Bookmark

Bookmark this Blog

Saturday, February 7, 2015

चालु घडामोडी ६

फेब्रुवारी २०१५

०१) जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलने ‘जी टॉक‘ ही सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
== १६ फेब्रुवारी २०१५ पासून

०२) गुगलने ‘जी टॉक‘ सेवेऐवजी आता कोणते अॅप्लिकेशन वापरण्याचा सल्ला मेसेजद्वारे आपल्या जी टॉक युजर्सना दिला आहे?
== गुगल हँगआऊट

०३) ‘मन पाखरु पाखरु‘, ‘प्रिती परी तुजवरती‘, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क‘, ‘तुज आहे तुजपाशी‘, ‘पळा पळा कोण पुढे पळे‘ या नाटकांमध्ये अभिनय केलेल्या कोणत्या अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== आत्माराम भेंडे

०४) आत्माराम भेंडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आले आहे?
== २००६-०७

०५) ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात(५०सावा) पुरस्काराने कोणत्या मराठी साहित्यिकास सन्मानित करण्यात आले आहे?
== भालचंद्र नेमाडे(२०१४ चा पुरस्कार)

०६) १९६५ पासून देण्यात येणाऱ्या ज्ञानपीठाचा मान मिळविणारे भालचंद्र नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरले असून, यापूर्वी हा सन्मानाने कोणास गौरविण्यात आले आहे?
== १९७४-वि.स. खांडेकर(‘ययाती’साठी)
>१९८७-वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज(‘विशाखा’साठी)
>२००३-गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर (‘अष्टदर्शने’साठी)
>२०१४-भालचंद्र नेमाडे(‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’साठी)

०७) भालचंद्र नेमाडेंची साहित्यसंपदा:-
>कादंबर्‍या:-
कोसला,बिढार,हिंदू -जगण्याची समृद्ध अडगळ,जरीला,झूल,

>कविता संग्रह:-
मेलडी,देखणी

>समीक्षा:-
>टीकास्वयंवर,साहित्याची भाषा,तुकाराम,द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी,नेटिविझम,इंडो – अँग्लियन रायटिंग्स

०८) भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार,मानसन्मान
- १९७६ - बिढार - ह. ना. आपटे पुरस्कार
- १९८४ - झूल - यशवंतराव चव्हाण (कऱ्हाड) पुरस्कार
- १९८७ - कुरुंदकर पुरस्कार, साहित्याची भाषा
- १९९१ - टीका स्वयंवर - साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९१ - देखणी - कुसुमाग्रज पुरस्कार
- १९९२ - देखणी - ना. धों. महानोर पुरस्कार
- २००२ - महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार
- २०१३ - नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार
- २०१५ - ज्ञानपीठ पुरस्कार(२०१४)
>उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट

०९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे शंभर दिवस कधी पूर्ण होत आहेत?
== ०७ फेब्रुवारी २०१५

१०) गांधीनगरमध्ये आयोजित ९व्या "प्लास्ट इंडिया-२०१५‘ या कार्यक्रमात मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
== वापी(गुजरात)

११) जागतिक तापमानवाढीवरील आंतरराष्ट्रीय परिषद पुढील वर्षी(२०१६) मध्ये कोठे होणार आहे?
== फ्रान्समधील पॅरिस येथे

१२) १९७५ साली प्रदर्शित झालेला व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला तसेच चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम नोंदविलेला अत्यंत लोकप्रिय असा कोणता चित्रपट पाकिस्तानमधील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे?
== शोले

१३) भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा हत्यारा व तमिळ टायगर रिबेलचा नेता असलेला कोणत्या व्यक्तीस परदेशात जाण्यास श्रीलंकन न्यायालयाने बंदी घातली आहे?
== कुमारन पथमंथम

१४) राजे फैजल आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते:-
भारतीय वंशाचे इस्लामिक विद्वान डॉ. झाकीर ए. नाईक:-इस्लामच्या सेवेबद्दल
विज्ञान श्रेणीतील पुरस्कार:- ग्राटझेल व रसायनशास्त्राचे प्रोफेसर ओमर मवान्नेस
इस्लामिक अभ्यासासाठीचा पुरस्कार:-डॉ. अब्दुल अजीज बिन अब्दुल रहमान काकी
वैद्यकीय क्षेत्रासाठीचा पुरस्कार:- प्रो. जेफ्री इव्हान गॉर्डन

१५) महाविद्यालय, विद्यापीठ आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यावर बंदी घालण्याबद्दल परिपत्रक जारी करा, असा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने राज्यसरकारला दिला आहे?
== मद्रास उच्च न्यायालय(तामिळनाडू)

१६) राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलाला नथुराम गोडसेंचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे?
== अलवर जिल्ह्यात

१७) नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पांतर्गत डिसेंबर २०१६ पर्यंत किती ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे?
== अडीच लाख

१८) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू असलेल्या कोणत्या तरुणाचा समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला आहे?
== मयूरेश भगवान पवार

१९) ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे हे कितव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते?
== ६१साव्या(नाशिक-१९८१)

२०) ११५ तास सलग कुराण पठण करून एक नवा विश्वविक्रम कोणी बनविला आहे़?
== नागपुरातील मोहम्मद शहजाद परवेज यांनी

Friday, February 6, 2015

भारताबद्दल थोडक्यात माहिती

1. भारताने लावलेले शोध 
��A. बुद्धिबळ 
��B. शून्य 
��C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला 
��D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील 
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे. 
��E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात 
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
��F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे. 
��G. योग - ५००० वर्षांपूर्वी 
��H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला. 
��I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध 
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.

��J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला 
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे 
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
��K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात
श्रीमंत देश होता.
��L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर 
देशावर विनाकारण हल्ला केला नाही. 
��M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत. 
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत. 
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
��N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील
एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान 
यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा 
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी 
होता. 
२००८मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने
वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 
��O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 
��P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात 
भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि
मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो. 
��Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे. 
��R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
��S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत. 
��T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत. 
��U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६
करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका 
विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस 
हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील
सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
m. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख 
लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक 
मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे. 
��V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे. 
दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही. 
o. १३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज 
असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे. 
��W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव
बँक आहे. 
��X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत 
पहिल्या ५० मध्ये आहेत. 
��Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा 
विश्वविक्रम नोंदविला आहे. 
��Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
��A. जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. 
ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. 
��B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, शिवाजी 
महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, देशासाठी 
प्राण त्यागलेले आणि प्राणपणाने लढलेल्या वीरांचा इतिहास असलेला 
भारत हा जगातील एकमेव देश आहे. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
��१८ प्रमुख भाषा,
��१,६०० द्वितीय भाषा,
��२९ प्रमुख सण,
��६,४०० जाती आणि उपजाती
��  ७ संघराज्य,
��२९ राज्य,
��६ मोठे धर्म,
��५२ मोठ्या जमाती
इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. 
��������������������������������

Thursday, February 5, 2015

चालु घडामोडी ५

#अतिसंभाव्य १०० प्रश्नोत्तरे
०१) लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार जाहीर:-
>लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर,
>विजय कुवळेकर व
>लक्ष्मण जोशी

०२) अलाहाबाद- निठारी हत्याकांड प्रकरण आरोपी असलेल्या कोणत्या व्यक्तीस ला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे?
== सुरेंद्र कोहली

०३) सुजाता सिंग यांच्या जागी नवे विदेश सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
== अमेरिकेतील भारताचे राजदूत डॉ.एस. जयशंकर (सुब्रमण्यम जयशंकर)

०४) कोणत्या देशाने  आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये परदेशी महिलांना पुरुषांचे व्हॉलीबॉल सामने बघता येणार, मात्र तेथील स्थानिक महिलांवरील बंदी कायम ठेवली आहे?
== इराण

०५) फ्रान्समधील 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकातील व्यंगचित्र प्रकाशित केल्याने मुंब्र्यातील कोणत्या स्थानिक ऊर्दू दैनिक'च्या संपादिका शिरीन दळवी यांना मुंब्रा पोलिसांनी अटक करून नंतर जामीनावर सुटका केली?
== अवधनामा

०६) व्हेनेझुएला या देशास अण्वस्त्रासंदर्भातील संवेदनशील माहिती देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमेरिकेमधील कोणत्या आण्विक शास्त्रज्ञास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली?
== पेड्रो लिओनार्डो मशेरोनी (मूळचे अर्जेंटिनाचे)

०७) रेव्ह= (रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्संपिरियन्स)

