#चालू घडामोडी:- २०१५ (१९ डिसेंबर)
>>देशातील ९१ प्रमुख जलसाठ्यांमध्ये केवळ ४९ टक्केच पाणी
>>उत्तर प्रदेशमध्ये २० डिसेंबर रोजी शपथ घेणार नवे लोकायुक्त
>>कोलकाताः धुक्यामुळे कोलकाता विमानतळावरील उड्डानं थांबवण्यात आली.
>>मुंबईची अवस्था; ७८ % शौचालयांत पाणी नाही
>>महाराष्ट्र सदन प्रकरण: भुजबळांना ‘क्लिन चिट’!
>>श्रीनगरः जम्मू काश्मीरमध्ये राबविण्यात आलेल्या ऑपरेशनदरम्यान हंदवाडा जंगलातून एका दहशतवाद्यास अटक.
>>दिल्लीः नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज सुनावणी, पटियाला हाऊस कोर्टात अतिरिक्त १६ सीसीटीव्ही कॅमेऱा बसवण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
>>दिल्लीः नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ५०-५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून जामीन मंजूर.
>>दिल्लीः नॅशनल हेरॉल्डप्रकरणी पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी
>>दिल्लीः नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी यांचा जामीन एके अॅन्टोनी यांनी, राहुल गांधी यांचा जामीन प्रियंका गांधी यांनी, मोतीलाल व्होरा यांचा जामीन अजय माकन यांनी तर सुमन दुबे यांचा जामीन मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला.
>>पालिका निवडणुकीतील ६,५०० कोटी पॅकेजप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीवकर नागरिकांची घोर फसवणूक केल्याने निषेध म्हणून डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांकडून "गाजराचे" वाटप.
>>फ्रान्समध्ये झिरो फिगर मॉडेलवर बंदी, फॅशन शोमध्ये सहभाग घेऊन उल्लंघन केल्यास होणार ६ महिन्यांची शिक्षा.
>>मुंबईः हेमा उपाध्याय हत्येप्रकरणी आरोपी प्रदीप राजभर, विनय राजभर आणि आझाद राजभर यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी.
>>नाशिकः साडेचार कोटी रुपयांच्या एलईडी लाईट अपहार प्रकरणी देवांग ठाकूर आरोपी पोलिसांच्या ताब्यात, एक आरोपी फरार. ४ कोटी रुपयांची एलईडी लाईटही जप्त
>>पुणेः सुरतच्या ब्रेनडेड पेशंटचे हार्ट मुंबईतील पेशंटला ट्रान्सप्लांटची पुण्यातील हार्टसर्जनची किमया, पश्चिम भारतातील आंतरराज्यातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट. महाराष्ट्रात पाच महिन्यात पाच हार्ट ट्रान्सप्लांट
>>पुणेः सुरत ते मुंबई फोर्टिस हॉस्पिटलपर्यंत हार्टचा दोनशे किलोमीटरचा प्रवास अवघ्या चाळीस मिनिटात
>>औरंगाबादः रमाई घरकुल योजनेतील मंजूर झालेल्या घरकुलाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीचे आरेखक पुंजाजी लहाने याला एसीबीने रंगेहाथ पकडले
>>निर्भया बलात्कार प्रकरणः अल्पवयीन आरोपीची अज्ञात ठिकाणी रवानगी, सुरक्षेच्या कारणांमुळे केली रवानगी. उद्या होणार तुरुंगातून सुटका
>>अल्पवयीन आरोपीच्या सुटकेविरोधात निर्भयाच्या पालकांची बालसुधारगृहाबाहेर निदर्शनं
>>दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली निर्भया बलात्कार प्रकरणी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींची भेट
>>राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आयोजित केलेल्या देशातील पोलीस महासंचलाकांच्या तीन दिवसीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि गृहराज्य मंत्री किरेन रिजीजू यांची उपस्थिती
>>सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशातील लोकायुक्तच्या निवडीला दिली स्थगिती, मा. न्यामूर्ती विरंद्र सिंग यांची झाली आहे लोकायुक्त पदी निवड. जनहित याचिकेनंतर निवडीवर स्थगिती. सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
>>भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौराः १२ जानेवारीपासून ५ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार
>>ऑस्ट्रेलिया दौरा; भारताचा वन-डे संघः महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, महमद शमी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, गुरकीरत मान, उमेश यादव, ऋषी धवन आणि बरेंद्र शरण
>>ऑस्ट्रेलिया दौ-यातील T-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: महेंद्र सिंग ढोणी, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, उमेश यादव, मोहम्मद शामी, सुरेश रैना, हरभजन सिंग, एच पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा
>>नाशिकः शिवसेनेकडून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १२२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजाराची आर्थिक मदत ,सार्वजानिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचे वाटप
>>अहमदनगर: पंडित दीनदयाळ नागरी सहकारी संस्थेचे पुरस्कार जाहीर, प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांना जीवन गौरव पुरस्कार
>>महेंद्रसिंग धोनी टी-२० वर्ल्डकपपर्यंत कर्णधारपदीः अनुराग ठाकूर
>>राज्यातील २२० ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८१ टक्के मतदान. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली माहिती.
>>अमेरिकेत एका महिलेला स्वत:च्या एक वर्षीय मुलीला मायक्रोवेव्हमध्ये घालून मारल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. का यांग असे या महिलेचे नाव आहे.
>>स्पेनची २३ वर्षीय सौंदर्यवती मिरेया लालागूना रोयो हिने मिस वर्ल्ड २०१५चा किताब पटकावला.
>>भारतीय जवानांनी जम्मू व काश्मिरमधल्या रामबान जिल्ह्यातला दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला असून प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.
>>CBSE ची सगळी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके व अन्य शैक्षणिक साहित्य ऑनलाइनवर मोफत उपलब्ध करून देणार - मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी
>>समलैंगिक संबंधांना कायदेशीर करण्याची मागणी करणा-या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी ३७७ कलमाच्या विरोधात चेन्नईमध्ये निदर्शने केली आहे. शशी थरूर यांचे यासंदर्भातले विधेयक नुकतेच लोकसभेत फेटाळण्यात आले.
>>युद्धग्रस्त सीरियामधून समुद्रमार्गे युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करणा-या स्थलातरितांची एक बोट उलटली असून १८ जण बुडाल्याचे वृत्त टर्कीमधल्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
>>हेमा उपाध्याय हत्या प्रकरण: आरोपी प्रदीप राजभर, विजय राजभर आणि आझाद राजभर या तिघांनाही २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
>>अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या ट्रम्प यांची लोकप्रियता तब्बल ११ टक्क्यांनी वाढून ३९ टक्क्यांच्या घरात पोचल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे
>>कोलकात्यातल्या एका संस्कृत वाचनालयामध्ये अभ्यासकांना सहाव्या शतकात लिहिलेल्या रामायणाची प्रत सापडली असून ही वाल्मिकी रामायणापाठोपाठची सगळ्यात जुनी प्रत असण्याची शक्यता आहे.
>>बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरण : चारही नगरसेवकांचे जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळले
>>हिट अँड रनप्रकरणी सलमानविरोधात सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार; राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंची माहिती
>>सुरज परमार आत्महत्याप्रकरणी गरज पडल्यास मोक्का लावू, विधानसभेत लक्षवेधी चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
No comments:
Post a Comment