Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

महत्वाचे खगोल - अंतराळ - तंत्रज्ञान

महत्वाचे खगोल-अंतराळ-तंत्रज्ञान :
Posted: 28 Jan 2016 12:21 AM PST
 महत्वाचे खगोल-अंतराळ-तंत्रज्ञान :

1. जी सॅट-6 हा दूरसंचार उपग्रह

हा उपग्रह 27 ऑगस्ट 2015 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सोडण्यात आला.
 जी सॅट मालिकेतील हा 12 वा उपग्रह आहे. या उपग्रहाचा कार्यकाल 9 वर्षाचा आहे.
 या उपग्रहाचे वजन 2117 किलो आहे.
 या उपग्रहाच्या उड्डाणासाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर दुसर्‍यांदा करण्यात आला यापूर्वी 5 जानेवारी 2014 रोजी जी सॅट-5 या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी प्रथम क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला होता.
 2 टनापेक्षा जास्त वजनाचा उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केला जातो.
 स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून उपग्रह अवकाशात सोडणारा भारत हा अमेरिका, रशिया, जपान, चीन, फ्रान्स,या देशानंतर जगातील 6 वा देश ठरला.
 25 व भूस्थिर दूरसंचार उपग्रह म्हणून जी सॅट-6 ओळखला जातो.

2. इंटरनॅशनल अॅस्त्रोमिकल युनियन चे उपाध्यक्ष आहेत- डॉ. अजित केंभावी

3. अमेरिकेतील हॉवर्ड स्मित सॉनियन येथील खगोल भौतिकी केंद्रात चंद्रा क्ष-किरण दुर्बिण उभारलेली आहे. या दुर्बिणीला सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचे नाव दिले आहे.

4. तामिळनाडूत श्री पेरांबदूर जवळ अंतराळनगरी/एअरोस्पेस पार्क उभरला जात आहे.

5. पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह - अॅस्ट्रोसॅट चे 28 सप्टेंबर 2015 रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

या उपग्रहाचे वजन 1513 किलो.
 हा उपग्रह 650 किमी च्या कक्षेत फिरणार आहे.
 श्रीहरीकोट्टा येथे सतीश धवन स्पेस सेंटर येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
 हे प्रक्षेपण पपीएसएलव्ही-सी30 च्या माध्यमातून करण्यात आले.
 या अॅस्ट्रोसॅटसह इंडोनेशिया व कॅनडाचा प्रत्येकी 1 उपग्रह आणि अमेरिकेचे 4 उपग्रह प्रथमच पाठविण्यात आले.
 अॅस्ट्रोसॅट या उपग्रहात सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप, लार्ज एरिया एक्स रे, प्रोपशनल काउंटर, कॅडमीयम झेनीक टेल्यूराईट इमेजर ही उपकरणे पाठविण्यात आली.
 अवकाशातून पृथ्वीवर येणार्‍या किरणांच्या उगमाचा अभ्यास कॅडमीयम झेनीक टेल्यूराईट इमेजर या मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेने विकसित केलेल्या उपकरणाव्दारे करण्यात येईल.
 या उपग्रहाला 2.7 कोटी डॉलर खर्च आला असून या उपग्रहाचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे.
 अॅस्ट्रोसॅटसह एकूण 6 विदेशी उपग्रह असे एकूण 7 उपग्रहाचे एकत्रित प्रक्षेपण करण्यात आले.
 अॅस्ट्रोसॅट प्रकल्पाचे संचालक - शास्त्रज्ञ के.एस. सरमा.
 खगोलिय उपग्रह/वेधशाळा अवकाशात पाठविणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला. यापूर्वी अमेरिका, युरोपीय यूनियन, रशिया, जपान या चार देशांनी स्वत:च्या वेधशाळा अवकाशात पाठविल्या आहेत.

6. आदित्य-1

हा उपग्रह/मोहीम इस्त्रो सूर्याच्या संशोधनासाठी पाठविणार आहे.
 ही मोहीम सन 2017-18 मध्ये यशस्वी केली जाईल.

7. 28 सप्टेंबर 2015 रोजी भारतात सूपर मून आणि खग्रास चंद्रग्रहण 33 वर्षांनंतर दिसले.

यापूर्वी सूपर मून आणि खग्रास चंद्रग्रहण 1982 साली दिसले होते.

8. अरसॅट-2 हा दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडणारा देश-अर्जेटीना

9. मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी आतापर्यंत पाठविलेल्या मोहिमा - मरिनर, व्हायकिंग, मार्स गलोबन सर्व्हेइअर, पाथ फाइंडर, ओडिसी, फिनिक्स, स्पिरीट, क्युरीऑसिटी, अपॉर्च्यूनिटी, मार्स रिकोनेसन्स ऑर्बिटर

10. भारताच्या इस्त्रो संस्थेने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या संशोधनासाठी प्रक्षेपित केले होते. हे मंगळ यान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले.

11. अमेरिकेच्या नासा संस्थेने अवकाशात सोडलेला नॅनो उपग्रह - क्युब सॅट

12. 68 पी-चुरायु मोव्ह गेरासिमेंको धुमकेतू-या घुमकेतुवर यूरोपियन युनियनचे फिनीलंडर हे यान जुलै 2015 मध्ये उतरले आहे.

13. अमेरिकेच्या नासा या संस्थेने प्लूटो या सूर्यमालेतील शेवटच्या लघूग्रहाकडे पाठविलेले न्यू होरायझन्स हे यान 14 जुलै 2015 रोजी प्लूटो ग्रहाच्या जवळ पोहोचले.

14. ब्रेक थ्रु लिसन प्रकल्प/मोहीम -

ही मोहीम पर ग्रहातील सजीवांचा शोध घेण्यासाठी जेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग आणि रशियातील श्रीमंत व्यक्ती युरी मिलनेर यांनी हाती 10 जुलै 2015 रोजी घेतली, या प्रकल्पाचे नाव सर्च फॉर एक्स्ट्रा टेरिस्ट्रीएल इंटेलिजन्स/सेटी असे आहे.
 इंग्लंडमधील प्रसिद्ध विश्वरचना वैज्ञानिक स्टिफन हॉकिंग हे वयाच्या 21 व्या वर्षापासून मोटार न्यूरॉन डिसीज या आजाराने ग्रस्त आहेत.

15. भारतीय अंतराळ संशोधन संस्था/इस्त्रो चे अध्यक्ष - डॉ.ए.एस. किरणकुमार

16. चांद्रयान-1 मोहीम - भारताच्या या मोहिमेचे शिल्पकार/जनक आहेत - शास्त्रज्ञ डॉ. एम./मयलस्वामी अण्णा दुराई

17. इस्त्रोच्या बंगळुरू येथील उपग्रह केंद्राचे नवे संचालक बनले - डॉ. एम. अण्णा दुराई (यांच्यापुर्वी एस.के. शिवकुमार होते.)

महत्वाच्या मोहिमा व अभियान :
Posted: 28 Jan 2016 12:12 AM PST
महत्वाच्या मोहिमा व अभियान :

महाराष्ट्र शासन कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबवत आहे.
 सहावा भारत आणि मालदिव या दोन देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव केरळमधील तिरूअनंतपुरम येथे 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2015 दरम्यान आयोजीत केला होता.
 या लष्करी सरावात भारताची बिहार रेजिमेंट सामिल झाली होती.
 25 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2015 दरम्यान स्वच्छता पंढरवाडा देशभर पाळण्यात आला.
 अमृत/अटल मिशन फॉर रिजिव्हानेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अभियान
 हे अभियान केंद्र सरकार देशातील 500 शहरांमध्ये राबविण्यात येणार असून केंद्र सरकार 1003 कोटी रुपये या योजनेत सहभागी शहराला देणार आहे.
 या योजेतून पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या, परिवहन व्यवस्थेत सुधारणा इ. सुविधा शहरात राबविणे बंधनकारक आहे.
 या योजनेत महाराष्ट्रातील 43 शहरांची निवड झाली.
 हे अभियान सन 2015-16 ते सन 2019-20 या पाच वर्षाच्या कालखंडात राबविले जाणार आहे.
 या योजनेत ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखांच्या आत आहे अशा शहरांची निवड केली गेली.
 ही योजना राबविताना केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 25 टक्के व संबंधित शहराची स्थानिक संस्था 25 टक्के असा आहे.
 ही योजना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र सरकारने सुरू केली.
 मलबार युद्ध सराव सन 2015 - यामध्ये संयुक्तपणे तीन देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला - भारत, अमेरिका, जपान.
 सुगम्य भारत अभियान - हे विकलांग व्यक्तींच्या विकासासाठी आखण्यात आले आहे.
 मित्रशक्ति लष्करी संयुक्त कवायत - हा संयुक्त लष्करी सराव सप्टें.- ऑक्टो. 2015 मध्ये औंध, पुणे येथे भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान संपन्न झाला.
 पोलीस मित्र अभियान - या अभियानाची संकल्पना महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांची आहे.
 प्रवीण दिक्षित यांनी नागपूर चे पोलीस आयुक्त असताना पोलीस मित्र ही संकल्पना राबविली होती. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जात आहे.
 पोलीस मित्र अभियान ची संकल्पना ही एका पोलीसासोबत पाच मित्र अशी आहे.
 ऑपरेशन वात्सल्य - ही मोहीम हरवलेल्या मुलांसाठी केरळ राज्य सरकारने राबविली.
 ऑपरेशन मुस्कान मोहीम - केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात गेल्या 5 वर्षात हरवलेल्या/बेपत्ता झालेल्या लहान बालकांच्या शोधासाठी ही मोहीम सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार 1 जुलै 2015 पासून राबविली.
 मिलन नौदल कवायत - सन 2014 मध्ये हिन्दी महासागरात 17 देशातील नौदलांच्या एकत्रित कवायत भारतीय नौदलाने घेतली होती.
 ऑरेशन राहत - युद्धग्रस्त येमेन देशातून तेथील भारतीय नागरीकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन राहत मार्च-एप्रिल 2015 मध्ये यशस्वी राबविले.
 उडाण अभियान - जम्मू काश्मिरमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी हे अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment