Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, November 18, 2015

Maharashtra Police whatsapp number

पोलीस तक्रार आता व्हॅाटसअपवर:-

मुंबई, नवी मुंबई वगळता राज्यात सर्वत्र व्हॅाटसअप क्रमांक सुरू...

मुंबई : सर्वसामान्य जनतेला पोलीसांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे व्हावे, तसेच आसपास घडणा-या गुन्ह्यांची माहिती पुराव्यासह नागरिकांना कळविता यावी, यासाठी राज्यात सर्वत्र पोलीसांनी व्हॅाटसअप क्रमांक सुरू केले आहेत. प्रत्येक परिक्षेत्रात जिल्हानिहाय वेगळे व्हॅाटसअप क्रमांक सुरू करण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित यांनी दिले होते. त्यानुसार राज्यात हे क्रमांक सुरू झाले आहेत. नागरिकांनी तक्रार केल्यास तातडीने त्याला प्रतिसाद देणे, हा उद्देश हे क्रमांक सुरू करण्यामागे आहे.

पोलीस महासंचालक पदाची सूत्रे स्विकारल्यापासून प्रविण दीक्षित यांनी महाराष्ट्र पोलीस दल अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नागरिकांनी पोलीसांना सहकार्य केले, तर समाजातील गैरप्रकारांना तातडीने आळा बसेल, अशी भूमिका महासंचालक दीक्षित यांनी घेतली होती. यात प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिका-यांने स्वतःचे ई-मेल आय.डी. तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यापुढे एक पाऊल जात सर्वसामान्यांना आपल्या तक्रारी मोबाइलच्या माध्यमातून करता याव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक वेगळा व्हॅाटसअप क्रमांक सुरू करावा, असे आदेश महासंचालकांनी दिले होते. मुंबई, नवी मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे.

अनेकदा नागरिक पोलिसांना तक्रार करण्यास कचरतात किंवा परिसरात गैरप्रकार सुरू असले, तरी पुराव्याअभावी त्यावर कारवाई करता येत नाही, अशावेळी नागरिकांची मदत आम्हाला नक्कीच होईल. नागरिकांनी एखादी तक्रार केल्यानंतर त्यावर पोलीसांनी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

              - प्रविण दीक्षित
(पोलीस महासंचालक-महाराष्ट्र राज्य)

* राज्यातील प्रमुख शहरांचे व्हॅाटसअप क्रमांक :-


- ठाणे ग्रामीण :
७०४५१००१११,
७०४५१००२२२.

- पुणे शहर :
८९७५२८३१००,
८९७५९५३१००.

- नाशिक शहर :
९६७३६७७७३१.

- औरंगाबाद शहर :
८३९००२२२२२,
७७४१०२२२२२.

- औरंगाबाद ग्रामीण :
९८८१९३२२२२,
७७६८९३२२२२.

- कोल्हापूर ग्रामीण :
९५५२३२८३८३,
७२१८०३८५८५.

- नाशिक ग्रामीण :
८३९०८२१९५२,
८३९०८२२३५२.

- जळगाव :
९४२२२१०७०१,
९४२२२१०७०२.

- अहमदनगर :
९६६५८८७००९,
९१५६४३८०८८.

- नागपूर ग्रामीण :
७७५८९०३०७९,
७७५८९०३०७५.

* अन्य क्रमांक व इतर परीक्षेत्राचे  व्हॅाटसअप क्रमांक mahapolice.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment