बंगालची फाळणी बद्दल माहिती
लॉर्झ कर्झन हा साम्राज्यावादी व स्वसमूह श्रेष्ठत्व सिध्दान्तांचा कट्टर पुरस्कर्ता होता.
1903 सर अॅन्डयू फ्रेझरने कर्झनचा आदेश मानून फाळणीची योजना तयार केली.
ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाल्याने मे 1905 मध्ये लंडनच्या स्टॅंर्डट वर्तमानपत्राने प्रथम जाहीर केली.
बिहार व ओरिसा विस्ताराने मोठा प्रदेश असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी फाळणी करण्यात आली.
परंतु प्रत्यक्षात तेथील राष्ट्रवादी चळवळ नष्ट करणे आणि हिंदु मुसलमान यांच्यात भेदनीतीचे राजकारण करणे हाच उद्देश बंगालच्या फाळणीचा असावा.
पूर्व बंगाल व आसाम प्रदेश एकत्र आणि पश्चिम बंगालचा प्रदेश असे विभाजन केले.
फाळणी विरोधी बंगालमध्ये वंगभंग आंदोलन सुरु झाले. कोलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड सभा घेऊन निषेध केला.
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी दि बंगाली वृत्तपत्रातून आंदोलनाचा इशारा दिला 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस राष्ट्रीय शोक दिन जाहिर करुन याच दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम केला.
गुरुदेव टागोर यांनी हमारा सोनार बंगला हे काव्य रचले वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले बंगाली ऐक्याचे प्रतीक म्हणून आनंद मोहन बोस यांनी फेडरेशन हॉल चे भूमिपूजन केले.
फाळणी रद्द होत नाही तोपर्यत लढा चालू ठेवण्या बाबत निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment