Bookmark

Bookmark this Blog

Thursday, December 10, 2015

चालु घडामोडी ६२

����चालू घडामोडी (10 डिसेंबर 2015)����

��पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढच्या वर्षी पाकिस्तानचा दौरा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
 'हार्ट ऑफ एशिया' या परिषदेत स्वराज सहभागी झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना स्वराज म्हणाल्या, 'मोदी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य शिखर परिषदेत (सार्क) सहभागी होणार असून, पुढील वर्षी ते पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. 
 सन 2012 नंतर प्रथमच भारताच्या परराष्ट्र मंत्री पाकिस्तान दौऱयावर गेल्या आहेत तर एस. एम. कृष्णा यांनी 2012 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. 

��बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथा :

बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जगात भारताचा क्रमांक चौथा आहे. 
 भारतातून 2004 ते 2013 दरम्यान दरवर्षी 51 अब्ज डॉलर रकमेचा ओघ बाहेर पडला आहे, अशी माहिती एका थिंक टँकच्या अहवालानुसार समोर आली आहे.  
 अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या थिंक टँकच्या अहवालानुसार, बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक लागतो. 
 चीनमधून 2004 पासून 2013 पर्यंत दर वर्षाला 139 अब्ज डॉलरची रक्कम बाहेर गेली आहे. त्यापाठोपाठ रशिया (104 अब्ज डॉलर) व मेक्सिको (52.8 अब्ज डॉलर) या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला आहे. 

⌚साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पीयूष सिंग यांच्याकडे :

385 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आयएएस अधिकारी पीयूष सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला. 
 महामंडळात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्याला बसविण्यात आले आहे.

��MPSC मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीविधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. 
 सदर निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर 20 जून 2015 रोजी घोषणा प्रसिद्ध करून या निर्णयाबाबत उमेदवारांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या.या संदर्भात लोकप्रतिनिधींचे निवेदन प्राप्त झाले आहे. 
 आयोगाच्या सदर घोषणेच्या अनुषंगाने प्राप्त सूचना विचारात घेऊ न याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडे विचारविनिमय सुरू असल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. 

��दाऊदच्या मालकीच्या स्थावर मालमत्ते लिलाव :

अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील एका हॉटेलसह देशभरातील ठिकठिकाणच्या सहा स्थावर मालमत्ता व एका मोटारीचा सोमवारी जाहीर लिलाव करण्यात आला. 
 त्यापैकी पाकमोडिया स्ट्रीट येथील हॉटेल रौनक अफरोज तथा दिल्ली जायका अखेर 4 कोटी 28 लाखांना विकण्यात आले.
 ज्येष्ठ पत्रकार व देशसेवा समिती या स्वयंसेवी संस्थेचे एस. बालाकृष्णन यांनी सर्वाधिक बोली लावत हा लिलाव जिंकला. त्याचप्रमाणे दाऊदची हुंदाई कंपनीची मोटार 32 हजारांना हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपानी यांनी विकत घेतली. 
 माटुंग्यातील फ्लॅट व गुजरातमधील चार शेतजमिनी अनुक्रमे मिलन संघवी, मुकेश शहा, जयदीप डोलनिसा व सुरत येथील राजबहाद्दूर शर्मा यांनी खरेदी केल्या. 

��एच 1 बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक :

एच 1 बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी मांडले आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारतालाही फटका बसू शकतो. 
 डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर बिल नेल्सन व रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जेफ सेशन्स यांनी हे विधेयक मांडले आहे. 
 दरवर्षी दिल्या जाणाऱ्या एच 1 बी व्हिसात कपात करण्याची मागणी करणारे विधेयक त्यांनी मांडले आहे.
 पात्र अमेरिकी कर्मचारी उपलब्ध असताना अनेकदा बाहेरच्या देशातून कर्मचारी आणले जातात व त्यांच्याकडून कमी वेतनात काम करून घेतले जाते. सध्या कमाल 85,000 एच 1 बी व्हिसा दिले जातात त्यात वीस हजार व्हिसा विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताचे  अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना दिले जातात.
 भारतातून येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात व्हिसा दिला जातो. विधेयकात असे म्हटले आहे की, एच 1बी व्हिसाचे प्रमाण 15 हजारांनी कमी करावे, त्याचबरोबर 70 हजार व्हिसा वाटप करताना जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना तो द्यावा. त्यामुळे  अमेरिकी कंपन्यांना प्रथम हे सिद्ध करावे लागेल की, त्यांनी आधी अमेरिकी कर्मचाऱ्यांना संधी दिली होती.
 अमेरिकी कर्मचाऱ्याला काढून एच 1 बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्याला घेता येणार नाही.

⌚चेन्नईत चोवीस तासात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद :

चेन्नईत 1-2 डिसेंबर रोजी चोवीस तासात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 1901 पासून चोवीस तासात एवढा म्हणजे 20 इंच पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे.
 नासाने चेन्नईच्या पावसाबाबत एक नकाशास्वरूपातील चित्रही जारी केले असून ते उपग्रहाने आग्नेय भारतात 1-2 डिसेंबर रोजी झालेल्या पावसाबाबतचे आहे. दर तीस मिनिटाला उपग्रहाने नोंदलेल्या माहितीच्या आधारे हे चित्र तयार केले आहे. 
 मान्सूननंतर ईशान्य मान्सूनमुळे चेन्नईत पावसाने थैमान घातले होते. तामिळनाडूत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला होता, असे नासाच्या अर्थ ऑब्झर्वेटरीने म्हटले आहे.

��दिनविशेष :

मानवी हक्क दिन

 

Wednesday, December 9, 2015

चालु घडामोडी ६१

��चालू घडामोडी (9 डिसेंबर 2015) ��

��भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका 24 डिसेंबर ते 5 जानेवारी 2016 या कालावधीत :

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित क्रिकेट मालिका 24 डिसेंबर ते 5 जानेवारी 2016 या कालावधीत पार पडेल. या दौऱ्यास पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असून, भारत सरकारही येत्या आठवड्यात परवानगी देईल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिली.
 हा दौरा छोटा असून, मालिकेत तीन एकदिवसीय आणि दोन टी- 20 सामने खेळविण्यात येतील. 
 तसेच ही मालिका श्रीलंकेत खेळविण्यात येणार असून, येथूनच दोन्ही संघ त्यांच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यास रवाना होतील. 

��"बाईक ऍम्ब्युलन्स" सुरू करण्याचा निर्णय :

चौकाचौकांत होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांना पर्याय म्हणून पुण्यात "बाईक ऍम्ब्युलन्स" सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 
 पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यावर नागपूर येथे तो राबविण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाला "गोल्डन अवर"मध्ये उपचार मिळेल, असा विश्‍वास आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. 
 तसेच राज्यात सध्या 108 ही आपत्कालीन रुग्णसेवा कार्यान्वित आहे. 

��बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार भारताला मदत करणार :

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार भारताला मदत करणार असून, या आठवड्यामध्ये भारत-जपान दरम्यान करार होणे अपेक्षित आहे. 
 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार 8 अब्ज डॉलरचे कर्ज भारताला देणार असल्याचे जपानमधील "निक्केई" या आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. 
 जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे हे भारत दौऱ्यावर येत असून, ते याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत, या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले जाईल. 
 तसेच या रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 14.6 अब्ज डॉलर एवढा खर्च केला जाणार असून, त्यातील अर्ध्यापेक्षाही अधिक रक्कम जपान सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून उभारली जाणार आहे. 
 या बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान 505 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग उभारण्यात येईल. सध्या दोन्ही देशांमध्ये आर्थिक मदतीसंबंधीच्या अटींवर चर्चा सुरू असून, यातून दीर्घमुदतीच्या अर्थपुरवठ्यासाठी शंभर अब्ज येनचा आराखडा निश्‍चित केला जाईल. 
 तसेच जपान सरकारने याआधीही अनेक देशांना बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाची निर्यात केली आहे, 2007 मध्ये हे तंत्रज्ञान तैवानला देण्यात आले होते, इंडोनेशियामध्येही हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; पण तो चीनमुळे यशस्वी होऊ शकला नाही. 
 जपान सरकारकडून आर्थिक मदत मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने जपानकडून 4.45 ट्रिलियन येन एवढे कर्ज घेतले आहे. आता बुलेट ट्रेनसाठी भारताला कर्जाऊ दिली जाणारी रक्कमही मोठी आहे, इंडोनेशियाला यासाठी 4.72 ट्रिलियन येन एवढी रक्कम देण्यात आली होती. 
 एकदा भारताने बुलेट ट्रेनसाठी जपानी तंत्रज्ञान घ्यायचे ठरविल्यास त्यासाठी स्वतंत्र निविदा काढल्या जातील. यामध्ये प्रक्रियेमध्ये जे. आर. ईस्ट, कवास्की हेवी इंडस्ट्रीज आणि हिताची या कंपन्या सहभागी होण्याची शक्‍यता आहे. तसेच "जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी" आणि रेल्वे मंत्रालय यासाठी स्वतंत्र अभ्यास करणार आहे. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पास 2017 मध्ये सुरवात होणार असून, 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

��लोकायुक्त व न्यायमूर्ती भास्कर राव यांचा पदाचा राजीनामा :

लोकायुक्त संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून लोकायुक्त व न्यायमूर्ती भास्कर राव यांनी पदाचा राजीनामा दिला. 
 राज्यपाल वजुभाई वाला यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. कायदामंत्री टी. बी. जयचंद्र यांनी राव यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. 
 अलीकडेच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच लोकायुक्तांनी राजीनामा दिला. 
 भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर लोकायुक्त भास्कर राव दीर्घ काळ रजेवर गेले होते. 135 दिवसांच्या रजेनंतर त्यांनी राजीनामा दिला. 

��मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा :

जगभरातील चित्रकारांना भुरळ घालणाऱ्या आणि एक गूढ बनून राहिलेल्या मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा करण्यात आला आहे. 
 या चित्राच्या मागे अन्य एक चित्र असल्याचे फ्रान्सचे वैज्ञानिक पास्कल कोटे यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांच्या संशोधनातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
 संशोधक पास्कल यांनी रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा अभ्यास केला आहे. लियोनार्डो दा विंसीचे हे चित्र अनेक शतकांनंतरही एक उत्सुकता बनून राहिलेले आहे. 
 मोनालिसाच्या या चित्रामध्ये हास्याचे भाव नाहीत अथवा नजरही थेट समोर पाहणारी नाही, असे पास्कल यांचे म्हणणे आहे. 
 या चित्राचा 782 अब्ज डॉलरचा विमा आहे. दरम्यान, पास्कल यांचा हा दावा मोनालिसाचे छायाचित्र असणाऱ्या लुवरे संग्रहालयाने फेटाळला आहे. 
 संग्रहालयाने त्यांना फक्त संशोधनासाठी सहकार्य केले आहे. त्यातील निष्कर्षाशी संग्रहालय सहमत नाही. जगातील सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक असणारे आणि सर्वाधिक चर्चेतील हे लियोनार्डो दा विंसी यांचे चित्र 1503 ते 1506 च्या काळातील आहे. 
 मोनालिसाचे हास्य रहस्यमय असून यापूर्वीही अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत. फ्रान्सच्या लुवरे संग्रहालयात सध्या हे चित्र आहे.
 संशोधक पास्कल यांच्या दाव्यानुसार या चित्रात रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजी (प्रतिबिंबित करणारा प्रकाश) वापरण्यात आली आहे. एका पेंटिंगवर दुसरे पेंटिंग असल्याने यातील हास्य रहस्यमय वाटते.

⌚दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन :

दक्षिण आफ्रिकन संघाच्या भारता विरुध्दच्या सुमार प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. 
 दक्षिण आफ्रिकन संघाची सध्याची खालावलेली कामगिरी पाहता माझा पुनरागमनाचा विचार सुरु असल्याचे स्मिथने सांगितले. 
 स्मिथ मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये वीरगो सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे. 
 एमसीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मंच ठरु शकतो असे स्मिथने म्हटले आहे. 
 नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा अत्यंत दारुण पराभव केला. 

��दिनविशेष 

टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) स्वातंत्र्य दिन
 1961 : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.

 

Sunday, December 6, 2015

चालु घडामोडी ६०

������चालू घडामोडी (4 डिसेंबर 2015)������

��जगातील 200 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 16 विद्यापीठे :

��जगातील 200 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 16 विद्यापीठे आणि तंत्रसंस्थांचा समावेश आहे.
 ��"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स"नंतर अनेक आयआयटी आपले स्थान टिकवून आहेत. काही आयआयटींचा नव्याने समावेश झाला आहे. गतवर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे स्थान वधारले असून ते 16 व्या क्रमांकावर आले आहे.
 ��पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ 129 व्या क्रमांकावर आहे. मुंबई विद्यापीठाचा या यादीत समावेश नाही.
 ��टाइम हायर एज्युकेशन ब्रिक्‍स आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्‍स यांनी हे रॅंकिंग जाहीर केले आहे.
 ��13 निकषांवर या विद्यापीठांची गुणवत्ता ठरवली जाते. यासाठी अध्यापन, संशोधन, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगांकडून येणारे उत्पन्न आदी निकष लावले जातात.
 ��प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर असलेल्या चीनच्या अनुक्रमे पेकिंग आणि त्सिंगुहा विद्यापीठांनी आपले स्थान गतवर्षीप्रमाणेच अबाधित ठेवले आहे.
 ��इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनंतर देशातील अनेक आयआयटींचा समावेश या रॅंकिंगमध्ये झाला आहे. मुंबई आयआयटीचे स्थान गतवर्षी 37 वे होते, ते यंदा 29 वे आहे.
�� मद्रास आणि दिल्ली आयआयटीने यंदा अनुक्रमे 36, 37 क्रमांकांवर बाजी मारली आहे. खरगपूर आयआयटी दुसऱ्या क्रमांकावरून घसरून 45 व्या क्रमांकावर गेली आहे. पंजाब विद्यापीठ यंदा 121 व्या क्रमांकावर घसरले आहे. गतवर्षी ते 39 व्या क्रमांकावर होते.

