Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, November 18, 2015

"जीसॅट -१५"

‘जीसॅट-१५’ या प्रगत दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताच्या ‘जीसॅट-१५’ या प्रगत दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयानामधील कौरोऊ येथून ११ नोव्हेंबर २०१५ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. कर्नाटकातील हासन येथून या उपग्रहाचे नियंत्रण करण्यात येणार आहे.भारताच्या या उपग्रहासोबत सौदी अरेबियाचा ‘अरबसॅट-६बी’ (बद्र-७)चेही प्रक्षेपण करण्यात आले.‘एरिन-५ व्हीए-२२७’ या प्रक्षेपकामार्फत या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्ये 
हा उपग्रह दूरसंपर्क क्षेत्रासाठी आहे.त्यामध्ये केयू बँडची इशारादर्शक यंत्रणा आहे.सध्याच्या उपग्रह प्रणालीची क्षमतावृद्धी आणि मुदत संपणाऱ्या उपग्रहाची ‘जीसॅट-१५’ जागा घेणार.हवाई वाहतूक यंत्रणेसाठी दिशादर्शनाची कामे करणे.जीपीएसच्या धर्तीवर स्थाननिश्चिती करणाऱ्या भारतीय यंत्रणेला माहिती पुरविणे.सध्या भारतीय उपग्रह यंत्रणेत (इन्सॅट) ट्रान्सपाँडरची कमतरता असून, जीसॅट १५ मुळे ती भरून निघण्यास हातभार लागेल.जीसॅट १५मुळे इस्रोला केयू बँडच्या भारतीय ग्राहकांना अखंड सेवा पुरवणे शक्य होईल. या उपग्रहावरील गगन यंत्रणेमुळे हवाई वाहतूक क्षेत्र आणि भारतीय विभागातील विविध स्थानाधारित सेवांना बळकटी मिळणार आहे.
‘जीसॅट-१५’बद्दल

वजन

३१६४ किलो

आयुष्यमान

१५ वर्षे

बनावट

स्वदेशी

कार्य श्रेणी

जीसॅट/इन्सॅट

उपग्रहावरील यंत्रणा

जीपीएसवर आधारित जीओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन (गगन)

इतर वैशिष्ट्ये

उपग्रहावर २४ ट्रान्सपॉँडर - एल १ आणि एल ५ बँडमध्ये कार्यरत राहणार

No comments:

Post a Comment