फेब्रुवारी २०१५
०१) जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलने ‘जी टॉक‘ ही सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
== १६ फेब्रुवारी २०१५ पासून
०२) गुगलने ‘जी टॉक‘ सेवेऐवजी आता कोणते अॅप्लिकेशन वापरण्याचा सल्ला मेसेजद्वारे आपल्या जी टॉक युजर्सना दिला आहे?
== गुगल हँगआऊट
०३) ‘मन पाखरु पाखरु‘, ‘प्रिती परी तुजवरती‘, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क‘, ‘तुज आहे तुजपाशी‘, ‘पळा पळा कोण पुढे पळे‘ या नाटकांमध्ये अभिनय केलेल्या कोणत्या अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== आत्माराम भेंडे
०४) आत्माराम भेंडे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य सांस्कृतिक पुरस्काराने कधी सन्मानित करण्यात आले आहे?
== २००६-०७
०५) ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात(५०सावा) पुरस्काराने कोणत्या मराठी साहित्यिकास सन्मानित करण्यात आले आहे?
== भालचंद्र नेमाडे(२०१४ चा पुरस्कार)
०६) १९६५ पासून देण्यात येणाऱ्या ज्ञानपीठाचा मान मिळविणारे भालचंद्र नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरले असून, यापूर्वी हा सन्मानाने कोणास गौरविण्यात आले आहे?
== १९७४-वि.स. खांडेकर(‘ययाती’साठी)
>१९८७-वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज(‘विशाखा’साठी)
>२००३-गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर (‘अष्टदर्शने’साठी)
>२०१४-भालचंद्र नेमाडे(‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’साठी)
०७) भालचंद्र नेमाडेंची साहित्यसंपदा:-
>कादंबर्या:-
कोसला,बिढार,हिंदू -जगण्याची समृद्ध अडगळ,जरीला,झूल,
>कविता संग्रह:-
मेलडी,देखणी
>समीक्षा:-
>टीकास्वयंवर,साहित्याची भाषा,तुकाराम,द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी,नेटिविझम,इंडो – अँग्लियन रायटिंग्स
०८) भालचंद्र नेमाडे यांना मिळालेले पुरस्कार,मानसन्मान
- १९७६ - बिढार - ह. ना. आपटे पुरस्कार
- १९८४ - झूल - यशवंतराव चव्हाण (कऱ्हाड) पुरस्कार
- १९८७ - कुरुंदकर पुरस्कार, साहित्याची भाषा
- १९९१ - टीका स्वयंवर - साहित्य अकादमी पुरस्कार
- १९९१ - देखणी - कुसुमाग्रज पुरस्कार
- १९९२ - देखणी - ना. धों. महानोर पुरस्कार
- २००२ - महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार
- २०१३ - नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार
- २०१५ - ज्ञानपीठ पुरस्कार(२०१४)
>उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट
०९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे शंभर दिवस कधी पूर्ण होत आहेत?
== ०७ फेब्रुवारी २०१५
१०) गांधीनगरमध्ये आयोजित ९व्या "प्लास्ट इंडिया-२०१५‘ या कार्यक्रमात मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ कोठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
== वापी(गुजरात)
११) जागतिक तापमानवाढीवरील आंतरराष्ट्रीय परिषद पुढील वर्षी(२०१६) मध्ये कोठे होणार आहे?
== फ्रान्समधील पॅरिस येथे
१२) १९७५ साली प्रदर्शित झालेला व अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला तसेच चित्रपटसृष्टीत अनेक विक्रम नोंदविलेला अत्यंत लोकप्रिय असा कोणता चित्रपट पाकिस्तानमधील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे?
== शोले
१३) भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा हत्यारा व तमिळ टायगर रिबेलचा नेता असलेला कोणत्या व्यक्तीस परदेशात जाण्यास श्रीलंकन न्यायालयाने बंदी घातली आहे?
== कुमारन पथमंथम
१४) राजे फैजल आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते:-
भारतीय वंशाचे इस्लामिक विद्वान डॉ. झाकीर ए. नाईक:-इस्लामच्या सेवेबद्दल
विज्ञान श्रेणीतील पुरस्कार:- ग्राटझेल व रसायनशास्त्राचे प्रोफेसर ओमर मवान्नेस
इस्लामिक अभ्यासासाठीचा पुरस्कार:-डॉ. अब्दुल अजीज बिन अब्दुल रहमान काकी
वैद्यकीय क्षेत्रासाठीचा पुरस्कार:- प्रो. जेफ्री इव्हान गॉर्डन
१५) महाविद्यालय, विद्यापीठ आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यावर बंदी घालण्याबद्दल परिपत्रक जारी करा, असा आदेश कोणत्या उच्च न्यायालयाने राज्यसरकारला दिला आहे?
== मद्रास उच्च न्यायालय(तामिळनाडू)
१६) राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलाला नथुराम गोडसेंचे नाव दिल्याने वाद निर्माण झाला आहे?
== अलवर जिल्ह्यात
१७) नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पांतर्गत डिसेंबर २०१६ पर्यंत किती ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य आहे?
== अडीच लाख
१८) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू असलेल्या कोणत्या तरुणाचा समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला आहे?
== मयूरेश भगवान पवार
१९) ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे हे कितव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते?
== ६१साव्या(नाशिक-१९८१)
२०) ११५ तास सलग कुराण पठण करून एक नवा विश्वविक्रम कोणी बनविला आहे़?
== नागपुरातील मोहम्मद शहजाद परवेज यांनी
No comments:
Post a Comment