Bookmark

Bookmark this Blog

Saturday, November 21, 2015

भारत-ब्रिटन नागरी अनुकरार

भारत-ब्रिटन यांच्यात नागरी अणुकरार

भारत आणि इंग्लंड यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नागरी आण्विक करारावर इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याबरोबरच उभय देशांत ९ बिलियन पौंडचा व्यापारी करारही झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये आगमन झाल्यानंतर ब्रिटिश लष्कराच्या पथकाने त्यांना मानवंदना दिली. कॅमेरून आणि मोदी यांच्यात १० डाउनस्ट्रीट येथे सुमारे ९० मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली.याशिवाय युनोच्या सुरक्षा परिषदेतील भारताच्या समावेशाला ब्रिटनचा पाठिंबा असल्याचेही कॅमेरून यांनी सांगितले.त्यानंतर जगातील लोकशाही व्यवस्थेचे मंदिर असलेल्या ऐतिहासिक बिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत भाषण दिले. स्वच्छ ऊर्जेसाठी ब्रिटनची मोठी गुंतवणूक अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील सुमारे ३.२ अब्ज पौंड किमतीच्या व्यावसायिक करारावर भारत आणि ब्रिटनने स्वाक्षऱ्या केल्या.स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रामधील गुंतवणुकीला चालना देण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले असून, स्वच्छ ऊर्जा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी नवे शोध आणि संशोधनावर जोर देण्याच्या दृष्टीने भारत आणि ब्रिटनने करार केला आहे.स्वच्छ ऊर्जा संशोधन कार्यक्रमासाठी एक कोटी पौंडांचा निधी संयुक्तरीत्या उपलब्ध करून देण्याची तयारी दोन्ही देशांच्या प्रमुखांनी दर्शविली आहे. या वेळी कॅमेरॉन यांनी भारत आणि आफ्रिकेतील अपारंपरिक ऊर्जेशी संबंधित प्रकल्पांसाठी मोठा निधी ब्रिटन उपलब्ध करून देईल, अशी घोषणा केली.  ब्रिटनसोबत आतापर्यंत झालेले करार ब्रिटनमधील ऊर्जा कंपन्यांकडून भारतातील गुंतवणूक २.९ वरून ३.४ अब्ज पौंड.किंग्ज कॉलेज हॉस्पिटल, नॅशनल हेल्थ सर्व्हिस ट्रस्ट आणि इंडो-ब्रिटन हेल्थकेअर यांच्यात चंडीगडमध्ये किंग्ज कॉलेज हॉस्पिटल स्थापण्याबाबत करार. मर्लिन एंटरटेन्मेंटची भारतात पहिल्यांदाच गुंतवणुकीची घोषणा. २०१७ पर्यंत नवी दिल्लीत मादाम तुसाँ वस्तुसंग्रहालय बांधण्यात येईल.जेनस एबीसी १० लाख पौंडच्या मदतीने पुण्याजवळ आर्ट फॅसिलिटी उघडणार.ब्रिटन आणि युरोपमध्ये सौरसंच बनवणाऱ्या ‘लाइफसोर्स’ची दोन अब्ज पौंड गुंतवणुकीची घोषणा. व्होडाफोन ‘मेक इन इंडिया’अंतर्गत योजनेच्या मदतीसाठी भारतात १३,००० कोटी रुपये गुंतवणुकीची घोषणा  ‘इंटेलिजंट एनर्जी’चा स्वच्छ ऊर्जेअंतर्गत २७,४०० टॉवर उभारण्यासाठी करारहॉलंड ॲण्ड बॅरेट इंटरनॅशनलचा अपोलो हॉस्पिटलसाठी दोनशे लाख पौंडचा व्यवहार इंडियन बुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडची ओकनार्थ बॅंक लिमिटेडमध्ये ६६० लाख पौंडची गुंतवणूक

जागतिक मानव विकास अहवाल

जागतिक मानव विकास अहवाल :
1. 1990 मानव विकासाची संकल्पना व मापन
2. 1991 मानव विकासासाठी वित्तीय मदत
3. 1992 मानव विकासाची जागतिक परिमाणे
4. 1993 जन-सहभाग
5. 1994 मानवी सुरक्षेची नवी परिमाणे 6. 1995 लिंगभावात्मकता आणि मानव विकास
7. 1996 मानव विकास व आर्थिक वृध्दी
8. 1997 दारिद्र्य निर्मुलनासाठी मानव विकास
9. 1998 मानव विकासासाठी उपभोग
10. 1999 मानवी चेहऱ्यासह जागतिकीकरण
11. 2000 मानवी हक्क व मानवी विकास 12. 2001 मानव विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर
13. 2002 विस्कळीत जगातील लोकशाहीची रुजूवात
14. 2003 सहस्त्रकातील विकासाची लक्ष्य: मानवी
दारिद्र्य नष्ट करण्यासाठी राष्ट्रांमधील एकी
15. 2004 आजच्या वैविध्यपूर्ण जगातील सांस्कृतिक
स्वातंत्र्य 16. 2005 आंतरराष्ट्रीय सहकार्य: असमान जगातील मदत,
व्यापार व सुरक्षा
17. 2006 तुटवड्याच्या पलीकडे: सत्ता, दारिद्र्य आणि
जागतिक जल पेचप्रसंग
18. 2007 व 2008 हवामान बदलाशी लढा: विभाजित
जगातील मानवी एकता 19. 2009 अडथळ्यांवर मात : मानवी गतिशीलता व
विकास
20. 2010 राष्ट्रांची खरी संपत्ती: मानव विकासासाठीचे
मार्ग
21. 2011 शाश्वतता व नि:पक्षपातीपणा: सर्वांसाठी
अधिक उज्ज्वल भवितव्य 22. 2012 यावर्षी अहवाल प्रसिद्ध झाला नाही.
23. 2013 दक्षिणेचा उदय: जागतिक विविधतेतील
मानवी विकास
24. 2014 मानवी विकासाचे स्थायीत्व: असुरक्षा कमी
करणे व

७वा वेतन अायोग

7 वा वेतन आयोग��
-----------------------------
* आयोगाची स्थापना:-२५ सप्टे २०१३
‪#‎अध्यक्ष‬:-न्या. अशोक कुमार माथुर
‪#‎सदस्य‬:- मीना अग्रवाल,डॉ.रतीन रॉय,विवेक रे
‪#‎अहवाल‬ सादर:-१८ नोव्हे २०१५ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर
#अहवाल लागू:- १ जानेवारी २०१६
‪#‎वेतन‬ आयोगाच्या ठळक शिफारशी:-
* 1 जानेवारी 2016 पासून नवा वेतन आयोग लागू;
* 74 हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पातून, तर 28 हजार कोटी रुपयांची तरतूद रेल्वे अर्थसंकल्पातून
* मूळ वेतनाच्या सरासरी 16 टक्के व महागाई व अन्य भत्ते मिळून ही वेतनवाढ 23.55 टक्के इतकी होणार
* नव्या वेतनश्रेणीनुसार सचिववगळता केंद्रीय अधिकाऱ्यांचे एकूण मासिक वेतन 2 लाख 25 हजार; तर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे मासिक वेतन अडीच लाख रुपयांवर.
* सरासरी 3 टक्के इतकी वार्षिक तर पेन्शन मध्ये २४ टक्के वेतनवाढ
* सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांपासून, तर लष्करी जवानांसाठीचे मूळ वेतन 6000 वरून 15 हजार 500 रुपये होणार. यात महागाई भत्ता, वैद्यकीय भत्ता वगैरे अतिरिक्त देणार.
* सरकारी तिजोरीवर १.०२ लाख' कोटीचा बोजा'
* ४७ लाख सरकारी कर्मचारी व ५२ लाख निवृत्त कर्मचार्यांना फायदा
* ग्रॅच्युईटीची मर्यादा १० लाखा वरून २० लाख
* आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रालय अंमलबजावणी समिती नेमणार. कॅबिनेट सचिव या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. याशिवाय एक अंमलबजावणी सचिवालयही माथूर समितीच्या शिफारशींचा अभ्यास करेल.
‪#‎आतापर्यंतचे‬ आयोग:-
----------------------
१ला (१९४६) :- श्रीनीवास वरदाचारियर
२ रा (१९५७) :- जगन्नाथदास
३ रा (१९७०) :- रघुवीर द्याळ
४ था (१९८३):- पी. एन सिंघल
५ वा (१९९४) :- रत्नवेल पांडीयन
६ वा (२००६) :- बी. एन. श्रीकृष्णन

Friday, November 20, 2015

चालु घडामोडी ५५

��चालू घडामोडी (20 नोव्हेंबर 2015)��

��अनीश कपूर यांची नियुक्तीची शिफारस रद्द :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला "हिंदू तालिबान" असे म्हणणारे मूळ भारतीय वंशाचे ब्रिटिश मूर्तिकार अनीश कपूर यांची जवाहर कला केंद्राच्या नियामक मंडळासाठी करण्यात आलेली नियुक्तीची शिफारस अखेर रद्द करण्यात आली आहे.
 राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तेथील जवाहर कला केंद्राच्या नियामक मंडळासाठी कपूर यांची शिफारस केली होती.
 कपूर यांनी मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान "गार्डीयन"मधील एका लेखात भारतातील वर्तमान सरकारला "हिंदू तालिबान शासन" असे संबोधले होते.
 लेखामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी मोदींसोबत कोणताही करार न करण्याचा सल्लाही कपूर यांनी दिला होता.
 तसेच, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू तालिबानचा प्रसार होत असल्याचा आरोपही त्यांनी लेखाद्वारे केला होता.
 कपूर हे मूळ मुंबईचे असून ते ब्रिटनमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहेत.
 दरम्यान, नेहरू कला केंद्राच्या नियामक मंडळावरील त्यांच्या नियुक्तीची शिफारस रद्द करण्यात आली आहे.
 त्यांच्यासह इतर 11 जणांच्या नावांची 16 नोव्हेंबर रोजी नियामक मंडळासाठी शिफारस करण्यात आली होती.
 मात्र, शिफारस करण्यात आलेली एकूण 12 जणांची यादीच रद्द करण्यात आल्याची माहिती राजस्थानचे पर्यटनमंत्री कृष्णेंद्र कौर यांनी दिली आहे.

��पश्‍चिम ओडिशातील शेतकऱ्यांसाठी 35 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर :

दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पश्‍चिम ओडिशातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 35 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.
 बारगड जिल्ह्यातील सोहेला येथे आयोजित कृषी मेळाव्यामध्ये पटनाईक यांनी या पॅकेजची घोषणा केली.
 पॅकेजमधील ऐंशी टक्के रक्कम ही कृषिविकासावर खर्च केली जाणार असून, आठ हजार कोटी रुपये जलसिंचन, तेरा हजार कोटी रुपये ग्रामीण भागातील विद्युतीकरण आणि पंधरा हजार कोटी रुपये जलसिंचन प्रकल्पांच्या विकासावर खर्च केले जाणार आहे.
 तसेच पटनाईक यांनी बारगड जिल्ह्यामध्ये दोन मध्यम स्वरूपाच्या जलसिंचन प्रकल्पांच्या उभारणीची घोषणा केली.
 यातील एक प्रकल्प ओंग नदीवर उभारला जाणार असून, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
 तर दुसरा प्रकल्प जीरा नदीवर उभारण्यात येईल, यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

��पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत.
 या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

��सर्वांत श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या दोन तरुण उद्योजकांनी स्थान पटकाविले :

फोर्ब्ज नियतकालिकाने जाहीर केलेल्या अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या दोन तरुण उद्योजकांनी स्थान पटकाविले आहे.
 चाळिशीच्या आतील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांची यादी फोर्ब्जने प्रसिद्ध केली आहे.
 फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्गने या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे.
 विवेक रामास्वामी (वय 30) हा भारतीय वंशाचा तरुण 50 कोटी डॉलरचा मालक असून, तो 33 व्या स्थानावर आहे. गुंतवणूक हा त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे.
 अपूर्व मेहता (वय 29) हा इंस्टाकार्ट या दैनंदिन वापरातील वस्तू पुरविणाऱ्या वेब कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
 त्यांची संपत्ती 40 कोटी डॉलरएवढी असून, तो 40 व्या स्थानावर आहे.

��फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस आज भारताच्या दौर्‍यावर :

भारताने प्रस्ताव केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस भारतात येत आहेत.
 तसेच पॅरिसमध्ये होणाऱ्या आगामी हवामान परिषदेच्या तयारीबाबतही या वेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
 या परिषदेच्या तयारीसाठी फॅबियस यांनी आखलेल्या दौऱ्याचा भारत हा पहिला टप्पा आहे.
 यानंतर ते दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि कॅनडा या देशांचा दौरा करणार आहेत.
 पॅरिस हवामान परिषद 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर यादरम्यान होणार आहे.
 या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 80 देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत.

��भारत आणि चीनने मंत्रीस्तरीय यंत्रणा तयार करण्याचे मान्य :

सुरक्षाविषयक मुद्यांबाबत सहकार्य आणि समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून भारत आणि चीनने मंत्रीस्तरीय यंत्रणा तयार करण्याचे मान्य केले.
 गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या यंत्रणेद्वारे दहशतवाद, तस्करी आणि अमलीपदार्थांच्या व्यवसायासारखे प्रश्‍न हाताळण्यात येतील.
 मंत्रीस्तरीय यंत्रणा उभारल्यानंतर त्याला कराराचे स्वरूप दिले जाऊन हा करार शेन्गुन यांच्या पुढील वर्षी होणाऱ्या भारत भेटीवेळी पूर्ण करण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
 दहशतवाद, सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी आणि अंमलीपदार्थ तस्करी, असे विषय यापुढे याच यंत्रणेमार्फत हाताळले जाणार आहेत.
 ही मंत्रीस्तरीय समिती दरवर्षी भेट घेऊन झालेल्या कामाचा आढावा घेईल, असे ठरले आहे.
 याशिवाय या समितीला दोन्ही देशांमधील सहसचिव पदावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील एक समिती सहाय करेल.

��जनलोकपाल विधेयकाला मंजुरी :

दिल्ली सरकारने जनलोकपाल विधेयकाला मंजुरी दिली.
 या विधेयकामुळे आता भ्रष्टाचारविरोधी संस्थेची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनादरम्यान सादर केलेल्या प्रस्तावानुसारच जनलोकपाल विधेयक असणार आहे, असा दावा सरकारने केला आहे.
 दिल्ली सरकार लवकरच जनलोकपाल विधेयक विधानसभेत सादर करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.

��सांस्कृतिक मंत्रालयाची गृहमंत्रालयाकडे शिफारस :

स्वयंपाकी आणि बल्लवाचार्य (शेफ) यांनाही आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
 सांस्कृतिक मंत्रालयाने या बाबतची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविली आहे.
 स्वयंपाक ही एक कला असल्याने या पाककलेचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव अलीकडेच सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

��प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत सात भारतीय महिलांची निवड :

भारतीय महिलांची क्षमता आणि कर्तृत्वाचे दर्शन पुन्हा एकदा जगाला घडले आहे.
 गायिका आशा भोसले, टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांच्यासह सात भारतीय महिलांची निवड बीबीसीने खूप प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत केली आहे.
 राजकारण, विज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रभावशाली, जागतिक नेत्या असलेल्या व तुलनेने कमी लोकप्रिय परंतु महत्त्वाकांक्षी अशा 100 महिलांची यादी बीबीसी दरवर्षी करीत असते.
 इतर भारतीय महिलांध्ये रिम्पी कुमारी (शेती), मुमताज शेख (कॅम्पेनर) स्मृती नागपाल आणि कनिका टेकरीवाल (जोखीम घेऊन उद्योग सुरू करणारा) यांचा समावेश आहे.

��दिनविशेष :

लोकशिक्षण दिन
 बालक हक्क दिन
 1917 : युक्रेन प्रजासत्ताक झाले.
 1984 : सेटीची स्थापना.
 1985 : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज 1.0 ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
 1998  : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

 

Thursday, November 19, 2015

चाकु घडामोडी ५४

��चालू घडामोडी (19 नोव्हेंबर 2015) ��

��नवीन शिक्षण धोरणासंदर्भातला महाराष्ट्र राज्याचा मसुदा मागे घेतला :

नवीन शिक्षण धोरणासंदर्भातला महाराष्ट्र राज्याचा मसुदा प्रखर टीकेनंतर अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला आहे.
 विद्यार्थ्यांना शाळेचे ठराविक तासांचे बंधन करावे, त्यासाठी शाळा 6 ऐवजी 8 तास असाव्यात, या मसुद्यातल्या शिफारशीवर टीकेची झोड उठल्यानंतर हा मसुदा मागे घेण्यात आला असून, नवा मसुदा येत्या दोन आठवड्यांत तयार करण्यात येणार आहे.
 केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करण्यात येणार आहे.
 त्यासाठी प्रत्येक राज्याकडून शिफारशी मागवण्यात आल्या आहेत.
 त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने शिक्षणक्षेत्रातल्या तज्ज्ञ, मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या चर्चासत्रानंतर "महाराष्ट्र रिपोर्ट ऑन नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसी"अशा शीर्षकाखाली हा मसुदा शिक्षण विभागाने संकेतस्थळावर अपलोड केला.

��"गुगल"ला एखादा प्रश्‍न विचारने आता आणखी सोपे होणार :

लोकप्रिय सर्चइंजिन असलेल्या "गुगल"ला एखादा प्रश्‍न विचारने आता आणखी सोपे होणार आहे.
 सर्च करताना यापुढे मोजके आणि नेमके शब्द वापरण्याची गरज पडणार नसून "गुगल"च्या नव्या सर्च पर्यायामुळे युजरच्या लिखाणाच्या सवयीनुसार "सर्च" करता येईल.
 त्यामुळेच युजर्सना नवा आणि वेगळा अनुभव मिळण्याची शक्‍यता आहे.
 जास्त शब्दांचा वापर, कठीण प्रश्‍न आणि वाक्‍प्रचारही सहज शोधता येतील, अशी सुविधा "गुगल"ने "सर्च इंजिन"मध्ये दिली आहे.
 "गुगल"ने 2012 मध्ये सुरू केलेल्या "नॉलेज ग्राफ" प्रकल्पाचा हा एक भाग आहे.
 "गुगल वेब" आणि ऍप्लिकेशनच्या वापरकर्त्यांना ही सुविधा देण्यात आली आहे.

��केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह चीनला शासकीय दौऱ्यासाठी रवाना :

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ चीनला शासकीय दौऱ्यासाठी रवाना झाले.
 हा संपूर्ण दौरा सहा दिवसांचा असेल.
 या दौऱ्यामध्ये राजनाथसिंह चीनचे प्रीमियर ली केक्वियांग यांना भेटणार आहेत.
 तसेच, चीनचे गृहमंत्री गुओ शेंगकून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

‘��इन्स्टंट आटा नूडल्स‘च्या विक्रीस एफएसएसएआय परवानगी दिली नसल्याचा खुलासा :

योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदने सोमवारी सादर केलेल्या ‘इन्स्टंट आटा नूडल्स‘च्या विक्रीस भारतीय अन्न सुरक्षा प्रमाण प्राधिकरणाने (एफएसएसएआय) परवानगी दिली नसल्याचा खुलासा एका वृत्तपत्राने केला आहे.
 तरीही पतंजली आटा नूडल्सच्या पाकीटांवर एफएसएसएआयने दिलेला परवाना क्रमांक देण्यात आल्याचे समोर आले आहे.
 पतंजलीच्या नूडल्सची विक्री पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

��रवींद्र जडेजाने आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी :

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या भारताच्या रवींद्र जडेजाने आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी मारली आहे.
 नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार तो 13 व्या क्रमांकावर आला आहे.
 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन या क्रमवारीत अद्याप प्रथम क्रमांकावर कायम आहे.
 जडेजाने पहिल्या कसोटीत 8 बळी, तर पावसामुळे व्यत्यय आलेल्या दुसऱ्या कसोटीतील एका डावात चार बळी घेतले आहेत.

��इंदिरा गांधी स्मृती पुरस्कारांची घोषणा :

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 मोबाइल किरणोत्सर्गाबाबत जनजागृती केल्याबद्दल हिंदी चित्रपट अभिनेत्री जुही चावला, धावपटू कविता राऊत, लेखिका-कवयित्री कविता महाजन, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, शिक्षणतज्ज्ञ फरीदा लांबे, उद्योजक मेघा फणसाळकर आणि पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राही भिडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमारी आणि काँग्रेसचे मुख्य सचिव जनार्दन द्विवेदी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

��भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा :

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 न्या. ठाकूर 3 डिसेंबर रोजी पदाची शपथ घेणार आहेत.
 विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे 2 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत.
 न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत.
 न्या. ठाकूर यांची सरन्यायाधीशपदाची मुदत 4 जानेवारी 2017 रोजी संपुष्टात येणार आहे.

��दिनविशेष :

नागरिक दिन
 1946 : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
 1969 : अपोलो 12तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
 1999 : चीनने शेन्झू 1 हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
 1917 : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान यांचा जन्मदिन

 

चालु घडामोडी ५३

��चालू घडामोडी (18 नोव्हेंबर 2015) ��

��केंद्र सरकारची जाम योजना :

प्रधानमंत्री जनधन योजनेत वर्षभरात देशात अठरा कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत.
 
या योजनेची व्याप्ती वाढवत याला मोबाईलची जोड देण्यात येणार आहे.
 
यासाठी जनधन, आधार आणि मोबाईल यांचा एकत्रित आविष्कार असणारी जाम (JAM) योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.
 
तसेच देशातील संपूर्ण 585 कृषी बाजार समित्यांना एकत्रित जोडण्यात येणार आहे.
 
यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास बाजाराची संकल्पना अमलात आणली आहे.
 
सर्व राज्यांना राष्ट्रीय कृषी विकास बाजार स्थापना अनिवार्य असून जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी होईल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी व्यक्त केला.

��भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर :

भारतातील इंटरनेट युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून डिसेंबर 2015 अखेरीस भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार असल्याची माहिती इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि इंडियन मार्केट मार्केट रिसर्च ब्युरोने (आयएमआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
 
ऑक्‍टोबर 2015 अखेर भारतामध्ये एकूण 37.5 कोटी इंटरनेट युजर आढळून आले आहे.
 
सध्या इंटरनेट युजर्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 
मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने डिसेंबर 2015 अखेरपर्यंत भारतामध्ये 40.2 कोटी इंटरनेट युजर्स असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.
 
अशाप्रकारे अपेक्षित वाढ झाली तर भारत अमेरिकेला मागे टाकणार असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार आहे.
 
याबाबतीत जगामध्ये चीन सर्वांत पुढे असून तेथे 60 कोटी इंटरनेट युजर्स आहेत.
 
गेल्या दशकभरात भारतामध्ये इंटरनेट युजर्समध्ये 1 कोटी वरून 100 कोटी एवढी वाढ झाली आहे.
 
तर मागील तीन वर्षात ही संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर पोचली आहे.
 
याचाच अर्थ असा की डिजीटल इंडस्ट्रीमध्ये भारत मोठी झेप घेत असून भारतामध्ये ई-कॉमर्सला मोठी संधी आहे असेही अहवालात पुढे म्हटले आहे.

��ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन :

रामजन्म चळवळीतील अग्रणी, विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप) ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन झाले. ते अविवाहित होते.
 
1992 मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात कारसेवकांचा मोठा सहभाग होता.
 
सिंघल यांचा जन्म 2 ऑक्‍टोबर 1926 रोजी झाला.

��'फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल :

मॅगीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी राजकीय दबाव कार्यरत झालेले असताना केंद्र शासनाच्या 'फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
 
त्यामुळे मॅगीची न्यायालयीन लढाई संपलेली नाही.
 
फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटीने अगदी सुरुवातीस म्हणजे 5 जून रोजी मॅगीवर बंदी आणली होती.
 
तर लगेचच 6 जून रोजी राज्य सरकारने मॅगीवर बंदी आणली होती.
 
या बंदीच्या विरोधात मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
बेलफास्ट, लिव्हरपूल येथील विद्यापीठांचे संशोधन :

कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, आता पॅरिसमधील हवामान परिषदेत कार्बन उत्सर्जन कुणी किती कमी करायचे यावर तू-तू-मैं-मैं होईल, पण प्रत्यक्षात हे उत्सर्जन वातावरणात पसरू नये यासाठी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे.
 
त्यांनी एका सच्छिद्र द्रवाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन गोळा करता येते, परिणामी ते वातावरणात मिसळत नाही.
 
सच्छिद्रतेचा गुणधर्म असलेला द्रव जगात प्रथमच तयार करण्यात आला आहे.
 
ब्रिटनमधील बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठ व लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांनी तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी हा नवीन द्रव शोधून काढला आहे.
 
त्यात खूप मोठय़ा प्रमाणावर हरितगृह वायू विरघळवता येतात.
 
हे वायू द्रवाच्या सच्छिद्रता गुणधर्मामुळे शोषले जातात.
 
अनेक पर्यावरण स्नेही रासायनिक प्रक्रिया यातून शोधता येतील.
 
सध्या कार्बन पकडून तो समुद्राच्या तळाशी गाडला जातो, त्याला कार्बन सिक्वेट्रेशन असे म्हणतात त्यापेक्षा तो सच्छिद्र द्रवाने पकडता येत असेल तर ते जास्त फलदायी आहे.
 
‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

��दिनविशेष :

1493 : क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदाच पोर्तो रिकोचा किनारा दिसला.
 
1803 : हैतीमधील क्रांती-व्हेर्तियेरेसची लढाई.
 
1905 : डेन्मार्कचा राजकुमार कार्ल हाकोन सातवा, नॉर्वे या नावाने नॉर्वेचा राजा झाला.
 
1918 : लात्व्हियाने स्वतःला रशिया पासून स्वतंत्र घोषित केले.
 
1963 : बटण असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला