Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, November 25, 2015

चालु घडामोडी ५८

����२६ नोंव्हेबर "संविधान दिन"����

�� महाराष्ट्र शासनाचा आदेश ����
��टाळना-यांवर कार्यवाही चे आदेश��

��सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यकर्त्यांना तसेच सार्वजनिक, शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी अधिकारी यांना कळवण्यात येते कि आप-आपल्या  वस्तीत, गावात, शहरात,कार्यालयात २६नोंव्हेबर रोजी "संविधान दिन" मोठ्या उत्साहात साजरा करा.

��सविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्पूर्ण सविधान तयार झाल्यावर २६नोव्हें १९४९ रोजी आपल्या देशाच्या (भारताच्या) स्वाधीन केले. तो दिवस "सविधान दिन" होय.

����महारास्ट्र शासनाचा आदेश��

महारास्ट्र शासनाचे उप सचिव व मुख्य मंत्र्यिचे खाजगी सचिव दिनेश रामचंद्र डिंगळे यांनी ९ ऑक्टो १५ ला सामाजिक न्याय विभागा तर्फे ऐक शासकिय निर्णय घेतला.३ नोव्हें ला त्यावर अमल बजावणीचा निर्णय व ६ नोव्हें २०१५ ला ३५७ क्र.चे "शासकिय परिपत्रक" काढले.

����सदर आदेश शाळा, विद्यालय,महाविद्यालय, शासकिय, निमशासकिय तसेच खाजगी कार्यालयांना सुद्धा लागु आहे.केंद्र सरकार ने घोषित केलेल्या बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंतीचा संदर्भ या आदेशाला आहे.

��या परिपत्रका नुसार "२६ नोंव्हे. या "संविधान दिनाला" भारतीय रास्ट्रीय ध्वज फडकाऊन, "भारतीय संविधान च्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करावे".
भारतीय घटणेचे शिल्पकार "डाॅ.बाबासाहेबांचा जयघोष" व "भारतीय संविधान चिरायु हो" च्या घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात यावी.

��सविधान शिल्पकारचा फोटो व सविधानची प्रत ठेउन
भारतीय संविधानावर चर्चा सत्र करावे. शक्य असल्यास सविधान अर्पण करतांना डाँ.बाबासाहेबांनी सविधान सभेत दिलेले सविधान बाबत चे अंतिम भाषनाचे वाचन करावे. या सर्व कार्यक्रमाचे फोटो, ऑडियो-व्हीडीओ क्लिप जिल्हाधिकारी किव्हा स्थानिक प्रशासनाच्या सुपुर्द करावेत. शासन निर्णयाचा मान ठेवुन प्रत्येक अधिकऱ्यांना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी च्या धर्तिवर याची दखल घेण्यास भाग पाडावे.
तसेच प्रिंट,इलेक्ट्रानिक व सोशल मिडिया वर प्रसिद्धि द्यावी.

��ज्या शाळा, विद्यालय,महाविद्यालय, शासकिय निमशासकिय , कार्यालयात "संविधान दिन" साजरा केला जाणार नाही त्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

��इतर सविधान समर्थक कार्यकर्त्यानी सम्बंधित शाला किव्हा कार्यालयातील प्रमुखाला "सविधान दिन" कार्यक्रमाची आधीच सुचना द्द्यावी.त्यांना शासकीय परिपत्र्क मिलालेले आहे.  त्यावर अमल न करणारे सविधानाचे विरोधक समजल्या जातील.

��असे झाल्यास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शहरातील नगरसेवक आदी लोकप्रतिनिधि किव्हा सामाजिक, राजकीय विशेस्था  कार्यकर्त्यन्नी  जवळच्या पोलिस ठाण्यात ताबडतोब तक्रार नोंदवावी.पोलिसांनी सुद्धा "सविधान दिन" चा कार्यक्रम करावा असा गृह खात्यालाही आदेश आहे. 

��भारतीय संविधानाने आपणाला अधिकार दिल्याने आपण त्या अधिकाराचा वापर करावा.
♦♦♦♦♦♦♦♦♦♦

Tuesday, November 24, 2015

चालु घडामोडी ५७

��चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2015)��

��देशातील स्मार्ट शहरांसाठी इस्राईलची मदत :

केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी मदत करणाऱ्या 'डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन ॲडव्हायजरी सर्व्हिसेस' (डीसीएफ) आणि इस्राईलमधील तेल अविव-याफो महापालिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेल अविव-याफो शिक्षण महाविद्यालयादरम्यान सहकार्य करार झाला आहे.
 भारतातील शहरांचे 'स्मार्ट सिटी'मध्ये रूपांतर घडवून आणण्याच्या प्रक्रियेला आता इस्राईलच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पातील तज्ज्ञांचे सहकार्य मिळणार आहे.
 तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात कामगिरी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख यासाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या 'द परफॉरमन्स मॅनेजनेंट डिलिव्हरी युनिट' (पेमांडू) आणि भारताचा निती आयोग यांच्यात सहकार्य करार करण्यात आला.

