर्नी
▪– जर्नलिस्टसाठी कन्सेशनल टिकिट.
▪– बारकोड तिकिटींग फॅसिलिटी.
▪– वेटलिस्टेड पॅसेजर्ससाठी विकल्प सिस्टिम इतर ट्रेन्समधेही वाढवण्यात येईल.
▪– पॅसेंजर्स एसएमसच्या माध्यमातून कोच स्वच्छतेसाठी मगणी करू शकतील
▪– 30000 बायोटॉयलेट्स ट्रेन्स आणि स्टेशन्सवर,
▪– प्रवाशांच्या जेवणासाठी आयआरसीटीसी स्वच्छ आणि वेळेत जेवळ पुरवतील..केटरिंगचा दर्जा आणि दायरा वाढवतील.
▪– लोकांना स्थानिक जेवणाचा ऑप्शन देण्यात येईल
▪– एकाच स्टॉलवर जेवण आणि औषधं असेही स्टॉल्स देण्यात येईल.
▪– महिलासांठी 33 टक्के बर्थ चा कोटा ठेवण्यात येईल.
▪– कोकण रेल्वेतील सारथी सेवा ज्यामुळे महिला आणि वृद्धांना सेवा देण्यात येते ती इतर स्टेशन्सवर वाढवण्यात येईल.
▪– प्रत्येक स्टेशनवर किमान एक टॉयलेट दिव्यांग प्रवाशांसाठी बनवण्यात येईल.
▪– रेल्वेप्रवाशांसाठी तिकिट काढताना इन्शुरन्सची सेवा.
हमसफर, अंत्योदय, तेजस, उद्य या रेल्वेच्या चार नव्या सेवा
भोपाळमधलं हबीबगंज रेल्वे स्टेशन देशातलं पहिलं मॉडेल स्टेशन बनणार. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार
सध्या 100 रेल्वे स्टेशनवर वायफाय, येत्या 2 वर्षात 400 स्टेशनवर सुविधा सुर करणार
कामात पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार
सिनिअर सिटीझन कोटा 50 टक्क्यांनी वाढवणार
महिला आणि वृद्धांसाठी लोअर बर्थसाठी विशेष कोटा
गाड्यांमधून मलमूत्र विसर्जन थांबवणार, मार्चअखेर 17 हजार बायोटॉयलेट्स स्टेशन आणि गाड्यांमध्ये बसवणार
रेल्वे अर्थसंकल्प केवळ व्यवहाराचं गणित नव्हे, अपेक्षांचं प्रतिक
जनरल डब्ब्यातही मोबाईल चार्जिंग पाईंटची सुविधा
2020 पर्यंत हवं तेव्हा तिकीट रिझर्व्हेशन उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य- सुरेश प्रभू
मेक इन इंडियामार्फत रेल्वेत 40 हजार कोटींची गुंतवणूक – सुरेश प्रभू
2020 पर्यंत वेळेवर गाडी सोडणं, सर्वांना रिझर्व्हेशन देण्याचं लक्ष्य –
2020 पर्यंत पहारेकरी नसलेले रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचं लक्ष्य
जगभरात मंदी असताना, रेल्वे नफ्यात आणण्याचा प्रयत्न
रेल्वेतील गुंतवणूक दुप्पटीने वाढेल
रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी पारंपारिक मार्ग बंद करण्यात येतील
छोटी छोटी कामे सुद्धा रेल्वेसाठी महत्वाची
सर्वसामान्य माणसाच्या हिताचं रेल्वे बजेट
यावर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये 8720 करोड रुपयांची बचत
〰〰〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment