Bookmark

Bookmark this Blog

Wednesday, December 9, 2015

चालु घडामोडी ६१

��चालू घडामोडी (9 डिसेंबर 2015) ��

��भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका 24 डिसेंबर ते 5 जानेवारी 2016 या कालावधीत :

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित क्रिकेट मालिका 24 डिसेंबर ते 5 जानेवारी 2016 या कालावधीत पार पडेल. या दौऱ्यास पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असून, भारत सरकारही येत्या आठवड्यात परवानगी देईल, अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी दिली.
 हा दौरा छोटा असून, मालिकेत तीन एकदिवसीय आणि दोन टी- 20 सामने खेळविण्यात येतील. 
 तसेच ही मालिका श्रीलंकेत खेळविण्यात येणार असून, येथूनच दोन्ही संघ त्यांच्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यास रवाना होतील. 

��"बाईक ऍम्ब्युलन्स" सुरू करण्याचा निर्णय :

चौकाचौकांत होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांना पर्याय म्हणून पुण्यात "बाईक ऍम्ब्युलन्स" सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 
 पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यावर नागपूर येथे तो राबविण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक अत्यवस्थ रुग्णाला "गोल्डन अवर"मध्ये उपचार मिळेल, असा विश्‍वास आरोग्य खात्याने व्यक्त केला आहे. 
 तसेच राज्यात सध्या 108 ही आपत्कालीन रुग्णसेवा कार्यान्वित आहे. 

��बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार भारताला मदत करणार :

देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार भारताला मदत करणार असून, या आठवड्यामध्ये भारत-जपान दरम्यान करार होणे अपेक्षित आहे. 
 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपान सरकार 8 अब्ज डॉलरचे कर्ज भारताला देणार असल्याचे जपानमधील "निक्केई" या आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. 
 जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे हे भारत दौऱ्यावर येत असून, ते याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत, या चर्चेनंतर संयुक्त निवेदनही प्रसिद्ध केले जाईल. 
 तसेच या रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 14.6 अब्ज डॉलर एवढा खर्च केला जाणार असून, त्यातील अर्ध्यापेक्षाही अधिक रक्कम जपान सरकारकडून मिळणाऱ्या मदतीतून उभारली जाणार आहे. 
 या बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद दरम्यान 505 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग उभारण्यात येईल. सध्या दोन्ही देशांमध्ये आर्थिक मदतीसंबंधीच्या अटींवर चर्चा सुरू असून, यातून दीर्घमुदतीच्या अर्थपुरवठ्यासाठी शंभर अब्ज येनचा आराखडा निश्‍चित केला जाईल. 
 तसेच जपान सरकारने याआधीही अनेक देशांना बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाची निर्यात केली आहे, 2007 मध्ये हे तंत्रज्ञान तैवानला देण्यात आले होते, इंडोनेशियामध्येही हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; पण तो चीनमुळे यशस्वी होऊ शकला नाही. 
 जपान सरकारकडून आर्थिक मदत मिळवणाऱ्यांच्या यादीमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत भारताने जपानकडून 4.45 ट्रिलियन येन एवढे कर्ज घेतले आहे. आता बुलेट ट्रेनसाठी भारताला कर्जाऊ दिली जाणारी रक्कमही मोठी आहे, इंडोनेशियाला यासाठी 4.72 ट्रिलियन येन एवढी रक्कम देण्यात आली होती. 
 एकदा भारताने बुलेट ट्रेनसाठी जपानी तंत्रज्ञान घ्यायचे ठरविल्यास त्यासाठी स्वतंत्र निविदा काढल्या जातील. यामध्ये प्रक्रियेमध्ये जे. आर. ईस्ट, कवास्की हेवी इंडस्ट्रीज आणि हिताची या कंपन्या सहभागी होण्याची शक्‍यता आहे. तसेच "जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी" आणि रेल्वे मंत्रालय यासाठी स्वतंत्र अभ्यास करणार आहे. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पास 2017 मध्ये सुरवात होणार असून, 2023 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

��लोकायुक्त व न्यायमूर्ती भास्कर राव यांचा पदाचा राजीनामा :

लोकायुक्त संस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून लोकायुक्त व न्यायमूर्ती भास्कर राव यांनी पदाचा राजीनामा दिला. 
 राज्यपाल वजुभाई वाला यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. कायदामंत्री टी. बी. जयचंद्र यांनी राव यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. 
 अलीकडेच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीच लोकायुक्तांनी राजीनामा दिला. 
 भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर लोकायुक्त भास्कर राव दीर्घ काळ रजेवर गेले होते. 135 दिवसांच्या रजेनंतर त्यांनी राजीनामा दिला. 

��मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा :

जगभरातील चित्रकारांना भुरळ घालणाऱ्या आणि एक गूढ बनून राहिलेल्या मोनालिसाच्या चित्राबाबत नवा दावा करण्यात आला आहे. 
 या चित्राच्या मागे अन्य एक चित्र असल्याचे फ्रान्सचे वैज्ञानिक पास्कल कोटे यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांच्या संशोधनातून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.
 संशोधक पास्कल यांनी रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा अभ्यास केला आहे. लियोनार्डो दा विंसीचे हे चित्र अनेक शतकांनंतरही एक उत्सुकता बनून राहिलेले आहे. 
 मोनालिसाच्या या चित्रामध्ये हास्याचे भाव नाहीत अथवा नजरही थेट समोर पाहणारी नाही, असे पास्कल यांचे म्हणणे आहे. 
 या चित्राचा 782 अब्ज डॉलरचा विमा आहे. दरम्यान, पास्कल यांचा हा दावा मोनालिसाचे छायाचित्र असणाऱ्या लुवरे संग्रहालयाने फेटाळला आहे. 
 संग्रहालयाने त्यांना फक्त संशोधनासाठी सहकार्य केले आहे. त्यातील निष्कर्षाशी संग्रहालय सहमत नाही. जगातील सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक असणारे आणि सर्वाधिक चर्चेतील हे लियोनार्डो दा विंसी यांचे चित्र 1503 ते 1506 च्या काळातील आहे. 
 मोनालिसाचे हास्य रहस्यमय असून यापूर्वीही अनेक दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत. फ्रान्सच्या लुवरे संग्रहालयात सध्या हे चित्र आहे.
 संशोधक पास्कल यांच्या दाव्यानुसार या चित्रात रिफ्लेक्टिव्ह लाईट टेक्नॉलॉजी (प्रतिबिंबित करणारा प्रकाश) वापरण्यात आली आहे. एका पेंटिंगवर दुसरे पेंटिंग असल्याने यातील हास्य रहस्यमय वाटते.

⌚दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन :

दक्षिण आफ्रिकन संघाच्या भारता विरुध्दच्या सुमार प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. 
 दक्षिण आफ्रिकन संघाची सध्याची खालावलेली कामगिरी पाहता माझा पुनरागमनाचा विचार सुरु असल्याचे स्मिथने सांगितले. 
 स्मिथ मास्टर्स चॅम्पियन्स लीगमध्ये वीरगो सुपर किंग्ज संघाकडून खेळणार आहे. 
 एमसीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मंच ठरु शकतो असे स्मिथने म्हटले आहे. 
 नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा अत्यंत दारुण पराभव केला. 

��दिनविशेष 

टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) स्वातंत्र्य दिन
 1961 : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.

 

No comments:

Post a Comment