��भारत आणि मलेशिया तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी :

द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब तुन रझाक यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
 भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.
 दोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.

��मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू :

तमिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू करण्याची तयारी दर्शविली आहे.
 सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह केवळ चौदा राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होत आहे.
 देशभरातील सर्व राज्यांच्या अन्न सचिवांची परिषद आज दिल्लीत झाली.
 2013 मध्ये संसदेने अन्नसुरक्षा कायदा मंजूर केल्यानंतर सर्व राज्यांमध्ये लागू करण्याची मुदत आतापर्यंत तीन वेळा वाढविण्यात आली होती.
 त्यातील शेवटची मुदत सप्टेंबरअखेर संपली.
 त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या अन्न सचिवांच्या बैठकीमध्ये तमिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च 2016पर्यंत अंमलबजावणीस होकार दिला आहे.
 यातील उत्तर प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्‍मीर आणि अंदमान-निकोबारमध्ये जानेवारीअखेरपर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू होणार आहे.
 तर उर्वरित गुजरात, केरळ, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड हे मार्चपर्यंत लागू करतील.
 तमिळनाडूमध्ये सरसकट सर्वांसाठी स्वस्त दरात धान्यपुरवठा करण्याची योजना सुरू असल्याने अन्नसुरक्षा कायदा लागू करणे शक्‍य नसल्याचे या राज्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पासवान म्हणाले.

��भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये :

भारत आणि पाकिस्तानमधील बहुचर्चित द्विपक्षीय क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये घेतली जाऊ शकते, असे वृत्त 'क्रिकइन्फो'ने दिले आहे.
 अर्थात, दोन्ही बाजूंकडून यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान हे दोघेही दुबईत आहेत.
 यासंदर्भातील अधिकृत घोषणा 27 नोव्हेंबरला केली जाईल.
 यापूर्वी भारताने 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.
 तर 2007 नंतर पाकिस्तानने द्विपक्षीय मालिकेसाठी भारताचा दौरा केलेला नाही.

��महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भारतरत्नासाठी शिफारस :

महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

��सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला सलग चौथ्यांदा विजेतेपद :

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावित या मोसमाची अखेर विजेतेपदाने केली.
 जोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-3.6-4 असा पराभव केला.
 जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोकोविचने आपला विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला आहे.
 एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या 46 वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे.
 यापूर्वी पीट सॅम्प्रास आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे.
 जोकोविचचे या वर्षातील हे अकरावे विजेतेपद आहे.
 त्याने या वर्षात खेळलेल्या 88 सामन्यांपैकी 82 सामन्यांत विजय मिळविलेला आहे.

��मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर :

प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
 हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
 'कार्टी काळजात घुसली'चा 100वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.
 पुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीदिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.

��कार्मिक मंत्रालयाच्या शिफारशी :

अनुसूचित जाती-जमाती व मागास जातीतील मुलांना जातीचा व अधिवासाचा दाखला मिळण्यात असंख्य अडचणी येत असल्याने यापुढे त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरच दलित असा शिक्का मारला जाण्याची शक्यता आहे.
 सरकारने त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
 सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शाळांना अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना अधिवास व जात प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
 मुले आठवीत शिकत असतानाच त्यांना शाळेने हे प्रमाणपत्र द्यायचे आहे.

��स्वीडनमधील वैज्ञानिकांचे संशोधन :

