---------- --------- ----------- ---------- --------
राष्ट्रीय काँग्रेस स्थापना पार्श्वभूमी
----------------------------------------------
ब्रिटिशांनी भारत जिंकला व भारत एका साम्राज्यवादी सत्तेची वसाहत बनून राहिला खरे तर एक प्रश्न अनुत्तरीत राहतो कि खरेच ब्रिटीशांनी आपल्या ताकतीने भारत जिंकला कि भारतीयांनी तो सहजपणे ब्रिटिशांना जिंकू दिला. एसोत सरतेशेवटी ब्रिटिश भारताचे सत्ताधीश बनले हे मात्र सत्य.
ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतीय जनतेनं आपला असंतोष व्यक्त करण्याचे एक मध्यम म्हणून सशस्त्र उठावाच्या मार्ग अवलंबिला मात्र ब्रिटिश त्यात अग्रेसर असल्याने भारतीय पराभूत झाले. याच काळात 1835 मध्यें भारतात इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झाला.
याच शिक्षणातून भारतीयांना ब्रिटिश विरोध करण्याचा नवीन मार्ग सापडला. आणि तो मार्ग म्हणजे सनदशीर चळवळीचा मार्ग होय. लगेचच 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जगली. भारतीय एका नवीन मार्गाने ब्रिटिश सत्तेला विरोध करण्यास सिध्द झाले.
राष्ट्रीय काँग्रेसपूर्वी अनेक प्रांतिक संघटना कार्यरत होत्या. मात्र त्यांचे कार्य प्रांतिक पटलजपुरतेच मर्यादित होते त्यामुळेच भारतीयांची एक राष्ट्रीय संघटना आवश्यक बनली. प्रांतिक संघटना पुढीलप्रमाणे होय.
प्रांतीय संघटना - बंगाल
1) 1836 वंगभाषा प्रसरिका सभा
संस्थापक - रॉय यांचे अनुयायी
2) 1838 जमींदारी असोसिअशंन
द्वारकानाथ टैगोर
3) 1843 बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
जॉर्ज थॉमसन व् जॉन एडम
4) 1851 बंगाल ब्रिटिश इंडिया
असोसिएशन
5) 1875 इंडिया लीग
शिशिर कुमार घोष
वर्तमानपत्र - अमृतबझार
पत्रिका
6) 1876 इंडियन अस्सोसिअशन
सुरेन्द्रनाथ बनर्जी व् अनदमोहन
बोस
वर्तमानपत्र - बंगाली
प्रांतीय संघटना - मुम्बई
1) 1852 बॉमबे असोसियशंन
नाना शंकरशेठ
भारतातील पहिली राजकीय
संघटना
2) 1867 पूना एसोसियशन
महादेव गोविन्द रानडे
3) 1870 सार्वजानिक सभा
सार्वजानिक काका
( गणेश वासुदेव जोशी)
4) 1885 बोम्बे प्रेसिडेंसी असोसियशन
बदरुद्दीन तैयबजी, फ़िरोज़शाह
मेहता,
काशीनाथ विश्वनाथ तेलंग
प्रांतीय संघटना - मद्रास
1) 1852 मद्रास नेटिव अस्सोसियशन
2) 1884 मद्रास अस्सोसिअशन
सुब्बाराव पंतलु, सुब्रमण्यम अय्यर
वीर राघवाचार्य, पी आनंदचारलू
इतर संघटना
1866 ईस्ट इंडिया अस्सोसियशन ( लंडन)
दादाभाई नावरोजि
राष्ट्रीय काँग्रेस स्थापना पार्श्वभूमी
लॉर्ड लिटन काळात भारतीय जनतेवर अन्याय करी ठरणारे अनेक कायदे करण्यात आले. त्यातूनच जनतेत मोठा असंतोष वाढीस लागला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसीअशनच्या माध्यमातून असंतोष प्रसारित केला. यातूनच पुढे राष्ट्रीय परिषद आयोजित केली.
1883 रोजी कलकत्ता विद्यापिठाच्या दीक्षांत समारंभात भारतीय करीत संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियन या नावाची संघटना स्थापन करण्यात आली. पुढे 1885 तिचे नामकरण इंडियन नॅशनल काँग्रेस असे दादाभाई नावरोजी यांच्या पुढाकारात करण्यात आले. प्रथम अधिवेशन मुंबईला गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयात घेण्यात आले.
1) ऍलन हम यांची भूमिका
ह्युम हे एक सनदी सेवा संबधित नोकर असूनही त्यांनी भारतीय संघटना स्थापन करावी हे एक गूढ म्हणावे लागेल. अनेक इतिहास करांनी या घटनेला सुरक्षा झडप सिद्धांत असे नाव दिले. मात्र बिपिनचंद्रा यांनी हा सिद्धांत नाकारला.
2) ह्युम याना भरतीयकरिता खरोखर संघटना स्थापन करायची होती का ?
याचे उत्तर निसचित देता येणार नाही कारण ह्युम यांनी भारतीयांना संघटना अधिक तेज करण्याचा सल्ला दिलेला आहेच. मात्र सुरेंद्रनाथ सारख्या जहाल व्यक्तीला त्यांनी राष्ट्रीय संघटनेपासून दूर ठेवले.
3) भारतीयांनी ब्रिटिश व्यक्तीने स्थापन केलेल्या संस्थेत का सहभाग घेतला?
कारण भारतीयांनी संघटना स्थापन करण्यास ब्रिटिश परवानगी दिली नसती. शिवाय अशी संघटना स्थापन झाली असती तर त्या संघटनेच्या वाटचालीत अनेक अडचणी निर्माण केल्या असत्या. म्हणूनच भारतीयांनी ब्रिटिश व्याकरी ए स्थपन केलेल्या संघटनेत सहभाग घेतला.
अशरीतिने भारतीयांचे नेतृत्व करणारी भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आली.
Bookmark
Bookmark this Blog
Saturday, January 30, 2016
राष्ट्रीय काँग्रेस स्थापना पार्श्वभुमी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment