चालू घडामोडी (4 डिसेंबर 2015)
जगातील 200 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 16 विद्यापीठे :
जगातील 200 सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील 16 विद्यापीठे आणि तंत्रसंस्थांचा समावेश आहे.
"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स"नंतर अनेक आयआयटी आपले स्थान टिकवून आहेत. काही आयआयटींचा नव्याने समावेश झाला आहे. गतवर्षी 25 व्या क्रमांकावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे स्थान वधारले असून ते 16 व्या क्रमांकावर आले आहे.
पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ 129 व्या क्रमांकावर आहे. मुंबई विद्यापीठाचा या यादीत समावेश नाही.
टाइम हायर एज्युकेशन ब्रिक्स आणि इमर्जिंग इकॉनॉमिक्स यांनी हे रॅंकिंग जाहीर केले आहे.
13 निकषांवर या विद्यापीठांची गुणवत्ता ठरवली जाते. यासाठी अध्यापन, संशोधन, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगांकडून येणारे उत्पन्न आदी निकष लावले जातात.
प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर असलेल्या चीनच्या अनुक्रमे पेकिंग आणि त्सिंगुहा विद्यापीठांनी आपले स्थान गतवर्षीप्रमाणेच अबाधित ठेवले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनंतर देशातील अनेक आयआयटींचा समावेश या रॅंकिंगमध्ये झाला आहे. मुंबई आयआयटीचे स्थान गतवर्षी 37 वे होते, ते यंदा 29 वे आहे.
मद्रास आणि दिल्ली आयआयटीने यंदा अनुक्रमे 36, 37 क्रमांकांवर बाजी मारली आहे. खरगपूर आयआयटी दुसऱ्या क्रमांकावरून घसरून 45 व्या क्रमांकावर गेली आहे. पंजाब विद्यापीठ यंदा 121 व्या क्रमांकावर घसरले आहे. गतवर्षी ते 39 व्या क्रमांकावर होते.
ब्रिटनमधील कोहिनूर हिऱ्यावर आता पाकिस्तानकडून हक्क :
भारताच्या इतिहासकालीन ऐश्वर्याचे प्रतीक असणाऱ्या ब्रिटनमधील कोहिनूर हिऱ्यावर आता पाकिस्तानकडून हक्क सांगण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये असलेला कोहिनूर हिरा पाकिस्तानमध्ये परत आणण्यात यावा, अशी याचिका पाकिस्तानी न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोहिनूर हिरा सन 1850 मध्ये राणी व्हिक्टोरियाला भेट देण्यात आला होता, त्यानंतर 1953 मध्ये राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या राजमुकुटात हा हिरा विराजमान झाला होता.
तसेच या हिऱ्याचे वजन 105 कॅरेट असून, त्याची किंमत अब्जांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. मात्र, राणी एलिझाबेथला हा हिरा स्वत:जवळ ठेवण्याचा कोणताही हक्क नाही.
कोहिनूर हिरा हा पंजाब प्रांताचा ऐतिहासिक ठेवा असल्याने त्याच्यावर येथील नागरिकांचा हक्क आहे, असे जाफरी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
फेसबुक हे चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले :
सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक हे चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहे. फेसबुकने पूरग्रस्तांसाठी 'सेफ' नावाने बटन उपलब्ध करून दिले आहे.
चेन्नईमध्ये सध्या मूसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. भारतामध्ये फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने फेसबुक पूरग्रस्तांसाठी धावून आले आहे.
फेसबुक वापरकर्त्याने आपल्या खात्यावरील 'सेफ' या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण सुरक्षित असल्याचा मजकूर मित्रांना आपोआप जाणार आहे.
तसेच गुगलनेही मुख्य पानावर 'रिसोर्स ऑफ चेन्नई फ्लड' नावाने लिंक उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या माहितीबरोबरच पूरासंबंधाची माहिती समजू शकणार आहे. शिवाय, पुराचा व्हिडिओही अपलोड केला आहे.
शहरातील नागरिक आपण सुरक्षित असल्याचे सांगण्याबरोबच पुराची माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक व ट्विटरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
दरम्यान, भारतासह, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपग्रस्त भागातील फेसबुक युजर्ससाठी फेसबुकने "सेफ्टी चेक" टूल उपलब्ध करून दिले होते. या टूलद्वारे भूकंपग्रस्त भागात असलेला युजर सुरक्षित असल्याचा संदेश मिळणार आहे.
न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांची 43वे सरन्यायाधीश म्हणून शपथ :
सर्वोच्च न्यायालतील सर्वात ज्येष्ठ असलेले न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर यांनी 43वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे बुधवारी निवृत्त झाले.
न्या. ठाकूर यांचा जन्म 4 जानेवारी 1952 रोजी झाला असून ते 4 जानेवारी 2017 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्याकडे वर्षापेक्षा थोडा जास्त काळ सरन्यायाधीशपदाचा कार्यभार राहील.
न्या. ठाकूर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पॉट फिक्सिंग आणि आयपीएलमधील सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट नियामक असलेल्या बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता.
स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिने नऊ स्पर्धा जिंकल्या :
भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या.
बीजिंग, वुहान, ग्वांगझू, अमेरिकन ओपन, विम्बल्डन, चार्ल्सटन, मियामी तसेच इंडियन वेल्स असे पाठोपाठ जेतेपद पटकविण्यात ही जोडी यशस्वी ठरली.
तामिळनाडूतील पूरग्रस्ताना एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा :
तामिळनाडूतील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत व पुनर्वसन कामांसाठी तातडीने एक हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
मदतकार्य सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांची रक्कम तत्काळ जारी करण्यात येईल. केंद्राने यापूर्वी जाहीर केलेल्या 940 कोटींच्या रकमेव्यतिरिक्तही रक्कम असेल, असे मोदी यांनी येथील 'आयएनएस अडय़ार' या नौदल तळावर सांगितले.
दिनविशेष :
जागतिक नौदल दिन
1958 : डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
1984 : चीनने नवीन संविधान अंगिकारले.
2008 : कॅनडाची संसद बरखास्त.
No comments:
Post a Comment