"सौर शहरे' योजना
देशातील साठ शहरे अपारंपरिक व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या "सौर शहरे‘ योजनेंतर्गत विकसित केली जाणार आहेत.
प्रत्येक राज्यातील 50 हजार ते 50 लाख या लोकसंख्येदरम्यानच्या किमान एक आणि कमाल पाच शहरांचा यात समावेश आहे.
महाराष्ट्रातील नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी, तसेच गोव्यातील पणजीसह देशातील साठ शहरे अपारंपरिक व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या "सौर शहरे‘
योजनेंतर्गत विकसित केली जाणार आहेत.
ऊर्जा मंत्रालयाकडून सोलर सिटी बनविण्याची योजना तयार करण्यासाठी २००९ सालात २६ सल्लागारांची समिती नेमली गेली होती. त्यानुसार देशाच्या प्रत्येक राज्यात किमान १ व जास्तीत जास्त ५ सौर नगरी निर्माण केल्या जाणार आहेत.
यासाठी केंद्राकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे आणि मास्टर प्लॅन तयार असलेल्या ४६ शहरांसाठी केंद्राने २३.६९ कोटी रूपये मंजुरही केले आहेत.
महाराष्ट्रातील शहरे :
नागपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद, नांदेड आणि शिर्डी.
अशी असेल योजना :
निवड झालेल्या शहरांना 50 लाख रुपयांपर्यंतचे केंद्राचे अर्थसाह्य मिळेल. त्यात विकास आराखडा, सोलर सीटी सेलनिर्मिती यांसारख्या बाबींवर भर असेल.
No comments:
Post a Comment