चालू घडामोडी:- २०१५ (१८ डिसेंबर)
>>सम्राट अशोक यांचा जन्मदिवसही १४ एप्रिलच, बिहार सरकारने जाहीर केली तारीख
>>माजी संरक्षण सचिव आर.के माथुर यांची भारताच्या मुख्य माहिती आयुक्तपदी झाली निवड
>>राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची आमदार सतीश चव्हाण यांची हिवाळी अधिवेशनात मागणी...
>>डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला धमकीचा मेसेज, पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
>>कॉं.गोविंद पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडची सुनावणी ३० डिसेंबरला होणार
>>गुजरातच्या कच्छमध्ये आज DGP परिषदेचे आयोजन, पंतप्रधान मोदी देखील सहभागी होणार
>>सुषमा स्वराज यांनी गीताच्या लहानपणीचा फोटो केला ट्विट, तिच्या पालकांनी शोधण्यासाठी सगळ्यांना केले मदतीचे आवाहन
>>देशात विविध ठिकाणी 'बाजीराव मस्तानी' व 'दिलवाले' सिनेमाच्या विरोधात निदर्शने
>>बाजीराव मस्तानी सिनेमाचे प्रदर्शन रोखण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार
>>नागपूर: शनिशिंगणापुरात महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदीच्या विरोधात विधानसभेच्या आवारात घोषणा
>>शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टसाठी आणखी तीन महिलांचे अर्ज दाखल. आतापर्यंत ७३ पुरूष आणि चार महिलांचे अर्ज, उद्या शेवटची मुदत
>>उत्तर प्रदेशात प्लॅस्टीकच्या बॅगवर बंदी, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेतल्याची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची माहिती
>>सनातनी वृत्ती केवळ हिंदूमध्येच नाही, तर मुस्लिम समाजातही वाढतेय, ज्येष्ठ उर्दू समीक्षक प्रा. जहीर अली यांचं वक्तव्य
>>अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला १६ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, २० हजार रुपये दंड, त्यातील १७ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश
>>गुजरात हायकोर्टाचे न्यायाधीश जेबी पारडीवाला यांच्या विरोधात महाभियोग नोटीस
>>एसटीचा संप मागे, परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर इंटक संघटनेचा निर्णय, सूत्रांनी दिली माहिती
>>आपण संतांना समजून घेतले नाही, संतांचे ब्राह्मण करून टाकले, सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांचे वक्तव्य
>>बेघर आणि दारिद्र्य रेषे खालील नागरिकांना २ माळ्यापर्यंत घर बांधण्यासाठी मदत करणार, पं. दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खेरदी योजने अंतर्गत करणार मदत, पंकजा मुंडे यांची माहिती
>>उद्योग आणि अन्य वापराच्या जमिनीची परवानगी घेण्यासाठी मंत्रालयापर्यंत जाण्याची गरज नाही, एक हेक्टरचा निर्णय जिल्हाधिकारी आणि १ ते ५ हेक्टरचा निर्णय विभागीय आयुक्त घेऊ शकणार, महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची माहिती
>>नागपूरः छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आंतर्राष्ट्रीय विमानतळ यामध्ये महाराज हा शब्द का वापरला जात नाही, असा प्रश्न विनायक मेटे यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्द्यावेळी मांडला. हा विषय तातडीने केंद्राळा कळवण्याचे सभापतींचे आदेश.
>>संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीच्या बालसुधारगृहातून सुटकेला स्थगिती देण्यास शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला.
>>निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीची होणारी सुटका हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असेल - दिल्ली महिला आयोग
>>राज्यपाल राम नाईक यांनी बीरेंद्र सिंह यांची उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तपदी केली नियुक्ती. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नियुक्तीला दर्शवला होता विरोध.
>>जानेवारीपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या विमान तिकीटावर २ टक्के उपकर लावण्याचा निर्णय लांबणीवर.
>>ऐंडरॉंड नॅनोडीग्री प्रोग्रॉमसाठी गुगल आणि टाट ट्रस्टने दिल्या १००० स्कॉलरशीप मोफत
>>पुणेः बाजीराव मस्तानी चित्रपटाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन, शनिवारवाडा येथे झालेले जोडे मारा आंदोलनात आमचा सहभाग नाही, पेशवे आणि सरदार दाभाडे यांच्या वंशजांचे स्पष्टीकरण
>>१ एप्रिल २०१६ पासून राज्यात दारूबंदी लागू होईल - नीतिश कुमार, मुख्यमंत्री, बिहार
>>शीना मुखर्जी हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी याला घरचे जेवण देण्यास न्यायालयाने दिली मंजुरी
>>समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणारे शशी थरूर यांचे विधेयक लोकसभेत फेटाळण्यात आले
>>नवी दिल्ली: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी घेतली रवी शंकर प्रसाद यांची भेट.
>>रेल्वे नीर प्रकरणी व सरकारी तिजोरीला नुकसान केल्याबद्दल दोन रेल्वे अधिका-यांवर सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
>>विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर राज्यसभा २१ डिसेंबरपर्यंत स्थगित.
>>आरक्षण विरोधी वक्तव्य केले म्हणून राज्यसभेतील ५८ खासदारांनी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जेपी. पारडीवाला यांच्या विरोधात महाभियोगाची नोटीस दिली.
>>२०१५-१६ मध्ये विकास दर ७ ते ७.५ टक्के रहाण्याचा अंदाज. महसुली तूट ३.८ टक्के राहील असा अंदाज.
>>गोंधळ घातला म्हणून वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींसह विरोधी पक्षाच्या ५८ आमदारांना आंध्रप्रदेश विधानसभेतून निलंबित केले.
>>ब्रेन ट्युमरमुळे अंथरुणाला खिळलेल्या एका ब्राझिलच्या रुग्णाला मदर तेरेसांनी २००८ मध्ये म्हणजे मृत्यूनंतरही बरे केल्याचा चमत्कार केल्याचा दावा पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारल्याचे आर्चबिशप थॉमस डिसोझांनी सांगितले.रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती कोलकात्याच्या आर्चबिशपनी दिली आहे.
विविध मागण्यांसाठी विधानभवनाकडे जाणाऱ्या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, बॅरिकेट्स ओलांडल्याने लाठीमार, पोलिसांचा दावा
>>आयसिसच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या अल्पवयीन मुलीचं मतपरिवर्तन, मुलीच्या संपर्कात असणाऱ्या सोहराबुद्दीनला राजस्थानमध्ये अटक
>>मुंबई मेट्रोची दरवाढ महिनाभरासाठी टळली, एमएमआरडीएच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा निर्णय, २९ जानेवारीला निर्णय अपेक्षित
>>भारत रशियाकडून विकत घेणार एस-४०० मिसाईल, पंतप्रधान मोदींकडून खरेदासाठी हिरवा कंदील
>>साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, अरुण खोपकर, श्रीकांत बहुलकर आणि उदय भेंब्रेंचा गौरव
No comments:
Post a Comment