०८) नर्सरी व शाळाप्रवेश:-
नर्सरी प्रवेश-३ वर्षे पूर्ण-२०१६-१७ पासून लागू
शाळाप्रवेश(पहिली)-६ वर्षे पूर्ण-२०१९-२० लागू

०९) गोरखा राज्य निर्मितीसाठी आंदाेलन सुरु करणार्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== सुभाष घिसिंग

१०) जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी कोणाची  नेमणूक केली आहे?
== नारायण नदार पौल वसंतकुमार

११) क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणा-या खेळाडूंना दिल्या जाणा-या बक्षीसांच्या रक्कमेत किती वाढ केली आहे?
== ३० ते ७५ लाख (यापूर्वी २० ते ५० लाखांचे पारितोषिक दिले जायचे)
>सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला ७५ लाख रुपये
>आॅलिम्पिकमध्ये रौप्य विजेत्या खेळाडूला ५० आणि कांस्य विजेत्याला ३० लाख रुपये
>आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविल्यास ३० लाख आणि रौप्यपदक विजेत्याला २० आणि कांस्य विजेत्या खेळाडूला १० लाख रुपये

१२) क्रिकेट स्पर्धा कार्यक्रम:-
>टी - २० विश्वचषक:- ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ -भारत
>चॅम्पियन्स ट्रॉफी:- १ जून ते १९ जून २०१७-इंग्लंड
>विश्वचषक:-३० मे ते १५ जून २०१९ -इंग्लंड
>महिला विश्वकप:- ४ ते २७ आॅगस्ट २०१७-इंग्लंड
>महिला टी-२० विश्वकप:-  २ ते २५ नोव्हेंबर २०१८-वेस्ट इंडीज

१३) उत्तर प्रदेशच्या कोणत्या दोन आमदारांचे विधानसभेचे सदस्यत्व लोकायुक्तांच्या शिफारशीनुसार रद्द करण्याचे आदेश राज्यपाल राम नाईक यांनी दिले आहेत?
==   बसपा आमदार उमाशंकर सिंग (बलियाच्या रसडा मतदारसंघ) आणि भाजपा आमदार बजरंग बहादूर सिंग(महाराजगंजच्या फरेंदा मतदारसंघ)
> लोकायुक्त:-  न्या.एन के मेहरोत्रा

१४) ३,६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी चॉपर करारात लाच दिल्याच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने कोणत्या दोन देशांना न्यायालयीन विनंतीपत्रे पाठविली आहेत?
== इटली व ट्युनिशिया

१५) कोणत्या कंपनीकडून ३,२०० कोटी करवसुलीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल राज्य सरकारच्या विरोधात गेल्यानंतर सरकारने कंपनीला करातून सूट देण्याची भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात जाणे टाळले आहे?
== व्होडाफोन

१६) केरळ राष्ट्रीय स्पर्धा:-
>३३ क्रीडा प्रकारांत देशातील ३० राज्ये व पाच केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडू सहभागी
>३३ क्रीडा प्रकारांत प्रत्येकी ४१४ सुवर्ण, ४१४ रौप्य व ५४१ कांस्यपदकांची लयलूट
>केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये स्पर्धा होणार
>त्रिवेंद्रम मीनामकुलम क्रीडानगरी

१७) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या २०१० च्या इंग्लंड दौऱ्यात स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरा जात असलेल्या कोणत्या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे?
== मोहम्मद आमिर

१८) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर संकलन वाढविण्याच्या दृष्टीने आता वित्तमंत्रालयाने कर विभागातील उच्चाधिका-याचे एक विशेष पथक तयार केले असून, याकरिता विशेष २०० अधिकाऱ्यांची निवड केली आहे.आयुक्त दर्जाच्या ४० अधिकाऱ्यांची याकरिता नेमणूक करण्यात आली असून, या अधिकाऱ्यांना कोणते पदनाम देण्यात आले आहे?
== लेखा परीक्षण आयुक्त

१९) ६६व्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात सामील झालेले चित्ररथ:-
> महाराष्ट्र:- प्रथम क्रमांक (दिग्दर्शक शेखर मोरे)
>झारखंड:-दुसरा क्रमांक
>कर्नाटक:-तिसरा क्रमांक

२०) शासनाने अग्निशमन सुरक्षा बळकटीकरण योजनेंतर्गत राज्यातील ‘ब’ दर्जाच्या किती  नगर परिषदांना मिनी अग्निशमन वाहन उपलब्ध करून दिले आहे?(क्षमता ३०० लिटर)
== १६

२१)  यंदाच्या प्रजासत्ताक दिन पथ संचलनात नॅशनल कॅडेट कॉर्प्स(एनसीसी)चा सर्वोच्च बहुमान असणा-या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद कोणत्या संघाला  मिळाले आहे?
== महाराष्ट्र(विजेतेपद-पंजाबला)

२२)‘व्हाईट हाऊस’च्या संकेतस्थळावर कोणत्या पथकाचा परेडचा फोटो ‘अपलोड’ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजीचा ‘फोटो आॅफ द डे’ असा याचा उल्लेख करण्यात आला आहे?
== नागपूर लेझीम पथक (नागपूर दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र)

२३) इंडिया रेटिंग्ज अहवाल:-
>राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदाद आधार वर्ष २००४-०५ होते ते आता २०११-१२ आहे.
>२०१३-१४ सालाचा जीडीपी ११,७०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला.
>२०१२-१३ चा जीडीपी ९३,८९० अब्ज रुपये होता.
>२०१३-१४ ची अर्थव्यवस्था ६ टक्के वाढली असून, १ लाख ११ हजार ७०० अब्ज रुपयांची (१८०० अब्ज डॉलर) झाली आहे.
>भारताची महसुली तूट २०१३-१४ सालात कमी झाली असून, ती जीडीपीच्या ४.३ टक्के होईल. २०१३-१४ मध्ये तो जीडीपीच्या ४.६ टक्के होती. तसेच कॅड (चालू तूट) जीडीपीच्या १.६ ते १.७ टक्का होईल.
>२०१९-२० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ३ हजार अब्ज डॉलरची होईल. आधार वर्ष २००४-०५ ठेवल्यास हा टप्पा २०२०-२१ मध्ये गाठला जाईल.

२४) चितळे समितीने ठपका ठेवलेल्या कोणत्या १२ पाटबंधारे प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) खुली चौकशी करण्यात येत आहे?
== कोंढाणे, चणेरा, बाळगंगा, काळू, शाई, सुसरी, गड नदी, शीळ, जमदा, शिरशिंगे, काळकुंभे व गडगडी.

२५) प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) आयुक्त महेश झगडे यांनी काढलेल्या दलालमुक्तीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे?
== नागपूर खंडपीठ
>याचिकाकर्ते:- अकोला ट्रक ओनर्स असोसिएशन
> न्या. भूषण गवई आणि न्या. मृदुला भटकर यांच्या खंडपीठासमक्ष

२६) भारताच्या सामरिक नीती क्षेत्राचे "गुरू‘ म्हणून कोणास ओळखले जाते?
== के. सुब्रह्मण्यम (नवे परराष्ट्रसचिव एस. जयशंकर यांचे वडील)

२७) प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर या वर्षी झालेल्या संचलनातील सुमारे २६चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा अद्वितीय सांस्कृतिक सोहळा असलेल्या कोणत्या  विषयावरील चित्ररथाने अव्वल क्रमांक पटकावला आहे?
== पंढरीची वारी (एकूण सहाव्यांदा हा बहुमान)
>झारखंडला (मलुटी या आदिवासी गावाची प्रतिकृती) व्दितीय क्रमांक  व
>कर्नाटक (चेन्नापट्टमचा खेळणी उद्योग) तृतीय क्रमांक
>राज्याचे सांस्कृतिक सहसंचालक मनोज सानप

२८) चित्ररथात महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा:-
>राज्याच्या निर्मितीनंतर पहिली ११ वर्षे महाराष्ट्राचा सहभागी नव्हता.
प्रथम पारितोषिक व चित्ररथ
१९८०- शिवराज्याभिषेक 
१९८३-बैलपोळा
१९९३-लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष
१९९४-हापूस आंबा
१९९५-बापू स्मृती
१९८६-भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान(व्दितीय पारितोषिक)
१९८८-लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला(व्दितीय पारितोषिक)
२००७-जेजुरीचा खंडेराय’(तृतीय पारितोषिक)
२००९-धनगर (व्दितीय पारितोषिक)  

२९) प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात किती पथकांनी भाग घेतला होता?
== केंद्रीय मंत्रालयाच्या ९ आणि विविध राज्यांतील १६ चित्ररथांनी

३०) ९५वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बेळगाव ६-८ फेब्रुवारी २०१५:-
>उद्‌घाटक:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रमुख पाहुणे:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

३१) भारतीय हॉकी संघाचे नवीन प्रशिक्षक:-
>पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नेदरलॅंड्‌सच्या पॉल व्हॅन ऍस
>महिला संघाच्या प्रशिक्षकपदी न्यूझीलंडच्या ऍन्थोनी थॉर्नटॉन

३२) केरळ येथे होणार्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा ब्रॅंड ऍम्बॅसॅडर कोण आहे?
== सचिन तेंडुलकर

३३) येत्या विश्वयकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना टाय झाला तर विजेता निश्चिहत करण्यासाठी कोणत्या पध्दतीचा वापर करण्याचा निर्णय आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत करण्यात आला आहे?
== सुपर ओव्हर(बैठकीचे अध्यक्ष:- एन. श्रीनिवासन)

३४) महाराष्ट्र बॉक्सिंेग संघटनेचे अध्यक्ष:- जय कवळी
> महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना सचिव:- बाळासाहेब लांडगे

३५) लंडन (१९४८) आणि हेलसिंकी (१९५२) या दोन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य असलेल्या कोणत्या खेळाडूचे नुकतेच निधन झाले आहे?
== जसवंतसिंह राजपूत

३६) भारतातील कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने यंदाच्या विश्व करंडक स्पर्धेसाठी वेस्ट इंडीजच्या संघाचे प्रायोजकत्व घेतले आहे?
== येप-मी

३७) ऑस्ट्रेलियाचा या वर्षीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आलेला व त्याला "ऍलन बोर्डर‘ पदकाने गौरविण्यात आलेला खेळाडू कोण?
== कर्णधार स्टिव्ह स्मिथ

३८) ल्यूक रॉंची आणि ग्रॅंट एलियट यांनी श्रीलंकेविरुध्द खेळतांना किती धावांची विश्वलविक्रमी भागीदारी सहाव्या विकेटसाठी केली आहे?
== २६७ धावा

३९) अग्नि-५ क्षेपणास्त्र
>आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
>फक्त भारत,अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स देशांकडेच
>१७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद
>वजन ५० टन
>एक टन अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता
>रेंज:-पाच हजार किलोमीटर

४०)  'अग्नि-५' हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रात नेमक्या दिशेनं मार्गक्रमणा करण्यासाठी कशाचा वापर करण्यात आला आहे?
== गायरोस्कोप आणि अॅक्सिलॅरॉमीटर

४१) ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ विजेते:-
>पुरुष एकेरीः नोव्हाक जोकोविच
>महिला एकेरीः सेरेना विल्यम्स
>पुरुष दुहेरीः बोलेली-फॉग्निनी
>महिला दुहेरीः सँड्स-सॅफारोव्हा
>मिश्र दुहेरीः पेस-हिंगिस

४२) १९९७, ९८, ९९ अशी सलग तीनवेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकाविणारी खेळाडू कोण?
== मार्टिना हिंगीस

४३) भारताचा सदाबहार टेनिसपटू लिअँडर पेसने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम २०१५ जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
== पंधरावे ग्रँडस्लॅम जेतेपद

४४) नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धा पाचव्यांदा जिंकत कारकिर्दीतील कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले?
== आठवे ग्रँडस्लॅम जेतेपद

४५) ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा बहुमान कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे?
== रॉय इमर्सन-ऑस्ट्रेलिया

४६) ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-केरळ
>प्रमुख पाहुणे:-केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू
>सदिच्छा दूत:-सचिन तेंडूलकर
>क्रीडाज्योत प्रज्वलन:- सचिन तेंडूलकर,पी.टी.उषा व अंजू बॉबी जॉर्ज
>सूत्रसंचालन:- अमिताभ बच्चन
>मल्याळम अभिनेता मोहन लाल विशेष नृत्य व गायन
>मोटो/स्लोगन:-गेट सेट प्ले
>बोधचिन्ह:-Ammu (The Great Hornbill, the State Bird of Kerala)

४७) २७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळ मध्ये कधी आयोजित करण्यात आल्या होत्या?
== १९८७

४८) ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण?
== संगीता चानू खुमुकचाम

४९) कर्नाटकमधील जमखंडी येथे आयोजित भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता असलेल्या 'हिंद केसरी' किताबावर नाव कोरत ऐतिहासिक विजय कोणी  मिळवला?
== सुनील साळुंखे(सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील बामणी गावातील)

