Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

महत्वाच्या मोहिमा अन् अभियान

महत्वाच्या मोहिमा व अभियान :

महाराष्ट्र शासन कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबवत आहे.
 
सहावा भारत आणि मालदिव या दोन देशांदरम्यान संयुक्त लष्करी सराव केरळमधील तिरूअनंतपुरम येथे 30 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2015 दरम्यान आयोजीत केला होता.
 
या लष्करी सरावात भारताची बिहार रेजिमेंट सामिल झाली होती.
 
25 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2015 दरम्यान स्वच्छता पंढरवाडा देशभर पाळण्यात आला.
 
अमृत/अटल मिशन फॉर रिजिव्हानेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अभियान
 
हे अभियान केंद्र सरकार देशातील 500 शहरांमध्ये राबविण्यात येणार असून केंद्र सरकार 1003 कोटी रुपये या योजनेत सहभागी शहराला देणार आहे.
 
या योजेतून पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या, परिवहन व्यवस्थेत सुधारणा इ. सुविधा शहरात राबविणे बंधनकारक आहे.
 
या योजनेत महाराष्ट्रातील 43 शहरांची निवड झाली.
 
हे अभियान सन 2015-16 ते सन 2019-20 या पाच वर्षाच्या कालखंडात राबविले जाणार आहे.
 
या योजनेत ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखांच्या आत आहे अशा शहरांची निवड केली गेली.
 
ही योजना राबविताना केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 25 टक्के व संबंधित शहराची स्थानिक संस्था 25 टक्के असा आहे.
 
ही योजना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने केंद्र सरकारने सुरू केली.
 
मलबार युद्ध सराव सन 2015 - यामध्ये संयुक्तपणे तीन देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला - भारत, अमेरिका, जपान.
 
सुगम्य भारत अभियान - हे विकलांग व्यक्तींच्या विकासासाठी आखण्यात आले आहे.
 
मित्रशक्ति लष्करी संयुक्त कवायत - हा संयुक्त लष्करी सराव सप्टें.- ऑक्टो. 2015 मध्ये औंध, पुणे येथे भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान संपन्न झाला.
 
पोलीस मित्र अभियान - या अभियानाची संकल्पना महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांची आहे.
 
प्रवीण दिक्षित यांनी नागपूर चे पोलीस आयुक्त असताना पोलीस मित्र ही संकल्पना राबविली होती. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जात आहे.
 
पोलीस मित्र अभियान ची संकल्पना ही एका पोलीसासोबत पाच मित्र अशी आहे.
 
ऑपरेशन वात्सल्य - ही मोहीम हरवलेल्या मुलांसाठी केरळ राज्य सरकारने राबविली.
 
ऑपरेशन मुस्कान मोहीम - केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात गेल्या 5 वर्षात हरवलेल्या/बेपत्ता झालेल्या लहान बालकांच्या शोधासाठी ही मोहीम सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार 1 जुलै 2015 पासून राबविली.
 
मिलन नौदल कवायत - सन 2014 मध्ये हिन्दी महासागरात 17 देशातील नौदलांच्या एकत्रित कवायत भारतीय नौदलाने घेतली होती.
 
ऑरेशन राहत - युद्धग्रस्त येमेन देशातून तेथील भारतीय नागरीकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन राहत मार्च-एप्रिल 2015 मध्ये यशस्वी राबविले.
 
उडाण अभियान - जम्मू काश्मिरमध्ये युवकांना रोजगार निर्मितीसाठी हे अभियान केंद्र सरकारने सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment