Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

माझी कन्या भाग्यश्री आणि दिनदयाळ योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना-

*राज्यात गत दहा वर्षात मुलीचा जन्मदर घटल्याने मुलीच्या जन्मदर वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना जाहीर करण्यात आली आहे. 

*या योजनेनुसार एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी 5 हजार रूपये दिले जाणार.

*तसेच मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत पोषण आहाराकरीता 10 हजार रूपये पहिली ते पाचवीपर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी 12 हजार 500 रूपये तर सहावी ते बारावीच्या शिक्षणापोटी 21 हजार रूपये मिळतील. 

*पालकांचा विमा उतरविला जाणार आणि पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार रूपये तर अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये मिळतील.

*मुलीचा 21 हजार रूपयांचा विमा करून 18 वर्ष झाल्यानंतर 1 लाख रु. मिळतील.

* मुलीच्या जन्मदरवाढीसाठी अशा प्रकारचे पाऊल उचल्याबद्दल मुलीचे आजी-आजोबा यांना सोन्याचे नाणे देत गौरवण्यात येणार आहे.

* त्याचबरोबर ज्या गावाने मुलीच्या जन्मदर वाढीसाठी प्रोत्साहन दिले त्या ग्रामपंचायतींना 5 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. 

*दोन मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास वरील सर्व फायदे विभागून दिले जातील. 

----------------------------------

पंडीत दीनदयाळ योजना-

*राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत देण्यात येणार्‍या घरकुलासाठी जागा खरेदी करता यावा यासाठी राज्य सरकारने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने योजना सुरू केली आहे.

*या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

*राज्य सरकार व केंद्र सरकार तर्फे अनु. जाती व अनु.जमातीसाठी दारीद्ररेषेखालील बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा आवास, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना राबविण्यात येते.

*परंतु आता वाढत्या लोकसंख्यामुळे घरासाठी जागा शिल्लक नाही या योजनेअंतर्गत 500 चौ. फुट जागेसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

*तसेच मोठ्या ग्रामपंचायती, नागरी भागात दोन मजली किंवा तिन मजली घरे बांधण्यास मुभा देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment