महत्वाचे उच्च पदस्थ :
महाराष्ट्र विधान परिषदेचे नवे सभापती/अध्यक्ष बनले - रामराजे नाईक निंबाळकर (फलटण जि. सातारा) (दिनांक 20 मार्च 2015 पासुन) (यांच्यापुर्वी शिवाजीराव देशमुख हे होते)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते बनले - विकास स्वरूप (18 एप्रिल 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सय्यद अकबरोद्दीन होते)
महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे गटनेते बनले - आ. जयंत पाटील (इस्लामपूर) (यांच्यापूर्वी आर.आर. पाटील होते.)
उप गटनेते आहेत - आ. जयदत्त क्षीरसागर (बीड)
भरताचे 20 वे केंद्रीय मुख्य निवडणुक आयुक्त बनले - सय्यद नसिम अहमद झैदी (19 एप्रिल 2015 पासुन) (यांच्यापूर्वी एच.एस.ब्रम्हा होते.)
केंद्रीय निवडणुक आयुक्त
अचलकुमार/ए.के. ज्योती
ओ.पी./ओम प्रकाश रावत
मुख्य निवडणुक आयुक्त आणि दोन निवडणुक आयुक्त यांना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत काम पाहता येते, नंतर निवृत्त होतात.
भारताचा राष्ट्रीय निवडणुक आयोग हा त्रिसदस्यीय असून एक मुख्य निवडणुक आयुक्त आणि इतर दोन निवडणुक आयुक्त आहेत.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे/एमपीएससी चे अध्यक्ष - श्री. व्ही.एन.मोरे.
युपीएससी/केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली - अरविंद सक्सेना, अध्यक्ष = दिपक गुप्ता
केंद्र सरकारचे/नवे केंद्रीय मंत्रीमंडल सचिव बनले- पी.के./प्रदीपकुमार सिन्हा (यांच्यापूर्वी अविनाश चंदर होते.)
केंद्र सरकारचे/प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहशतवाद विरोधी सल्लागार बनले - सय्यद आसिफ इब्राहीम
केंद्रीय/भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनले - विजय शर्मा (10 जून 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सत्यानंद मिश्रा होते)
माहिती आयोगात एकूण 10 माहिती आयुक्त कार्यरत असतात परंतु सध्या तीन पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असणारे सात माहिती आयुक्त
वसंत सेठ
यशोवर्धन आझाद
शरद सबरवाल
मंजुळा पराशर
एम.ए.खान युसूफी
सदभूनम श्रीधर आचार्यालू
सुधिर भार्गव
मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात तसेच पदाची शपथ राष्ट्रपती देतात.
माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त हे वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत कार्यरत राहतात.
भारताचे/केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त बनले - के.व्ही. चौधरी (10 जुन 2015 पासुन) (यांच्यापूर्वी प्रदीप कुमार होते)
केंद्रीय दक्षता आयोगात इतर दोन दक्षता आयुक्त असतात. त्यापैकी एक दक्षता आयुक्त नियुक्ती करण्यात आली - टी.एम. भसीन
केंद्र सरकारचे विज्ञान सल्लागार - प्रोफेसर सी. एन. आर. राव
सीबीआय चे नवे महासंचालक/प्रमुख बनले - अनिलकुमार सिन्हा (3 डिसेंबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी रणजीतकुमार सिन्हा हे होते.)
भारतीय गुप्त वार्ता विभाग/आयबी/इंटेजिलन्स ब्यूरो चे नवे प्रमुख बनले-दिनेश्वर शर्मा (जानेवारी 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सईद आसिफ इब्राहीम हे होते.)
रॉ/रिसर्च अँड अॅनालेसिस विंग चे नवे महासंचालक/प्रमुख - राजेंद्र खन्ना (31 डिसेंबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी आलोक जोशी होते.)
रॉ ही भारताची परदेश विषयक गुप्तचर यंत्रणा आहे.
13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले - आ. राधाकृष्ण विखे पाटील - काँग्रेस (शिर्डी जि.नगर)
महराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले- आ. धनंजय मुंडे- राष्ट्रवादी काँग्रेस (परळी वैजीनाथ, जि.बीड)
महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे नेते - देवेंद्र फडणवीस
विधानसभा सभागृहाचे नेते हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात असा संकेत आहे.
महाराष्ट्र विधान परीषदेचे सभागृहनेते - एकनाथ खडसे हे आहेत.
सध्या महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यानंतर दुसर्या क्रमांकाचे नेते एकनाथ खडसे हे आहेत.
13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती/अध्यक्ष बनले - आ. हरीभाऊ बागडे (फुलंब्री जि. औरंगाबाद) (12 नोव्हेंबर 2014 पासुन)
यांच्यापूर्वी 12 व्या विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते.
काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून निवड करण्यात आली - मल्लिकार्जून खर्गे (कुलबर्गी/गुलबर्गा, कर्नाटक)
काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील उपनेते - कॅप्टन अमरिंदर सिंग (अमृतसर, पंजाब)
काँग्रेस लोकसभेतील मुख्य प्रतोद - जोतिरादित्य शिंदे (गुना,मध्यप्रदेश)
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते - गुलाम नबी आजाद (जम्मू कश्मीर), राज्यसभेचे उपविरोधी उपक्षनेते - आनंद शर्मा (हरियाणा)
लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद अध्याप कोणत्याही काँग्रेस नेत्याला देण्यात आलेले नाही.
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - अजितकुमार डोवल.
भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले - अरविंद गुप्ता
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव - श्रीमती ओमिता पॉल.
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव - स्वाधिन क्षत्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम व्यवस्थापक/सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली - शरत चंदेर
राज्यसभा सभागृहाचे उपनेते - अरुण जेटली हे आहेत.
लोकसभा व राज्यसभा या दोन्हीही सभागृहाच्या संसदीय पक्षाचे नेतेपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे
भारत सरकारचे प्रतोद - व्यंकय्या नायडू. लोकसभा उप प्रतोद - संतोष गंगवार. राज्यसभेचे उप प्रतोद - प्रकाश जावडेकर.
लोकसभेतील भाजपाचे मुख्य प्रतोद - खा. अर्जुन राम मेघवाल.
लोकसभेचे सभागृह नेते - पंतप्रधान नरेंद्र मोदी तर उप न्ते - राजनाथसिंग
उच्च पदस्थ भारत -
भारताचे राष्ट्रपती : प्रणव मुखर्जी (प.बंगाल) (25 जुलै 2012 पासुन) 13 वे राष्ट्रपती आहेत.
उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती : मोहम्मद हमीद अंसारी (यू.पी)
राज्यसभा उपाध्यक्ष : पी.जे./पल्लथ जोसेफ कुरियन (काँग्रेस) (केरळ)
16 व्या लोकसभेच्या अध्यक्षा - श्रीमती सुमित्रा महाजन (इंदौर- मध्यप्रदेश)
16 व्या लोकसभेचे उपसभापती - थंबी दुराई (करूर - तामिळनाडू)
महाराष्ट्र राज्य उच्च पदस्थ -
महाराष्ट्र राज्यपाल : सी./चेन्नामेनिनी विद्यासागर राव (तेलंगणा) (30 ऑगस्ट 2014 पासुन) (18 वे राज्यपाल)
राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष : मुख्यमंत्री असतात - श्री. देवेंद्र फडणवीस
राष्ट्रीय कृषि आयोग अध्यक्ष : डॉ. एम.एस. स्वामीनाथन
महाराष्ट्राचे मुख्य निवडणुक अधिकारी - श्री. नितीन गद्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव/प्रिन्सिपल सेक्रेटरी - श्री. नृपेंद्र मिश्रा (27 मे 2014 पासुन)
भारताचे नवे अॅटर्नी जनरल/महान्यायवादी बनले - श्री. अॅड. मुकूल रोहतगी (28 मे 2014 पासुन)
रोहतगी हे भारताचे 14 वे अॅटर्नी जनरल आहेत.
केंद्र सरकारमधील सध्याचे नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसर्या क्रमांकाचे मंत्री - राजनाथ सिंह.
महाराष्ट्र राज्याचे नवे महालेखापाल बनले - श्री सायंतानी जाफा
भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष - अशोक चावला
महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणुक आयुक्त - जे एस. सहारिया (5 सप्टेंबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी निला सत्यनारायण या होत्या.)
राज्य निवडणुक आयुक्त हे घटनात्मक पद असून यांची नियुक्ती राज्यपाल करतात. तसेच पद व गोपनियतेची शपथ राज्यपाल देतात.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - सुसान राईस
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ऑक्टोबर 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली - अरविंद सुब्रमण्यम (16 ऑक्टोबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी इला पटनायक होत्या).
एन.आय.ए./नॅशनल इंटेजिलन्स एजन्सी/राष्ट्रीय तपास संस्था चे प्रमुख/संचालक - शरद कुमार.
भारताचे नवे नियंत्रक व महालेखापाल/कॅग - शशिकांत शर्मा