Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

चल वस्तु

चल वस्तु (Moving object)
==============
चल वस्तु :
विस्थापन :
विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदुनमधील सर्वात कमी अंतर होय.
चाल :
एखाद्य वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
चाल = एकूण कापलेले अंतर / एकूण लागलेला वेळ
SI पद्धतीने चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत cm/s मध्ये मोजतात.
खूप जास्त अंतरासाठी km/hr हे एकक वापरतात.
वेग :
'एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात'.
विस्थापनातील वेळेच्या संदर्भात होणार्‍या बदलाचा दर म्हणजे वेग होय.
वेग = विस्थापन / वेळ
चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात.
चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे.
गती सरल रेषेत असेल तर वेग आणि चाल यांचे मूल्य सारखेच असते.
अन्यथा चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी आहे.
एकरेषीय एकसमान व नैकसमान गती:
एकरेषीय एकसमान गती : ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतात.
नैकसमान गती : ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत असमान अंतर कापते, तिला नैकसमान गती म्हणतात.
उदा. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची गती.
त्वरण :
वेगामधील वेळेच्या संदर्भात होणार्‍या बदलला त्वरण म्हणतात.
त्वरण = वेग बदल / काल
a = v-u/t
v= अंतिम वेग
u= सुरवातीचा वेग
t= कालावधी
ज्यावेळी गतीच्या सुरवातीला वस्तु विराम अवस्थेत असते त्यावेळी सुरवातीचा वेग u=0
ज्यावेळी गतीच्या आखेरीस वस्तु विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग v=0
गतीविषयक समीकरणे :
1. वेग काळ संबंधी समीकरणे:
v=u+at
2.स्थिती काळ संबंधी समीकरणे :
s = ut+1/2 at2
3. स्थिती वेग संबंधी समीकरणे :
v2 =u2+2as

No comments:

Post a Comment