��ब्रिटनमधील कोहिनूर हिऱ्यावर आता पाकिस्तानकडून हक्क :

��भारताच्या इतिहासकालीन ऐश्‍वर्याचे प्रतीक असणाऱ्या ब्रिटनमधील कोहिनूर हिऱ्यावर आता पाकिस्तानकडून हक्क सांगण्यात आला आहे.
�� ब्रिटनमध्ये असलेला कोहिनूर हिरा पाकिस्तानमध्ये परत आणण्यात यावा, अशी याचिका पाकिस्तानी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.  ��कोहिनूर हिरा सन 1850 मध्ये राणी व्हिक्‍टोरियाला भेट देण्यात आला होता, त्यानंतर 1953 मध्ये राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या राजमुकुटात हा हिरा विराजमान झाला होता.
�� तसेच या हिऱ्याचे वजन 105 कॅरेट असून, त्याची किंमत अब्जांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. मात्र, राणी एलिझाबेथला हा हिरा स्वत:जवळ ठेवण्याचा कोणताही हक्क नाही.
��कोहिनूर हिरा हा पंजाब प्रांताचा ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याच्यावर येथील नागरिकांचा हक्क आहे, असे जाफरी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

��फेसबुक हे चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले :

��सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक हे चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहे. फेसबुकने पूरग्रस्तांसाठी 'सेफ' नावाने बटन उपलब्ध करून दिले आहे.
 ��चेन्नईमध्ये सध्या मूसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. भारतामध्ये फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने फेसबुक पूरग्रस्तांसाठी धावून आले आहे.
 ��फेसबुक वापरकर्त्याने आपल्या खात्यावरील 'सेफ' या बटनावर क्‍लिक केल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचा मजकूर मित्रांना आपोआप जाणार आहे.
 ��तसेच गुगलनेही मुख्य पानावर 'रिसोर्स ऑफ चेन्नई फ्लड' नावाने लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या माहितीबरोबरच पूरासंबंधाची माहिती समजू शकणार आहे. शिवाय, पुराचा व्हिडिओही अपलोड केला आहे.
 ��शहरातील नागरिक आपण सुरक्षित असल्याचे सांगण्याबरोबच पुराची माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक व ट्‌विटरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
 ��दरम्यान, भारतासह, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपग्रस्त भागातील फेसबुक युजर्ससाठी फेसबुकने "सेफ्टी चेक" टूल उपलब्ध करून दिले होते. या टूलद्वारे भूकंपग्रस्त भागात असलेला युजर सुरक्षित असल्याचा संदेश मिळणार आहे.

��न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांची 43वे सरन्यायाधीश म्हणून शपथ :

��सर्वोच्च न्यायालतील सर्वात ज्येष्ठ असलेले न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांनी 43वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
�� राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
 ��सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे बुधवारी निवृत्त झाले.
 ��न्या. ठाकूर यांचा जन्म 4 जानेवारी 1952 रोजी झाला असून ते 4 जानेवारी 2017 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्याकडे वर्षापेक्षा थोडा जास्त काळ सरन्यायाधीशपदाचा कार्यभार राहील.
 ��न्या. ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पॉट फिक्सिंग आणि आयपीएलमधील सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट नियामक असलेल्या बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता.

��स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नऊ स्पर्धा जिंकल्या :

��भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या.
 ��बीजिंग, वुहान, ग्वांगझू, अमेरिकन ओपन, विम्बल्डन, चार्ल्सटन, मियामी तसेच इंडियन वेल्स असे पाठोपाठ जेतेपद पटकविण्यात ही जोडी यशस्वी ठरली.

��तामिळनाडूतील पूरग्रस्ताना एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा :

��तामिळनाडूतील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत व पुनर्वसन कामांसाठी तातडीने एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
 
��मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांची रक्कम तत्काळ जारी करण्यात येईल. केंद्राने यापूर्वी जाहीर केलेल्या 940 कोटींच्या रकमेव्यतिरिक्तही रक्कम असेल, असे मोदी यांनी येथील 'आयएनएस अडय़ार' या नौदल तळावर सांगितले.

������दिनविशेष :������

��जागतिक नौदल दिन��
 ��1958 : डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
 ��1984 : चीनने नवीन संविधान अंगिकारले.
 ��2008 : कॅनडाची संसद बरखास्त.

��������������������