५०) ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धेचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविणार्या लिअँडर पेसचे हे मिश्र दुहेरीतील कितवे जेतेपद आहे?
== सातवे (मार्टिना हिंगीसचे ११वे ग्रॅण्ड स्लॅम)

५१) सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँडस्लॅम स्पर्धेचे सहाव्यांदा विजेतेपद पटकावीत एकूण किती ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे?
== १९

५२) खुल्या स्पर्धाच्या युगात(ऑस्ट्रेलियन ओपन) विजेतेपद मिळवणारी  सर्वात प्रौढ खेळाडू कोण ठरली आहे?
== सेरेना विलियम्स(वय ३३ वर्षे)

५३) विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर वेस्ट इंडिजचा कोणत्या  अष्टपैलू क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
== ड्वेन ब्राव्हो

५४) ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वात मोठय़ा वयाची जोडी कोणती होती?
लिअँडर पेस(४१)- मार्टिना हिंगीस(३४)

५५) टेनिस मध्ये सर्वाधिक जेतेपद मिळवणा-या महिला टेनिसपटूंमध्ये तिस-या स्थानी झेप घेणारी खेळाडू कोण?
==  सेरेना विल्यम्स(१९ जेतेपद)
>मार्गारेट कोर्ट (२४ जेतेपदे)
>स्टेफी ग्राफ (२२ जेतेपदे)

५६) आमदार आदर्श ग्राम योजना
>२०१६ पर्यंत एक आणि २०१९ पर्यंत दोन गावे आमदारांना दत्तक घ्यावी लागणार
>विधानसभा सदस्य २८९
>विधान परिषद सदस्य ७६
>एकूण सदस्य ३६७
>एकूण दत्तक गावे ११०१
>प्रभारी अधिकारी:-जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी
>संपर्क अधिकारी:-जिल्हा नियोजन अधिकारी

५७) भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट सामन्याचे समालोचन कोण करणार आहेत?
== अमिताभ बच्चन-कपिल देव-शोएब अख्तर

५८) नागालँडमधील दिमापूर येथे भारतीय लष्कराचे कोणते  हेलिकॉप्टर उड्डाण घेताच कोसळले आहे?
== चिता

५९) ६०वा फिल्म फेअर पुरस्कार:-
>क्वीन- सर्वोत्कृष्ट चित्रपट
>सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-विकास बहल(क्वीन)
>सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- कंगना राणावत(क्वीन)
>सर्वोत्कृष्ट अभिनेता:-शाहीद कपूर(हैदर)
>सर्वोत्कृष्ट साहाय्यक भूमिका:- तब्बू आणि के. के. मेनन((हैदर)
>परीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट:-आँखो देखी
>परीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेता:-संजय मिश्रा(आँखो देखी)
>परीक्षकांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री:- आलिया भट(हायवे)
>सर्वोत्कृष्ट  संगीत:-शंकर-एहसान-लॉय(टू स्टेट्‌स)
>पार्श्वगायन:- अंकित तिवारीला "एक व्हिलन‘मधल्या "गलियॉंसाठी तर कनिका कपूरला "बेबी डॉल"साठी
>गीतकार:- रश्मीं सिंग -मुस्कुराने की वजह(सिटी लाइट्‌स)
>सर्वोत्कृष्ट संवाद आणि पटकथा:- पीके

६०) तीस वर्षांपूर्वीच्या शीख विरोधी दंगलीच्या फेरचौकशीची शक्य ता पडताळून पाहण्यासाठी मागील वर्षी २३  डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे यांच्या कोणाच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली होती?
== माजी सरन्यायाधीश जी. पी. माथूर

६१) "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसीस) या दहशतवादी संघटनेने कोणत्या अपहृत जपानी पत्रकाराची हत्या केली असून यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे?
== केनजी गोटो

६२) पंधरावर्षांच्या पूर्वीच्या वाहनांवर कोणत्या राज्यसरकारच्या वाहतूक विभागाने हरित कर आकारण्यास सुरुवात केली आहे.
== उत्तर प्रदेश

६३) जन्मनियंत्रण करणाऱ्या पहिल्या वैद्यकीय रसायनाचा शोध लावणार्या कोणत्या  शास्त्रज्ञाचे नुकतेच निधन झाले आहे?
== कार्ल डिजेरसी

६४) "धिस मॅन्स पिल‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== कार्ल डिजेरसी

६५) माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच भारताच्या लूक ईस्ट पॉलिसीचे नामकरण करून कोणते नवीन नाव दिलं आहे?
== ॲक्टल ईस्ट पॉलिसी

६६) अमेरिकाप्रणित आघाडीच्या फौजांनी इराकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट (आयसिस) संघटनेचा रासायनिक शस्त्रांमधील एक तज्ज्ञ मारला गेल्याचे वृत्त आहे त्याचे नाव काय होते?
== अबू मलिक

६७) वांगी, मका, तांदूळ, कापूस आणि काबुली चणे या पाच पिकांच्या जनुकीय सुधारित (जीएम) बियाण्यांची प्रत्यक्ष शेतात चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "ना हरकत‘ प्रमाणपत्र दिले आहे. शेतामध्ये चाचणी घ्यायची असल्यास राज्य शासनाकडून "ना हरकत‘ घेणे कंपन्यांना कधीपासून  पासून बंधनकारक करण्यात आले आहे?
== २०११पासून  (महाराष्ट्रासह पंजाब, हरियाना, दिल्ली आणि आंध्र प्रदेशमध्ये परवानगी)

६८) कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीच्या झालेल्या बैठकीत या पाच पिकांच्या चाचणीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने तांदळाच्या बीटी आणि इतर दोन वाणांच्या चाचणीसाठीही परवानगी दिली आहे?
== अनिल काकोडकर

६९) "टू इअर्स एट मंथस अँड ट्‌वेंटी एट नाईट्‌स‘ या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
== सलमान रश्दीइ

७०) केरळमध्ये सुरू असलेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळविण्याचा मान वेटलिफ्टिंगमध्ये कोणी मिळविला?
== दीक्षा गायकवाड (५३ किलो वजन गटात रौप्य पदक पटकाविले)

७१) भारताच्या विदेश दौर्यावर येणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?
== ड्वाइट आइज़नहॉवर (Dwight Eisenhower)-१९५९

७२) गॉर्ड ऑफ ऑनर (Guard of Honour) देणारी विंग कमांडर पूजा ठाकूर वायुसेनेच्या कोणत्या शाखेत काम करते?
== पब्लिसिटी सेल

७३) यू.एस. सीक्रेट सर्विस (US Secret Service) च्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका ठिकाणी किती मिनिटे थांबू शकतात?
== ४५ मिनिटे

७४) प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टमध्ये आर्मीचे प्रतिनिधित्व कोणी केले होते?
== कॅप्टन दिव्या अजीत

७५) प्रजासत्ताक दिनाच्या मार्च पास्टमध्ये तिरंगा ध्वज फडकाविण्याचा बहुमान प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
== कॅप्टन हाओबाम बेला देवी(मणिपूर)

७६) एलेक्सिस सिपरस( सिरीज़ा पार्टी) हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत?
== ग्रीस

७७) भारत सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जाणारे आर.के.लक्ष्मण यांची  “यू सेड इट” ही चित्रमालिका टाईम्स ऑफ इंडिया मध्ये कधीपासून प्रकाशित होत आहे?
== १९५१

७८) ६३व्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेची विजेती कोण ठरली आहे?
==  पॉलीना वेगा

७९) २०१४मध्ये  जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते ठरले आहे?
== दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

८०) २६ जानेवारी २०१५ ला पृथ्वीच्या अगदी जवळून गेलेल्या लघुग्रहाचे नाव काय होते?
== २००४ बी.एल.८६

८१) २०साव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
== न्या.ए पी शाह

८२) खनिज संपदेने समृद्ध विदर्भात येत्या सहा महिन्यांत तीन नव्या मँगनीज खाणी सुरू होणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.यातील लवकरच कोणत्या दोन ठिकाणी खाणी उभारल्या जाणार आहेत?
== परसोडा आणि  खापा

८३) ‘मिहान:-‘मल्टिमोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर’
>क्षेत्रफळ:- ४ हजार ३५४ हेक्टणर
>पहिली धावपट्टी:- ३६०० मीटर
>दुसरी धावपट्टी:- ४ हजार मीटर
>विशेष आर्थिक क्षेत्र:- २ हजार ८६ हेक्टोर
>५६ कंपन्यांनी जागा खरेदी:१२ १२ कंपन्यांचा श्रीगणेशा

८४) जर्मनी आणि हॉलंडमध्ये प्रसिध्द होणारा ‘मामाच्या गावाला जाऊया‘ चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
== समीर हेमंत जोशी

