Bookmark

Bookmark this Blog

Saturday, December 19, 2015

चालु घडामोडी ६४

चालू‬ घडामोडी:- २०१५ (१८ डिसेंबर)

>>सम्राट अशोक यांचा जन्मदिवसही १४ एप्रिलच, बिहार सरकारने जाहीर केली तारीख

>>माजी संरक्षण सचिव आर.के माथुर यांची भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी झाली निवड

>>राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची आमदार सतीश चव्हाण यांची हिवाळी अधिवेशनात मागणी...

>>डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धमकीचा मेसेज, पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

>>कॉं.गोविंद पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडची सुनावणी ३० डिसेंबरला होणार

>>गुजरातच्या कच्छमध्ये आज DGP परिषदेचे आयोजन, पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार

>>सुषमा स्वराज यांनी गीताच्या लहानपणीचा फोटो केला ट्विट, तिच्या पालकांनी शोधण्यासाठी सगळ्यांना केले मदतीचे आवाहन

>>देशात विविध ठिकाणी 'बाजीराव मस्तानी' व 'दिलवाले' सिनेमाच्या विरोधात निदर्शने

>>बाजीराव मस्तानी सिनेमाचे प्रदर्शन रोखण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

>>नागपूर: शनिशिंगणापुरात महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदीच्या विरोधात विधानसभेच्या आवारात घोषणा

>>शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टसाठी आणखी तीन महिलांचे अर्ज दाखल. आतापर्यंत ७३ पुरूष आणि चार महिलांचे अर्ज, उद्या शेवटची मुदत

>>उत्तर प्रदेशात प्लॅस्टीकच्या बॅगवर बंदी, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेतल्याची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची माहिती

>>सनातनी वृत्ती केवळ हिंदूमध्येच नाही, तर मुस्लिम समाजातही वाढतेय, ज्येष्ठ उर्दू समीक्षक प्रा. जहीर अली यांचं वक्तव्य

>>अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला १६ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, २० हजार रुपये दंड, त्यातील १७ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

>>गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश जेबी पारडीवाला यांच्या विरोधात महाभियोग नोटीस

>>एसटीचा संप मागे, परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर इंटक संघटनेचा निर्णय, सूत्रांनी दिली माहिती

>>आपण संतांना समजून घेतले नाही, संतांचे ब्राह्मण करून टाकले, सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांचे वक्तव्य

>>बेघर आणि दारिद्र्य रेषे खालील नागरिकांना २ माळ्यापर्यंत घर बांधण्यासाठी मदत करणार, पं. दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खेरदी योजने अंतर्गत करणार मदत, पंकजा मुंडे यांची माहिती

>>उद्योग आणि अन्य वापराच्या जमिनीची परवानगी घेण्यासाठी मंत्रालयापर्यंत जाण्याची गरज नाही, एक हेक्टरचा निर्णय जिल्हाधिकारी आणि १ ते ५ हेक्टरचा निर्णय विभागीय आयुक्त घेऊ शकणार, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची माहिती

>>नागपूरः छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आंतर्राष्ट्रीय विमानतळ यामध्ये महाराज हा शब्द का वापरला जात नाही, असा प्रश्न विनायक मेटे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्द्यावेळी मांडला. हा विषय तातडीने केंद्राळा कळवण्याचे सभापतींचे आदेश.

>>संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीच्या बालसुधारगृहातून सुटकेला स्थगिती देण्यास शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.

>>निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची होणारी सुटका हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असेल - दिल्ली महिला आयोग

>>राज्यपाल राम नाईक यांनी बीरेंद्र सिंह यांची उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदी केली नियुक्ती. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नियुक्तीला दर्शवला होता विरोध.

>>जानेवारीपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या विमान तिकीटावर २ टक्के उपकर लावण्याचा निर्णय लांबणीवर.

>>ऐंडरॉंड नॅनोडीग्री प्रोग्रॉमसाठी गुगल आणि टाट ट्रस्टने दिल्या १००० स्कॉलरशीप मोफत

>>पुणेः बाजीराव मस्तानी चित्रपटाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन, शनिवारवाडा येथे झालेले जोडे मारा आंदोलनात आमचा सहभाग नाही, पेशवे आणि सरदार दाभाडे यांच्या वंशजांचे स्पष्टीकरण

>>१ एप्रिल २०१६ पासून राज्यात दारूबंदी लागू होईल - नीतिश कुमार, मुख्यमंत्री, बिहार

>>शीना मुखर्जी हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी याला घरचे जेवण देण्यास न्यायालयाने दिली मंजुरी

>>समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणारे शशी थरूर यांचे विधेयक लोकसभेत फेटाळण्यात आले

>>नवी दिल्ली: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी घेतली रवी शंकर प्रसाद यांची भेट.

