Bookmark

Bookmark this Blog

Friday, January 29, 2016

गिआन योजना

गिआन योजना २०१५  
==================================
१) ३० नोव्हेंबर २०१५ रोजी मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आयआयटी, गांधीनगर (गुजरात) येथे गिआन (Global Intiative On Acadamic Network - GIAN) ह्या योजनेचा शुभारंभ केला.
.
=============
हेतू 
=============
ह्या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील आयआयटी, एनआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ, आयआयआयटी, नॅकद्वारे (अ) प्रमाणपत्र मिळवलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठांच्या तज्ञाचे मार्गदर्शन मिळणर आहे.
.
देशातील शैक्षणिक संसाधनांची गुणवत्ता वाढविणे, गुणवत्ता सुधारणांचा वेग वाढविणे, भारताची वैज्ञानिक व तांत्रिक क्षमता जागतिक दर्जाची बनविणे हे या योजनेचा हेतू आहे.
=============
उद्दिष्ट्ये 
=============
१) भारतीय शैक्षणिक संस्थामध्ये प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सहभाग वाढविणे
.
२) भारतीय अध्यापकांना आंतरराष्ट्रीय तज्ञाबरोबर माहिती व ज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी देणे
.
३) भारतीय विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय अध्यापकांकडून अध्ययनाची संधी देणे
.
४) उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती करणे.
.
५) शैक्षणिक संस्थामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा सहभाग व उपस्थिती वाढविणे
===============
समिती 
===============
या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने संसाधन विकास मंत्रालयाने सचिव (HRD विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली 'गिआन अंमलबजावणी समिती' ची स्थापना केली आहे. ही समिती 'गिआन' संबंधी अभ्यासक्रमाना मंजुरी देण्याचे काम करेल तसेच या अभ्यासक्रमासाठी आवश्यक निधी मंजूर करेल.

No comments:

Post a Comment