८५) महाराष्ट्र सदनातील संपर्काधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्या अधिकारी महिलेची नुकतीच मुंबईला बदली करण्यात आली आहे?
== संध्या पवार

८६) २००७  मध्ये "व्होडाफोन‘ने "सीजीपी इनव्हेस्टमेंट्‌स‘चे सर्व शेअर खरेदी केले. त्यामुळे "व्होडाफोन‘कडे आपोआपच कोणत्या कंपनीच्या ५२  टक्के शेअरची मालकी आली होती?
== हचिसन्स एस्सार

८७) ब्रिटनमधील पहिल्या स्त्री बिशप म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे?
== रेव्हरंड लिबी लेन (स्टॉकपोर्ट)

८८) इस्लामिक स्टेट (इसिस) प्रणित तथाकथित खिलाफतचे कार्यक्षेत्र वाढविताना खुरासान (अफगाणिस्तान) प्रांताचा सुभेदार (वाली) म्हणून तेहरिक-इ-तालिबान संघटनेचा कोणत्या नेत्याला नेमण्यात आले आहे?
== हफीझ सईद खान

८९) भारताचे महालेखापाल (कॅग) यांचा महाराष्ट्रातील रस्त्यांसंबंधी अहवाल:-
>असा आहे फरक:-
२.७०लाख किलोमीटर रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट
२.४३लाख किलोमीटर रस्त्यांचेच काम पूर्ण
>बॅकलॉग किलोमीटरमध्ये
अमरावती - १३,६७७ किलोमीटर
औरंगाबाद - ३,२७७ किलोमीटर.
कोकण - २७१७ किलोमीटर.
नागपूर - ८८७८ किलोमीटर.
नाशिक - ३६५० किलोमीटर.
पुणे - २२६६  किलोमीटर.

९०) पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या सुमारे सात लाख भारतीय जवानांच्या योगदानाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी छायाचित्रे आणि काही वस्तूंचे प्रदर्शन कोठे भरविण्यात आले आहे?
== दिल्ली "इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस‘ (आयजीएनसीए)

९१) The Secret Story of India's Quest to be a Nuclear Power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== राज चेंगप्पा

९२) 'बेटी बचाव, बेटी पढाओ मोहिमेची सुरुवात २२  जानेवारी २०१५ रोजी कोठून करण्यात आली?
== पानिपत,हरियाणा

९३) गंगा नदीच्या अभियानासाठी श्रीमती उमा भारती यांनी कोणते वर्ष "जलक्रांती वर्ष' म्हणून घोषित केले आहे?
== २०१५-१६

९४) ‘The Theory of Everything’ हा चित्रपट कोणत्या भौतिकशास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित आहे?
== स्टिफन हॉकिंग

९५) १९८० मध्ये गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे (जीएनएलएफ) ची स्थापना करणार्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
सुभाष घिशिंग
>दार्जिलिंग गोरखा परिषदचे १९८८ ते २००८ या कालावधीपर्यंत ते अध्यक्ष होते.

९६) वीज वितरण, जोडणी, देखभाल व दुरुस्तीचे प्रश्न स्थानिक पातळीवर तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हानिहाय फिडर व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाणार असून, त्यात कोणाचा समावेश असणार आहे?
== स्थानिक आमदार व महावितरण कंपनीचे अधिकारी

९७) 'युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड' (ईजीएमओ) या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच भाग घेत आहे.या स्पर्धेत महाराष्ट्रातून कोणत्या दोन मुलींची निवड करण्यात आली आहे?
== प्रांजल पांडुरंग वऱ्हाडे(नागपूर) आणि रागिणी पत्की(पुणे)

९८) बिहारमधील कोणत्या  जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात नुकताच बॉम्बस्फोट झाला होता?
==  आरा जिल्हा सत्र न्यायालय

९९) ८ मार्च २०१४ रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे ‘एमएच ३७०’ हे मलेशिया एअरलाईन्सचे बेपत्ता विमान अपघातग्रस्त झाल्याचे मलेशिया सरकारने जाहीर केले असून यात किती भारतीय मृत घोषित करण्यात आले आहेत?
== ५
एकूण २३९

१००) येमेनच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ताब्यात घेणा-या हाऊथी बंडखोरांनी  कोणास बंधक बनवले आहे?
== राष्ट्राध्यक्ष अबेद राबो मनसूर हडी