Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

दशांश अपुर्णांक

���� दशांश अपूर्णांक��

ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10 च्या घातांकात असतो. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात.

उदाहरणार्थ : 8/10 = 0.8, 3/100 = 0.03

व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना : प्रथम छेद 10 किंवा 10 च्या घातांकात करा.

उदाहरणार्थ : 2/5 = 2×2/5×2 = 4/10 = 0.4, 3/25 = 3×4/25×4 = 12/100 = 0.12

छेदाच्या 1 वर जेवढे शून्य असतील, तेवढया स्थळानंतर अंशांच्या संख्येत डावीकडे दशांश चिन्ह धा.

उदाहरणार्थ : 5/100 = 0.05, 25/100 = 0.25

दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना :

गुणांकातील एकूण स्थळे मोजून तेवढया स्थळानंतर गुणाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.

उदाहारणार्थ : 15×7 = 105 :: 0.15×0.7 = 0.105 याचप्रमाणे 0.15×0.07 = 0.0105.

दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना : भाजकाची जेवढी स्थळे भाज्यापेक्षा जास्त, भागाकारात तेवढे शून्य उजवीकडे देणे.

No comments:

Post a Comment