चालू घडामोडी - १२ नोव्हेंबर २०१५
मोदींचा ब्रिटन दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबर रोजी लंडनमध्ये दाखल झाले. मोदींच्या या ब्रिटन दौऱ्याची काही ठळक वैशिष्ट्ये सुमारे दहा वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान प्रथमच ब्रिटनला भेट देत आहेत.लंडन येथील डॉ. आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी संरक्षण, व्यापारावर चर्चा करणार. ब्रिटनची राणी एलिझाबेथ (दुसरी) यांनी आयोजित केलेल्या बकिंगहॅम पॅलेस येथील मेजवानीत प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित रहाणार.ब्रिटिश संसदेच्या विशेष अधिवेशनात मोदी भाषण करणार. जॅग्वार लॅंड रोव्हरच्या प्रकल्पाला भेट. लंडन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला ते आदरांजली वाहणार.या कार्यक्रमानंतर मोदी जी-२०च्या परिषदेसाठी तुर्कस्थानला रवाना होणार आहेत. या परिषदेत भारत काळा पैसा, कर यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहे.
No comments:
Post a Comment