>>रेल्वे नीर प्रकरणी व सरकारी तिजोरीला नुकसान केल्याबद्दल दोन रेल्वे अधिका-यांवर सीबीआयने दाखल केले आरोपपत्र

>>विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर राज्यसभा २१ डिसेंबरपर्यंत स्थगित.

>>आरक्षण विरोधी वक्तव्य केले म्हणून राज्यसभेतील ५८ खासदारांनी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेपी. पारडीवाला यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस दिली.

>>२०१५-१६ मध्ये विकास दर ७ ते ७.५ टक्के रहाण्याचा अंदाज. महसुली तूट ३.८ टक्के राहील असा अंदाज.

>>गोंधळ घातला म्हणून वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींसह विरोधी पक्षाच्या ५८ आमदारांना आंध्रप्रदेश विधानसभेतून निलंबित केले.

>>ब्रेन ट्युमरमुळे अंथरुणाला खिळलेल्या एका ब्राझिलच्या रुग्णाला मदर तेरेसांनी २००८ मध्ये म्हणजे मृत्यूनंतरही बरे केल्याचा चमत्कार केल्याचा दावा पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारल्याचे आर्चबिशप थॉमस डिसोझांनी सांगितले.रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती कोलकात्याच्या आर्चबिशपनी दिली आहे.

विविध मागण्यांसाठी विधानभवनाकडे जाणाऱ्या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, बॅरिकेट्स ओलांडल्याने लाठीमार, पोलिसांचा दावा

>>आयसिसच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या अल्पवयीन मुलीचं मतपरिवर्तन, मुलीच्या संपर्कात असणाऱ्या सोहराबुद्दीनला राजस्थानमध्ये अटक

>>मुंबई मेट्रोची दरवाढ महिनाभरासाठी टळली, एमएमआरडीएच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय, २९ जानेवारीला निर्णय अपेक्षित

>>भारत रशियाकडून विकत घेणार एस-४०० मिसाईल, पंतप्रधान मोदींकडून खरेदासाठी हिरवा कंदील

>>साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, अरुण खोपकर, श्रीकांत बहुलकर आणि उदय भेंब्रेंचा गौरव

Friday, December 18, 2015

चालु घडामोडी ६३

⏰ चालूघडामोडी ⏰

��स्पर्धा परीक्षा विशेष ��

��१४ डिसेंबर२०१५ ��

����सर्व देशांना बंधनकारक करणारा पर्यावरण करार मंजूर :

कार्बनसह हरितवायूंचे उत्सर्जन कमी करून तापमानवाढ नियंत्रणात आणणे जगातील जवळपास सर्व देशांना बंधनकारक करणारा पर्यावरण करार मंजूर करण्यात आला.
 
तसेच या कराराचा अंतिम मसुदा सादर करण्यात आला होता.या करारानुसार, जागतिक तापमानवाढ 1.5 अंशाच्या वर जाऊ न देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.
 
गेली अनेक वर्षे या कराराबाबत चर्चा होत होती. मात्र जागतिक तापमानवाढीचे संकट वाढल्याने यंदा बहुतेक वाद मिटवून सर्व देशांनी या करारासाठी जोर लावला होता.
 
हरितवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी गरीब आणि विकसनशील देशांना 2020 पर्यंत शंभर अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचेही करारात निश्‍चित करण्यात आले आहे.
2050 पर्यंत हरितवायूंचे उत्सर्जन बंद करण्यावर आता सर्व देशांचा भर असणार आहे.
 
जैविक इंधनाचे युग समाप्त करून अपारंपरिक ऊर्जेकडे वाटचाल करण्यासाठी जगातील 195 देशांनी मिळून केलेला हा पहिलाच पर्यावरण करार आहे.
 
श्रीमंत देशांनी द्यावयाच्या भरपाईबद्दल अद्याप निश्‍चित धोरण ठरले नसले, तरी या करारातील मुद्यांबाबत बहुतांश देश समाधानी आहेत.
 
हरितवायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबत आधी झालेला केटो करार अमेरिकेसह काही देशांनी नाकारला होता. पॅरिस परिषदेत झालेला हा करार सर्वच देशांना बंधनकारक आहे. दर पाच वर्षांनी प्रत्येक देशाला ठरवून दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेतला जाणार आहे.
--------------------------

�� �� ���� �� �� �� �� ��

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या बस भेट देणार :

राजधानी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यात खासदारांचाही सहभाग असावा, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना येण्या-जाण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन बस भेट देणार आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
 
उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेल्या बॅटरीसारख्याच लिथियमच्या बॅटरीचा या बसमध्ये वापर करण्यात आला आहे.
 
तसेच इस्रोने केंद्र सरकारला सहकार्य करत पाच लाख रुपयांना ही बॅटरी तयार केली आहे. उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची किंमत 55 लाख रुपये असते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मेक इन इंडिया" मोहिमेंतर्गत या प्रकारच्या बसला प्रोत्साहन दिले जाणार असून, लवकरच याचे पेटंट घेतले जाणार असल्याची माहितीही दिली.
 
प्रायोगिक तत्त्वावर दिल्लीमध्ये लवकरच अशा पंधरा बस उतरविल्या जातील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर शहरांमध्येही त्यांचा वापर सुरू केला जाईल.
####################
������ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित :

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार उपस्थित होते.
 
एप्रिल महिन्यात दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्याला प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिलीप कुमार यांना उपस्थित राहता आले नव्हते.
--------------------------

����डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता :

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी 12 जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे.
 
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद वॉर्नर सांभाळण्याची शक्यता आहे.
 
तसेच बिग बॅश लीगच्या सुरुवातीच्या फेरीतील लढतींमध्येही स्मिथ खेळणार नाही.
####################
��������भारत आणि अमेरिका
यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात :

भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराची अंमलबजावणी नवीन वर्षात होऊ शकते. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
 
भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुसहकार्य कराराबाबत अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत, तर काही पूर्णत्वास जात आहेत.
 
भारत आणि अमेरिका संपर्क समूहाची मागील बैठक नोव्हेंबर महिन्यात वॉशिंग्टनमध्ये झाली होती.
--------------------------

����परिभ्रणाचा वेग मंदावल्याचा परिणाम :

पृथ्वीच्या ध्रुवांवर असलेल्या हिमनद्या वितळत असून त्यामुळे सागरी जलपातळी वाढत आहे. परिणामी पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावला असून त्यामुळे दिनमानाचा कालावधी वाढत आहे, तो 1.7 मिलिसेकंदांनी वाढला असला तरी त्याचा संकलित परिणाम विचारात घेतला तर तो जास्त असू शकेल, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
 
सागरी जलपातळीत भूतकाळात झालेले फरक अभ्यासून आगामी काळाबाबत हवामान बदलांचे भाकित करण्यासाठी संशोधन करण्यात आले असून त्यात पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग कमी होत चालल्याचे निदर्शनास आले आहे.
 
कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक मॅथ्यू डमबेरी यांनी सांगितले की, गेल्या शतकातील सागरी पातळीतील बदलांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या गाभ्याच्या गतिशीलतेचाही विचार करण्यात आला.
 
हिमनद्या वितळल्याने सागरी जलपातळी वाढते व त्यामुळे पृथ्वीचे वस्तुमान ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे सरकते त्यामुळे परिभ्रमणाचा वेग कमी होतो.
 
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावानेही पृथ्वीचा वेग मंदावतो. असे असले तरी केवळ या दोन कारणांमुळेच पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावतो असे नाही तर पृथ्वीच्या गाभ्यातील गतिशील परिणामांचा त्यात समावेश असावा.
 
गेल्या तीन हजार वर्षांत पृथ्वीचा गाभा थोडा वेग घेतो आहे, तर वरच्या कवचाचा वेग मंदावतो आहे. त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग अधिक मंदावतो. त्यामुळे दिनमान 1.7 मिलिसेकंदांनी वाढले आहे.
 
हे प्रमाण फार मोठे नाही, पण दूरगामी विचार केला तर त्याचा परिणाम जास्त आहे.
 
वैज्ञानिकांच्या मते 21 व्या शतकाच्या अखेरीस सागरीपातळी काय असेल याचा अंदाज करता येऊ शकतो. हवामान बदलाशी सामना करताना आपण अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत गुंतवणुकीचा विचार करीत असून किनारी भागतील शहरांसाठी ती गुंतवणूक अधिक असली पाहिजे.
####################

����दिनविशेष :

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन
 
1991 : नॉर्वेजियन ध्रुव-प्रवासी रोआल्ड अमुंडसेन दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला पहिला मानव ठरला.
--------------------------
--------------------------

���� राष्ट्रीय पुरस्कार ����

��भारतरत्न पुरस्कार��

भारतातला हा सर्वोच्च सन्मान आहे.
♦ अडीच लाख रुपये रोख व स्मृती चिन्ह या स्वरुपात दिला जातो.