स्वीडनमधील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये काही सर्किट्स (मंडले) प्रत्यारोपित करून त्यातील पोषके व जलवाहक वाहिन्यांच्या प्रणालीत बदल केले व त्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुलाबाच्या रोपाची निर्मिती करण्यात आली आहे.
 वनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान यांचा संगम यात पाहण्यास मिळतो.
 स्वीडनच्या लिंकोपिंग विद्यापीठातील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये डिजिटल व अ‍ॅनॅलॉग सर्किट्स प्रत्यारोपित केली आहेत.
 या प्रकाराला सायबोर्ग वनस्पती असे म्हणता येते.
 लॅबोरेटरी ऑफ ऑर्गनॅनिक इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेचे प्राध्यापक मॅग्नस बेरग्रेन यांनी जैविक गुलाबातील काही घटक वापरून प्रथम इलेक्ट्रॉनिक मंडल (सर्किट) तयार केले.
 त्यात वायर्स, डिजिटल लॉजिक, डिस्प्ले यांचा वापर करण्यात आला होता. वनस्पतींची रचना गुंतागुंतीची असते व त्यांच्यात आयनाच्या स्वरूपातील संदेश व संप्रेरके विशिष्ट कार्ये घडवून आणत असतात.
 पण त्यांच्या या क्रिया फार हळूहळू चालत असतात. वनस्पतींमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरल्याने त्यांची ही कार्यक्षमता वाढली व विद्युत संदेश तसेच रासायनिक अभिक्रिया यांची सांगड वेगाने घातली जाऊ लागली.
 वनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स यांचा संबंध जोडणारे संशोधन यापूर्वी झालेले नाही.
 सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
 यातून आगामी काळात ऊर्जा देणाऱ्या वनस्पती तयार करता येणार आहेत.

��दिनविशेष :

राष्ट्रीय ग्राहक दिन

 

Monday, November 23, 2015

चालु घडामोडी ५६

��चालू घडामोडी (23 नोव्हेंबर 2015)��

��महानगरांसाठी धोक्‍याची घंटा :

मुंबई आणि पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यांत काही प्रमाणात साम्य असले तरी वेगळेपणा व फरकही होता.
 एक-दोघे जण अल्जीरिया या पूर्वीच्या फ्रेंच वसाहत असलेल्या देशाचे असल्याची माहितीही मिळाली आहे.
 महानगरी सुरक्षा व्यवस्थेचा स्वतंत्रपणे विचार करण्यास जी सुरवात झाली; तसेच त्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि तत्सम सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबतही संबंधित राज्यांना अधिक आर्थिक मदत करण्याचे जे काम आधीपासूनच सुरू झाले आहे, त्याला गती देण्याची वेळ आली आहे.
 सहा शहरांसाठी महानगरी पोलिस व सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळूर या शहरांचा त्यात समावेश आहे.
 सीसीटीव्ही (क्‍लोज सर्किट टीव्ही), गोपनीय माहिती संकलन आणि विश्‍लेषण केंद्र, सुरक्षा यंत्रणांबरोबरची संपर्क यंत्रणा (उदा. पोलिस - 100 क्रमांक), हवाई टेहळणी यंत्रणा (हेलिकॉप्टर्स, मानवरहित वाहने - यूएव्ही), महामार्ग किंवा हमरस्त्यांवरील गस्त तसेच महानगरांतर्गत गस्त व देखरेख, टेहळणी व पाळत यंत्रणा, सामाजिक पोलिस व्यवस्था किंवा कम्युनिटी पोलिसिंग म्हणजेच जागरूक नागरिकांचे साह्य घेऊन समाजविरोधी व संभाव्य दहशतवाद्यांवर नजर ठेवणे, पाळत ठेवणे, पोलिस दलांना आधुनिक प्रशिक्षण, महिला पोलिस, पोलिस दलांच्या दृष्टिकोनात सुधारणा व बदल करण्याचे प्रशिक्षण असे महानगरीय सुरक्षा व्यवस्थेचे मूलभूत घटक मानले जातात.

��दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्याच वर्षी मदत :

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाच्या मदतीसंदर्भात डिसेंबरअखेर केंद्र शासन घोषणा करेल.
 जानेवारीत ही मदत शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता. 22) पत्रकार परिषदेत दिली.
 केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने 20 व 21 रोजी मराठवाड्यासह राज्याचा दौरा केला. राज्य शासनाने केंद्राला 4 हजार 2 कोटींचा प्रस्ताव सादर केला, यानंतर तीनच दिवसांत पथक पाठविण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
 आतापर्यंतच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. केंद्रीय पथकाकडून झालेली या वर्षातील ही पहिलीच पाहणी आहे.
 फळपिकांचे नुकसान होणार आहे किंवा झालेले आहे, त्यांचे दोन भाग केले आहेत. त्यातील एक म्हणजे फळपिके पुनर्जीवन. त्यासाठी एक योजना तयारी केली असून केंद्राकडे निधी मागितला आहे.
 दुसरा भाग म्हणजे पूर्ण नुकसान झालेल्यांना जूनपासून नव्याने लागवड करण्यासाठी "मनरेगा‘च्या माध्यमातून शंभर टक्‍के अनुदान शासन देईल.

��कवी जयंता महापात्रा 'पद्मश्री' परत करणार :

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी आणि साहित्यिक जयंता महापात्रा यांनी आज देशातील वाढत्या नैतिक विषमतेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत "पद्मश्री‘ पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
 विरोध दर्शविण्यासाठी मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे महापात्रा यांनी दूरध्वनीवरून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

��मतदारांच्या बोटावर आता मार्करचे निशाण :

मतदान केल्यानंतर मतदाराच्या पहिल्या बोटावर खूण करण्यासाठी केला जाणारी शाई आणि ब्रशचा वापर आता लवकरच इतिहासजमा होणार असून, त्याजागी मार्करचा वापर केला जाऊ शकतो.
 सध्या निवडणूक आयोगाकडून म्हैसूर पेंट्‌स या कंपनीने तयार केलेल्या मार्कर पेनाची चाचणी घेतली जात आहे.
 साधारणपणे 1962 पासून बोटावरून सहजासहजी पुसल्या जाणाऱ्या अशा शाईचा वापर केला जात आहे.
 शाईच्या बाटल्यांपेक्षा मार्करसोबत बाळगणे आणि ते साठवून ठेवणे अधिक सोपे असल्याने निवडणूक आयोग त्यांच्या वापराबाबत आग्रही आहे.
 याआधी अफगाणिस्तानामध्ये झालेल्या निवडणुकीत म्हैसूर पेंटने तयार केलेल्या मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता.

��जोकोविचने पटकावले एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सचे जेतेपद :

एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररला नमवून नोवाक जोकोविचने स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
 या स्पर्धेचा माजी विजेता असलेल्या स्वित्झर्लँडच्या फेडररचा सर्बियाच्या जोकोविचने 6-3,6-4 असा पराभव करत पुरूष एकेरीचे जेतेपद सलग चौथ्यांदा पटकावत यावर्षाची विजयी सांगता केली.
 सलग चार वर्ष घरी विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जाणारा जोकोविच हा 46 वर्षातूल पहिलाच खेळाडू ठरला आहे.
 28 वर्षीय जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये अँडी मरेचा तर विम्बल्डन व यू.एस ओपनमध्ये रॉजर फेडररचा पराभव करत तीन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजेतेपदे पटकावली.
 फ्रेंच ओपनमध्ये स्टॅन वावरिंकाने त्याचा पराभव केल्याने त्याचे चौथे ग्रॅंडस्लॅमपद हुकले. 

��प्रशांत दामले यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर :

प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
 हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
 ‘कार्टी काळजात घुसली’चा 100 वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.
 प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी मराठी रंगभूमीची गेली तीन दशके अविरत सेवा केली आहे.
 हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय कमी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला, पण कमी वयातही त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी त्यांचीच निवड योग्य असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

��मजबूत लढाऊ ड्रोन विमानाची चीनकडून निर्मिती :

चीनने अत्यंत मजबूत असे लढाऊ ड्रोन विमान तयार केले असून ते टेहळणीही करू शकणार आहे.
 हे ड्रोन विमान निर्यात बाजारपेठेचे आकर्षण ठरले आहे. याच वर्षी चीनने या ड्रोन विमानाचे उड्डाण यशस्वी केले असून ते तीन हजार किलोचे वजन सहज वाहून नेऊ शकते.
 चीनच्या लष्कराने सीएच 5 हे लढाऊ व टेहळणी ड्रोन सादर केले असून ते चायना अ‍ॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अँड एरोडायनॅमिक्स या संस्थेने तयार केले आहे.
 त्याचे उत्पादन मात्र चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कार्पोरेशन या ग्वांगडाँग राज्यातील शेनझेन येथे असलेल्या कंपनीने केले आहे.
 इतर लष्करी ड्रोनशी तुलना करता चीनचे सीएच 5 हे लष्करी ड्रोन विमान 3000किलो वजन व 900 किलो साधनसामग्री वाहून नेऊ शकते. इतर ड्रोन विमाने केवळ 1500 किलो वजन वाहून नेऊ शकतात.
 त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त टेहळणी सामग्री त्यावर ठेवता येते व ते ड्रोन विमान 80 कि.मी.च्या त्रिज्येत कुठेही फिरू शकते, असे या अ‍ॅकॅडमीचे अभियंता लॅन वेन्बो यांनी सांगितले.
 प्रगत रडार त्यावर ठेवता येते व ते रडार जाड भिंतीमागे लपलेल्या अतिरेक्यांनाही शोधू शकते.