कला, साहित्य, वैज्ञानिक, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील अलौकिक कामगिरीबद्दल हा सन्मान प्रजासत्ताक दिनी प्रदान केला जातो.
या सन्मानाची सुरुवात 1954 पासून झाली.
�� सर्वात प्रथम हा सन्मान
�� सी. राजगोपाळचारी,

   ��डॉ. सी. राधाकृष्णन,

��सी. व्ही. रमन यांना सन्मानीत करण्यात आले.
 
  ����सचिन तेंडुलकर आणि डॉ. सी. आर. राव यांना 'भारतरत्न पुरस्कार - 2013' देण्यात आला.

भारतरत्न पुरस्कार प्राप्तकर्ते

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - 1954
चक्रवर्ती राजगोपाळचारी - 1954
डॉ. सी.वी. रमन - 1954
डॉ. भगवान दास - 1955
डॉ. एम. विश्वेश्वरय्या - 1955
जवाहरलाल नेहरू - 1955
गोविंद वल्लभ पंत - 1957
डॉ. डी.के. कर्वे - 1958
डॉ. बी.सी. रॉय - 1961
पुरषोत्तम दास टंडन - 1961
डॉ. राजेंद्र प्रसाद - 1962
डॉ. झाकीर हुसेन - 1963
डॉ. पी.व्ही. काणे - 1963
लाल बहादुर शास्त्री (मरणोत्तर) - 1966
श्रीमती इंदिरा गांधी - 1971
व्ही.व्ही. गिरी - 1975
के. कामराज (मरणोत्तर) - 1976
मदर तेरेसा - 1980
आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - 1983
खान अब्दुल गफ्फारखान - 1987
एम.जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - 1988
डॉ. बी.आर. आंबेडकर (मरणोत्तर) - 1990
नेल्सन मंडेला - 1990
मोरारजी देसाई - 1991
राजीव गांधी (मरणोत्तर) - 1991
सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - 1992
मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - 1992
जे. आर.डी. टाटा - 1992
सत्यजीत रे - 1992
गुलझारी लाल नंदा - 1997
श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) - 1997
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - 1997
एम.एस. सुबलक्ष्मी - 1998
जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - 1998
सी.एस. सुब्रमण्यम - 1998
पं. रवि शंकर    - 1999
गोपीनाथ बोरडोलाई - 1999
अमर्त्य सेन - 1999
बिसमिल्ला खान - 2000
लता मंगेशकर - 2000
पं. भीमसेन जोशी - 2008
सचिन तेंडुलकर - 2013  
डॉ. सी.आर. राव - 2013
पंडित मदनमोहन मालविय (मारणोत्तर) - 2014
अटल बिहारी बाजपेयी - 2014

➕➖➕➖➕➖➕➖➕

   ��पद्मविभूषण ��

हा देशातील क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी शासकीय सेवेसह इतर क्षेत्रातील असाधारण कामगिरी बद्दल जाहीर राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान करण्यात येते.
--------------------------

   ��पद्मभूषण ��

प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणत्याही क्षेत्रात असामान्य व महत्वपूर्ण सेवा करणार्‍या व्यक्तिला देण्यात येते. हा देशात तिसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे.
####################

     �� पद्मश्री ��

देशात चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार विशिष्ट क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्‍या व्यक्तीला प्रजासत्ताक दिनी देण्यात येतो.
--------------------------

��सैनिक शौर्य पदके��

  ����  परमवीर चक्र ����

शत्रुशी झालेल्या लढाईत असामान्य प राक्रम, धाडस करून आत्मबलिदान केलेल्या तीनही दलातील अधिकारी व  सैनिकाला हा पुरस्कार देण्यात येतो. हा देशात सर्वोच्च लष्करी पद आहे.
--------------------------

    ����महावीर चक्र ����

असामान्य धैर्य व पराक्रमाबद्दल हे पदक दिले जाते. सैन्य पुरस्कारापैकी हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च पदक होय.
#####################

     ���� वीरचक्र ����

तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी पदक. तिन्ही दलातील जवान वा अधिकार्‍यास असामान्य धैर्य व पराक्रमाबद्दल हे पदक दिले जाते.